बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 1:01 am

मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.

येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.

तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.

समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

हे ठिकाणवावरसंस्कृतीकलानाट्यसंगीतइतिहासवाङ्मयकविताविनोदराहणीप्रवासदेशांतरज्योतिषफलज्योतिषराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटप्रकटनसद्भावनाअनुभवमाहितीवादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2014 - 1:53 am | प्रभाकर पेठकर

बेसनलाडूंची संस्थळीय ओळख आहेच. एक जुने-जाणते सदस्य म्हणून त्यांना भेटायला नक्कीच आवडलं असतं पण...
सध्या भारतवारी नसल्याने तुमच्या कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.. कट्ट्याची छायाचित्र आणि धावते समोलोचन येईलच. प्रतिक्षा आहे.

पिवळा डांबिस's picture

23 May 2014 - 2:46 am | पिवळा डांबिस

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
(कुणीतरी छुपा कॅमेरा लावून चित्रण करा रे, नक्की सांगतो इंटरेष्टिंग असणार!!!!!!)
*biggrin*

सुनील's picture

23 May 2014 - 6:10 am | सुनील

येण्याचा प्रयत्न केला जाईल.

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 8:28 am | आत्मशून्य
मुक्त विहारि's picture

23 May 2014 - 10:15 am | मुक्त विहारि

झक्कास...

(अरेरे, काय आमचे फुटके नशीब...तो टवाळ कार्टा तर भेटला नाहीच आणी आता "बेसन लाडू" ह्यांना भेटायचा पण चानस हुकला.)

असो,

ह्या दू:खावर एकच इलाज,

आज परत एक कट्टा करायला लागणार.

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 10:31 am | आत्मशून्य

कट्टा आहे आणि तुम्ही नाही म्हटले की फार चुकल्या चुकल्या सारखे होते बगा...

मुक्त विहारि's picture

23 May 2014 - 10:35 am | मुक्त विहारि

तसा उल्लेख आम्ही आमच्या "प्रोफाईल" मध्ये पण केला आहेच.

पोट नेईल तिथे जात असल्याने, काही गोष्टींना इलाज नाही.

अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी काही कारणाने क्यान्सल करावी लागल्याचे दु:ख या बातमीने अधिकच चरचरते आहे.
बेलांना भेटायची उत्सुकता होती. असो. शुभेच्छा!

अनुप ढेरे's picture

23 May 2014 - 10:39 am | अनुप ढेरे

लेखन विषय ज्योतिष, फलज्योतिष
=))
हे का?

टवाळ कार्टा's picture

23 May 2014 - 11:59 am | टवाळ कार्टा

कट्टा मुंबईच्या ईशान्येस नसल्याने माझा पास

समन्वयासाठी कुणाला व्यनि करायचा ??

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 May 2014 - 12:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला.

कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा...
बादवे :- विमे आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा बेला चा विषय आला होता,आणि बोलणेही झाले होते ते आठवले बघ मला ! ;)

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2014 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर

>>>> तेव्हा बेला चा विषय आला होता.

कॉलेजचे दिवस आठवले. आम्हा मित्रमंडळीत जवळ-जवळ रोजच 'बेला' चा विषय असायचा. आमच्या हातावर तुरी देऊन ती दुसर्‍याचाच हात धरून निघून गेली *sad* . आज त्या आठवणींनी गहिवरलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2014 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब, दिसायला कशी होती बेला ? तुम्हाला तिची कोणती गोष्ट आवडायची ? तुम्ही तिच्या कोणत्या गुणांवर फिदा असायचे, जरा व्य.नि. करा. ;)

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

25 May 2014 - 2:55 am | प्रभाकर पेठकर

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले).
मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे आणि घायाळ तरूणांकडे 'poor chaps' अशी नजर टाकून दृष्टीआड होणे.
आम्हाला सावरायला १० मिनिटे लागायची. ही अप्राप्य वस्तु आपल्या कॉलेजात का आणि कशी आली ह्याचा विचार करीत असतानाच ती दुसर्‍याची झाली. तिचं आयुष्य फळालं (असावं), आमचं वर्ष बुडालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2014 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे......आपल्या प्रेमाची चित्तरकथा लैच भारी आहे. ;)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2014 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

काका, यू टू ?... काकूंनी वाचलं तर काय म्हणतील ;)

प्रभाकर पेठकर's picture

25 May 2014 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

काकू म्हणतील, 'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।'

'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत. बंदर कितनाभी बुढा हो जाए, गुलाटी मारना नही भुलता।'
हा.हा.हा... चला ह्या बेला च्या निमित्त्याने का होइना काकाश्रींच्या त्या बेलाची आठवण आम्हा सर्वांना कळाली. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2014 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

विजुभाऊ's picture

26 May 2014 - 11:00 am | विजुभाऊ

मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणे
ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्‍याला मस्त फ्रेम करणारे.

