स्मायली / Emoji

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
15 Sep 2020 - 8:53 pm

नमस्कार मिपाकरांनो,

सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो.

सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो. परंतु मिपावर आपल्या स्मार्टफोनवरून लिहिताना आपल्याला की-पॅड वर उपलब्ध असलेल्या एमोजींचा वापर करण्यावर मर्यादा येतात. प्रतिसादाचे केवळ शीर्षकच प्रकाशित होणे, गमतीनी किंवा उपहासाने दिलेल्या प्रतिसादामागच्या भावना वाचणाऱ्याला नीट न समजल्याने गैरसमज होणे अशा समस्या उद्भवतात. ते टाळण्यासाठी आपण :), :P, :( अशा वर्णाक्षरांचा वापर करतो.

आपल्या लेखनात किंवा प्रतिसादात आकर्षक अशा इमोजी दर्शवण्यासाठी आपल्याला HTML एमोजींचा वापर करणे सहज शक्य आहे.

सर्वप्रथम आपण HTML Emoji म्हणजे काय ते पाहू.

एमोजी ह्या दिसायला चित्र किंवा चिन्हांसारख्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या UTF-8 (Unicode) ह्या वर्ण संचातल्या अक्षरांचा समूह असतात. UTF-8 (Unicode) मध्ये जगातल्या जवळपास सर्व अक्षरांचा आणि चिन्हांचा अंतर्भाव आहे. आपण आज मरठी अथवा ईतर भारतीय भाषांमध्ये जे लिहितो, वाचतो ती ह्या UTF-8 (Unicode) चीच कृपा!

आता आपण पाहूयात की अशा हजारो आकर्षक एमोजींपैकी चेहऱ्यावरील भाव आणि हाताने किंवा हाताच्या बोटांनी केलेले निर्देश अशा आपल्या नित्य वापरात असलेल्या एमोजींचा वापर आपण मिपावर कशा प्रकारे करू शकतो. HTML Emoji दर्शवण्यासाठी &, #, ; आणि इंग्रजीतील अंक व अक्षरांचा वापर केला जातो. प्रत्येक एमोजीसाठी एक अनुक्रमांक असतो आणि त्या अनुक्रमांकाच्या आधी &# आणि नंतर ; जोडावे लागते.

उदाहरणार्थ स्मितहास्य 🙂 दर्शवण्यासाठी &# नंतर 128578 आणि शेवटी ; असे टंकले कि ते स्क्रीनवर 🙂 असे दिसेल.

चेहऱ्यावरील भाव दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128512 ने होते. हा अनुक्रमांक लक्षात ठेवण्यास तसा सोपा आहे. 128 kbps, 256 kbps, 512 kbps, 1 Mb अथवा 128 Mb, 256 Mb, 512 Mb, 1 Gb असे शब्द आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत त्यातले 128 आणि 512 हे दोन क्रमांक जोडले आणि त्याच्या आधी &# व शेवटी ; लावले कि झाली 😀 अशी हास्याची एमोजी तयार.

हाताच्या बोटांनी केलेले निर्देश (मुद्रा) दर्शवण्यासाठी असलेल्या एमोजींच्या अनुक्रमांकांची सुरुवात 128070 ने होते.

उदाहरणार्थ बोट वर केलेले 👆 दर्शवण्यासाठी
&# नंतर 128070 आणि शेवटी ; म्हणजे 👆 असे टंकले कि ते स्क्रीनवर 👆 असे दिसेल.

वरील स्मायली/एमोजींचा अनुक्रमांक वाढवत गेल्यास दिसणाऱ्या स्मायली अथवा एमोजी त्यानुसार बदलत जातात. स्मायलींसाठी 128512 ते 128580 व 129296 ते 129303 आणि हाताच्या बोटांनी केलेले निर्देश असलेल्या एमोजींसाठी 128070 ते 128080 व 129304 ते 129311 असे अनुक्रमांक आहेत. तर काही स्मायली आणि एमोजींचे क्रमांक विखुरलेले आहेत. सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी.

