✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

D — drsunilahirrao, Sun, 02/21/2016 - 09:59
चार दिवस पुरणारे अत्तर असते प्रेम तसे मग बाकी खडतर असते सुटकेचा आयास निरर्थक असतो कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते आपण अपुली सांभाळावी दुनिया सूख जरासे दु:ख निरंतर असते आकाशाला हातच पोचत नाही नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते प्रश्न तुला मी तोच कितीदा केला तुझे आपले एकच उत्तर असते कुठून कोठेतरी जायचे नुसते.. प्रेम शेवटी एक अधांतर असते डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
2219 वाचन

💬 प्रतिसाद (6)

सुटकेचा आयास निरर्थक असतो

गवि
Sun, 02/21/2016 - 10:09 नवीन
सुटकेचा आयास निरर्थक असतो कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते
तुम्हाला "निरंतर" म्हणायचेय का?
  • Log in or register to post comments

दिगंतरच !

drsunilahirrao
Sun, 02/21/2016 - 10:12 नवीन
दिगंतरच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नेहमी इतकी परिणाम-कारक नाही

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/21/2016 - 10:29 नवीन
नेहमी इतकी परिणाम-कारक नाही वाटली.
  • Log in or register to post comments

@गवि ,आत्मबंध धन्यवाद !

drsunilahirrao
Mon, 02/22/2016 - 15:31 नवीन
@गवि ,आत्मबंध धन्यवाद !
  • Log in or register to post comments

@गवि ,आत्मबंध धन्यवाद !

drsunilahirrao
Mon, 02/22/2016 - 15:32 नवीन
@गवि ,आत्मबंध धन्यवाद !
  • Log in or register to post comments

कुठून कोठेतरी जायचे नुसते..

संदीप-लेले
गुरुवार, 03/09/2017 - 17:17 नवीन
कुठून कोठेतरी जायचे नुसते.. प्रेम शेवटी एक अधांतर असते छान !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा