स्मायली / Emoji

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
15 Sep 2020 - 8:53 pm

नमस्कार मिपाकरांनो,

सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो.

सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो. परंतु मिपावर आपल्या स्मार्टफोनवरून लिहिताना आपल्याला की-पॅड वर उपलब्ध असलेल्या एमोजींचा वापर करण्यावर मर्यादा येतात. प्रतिसादाचे केवळ शीर्षकच प्रकाशित होणे, गमतीनी किंवा उपहासाने दिलेल्या प्रतिसादामागच्या भावना वाचणाऱ्याला नीट न समजल्याने गैरसमज होणे अशा समस्या उद्भवतात. ते टाळण्यासाठी आपण :), :P, :( अशा वर्णाक्षरांचा वापर करतो.

आपल्या लेखनात किंवा प्रतिसादात आकर्षक अशा इमोजी दर्शवण्यासाठी आपल्याला HTML एमोजींचा वापर करणे सहज शक्य आहे.

सर्वप्रथम आपण HTML Emoji म्हणजे काय ते पाहू.

एमोजी ह्या दिसायला चित्र किंवा चिन्हांसारख्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या UTF-8 (Unicode) ह्या वर्ण संचातल्या अक्षरांचा समूह असतात. UTF-8 (Unicode) मध्ये जगातल्या जवळपास सर्व अक्षरांचा आणि चिन्हांचा अंतर्भाव आहे. आपण आज मरठी अथवा ईतर भारतीय भाषांमध्ये जे लिहितो, वाचतो ती ह्या UTF-8 (Unicode) चीच कृपा!

आता आपण पाहूयात की अशा हजारो आकर्षक एमोजींपैकी चेहऱ्यावरील भाव आणि हाताने किंवा हाताच्या बोटांनी केलेले निर्देश अशा आपल्या नित्य वापरात असलेल्या एमोजींचा वापर आपण मिपावर कशा प्रकारे करू शकतो. HTML Emoji दर्शवण्यासाठी &, #, ; आणि इंग्रजीतील अंक व अक्षरांचा वापर केला जातो. प्रत्येक एमोजीसाठी एक अनुक्रमांक असतो आणि त्या अनुक्रमांकाच्या आधी &# आणि नंतर ; जोडावे लागते.

उदाहरणार्थ स्मितहास्य 🙂 दर्शवण्यासाठी &# नंतर 128578 आणि शेवटी ; असे टंकले कि ते स्क्रीनवर 🙂 असे दिसेल.

चेहऱ्यावरील भाव दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128512 ने होते. हा अनुक्रमांक लक्षात ठेवण्यास तसा सोपा आहे. 128 kbps, 256 kbps, 512 kbps, 1 Mb अथवा 128 Mb, 256 Mb, 512 Mb, 1 Gb असे शब्द आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत त्यातले 128 आणि 512 हे दोन क्रमांक जोडले आणि त्याच्या आधी &# व शेवटी ; लावले कि झाली 😀 अशी हास्याची एमोजी तयार.

हाताच्या बोटांनी केलेले निर्देश (मुद्रा) दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128070 ने होते.

उदाहरणार्थ बोट वर केलेले 👆 दर्शवण्यासाठी
&# नंतर 128070 आणि शेवटी ; म्हणजे 👆 असे टंकले कि ते स्क्रीनवर 👆 असे दिसेल.

वरील स्मायली/एमोजींचा अनुक्रमांक वाढवत गेल्यास दिसणाऱ्या स्मायली अथवा एमोजी त्यानुसार बदलत जातात. स्मायलींसाठी 128512 ते 128580 व 129296 ते 129303 आणि हाताच्या बोटांनी केलेले निर्देश असलेल्या एमोजींसाठी 128070 ते 128080 व 129304 ते 129311 असे अनुक्रमांक आहेत. तर काही स्मायली आणि एमोजींचे क्रमांक विखुरलेले आहेत. सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी.

वर उदाहरणासाठी एमोजींचा आकार मोठा केला आहे, तशा मोठ्या आकारात एमोजी दर्शवण्यासाठी छोटासा कोड आहे.
🙂  असा कोड लिहिल्यास एमोजी
🙂 अशी मोठी दिसेल.
ह्या कोड मध्ये 50px च्या जागी 100px  🙂  असा बदल केल्यास ती
🙂 अशी आणखीन मोठी दिसेल.

मिपाकरांना उपयुक्त ठरू शकतील अशा नित्य वापरात येणाऱ्या काही निवडक स्मायली आणि एमोजींचे दोन तक्ते खाली देत आहे. त्यातले अनुक्रमांक थेट कॉपी-पेस्ट करून वापरता येतील.

