दु:ख अवघा धृवतारा मागते
- Read more about दु:ख अवघा धृवतारा मागते
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मागचा सारा चुकारा मागते
दु: ख अवघा धृवतारा मागते
थेंबही नाही उभ्या रानात अन
जिंदगानी शेतसारा मागते
केवढे जहरुन हे गेले शहर
वीषही आता उतारा मागते
वेदना ओथंबुनी येतात अन
सूख मोराचा पिसारा मागते
जो कधी उधळून ती जाते स्वत:
प्रीत तो सारा पसारा मागते
डॉ. सुनील अहिरराव