लेखकटर्मीनेटरयांनी मंगळवार, 15/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो,
सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो.
सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो. परंतु मिपावर आपल्या स्मार्टफोनवरून लिहिताना आपल्याला की-पॅड वर उपलब्ध असलेल्या एमोजींचा वापर करण्यावर मर्यादा येतात. प्रतिसादाचे केवळ शीर्षकच प्रकाशित होणे, गमतीनी किंवा उपहासाने दिलेल्या प्रतिसादामागच्या भावना वाचणाऱ्याला नीट न समजल्याने गैरसमज होणे अशा समस्या उद्भवतात. ते टाळण्यासाठी आपण :), :P, :( अशा वर्णाक्षरांचा वापर करतो.
आपल्या लेखनात किंवा प्रतिसादात आकर्षक अशा इमोजी दर्शवण्यासाठी आपल्याला HTML एमोजींचा वापर करणे सहज शक्य आहे.
सर्वप्रथम आपण HTML Emoji म्हणजे काय ते पाहू.
एमोजी ह्या दिसायला चित्र किंवा चिन्हांसारख्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या UTF-8 (Unicode) ह्या वर्ण संचातल्या अक्षरांचा समूह असतात. UTF-8 (Unicode) मध्ये जगातल्या जवळपास सर्व अक्षरांचा आणि चिन्हांचा अंतर्भाव आहे. आपण आज मरठी अथवा ईतर भारतीय भाषांमध्ये जे लिहितो, वाचतो ती ह्या UTF-8 (Unicode) चीच कृपा!
आता आपण पाहूयात की अशा हजारो आकर्षक एमोजींपैकी चेहऱ्यावरील भाव आणि हाताने किंवा हाताच्या बोटांनी केलेले निर्देश अशा आपल्या नित्य वापरात असलेल्या एमोजींचा वापर आपण मिपावर कशा प्रकारे करू शकतो. HTML Emoji दर्शवण्यासाठी &, #, ; आणि इंग्रजीतील अंक व अक्षरांचा वापर केला जातो. प्रत्येक एमोजीसाठी एक अनुक्रमांक असतो आणि त्या अनुक्रमांकाच्या आधी &# आणि नंतर ; जोडावे लागते.
उदाहरणार्थ स्मितहास्य 🙂 दर्शवण्यासाठी &# नंतर 128578 आणि शेवटी ; असे टंकले कि ते स्क्रीनवर 🙂 असे दिसेल.
चेहऱ्यावरील भाव दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128512 ने होते. हा अनुक्रमांक लक्षात ठेवण्यास तसा सोपा आहे. 128 kbps, 256 kbps, 512 kbps, 1 Mb अथवा 128 Mb, 256 Mb, 512 Mb, 1 Gb असे शब्द आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत त्यातले 128 आणि 512 हे दोन क्रमांक जोडले आणि त्याच्या आधी &# व शेवटी ; लावले कि झाली 😀 अशी हास्याची एमोजी तयार.
हाताच्या बोटांनी केलेले निर्देश (मुद्रा) दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128070 ने होते.
उदाहरणार्थ बोट वर केलेले 👆 दर्शवण्यासाठी
&# नंतर 128070 आणि शेवटी ; म्हणजे 👆 असे टंकले कि ते स्क्रीनवर 👆 असे दिसेल.
वरील स्मायली/एमोजींचा अनुक्रमांक वाढवत गेल्यास दिसणाऱ्या स्मायली अथवा एमोजी त्यानुसार बदलत जातात. स्मायलींसाठी 128512 ते 128580 व 129296 ते 129303 आणि हाताच्या बोटांनी केलेले निर्देश असलेल्या एमोजींसाठी 128070 ते 128080 व 129304 ते 129311 असे अनुक्रमांक आहेत. तर काही स्मायली आणि एमोजींचे क्रमांक विखुरलेले आहेत. सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी.
वर उदाहरणासाठी एमोजींचा आकार मोठा केला आहे, तशा मोठ्या आकारात एमोजी दर्शवण्यासाठी छोटासा कोड आहे.
<span style="font-size:50px"> 🙂 </span> असा कोड लिहिल्यास एमोजी
🙂 अशी मोठी दिसेल.
ह्या कोड मध्ये 50px च्या जागी 100px <span style="font-size:100px"> 🙂 </span> असा बदल केल्यास ती
🙂 अशी आणखीन मोठी दिसेल.