वर उदाहरणासाठी एमोजींचा आकार मोठा केला आहे, तशा मोठ्या आकारात एमोजी दर्शवण्यासाठी छोटासा कोड आहे.
<span style="font-size:50px"> &#128578; </span> असा कोड लिहिल्यास एमोजी
🙂 अशी मोठी दिसेल.
ह्या कोड मध्ये 50px च्या जागी 100px <span style="font-size:100px"> &#128578; </span> असा बदल केल्यास ती
🙂 अशी आणखीन मोठी दिसेल.

मिपाकरांना उपयुक्त ठरू शकतील अशा नित्य वापरात येणाऱ्या काही निवडक स्मायली आणि एमोजींचे दोन तक्ते खाली देत आहे. त्यातले अनुक्रमांक थेट कॉपी-पेस्ट करून वापरता येतील.

स्मायली

&#128512;
😀

&#128513;
😁

&#128514;
😂

&#128516;
😄

&#128517;
😅

&#128518;
😆

&#128519;
😇

&#128520;
😈

&#128521;
😉

&#128522;
😊

&#128523;
😋

&#128524;
😌

&#128525;
😍

&#128526;
😎

&#128527;
😏

&#128528;
😐

&#128529;
😑

&#128530;
😒

&#128531;
😓

&#128532;
😔

&#128533;
😕

&#128534;
😖

&#128535;
😗

&#128536;
😘

&#128537;
😙

&#128538;
😚

&#128539;
😛

&#128540;
😜

&#128541;
😝

&#128542;
😞

&#129315;
🤣

&#128567;
😷

एमोजी

&#128070;
👆

&#128071;
👇

&#128072;
👈

&#128073;
👉

&#128074;
👊

&#128075;
👋

&#128076;
👌

&#128077;
👍

&#128078;
👎

&#128079;
👏

&#128080;
👐

&#128591;
🙏

&#129306;
🤚

&#129307;
🤛

&#129308;
🤜

&#129309;
🤝

&#129310;
🤞

&#129311;
🤟

तर मग आता एखादा धागा/प्रतिसाद आवडल्यास त्यावर व्यक्त होताना +१ ऐवजी &#128077; टंकून 👍 असा प्रतिसाद देण्याची कल्पना कशी वाटते ते जरूर कळवा 😉

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 Sep 2020 - 9:04 pm | श्रीरंग_जोशी

या माहितीसाठी खूप धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

15 Sep 2020 - 9:06 pm | टर्मीनेटर

धन्यवाद 🙏

सोत्रि's picture

15 Sep 2020 - 9:20 pm | सोत्रि

👍

- (आभारी) सोकाजी

शा वि कु's picture

15 Sep 2020 - 9:25 pm | शा वि कु

&#128079

अथांग आकाश's picture

15 Sep 2020 - 9:36 pm | अथांग आकाश

अरे वा! छान माहिती!! वाचनखुण साठवली आहे!!!

👌

आता धागा आवडला तर 👍 आणि नाही आवडला तर 👎 द्यायची सोय झाली 🤣

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:22 am | शाम भागवत

👍

डॅनी ओशन's picture

15 Sep 2020 - 10:54 pm | डॅनी ओशन

हि फारच मोठी सोया झाली. फार्फार आभार.
🙏

डॅनी ओशन's picture

15 Sep 2020 - 10:58 pm | डॅनी ओशन

समहाऊ या धाग्यावरचे सगळे दुव्यांची अक्षरे नेहमीप्रमाणे तांबडे दिसत नाहीयेत, तर नॉर्मल काळे दिसतायत.

कंजूस's picture

16 Sep 2020 - 9:03 pm | कंजूस

Trial

सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी.

कंजूस's picture

16 Sep 2020 - 9:04 pm | कंजूस

सर्व HTML Emoji चे अनुक्रमांक जाणून घ्यायचे असल्यास ह्या पानास अवश्य भेट द्यावी.

सुमो's picture

16 Sep 2020 - 4:51 am | सुमो

माहिती. &#128076

वाखु साठवतो आहे.

👍

चामुंडराय's picture

16 Sep 2020 - 5:20 am | चामुंडराय

🙏 🙏
झकास काम झाले हे !

🙏 हे चिन्ह (इमोजी) खरंतर मुळात high five साठी तयार केले असावे का?
मला अशी दाट शंका आहे परंतु भारतीयांनी ते नमस्कार किंवा नमस्ते अशा अर्थाने वापरायला सुरवात केली आहे.
कारण एव्हढंच की हे चिन्ह दोन हात जोडून केलेल्या नमस्कार किंवा नमस्ते सारखे दिसते.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 2:15 pm | टर्मीनेटर

@ चामुंडराय प्रतिसादासाठी आभारी आहे.