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2014 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

>>>>ओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे.

ए नोई चॉलबे, विजूभाऊ, तुमची रश्मी तुमच्याजवळ. बेलाजवळ लुडबुड नाही करायची. हांssss!

बॅटमॅन's picture

26 May 2014 - 3:18 pm | बॅटमॅन

पेठकरकाकांचे वर्णन ऐकून

१. नाथा कामत आठवला.
२. 'तुम्हांला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे?' या चित्रगुप्तांच्या धाग्यावर विजुभौंनी दिलेले 'कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे' हे खल्लास उत्तर आठवले.

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2014 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून

'ते' पेठकरकाकांचे वर्णन नव्हते, 'बेला'चे होते. तुम्ही फारातफार 'पेठकरकाकांनी केलेले वर्णन म्हणू शकता.' अर्थात तुम्हाला तेच म्हणायचे होते ह्याची कल्पना आहेच (आता ही 'कल्पना कोण' विचारून जुन्या आठवणींमध्ये दगड टाकून तरंग उठवू नका). *stop*

शन्वार संध्याकाळ ठेवलात ते आपलं बरं केलंत हो!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 May 2014 - 11:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शनिवार संध्याकाळ म्हणजे सगळ्यांना सोईस्कर असा विचार केला. तसे ठिकाण मध्यवर्ती नाही ठेवता आले याची खंत आहे म्हणा ;-)

प्रदीप's picture

25 May 2014 - 7:21 pm | प्रदीप

दादर पूर्व आता मध्यवर्ती राहिले नाही, ह्याचा अचंबा वाटला. तसा तो बेलांनाही वाटणारच, ह्याची खात्री आहे.

असो (खरे तर नसो). कट्ट्याला शुभेच्छा!

-- सेंट्रल माटुंगाकर प्रदीप

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 May 2014 - 12:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दादरकरांनी माज दाखवायचे दिवस गेले. आता माज ठाणेकर दाखवणार. दादर आता गावकुसाबाहेर आहे. दादरकरांनी गतवैभवाचे दाखले न देता आपली पायरी ओळखून वागणे इष्ट ठरेल.

प्रदीप's picture

29 May 2014 - 12:35 pm | प्रदीप

माज वगैरे कडक शब्दांनी घाबरवलेत ना तुम्ही मला! दादरचा 'माज' वगैरे काही नाही. पण मुंबईत दादर एकमेकांना भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे, असे मला वाटते. मिपाकर आता मुलूंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे, दादरपेक्षा जास्त संख्येने आहेत तेव्हा आता निदान मिपांकरांपुरते मध्यवर्ती ठिकाण ठाण्याच्या दिशेने सरकले आहे, इतके म्हटले असते तरी चालण्यासारखे होते, नाही का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 May 2014 - 12:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे

It was sarcastic. I stay at dadar :-)

सुधांशुनूलकर's picture

23 May 2014 - 3:36 pm | सुधांशुनूलकर

अर्रर्रर्र

नेमका या शनि-रविवारी मुंबईबाहेर जाणार आहे, तेव्हा हा कट्टा हुकणार...

कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

साती's picture

24 May 2014 - 2:19 pm | साती

माझ्यातर्फे कुणीतरी चक्रपाणि ला नमस्कार सांगा.

उलटसुलट केले काळजाला जरासे
http://www.manogat.com/node/5637

असे साती म्हणत होती असे त्याला सांगा!
;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2014 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडु, धम्मकलाडु, तेलपाडू (तेलपाडू असा आयडी अजून कोणी घेतला नाही) अशा लोकांनी आंतरजालावर जरा हालचाल केली आहे. मजा आणली आहे. बेलाने कधी कधी मिपावर रंगत आणली आहे, सालं आपलं कधी त्यांच्याशी नीट जमलं नाही. पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो. वृत्तांत येऊ द्या कट्ट्याचा. :)

बेलाशेठ मिपावर लिहित चला. गझला बिझलांची वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 May 2014 - 10:23 am | विश्वनाथ मेहेंदळे