मिपाकरांना उपयुक्त ठरू शकतील अशा नित्य वापरात येणाऱ्या काही निवडक स्मायली आणि एमोजींचे दोन तक्ते खाली देत आहे. त्यातले अनुक्रमांक थेट कॉपी-पेस्ट करून वापरता येतील.
स्मायली
😀
😀
😁
😁
😂
😂
😄
😄
😅
😅
😆
😆
😇
😇
😈
😈
😉
😉
😊
😊
😋
😋
😌
😌
😍
😍
😎
😎
😏
😏
😐
😐
😑
😑
😒
😒
😓
😓
😔
😔
😕
😕
😖
😖
😗
😗
😘
😘
😙
😙
😚
😚
😛
😛
😜
😜
😝
😝
😞
😞
🤣
🤣
😷
😷
एमोजी
👆
👆
👇
👇
👈
👈
👉
👉
👊
👊
👋
👋
👌
👌
👍
👍
👎
👎
👏
👏
👐
👐
🙏
🙏
🤚
🤚
🤛
🤛
🤜
🤜
🤝
🤝
🤞
🤞
🤟
🤟
तर मग आता एखादा धागा/प्रतिसाद आवडल्यास त्यावर व्यक्त होताना +१ ऐवजी 👍 टंकून 👍 असा प्रतिसाद देण्याची कल्पना कशी वाटते ते जरूर कळवा 😉
इमोजीचा नेहमीचा आकार 👌
हाच कोड सिलेक्ट करून, प्रतिसाद चौकटीच्यावरील १० व्या हेडिंग टॅग च्या चौकोनी बटणावर टिचकी मारून
👌
यामुळे
१ मुख्य म्हणजे टाइपिंग कमी होते.
२ हेडिंग टॅग उपलब्ध असल्याने कमी वेळात काम होते.
३ स्पॅन कोड आठवायला लागत नाही.
४ स्पॅन कोड टायपिंग मिस्टेक होत नाही.
२ मोठ्यातला मोठा आकार सगळ्यांचा सारखा येईल. बिरूटे सरांनाही मग बरे वाटेल. त्यांना पांचटपणा बिलकूल आवडत नाही. 👌
😉
सामोजी या सूचनेसाठी 🙏
शिवाय कालच्या कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीसाठी
🙏
गामाजी,
कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीतील चौथ्या व्हेरीएशन सेपरेटरची जरूरी नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल.
🙏
खूप छान लेख. वाचनखूण साठवली आहे.
तुमच्या लेखाला किंवा बाकी कोणालाच दोष द्यायचा अजिबात विचार नाही पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, इमोजी असा उच्चार नसून एमोजी असा खरा उच्चार आहे. जपानी भाषेमध्ये ही कांजी बघितली तर 絵文字 अशी दिसते. यातल्या "ए(絵)" या शब्दाचा अर्थ चित्र असा होतो तर "मोजी(文字)" म्हणजे अक्षर किंवा लिपी असा अर्थ आहे.
जपानी कळफलकावर टंकन करताना e हे अक्षर टंकलं की जपानीमधील "ए" हे अक्षर उमटतं. जपानी "इ" साठी i टंकावं लागतं
.
पुन्हा एकदा प्रांजळपणे सांगू इच्छितो की, कोणालाही दोष द्यायचा विचार नाही. 🙂
दुरुस्ती
वरचा प्रतिसाद तपासताना चित्र आणि स्माईली मोठ्या दिसतात पण प्रकाशित केल्यावर लहानच दिसते आहे.
असो. यात सुधारणा म्हणजे पाच दहा स्माईलींची ओळ टाकणे.
प्रतिक्रिया
@ असा मी असामी | गामा पैलवान
झकास !
हे भारी आहे
भारी आहे मान्य.
In reply to हे भारी आहे by ज्ञानोबाचे पैजार
ह्ये भारी नाय !
In reply to हे भारी आहे by ज्ञानोबाचे पैजार
झक्कास!!