स्मायली

एमोजी

तर मग आता एखादा धागा/प्रतिसाद आवडल्यास त्यावर व्यक्त होताना +१ ऐवजी 👍 टंकून 👍 असा प्रतिसाद देण्याची कल्पना कशी वाटते ते जरूर कळवा 😉

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 2:47 pm | टर्मीनेटर

विषय: ह्या रकान्यात HTML कोड चालत नाहीत. संस्थळाच्या सुरक्षेसाठी ते आवश्यक ठरते.
आपल्या प्रतिसादांसाठी मन:पूर्वक आभार 🙏

अनिंद्य's picture

17 Sep 2020 - 2:56 pm | अनिंद्य

हे बेस्ट झाले !

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2020 - 4:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

17 Sep 2020 - 6:49 pm | शाम भागवत

भारी आहे मान्य.

पण कुठे बघताय तेवढे तरी सांगा की.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2020 - 4:50 pm | चौथा कोनाडा

ह्ये भारी नाय, तर अति भारी आहे !

डोळे जास्तच रोमॅण्टिक वाटताहेत ..... दिवा़ळी२०२० मध्ये कथा येणार बहुधा !

तुषार काळभोर's picture

18 Sep 2020 - 5:24 am | तुषार काळभोर

सर्व डॉक्टरांच्या कोरोना माहिती धाग्याएवढाच २०२० मधला महत्त्वाचा धागा

आकार कसा वाढवायचा?
ताजा कलम :

सुमो's picture

18 Sep 2020 - 5:36 am | सुमो

वाढवण्यासाठी टर्मीनेटर यांनी  कोड दिलाय. तो वापरून आकार वाढवा.

किंवा
टॅग इथे प्रतिसाद खिडकीच्यावर Hn ह्या बॉक्स मधे आहे तो वापरा.

इमोजीचा नेहमीचा आकार 👌
हाच कोड सिलेक्ट करून, प्रतिसाद चौकटीच्यावरील १० व्या हेडिंग टॅग च्या चौकोनी बटणावर टिचकी मारून 👌

यामुळे
१ मुख्य म्हणजे टाइपिंग कमी होते.
२ हेडिंग टॅग उपलब्ध असल्याने कमी वेळात काम होते.
३ स्पॅन कोड आठवायला लागत नाही.
४ स्पॅन कोड टायपिंग मिस्टेक होत नाही.
२ मोठ्यातला मोठा आकार सगळ्यांचा सारखा येईल. बिरूटे सरांनाही मग बरे वाटेल. त्यांना पांचटपणा बिलकूल आवडत नाही. 👌 😉

सामोजी या सूचनेसाठी 🙏
शिवाय कालच्या कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीसाठी 🙏

गामाजी,
कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीतील चौथ्या व्हेरीएशन सेपरेटरची जरूरी नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2020 - 4:51 pm | चौथा कोनाडा

गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 5:54 pm | गामा पैलवान
गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 5:55 pm | गामा पैलवान
गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 5:56 pm | गामा पैलवान
गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 5:56 pm | गामा पैलवान

च्या ऐवजी  पण चालतं.

धन्यवाद! 🙏

-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2020 - 10:11 pm | चौथा कोनाडा

गापै, छान माहिती +१
धन्यवाद !

प्रशांत's picture

17 Sep 2020 - 8:42 pm | प्रशांत

रातराणी's picture

18 Sep 2020 - 4:10 am | रातराणी

👆 असेच म्हणते! 😀

बोका's picture

17 Sep 2020 - 9:31 pm | बोका
नीलस्वप्निल's picture

18 Sep 2020 - 4:01 pm | नीलस्वप्निल

गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 6:03 pm | गामा पैलवान

लोकहो,

खालील चार प्रतिसाद मिपा गंडल्यामुळे दिसंत आहेत :

https://www.misalpav.com/comment/1080688#comment-1080688
https://www.misalpav.com/comment/1080690#comment-1080690
https://www.misalpav.com/comment/1080691#comment-1080691
https://www.misalpav.com/comment/1080692#comment-1080692

मिपाने गफलत ( म्हणजे एरर) दाखवली, तरीही संदेश प्रविष्ट केला. त्यामुळे तो अर्धवट रीत्या प्रदर्शित झाला. असं चार वेळा घडल्याने चार अर्धवट संदेश दिसंत आहेत.

तसदीबद्दल क्षमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

18 Sep 2020 - 10:46 pm | Gk

&#128523

सॅनफ्लॉवर्स's picture

18 Sep 2020 - 11:16 pm | सॅनफ्लॉवर्स

खुप छान माहिती...!!! 😎

मदनबाण's picture

18 Sep 2020 - 11:48 pm | मदनबाण

लयं भारी ! वाखु साठवली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2020 - 5:25 pm | प्रकाश घाटपांडे

छद्मी हास्य व निरागस हास्य यातील भावनिकांचा फरक कसा करायचा?