यावर एक खणखणित उत्तर दिले असते. पण त्याला तिसर्या मिनिटाला पंख लागतील याची खात्री आहे. त्यामुळे जाऊ दे. तूर्तास "गेट वेल सून" इतकेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2014 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच मीही म्हणतो.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 May 2014 - 12:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, ओैचित्यभंग तुम्ही केला आहे. कट्टयाच्या आमंत्रणासारख्या खेळीमेळीच्या धाग्यावर विनाकारण गरळ तुम्ही ओकताय आणि मला गेट वेल सून चा संदेश ?? उत्तम आहे. चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2014 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महोदय, प्राध्यापकानं आपल्याच खेळीमेळीच्या धाग्यावर असं का बरं औचित्यभंग केला असेल असं म्हणुन स्वत:कडे पाहता आलं तर पाहा. आपण टाकलेल्या अनेक नसत्या गरळी विसरुन जाता का आपण ? म्हणुन म्हणालो लवकर बरे व्हा.

आपल्याबद्दल काही मित्रमंडळी चांगली बोलणारी आहे, धड आपल्याला समजून सांगताही येत नाही आणि धड भांडताही येत नाही म्हणुन झालेला तो विनाकारण औचित्य भंग. नै तर फाट्यावर मारण्याबद्दल जालावर आमचाही कोणी हात धरु शकत नाही.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 May 2014 - 1:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओके,ओके... माफ करा हां.. तुम्ही माझ्याविरुद्ध काही कृती केलीत याचा अर्थ माझेच काहीतरी चुकले असणार इतके साधे तर्कशास्त्र मला कळले नाही.

स्पेशल 14 मधले तुम्ही, तुमचे काही चुकणे कसे शक्य आहे.माझीच मिश्टेक झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2014 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ओके,ओके... माफ करा हां..
माफ केलं तुम भी क्या याद करोगे... ;)

बाकी, स्पेशल १४ काय आहे ? आणि आमचं काही चुकणेच शक्य नाही, आम्ही माणुस नाही, म्हणजे आम्ही देव या संकल्पनेपेक्षा अजून काही वर असेल की जिथे माणसं चुकतच नाही त्या पातळीवरच्या कल्पनेवर आम्हाला नेल्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

26 May 2014 - 1:29 pm | प्यारे१

>>> तिसर्या मिनिटाला पंख लागतील

विष्णुपंत पागनीस मोड>>>

विमे, विमे असं काय करायचं बरं ते????
अरे त्या तिसर्‍या मिन्टाला प्रतिसाद उडेल ह्या भीतीसाठी आधीची दोन मिनिटं का बरं वाया दवडतोस?
येऊ दे बरं प्रतिसाद! आपण आपलं काम करावं, इतरांनी इतरांचं. आपण का बरं ठरवावं कुणी काय करायचं ते?

>>> विष्णुपंत पागनीस मोड समाप्त

;) ;)

>>आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे >>

मी काय म्हणतो प्राडॉ 'जे मिपाकर मिपावर लिहीतात अशाच लोकांसाठी कढ दाटून आणण्यास परवानगी आहे' अशी एक सूचना टाकून द्या ना खरडफळ्यावर!! नाय म्हणजे पुढच्या वेळेस कट्टे करताना आम्ही मिपावर कित्ती कित्ती प्रेम करतो हे दाखवायला का होईना मिपावर लिहीणार्‍यांसाठीच कढ दाटून आणतील लोक. पक्षी, तसं आणल्याचं दाखवतील. नै का?

बॅटमॅन's picture

26 May 2014 - 3:19 pm | बॅटमॅन

नाय तर काय! मिपावर कोणी अन कुणाबद्दल लिहावं याचेही नियम करा म्हणावं जरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2014 - 3:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं तर नाय करता येणार खरं तर... आपण तपशिलवार प्रतिसाद लिहिल्याने माझी चूक लक्षात आलीय. मिपावर लिहिणारे मिपाकर असो किंवा नसो एकदा लॉगीन केलं किंवा केलेलं नसो, नोंदणी केली की तो मिपाकर झाला. मिपाकरांचे कट्टे झाले पाहिजेत. खरं तर मला असा कढ कोणाला दाटून यावा, अशा टाईपची ती भावना होती. म्हणजे असं की...उदा. माझा धंदा मिपाला नाव ठेवण्यात चाललाय आणि मला मिपाकरांचा कट्टा व्हावा असं वाटणं म्हणजे जरा बरं दिसतं का ते या अर्थाने होतं. अर्थात तसं करणंही एक मिपाकर मिपाबद्दलची प्रेम भावना वाढवतोच असतो हे सालं मी गडबडीत विसरुन गेलो. सॉरी सेठ. :)