आकार
In reply to झक्कास!! by तुषार काळभोर
🚵♂
<h1>🚵‍♂</h1>स्पॅनच्या ऐवजी हेडिंग टॅग मस्त
In reply to आकार by सुमो
👌
यामुळे १ मुख्य म्हणजे टाइपिंग कमी होते. २ हेडिंग टॅग उपलब्ध असल्याने कमी वेळात काम होते. ३ स्पॅन कोड आठवायला लागत नाही. ४ स्पॅन कोड टायपिंग मिस्टेक होत नाही. २ मोठ्यातला मोठा आकार सगळ्यांचा सारखा येईल. बिरूटे सरांनाही मग बरे वाटेल. त्यांना पांचटपणा बिलकूल आवडत नाही. 👌😉
सामोजी या सूचनेसाठी 🙏 शिवाय कालच्या कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीसाठी🙏
गामाजी, कपाळावर हात मारलेल्या पुरूषाच्या इमोजीतील चौथ्या व्हेरीएशन सेपरेटरची जरूरी नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल. 🙏धन्यवाद !
In reply to स्पॅनच्या ऐवजी हेडिंग टॅग मस्त by शाम भागवत
👌
अतिरिक्त : <span> च्या ऐवजी <a> पण चालतं.
In reply to आकार by सुमो
अतिरिक्त : span च्या ऐवजी a पण चालतं.
In reply to आकार by सुमो
<span> च्या ऐवजी <a> पण चालतं
In reply to आकार by सुमो
अधिक माहिती ....
In reply to आकार by सुमो
अधिक माहिती : <span> च्या ऐवजी <a> पण चालतं.
In reply to आकार by सुमो
गापै, छान माहिती +१ धन्यवाद !
In reply to अधिक माहिती : <span> च्या ऐवजी <a> पण चालतं. by गामा पैलवान
वाचणखुण साठवण्यात आली..
+1
In reply to वाचणखुण साठवण्यात आली.. by प्रशांत
छान
+१
चुकीची दुरुस्ती
.
खुप छान माहिती
लयं भारी ! वाखु साठवली आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूछद्मी हास्य व निरागस हास्य
खूप छान लेख. वाचनखूण साठवली
एमोजी
In reply to खूप छान लेख. वाचनखूण साठवली by नचिकेत जवखेडकर
👍
@नचिकेत जवखेडकर
In reply to खूप छान लेख. वाचनखूण साठवली by नचिकेत जवखेडकर
'एमोजी' म्हंजे इंगलिश शब्द
In reply to @नचिकेत जवखेडकर by टर्मीनेटर
ही माझी अट्यंट आवडती स्माय ली
आमची पण ही .....
In reply to ही माझी अट्यंट आवडती स्माय ली by अत्रुप्त आत्मा
मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब
मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब
मोठीच सोय केलीत टर्मीनेटर साहेब
या वर्षी नको.
GIF EMOJI
( निरनिराळ्या लेखातून कॉपी केलेल्या. )
Emoji डोके आपटून घेणे
'डोके आपटून घेणे' emojiसाठी कोड
<img alt="Banging head on the Wall" width="98" height="49" src="http://www.sherv.net/cm/emoticons/yellow-hd/banging-head-on-the-wall-sm…" />
---------------------
पळणारा घोडा
'पळणारा घोडा' emojiसाठी कोड
<img width="98" height="98" typeof="foaf:Image" src="https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/pictures/picture-24.gif"/>
--------------------
कुदळीने माती खोदणारे
'कुदळीने माती खोदणारे' emojiसाठी कोड
<img width="198" height="99" src="http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/digger-smiley-emoticon.gif" />
---------–----------–-
आगविझवे
'आगविझवे' emojiसाठी कोड
<img width="98" height="98" src="http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-accident-smiley-emoticon…" />
------------------------
विषय
चाचणी
अंतर
जमलीय की !
In reply to चाचणी by हेमंतकुमार
हो पण...
In reply to जमलीय की ! by चौथा कोनाडा
ही इमोजी बर्याच वेळेस उपयोगाला येते
🎯
भारीच
धन्यवाद ..
छान. आता माझे प्रतिसाद पण रंगीत होणार
येस!
In reply to छान. आता माझे प्रतिसाद पण रंगीत होणार by ॲबसेंट माइंडेड…
या पद्धतीने साईझ लहानच येतीय
नेपाळात गेले आहेत टर्मीनेटर
In reply to या पद्धतीने साईझ लहानच येतीय by चौथा कोनाडा
अरे व्वा भारी च की!
In reply to नेपाळात गेले आहेत टर्मीनेटर by कंजूस
सुमो यांनी दिलेला h1 to tag
👍 मोठं चित्र 👎
चाचणीदुरुस्ती
In reply to सुमो यांनी दिलेला h1 to tag by कंजूस
एक नम्बर