नचिकेत जवखेडकर's picture

17 Nov 2020 - 7:58 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान लेख. वाचनखूण साठवली आहे.
तुमच्या लेखाला किंवा बाकी कोणालाच दोष द्यायचा अजिबात विचार नाही पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, इमोजी असा उच्चार नसून एमोजी असा खरा उच्चार आहे. जपानी भाषेमध्ये ही कांजी बघितली तर 絵文字 अशी दिसते. यातल्या "ए(絵)" या शब्दाचा अर्थ चित्र असा होतो तर "मोजी(文字)" म्हणजे अक्षर किंवा लिपी असा अर्थ आहे.
जपानी कळफलकावर टंकन करताना e हे अक्षर टंकलं की जपानीमधील "ए" हे अक्षर उमटतं. जपानी "इ" साठी i टंकावं लागतं

पुन्हा एकदा प्रांजळपणे सांगू इच्छितो की, कोणालाही दोष द्यायचा विचार नाही. 🙂

शाम भागवत's picture

17 Nov 2020 - 10:48 am | शाम भागवत

टर्मीनेटर's picture

17 Nov 2020 - 12:04 pm | टर्मीनेटर

खुप माहितीपूर्ण प्रतिसाद!
लवकरच लेखातील 'इमोजी' च्या ठिकाणी 'एमोजी' अशी सुधारणा करतो 👍

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2020 - 12:51 pm | चौथा कोनाडा

'एमोजी' म्हंजे इंगलिश शब्द झाला !

पण, आम्ही मराठीत इमोजी च म्हणनार जसं हॉस्पिटलचं इस्पितळ अन टेम्पररीचं टेम्परवारी !

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2020 - 10:57 am | अत्रुप्त आत्मा

ही माझी अट्यंट आवडती स्माय ली 😛

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2020 - 12:27 pm | चौथा कोनाडा

आमची पण ही .....

&#128567

कंजूस's picture

2 Jan 2021 - 8:40 pm | कंजूस

कंजूस's picture

3 Jan 2021 - 7:05 am | कंजूस

काही उपयोगी GIF Emoji
( निरनिराळ्या लेखातून कॉपी केलेल्या. )
Emoji
डोके आपटून घेणे
Banging head on the Wall

'डोके आपटून घेणे' emojiसाठी कोड

पळणारा घोडा

'पळणारा घोडा' emojiसाठी कोड

कुदळीने माती खोदणारे

'कुदळीने माती खोदणारे' emojiसाठी कोड

आगविझवे

'आगविझवे' emojiसाठी कोड

पिनाक's picture

5 Jan 2021 - 10:35 am | पिनाक

कुमार१'s picture

30 Mar 2022 - 11:06 am | कुमार१

घेऊन पाहतोय ....
मला चौकट छोटी हवीय.

अंतर

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2022 - 12:35 pm | चौथा कोनाडा

जमलीय की !
... म्हणजे जमलीय ना ? का आणखी छोटी हवीय ?

कुमार१'s picture

31 Mar 2022 - 12:38 pm | कुमार१

चौकट लहान झाली पण मला संपूर्ण भवताल निळा नको होता.
तो का झाला आहे हे कोणी सांगेल काय ?

"& #1 2 7 9 1 9;"

कर्नलतपस्वी's picture

11 Jun 2022 - 8:14 pm | कर्नलतपस्वी

&#128070
&#12870
&#128578

ASCII Code वापरून कधी DBASE मधे SOFTWARE चा FRONTEND बनवायचो. आता सर्व
"पुढचे पाठ मागचे सपाट".
धन्यवाद.

तर्कवादी's picture

22 Aug 2022 - 6:35 pm | तर्कवादी

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

22 Aug 2022 - 7:33 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान. आता माझे प्रतिसाद पण रंगीत होणार

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2022 - 1:18 pm | चौथा कोनाडा

येस्स.....

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2023 - 10:57 pm | चौथा कोनाडा

या पद्धतीने साईझ लहानच येतीय !
आधी खणखणीत यायची !

कॉलींग टर्मीनेटर ...... !!! ..... !!! ..... !!!

प्लिझ हेल्प टर्मीनेटर गुरुवर्य !

नेपाळात गेले आहेत टर्मीनेटर गुरुवर्य. नाडी ग्रंथ शोधायला.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2023 - 8:48 pm | चौथा कोनाडा

अरे व्वा भारी च की!
त्यांना नाडी लवकर सापडो या शुभेच्छा!

कंजूस's picture

12 Sep 2023 - 7:13 am | कंजूस

सुमो यांनी दिलेला h1 to tag चालतो आहे.
मिपावरून चार महीन्यात पूर्वी embed आणि span tag काढल्यामुळे चित्र मोठं होतं नाही.
👍 मोठं चित्र 👎
चाचणी

कंजूस's picture

12 Sep 2023 - 7:17 am | कंजूस

दुरुस्ती
वरचा प्रतिसाद तपासताना चित्र आणि स्माईली मोठ्या दिसतात पण प्रकाशित केल्यावर लहानच दिसते आहे.

असो. यात सुधारणा म्हणजे पाच दहा स्माईलींची ओळ टाकणे.

पाटीलभाऊ's picture

13 Sep 2023 - 2:16 pm | पाटीलभाऊ

आरे वाह...!
#128077

प्रकाशित करुन बघतो...स्माइली कशी दिसतेय ते...!