आपल्याकरिता हा विषय संपला.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 May 2014 - 12:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? भाषा जरा जपून वापरलीत तर बरे होईल. तोंडाचा पट्टा इतरांनाही सोडता येतो हे ध्यानात ठेवा. मुळात मला "बिरुटे certified मिपाप्रेमी" होण्यात रस नाही. मला तुमच्या (किंवा कुणाच्याच) अप्रुवलची गरज नाही.

राहिला मुद्दा टीकेचा. प्रगल्भ लोकं इतरांनी केलेल्या सकारात्मक टीकेचे स्वागत करतात. हा अनुभव मला मिपावरही अनेकदा आला आहे. पण सर्वांना हे झेपते असे नाही. त्यातून मी केलेली बरीचशी टीका ही अत्यंत निवडक लोकांवर होती. त्यामुळे हे साधारण सरकारवर टीका करणाऱ्याला राष्ट्रद्रोही म्हणण्यासारखे झाले. तुम्हाला हे सगळे कळावे अशी अपेक्षा नाहीये, ठेवण्यात अर्थ नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2014 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषा आमची तशी सौम्यच असते आणि माणसं पाहुन तिचा आम्ही योग्य वापर करतो. बाकी, मिपाप्रेमी होण्यासाठी अप्रुवल वगैरे लागत नसते, नाही. ती एक वृत्ती असते. तिथे कोणाच्याच प्रमाणपत्राची कोणाला गरज नसते. ती वृत्ती आपोआप दिसून येते.

बाकी, टीका ही प्रगल्भ असते, तिला एक सकारात्मक पैलूही असतो, हे कळत नसूनही, आणि समजावे अशी अपेक्षा नसूनही सांगितल्याबदल आपण वेळात वेळ काढून रक्त आटवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

24 May 2014 - 11:47 pm | राजेश घासकडवी

बेला हे मिपावरती भेटलेल्यांपैकी प्रत्यक्ष भेटलेलं पहिलं व्यक्तिमत्व. त्यानंतर बे एरियातल्या माझ्या वर्षभराच्या वास्तव्यात अनेक कट्टे झाले. तेव्हा बहुतेक वेळा त्याची भेट झालीच. त्यावेळी तो खुशालचेंडू तरुण होता, आता जरा सद्गृहस्थ वगैरे झालेला आहे असं ऐकून आहे.

पण, आता जे मिपाकर मिपावर लिहित नाही, त्यांच्यासाठी असे कढ दाटून येणे आणि तेही मिपावर अतिशय जीवापाड प्रेम करणा-या विमेकडून सखेद आश्चर्य आणि सुखद धक्का वगैरे वाटतो.

इथे कढ काढणं, सखेद आश्चर्य वगैरे शब्दप्रयोग का केले कळत नाही. अहो एकदा माणूस मिपाकर झाला की कायमचा मिपाकर असतो. आता उद्या तुम्ही 'राजेश घासकडवी मिपाकर नाही' म्हणाल! तरी बरं, अजून मी अधूनमधून का होईना, मिपावर लिहीत असतो. लिहायचं थांबलेले म्हटले तर चतुरंग, केसुगुर्जी, तात्या अभ्यंकर, नंदन अशा अनेक मोठ्या मोठ्या माजी संपादक आयडींबाबत 'या मिपाकरांच्या नावाने कसले कढ काढायचे?' असं म्हणता येईलच...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 May 2014 - 12:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

What else did you expect from Pra Doc ???

दिनेश सायगल's picture

25 May 2014 - 6:44 pm | दिनेश सायगल

तुमच्या स्वाक्षरीतल्या लिंका सगळ्याच मिपावरच्या लिखाणाच्या आहेत वाटते!

राजेश घासकडवी's picture

26 May 2014 - 11:24 am | राजेश घासकडवी

नाही. पहिली मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखाची आहे. दुसऱ्या दोन लिंका मिपावरच्या लिखाणाच्या नाहीयेत.

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि

कट्टा झाला तरी, व्रुत्तांत नाही.

अरेरे काय हे...

कुठे गेले ते लाइव्ह कट्ट्याचे दिवस?