🙏 हे चिन्ह (इमोजी) खरंतर मुळात high five साठी तयार केले असावे का?

आपला प्रश्न रास्त आहे पण हे चिन्ह high five साठी तयार केलेले नसावे. कारण जर मोबाईलवर बघितल्यास दोन्ही हातांची बोटे स्पष्ट दिसतात.(IOS पेक्षा Android वर बोटे अधिक स्पष्ट दिसतात.) त्यात करंगळी समोर करंगळी आलेली दिसते. जर high five साठी हे चिन्ह असते तर असे न होता एका हाताच्या अंगठ्या समोर दुसऱ्या हाताची करंगळी दिसेल. ज्या पद्धतीने डाव्या आणि उजव्या हाताची बोटे समोरासमोर चिकटलेली दिसतात त्यावरून हे दोन्ही हात एकाच व्यक्तीने नमस्कार करण्यासाठी जोडले आहेत असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे ठाम पणे केलेला दावा नाही 🙂

कंजूस's picture

16 Sep 2020 - 7:05 am | कंजूस

The website encountered an unexpected error. Please try again later.
हा मेसेज येतो.

राघवेंद्र's picture

16 Sep 2020 - 9:03 am | राघवेंद्र

विषय: मध्ये अक्षरात लिहा. तिथे इमोजी चालत नाही.

कंजूस's picture

16 Sep 2020 - 10:16 am | कंजूस

अरेच्या हे विसरलोच. विषय कोरा ठेवला तर Comment मधली पहिली ओळ विषयात घुसते.

राघवेंद्र's picture

16 Sep 2020 - 9:00 am | राघवेंद्र

धन्यवाद !!!

राघवेंद्र's picture

16 Sep 2020 - 9:01 am | राघवेंद्र

आवडले.

👌

निनाद's picture

16 Sep 2020 - 9:14 am | निनाद

🤝

निनाद's picture

16 Sep 2020 - 9:16 am | निनाद

👌

कंजूस's picture

16 Sep 2020 - 10:12 am | कंजूस

अरेच्या हे विसरलोच. विषय कोरा ठेवला तर Comment मधली पहिली ओळ विषयात घुसते.
😞

डीप डाईव्हर's picture

16 Sep 2020 - 11:01 am | डीप डाईव्हर

लेख आवडला 👍 नवीन माहिती मिळाली

🙏

प्रसाद_१९८२'s picture

16 Sep 2020 - 11:02 am | प्रसाद_१९८२

👍

प्रसाद_१९८२'s picture

16 Sep 2020 - 11:03 am | प्रसाद_१९८२

👍

गोरगावलेकर's picture

16 Sep 2020 - 12:34 pm | गोरगावलेकर

🙏

प्रसाद_१९८२'s picture

16 Sep 2020 - 12:41 pm | प्रसाद_१९८२

या धाग्यावरिल प्रतिसादांचा व त्यातील अक्षरांचा रंग लॉगआऊट असल्याप्रमाणे का दिसतोय ?

त्यामुळेच मायबोलीने इमोजींवर बंदी घातली असेल काय?

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:27 pm | शाम भागवत

मी दुसऱ्या दोन तीन धाग्यांवर इमोजी देऊन पाहिल्या. तिथेतरी असा काही प्रश्न उद्भवला नाही.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 2:27 pm | टर्मीनेटर

हो, ह्या 🤦 इमोजीचा अनुक्रमांक &#129318; असा आहे. अर्थात तुम्ही तो मिळवला आहेच 😀

संजय पाटिल's picture

22 Sep 2020 - 11:18 am | संजय पाटिल

🤦

@ सोत्री, शा वि कु आणि अथांग आकाश प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

@ सुमो, राघवेंद्र, निनाद आणि गोरगावलेकर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

@ कंजूस, डीप डाईव्हर आणि प्रसाद_१९८२ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

विद्याधर३१'s picture

16 Sep 2020 - 1:55 pm | विद्याधर३१

&#128077

समहाऊ या धाग्यावरचे सगळे दुव्यांची अक्षरे नेहमीप्रमाणे तांबडे दिसत नाहीयेत, तर नॉर्मल काळे दिसतायत.

या धाग्यावरिल प्रतिसादांचा व त्यातील अक्षरांचा रंग लॉगआऊट असल्याप्रमाणे का दिसतोय ?

मी दुसऱ्या दोन तीन धाग्यांवर इमोजी देऊन पाहिल्या. तिथेतरी असा काही प्रश्न उद्भवला नाही.

डॅनी ओशन, प्रसाद_१९८२ आणि शाम भागवतजी ही समस्या नसून ह्या लेखा पुरता पेज डिझाईन मध्ये बदल केला आहे म्हणून ते असे दिसत आहे. 😀

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2020 - 2:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

😀 😁 😂 😄 😅 😆 😇 😈 😉 😊 😋 😌😍 😎 😏 😐 😑 😒
😓 😔 😕 😖 😗 😘 😙 😚 😛 😜 😝 😞 🤣 😷

🙏पैजारबुवा, 🙏

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 2:21 pm | टर्मीनेटर

@ विद्याधर३१ आणि पैजारबुवा प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

पैजारबुवा प्रतिसादात स्मायलींचा वापर अगदी घाऊक प्रमाणात केला आहे 😀

चौथा कोनाडा's picture

16 Sep 2020 - 5:14 pm | चौथा कोनाडा

👌

अतिशय एक नंबर माहिती !
टर्मीनेटर बॉस, तुमी सर्वांची कायमची सोय केलीत !

असा मी असामी's picture

16 Sep 2020 - 5:21 pm | असा मी असामी

&#128077
विषय: मध्ये स्मायली दिसत नाही

गामा पैलवान's picture

16 Sep 2020 - 10:09 pm | गामा पैलवान

असा मी असामी,

खरंय. मी विषयात हास्याकृती चिकटवायचा प्रयत्न केला तर पूर्वदर्शनात ठीक दिसलं :

https://i.imgur.com/LrDUPm2.jpeg

मात्र प्रत्यक्ष प्रस्तुतीत मिपा गफलत ( = एरर) दाखवतं.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2020 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक आभार सेठ. 👍
स्मायल्या एका विशिष्ट आकारातच असले पाहिजेत.
नाय तर, लोक फार पांचटपणा करतात, असा अनुभव आहे.

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

16 Sep 2020 - 7:07 pm | वामन देशमुख

टर्मिनेटर साहेब, भारी आयडिया दिलीत राव!
इमोजीज अश्या वापरायच्या हे लक्षातच आलं नव्हतं.
ह्या घ्या सगळ्या स्माईलीज -

var emojies = new Array();
var emojiCode = 128512;
for (var i = 0; i <= 79; i++) {
var output = "&#" + emojiCode + ";";
emojies[i] = output;
emojiCode++;
}
document.getElementById("mipa").innerHTML = emojies;

गामा पैलवान's picture

16 Sep 2020 - 9:46 pm | गामा पैलवान

मी हिला शोधंत होतो .... &#x1F447;

&#x1F926;

बाई सापडली, पण माणूस सापडला नाय &#x1F61E;

-गा.पै.

सुमो's picture

17 Sep 2020 - 11:31 am | सुमो

🤦‍♂️

कोड

&#129318;&#8205;&#9794;&#65039;

गामा पैलवान's picture

17 Sep 2020 - 1:07 pm | गामा पैलवान

सुमो,

जमलं बरं ! 🙂

🤦‍♂

&‌#129318;&‌#8205;&‌#9794; हे तीनंच कोड पुरले.

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 2:37 pm | टर्मीनेटर

अरे वाह! छान शोधून काढलीत. 👍

डीप डाईव्हर's picture

17 Sep 2020 - 11:58 pm | डीप डाईव्हर

सुमो साहेब ही emoji 👍 आणी 🙏 नंतर सर्वात जास्ती वापरली जाणार यात शंका नाही 😁
कोड साठी आभारी आहे 🙏

🤦‍♂️
वरची मला आवडली, सध्या इथे खूप वेळा वापरता येईल
😂😂😂

@ चौथा कोनाडा, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, वामन देशमुख
आपल्या प्रतिसादांसाठी मन:पूर्वक आभार 🙏