मनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 2:45 pm

मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख
(गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित)

रामराम

सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते

म्हणून म्हणले एक लेखच लिहु

त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात

म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत

तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच .

नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे पोहोचला.पहिल्यांदा एका शाळेत गेला तिथे पाहतो तो काय ही गर्दी हे काय चाललय म्हणून तो सगळ्यांकडे बघतोय आणि हा कोण परदेशि पाहुणा म्हणून पोरे त्याच्याकडे बघत आहेत ,काय तो प्रसंग.नंतर समजले की म्हणे बारावीची परिक्षा सुरु आहे ,एव्हाना ही काय लहान पोरे नाहीत हे त्यला त्यांच्या टोंटींग वरुन समजले होतेच ,मग काय अचानक एक दरवाजा उघडला आणि अलिबाबाची गुहा उघल्यावर किंवा थिएटरचे दार उघडल्यावर कसे माणसे अविचाराने आत पळतात तसे आत पळु लागले जणू काय खुल जा सिम सिम अशी यांची प्रार्थना सफल झाली होती.चामायला याला काय ते समजेचना एकतर एवढ्या मुलांची एकत्र परिक्षा असते हेच त्याला पटत नव्हते आणि हे असे काही पलत आहेत जणू काही यांच्या पाठीमागे वाघच लागलाय जणू ...बर राहु दे म्हणाला आणि तो तसाच बाहेर थांबला काही वेळाने गर्दी ओसरली आणि काही सोमे गोमे फक्त राहिले त्यात तो पण मिसळला एव्हाना थोडी थोडी मराठी समजु लागली होतीच ,म्हणून जरा कानोसा घेवु लागला तर काय ?आत पेपरमध्ये हे हे प्रश्न आलेत असे ही पोरे बाहेर सांगु लागली होती याला काही कळेचना. मगाशी तर पोरे आत गेली त्यानंतर पेपर फोडले गेले असणार आणि मग परिक्षा सुरु झाली मग हे बाहेर कसे आले !पण त्याला आता अशा धक्यांची सवय झालेली होती तेव्हा तो असेल काहीतरी म्हणाला इतक्यात त्याला जोरजोरात आवाज येवु लागले, काय झाले म्हणून बघु लागला तर ही मोठी फटाक्यांची माळ ,तो म्हणाला अरे वा कोणीतरी निवडुन आले वाटते मग काही हरकत नाही आमी बी लय फटाके फोडतो ,पण एवढ्यात त्याचे लक्ष परिक्षा खोल्यांच्या खिडक्यांकडे गेले आणि काय आश्चर्य अचानक तिथुन वेगवेगळ्या आकाराचे पांढरे कागद बाहेर येता॑ना दीसले ,अरेरे काय हे कॉपी पण तरी कॉपीचा आणि याचा काय संबंध? पण हा प्रश्न त्याला लगेच सुटला. आचनक एक गाडी आली त्यातुन दहा माणसे उतरली आणि कॉलेजात गेली गाडीवर मोठ्या अक्षरात लिहिले होते कॉपीविरोधी पथक ,झाले इथे सगळ्या कॉप्या बाहेर आल्याने कोफी पिवुन देखील त्याच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे ते बाहेर पडले आणि इकडे अजुन एक फटाक्याची माळ वाजली कदाचीत ही माळ कॉपीविरोधी पथकाविरुद्ध मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ असावी ,आणि काय आश्चर्य पुन्हा सगळे कागद आत जावु लागले ,आयला अशी जादु तर आमच्या महान जादुगारानादेखील येत नाही इति सिंदाबाद .झाले हा दिवस पार पडला .खरेतर सिंदाबादला आज फार दुख झालेले होते एवढे मोठे महान राज्य आणि एवढे सगळे करपश्न!छी! असु दे म्हणला यामुळेच आमच्यासारख्या परकीयांचे फावले ..जावु दे आणि तो निघुन गेला

पण त्याची उत्सुकता काही थांबेना दुसर्‍या दिवशी तो दुसर्‍या ठिकाणी गेला ,इथे कसे सगळे नीट होते ,शांतपणे सगळे चालु होते ,छान म्हणला सगळेच काही वाइट नाहीत अगदी .पण तो पेपर संपेपर्यंत थांबला आणि अघटीत घडले त्याला ५ -६ मुले रडत बाहेर बाहेर येतना दिसली याला काय समजेचना ...काल एका ठिकाणी कॉपी आणि आज एका ठिकाणी रडत येणारी पोरे असो मग त्याने कारण शोधुन काढले आणि ते असे होते की पेपरमध्ये बरेचसे प्रश्न पुस्तकाबाहेरचे होते अवघे एकच पुस्तक असुनही माणसे पेपर नीट सेट करु शकलेली नव्हती आणि अभ्यास न झाल्यने सगळे अवघड झालेले होते. हा पुन्हा दुखी पुन्हा इथे राजकारणाचा विजय तर! असु दे म्हणला ....जावु दे तसाच त्याने अठवडा घालवला अपण परीक्षा केंद्रावर येतच राहिला .काय ना काय अनुभव कोण खुप अभ्यास करतय तर कोण म्हणतय की काही गरज नाही अभ्यासाची आपले सगळे सेटींग आहे मध्ये त्याने एकाशी वाद घालायचा प्रयत्न केला पण सगळे निष्फ्ळ असो गप बसला बिचारा ..पण यात हुशार पोरे भरडली जातात असे त्याला राहुन राहुन वाटु लागले

झाले जरा काही दिवस गेले आणि दहावीची परिक्षा सुरु झाली ...पुन्हा सिंदबाद हजर आणि हो यावेळी त्याला काही कळेचना ..त्याला वाटल की काय सभा वगैरे आहे की काय ......पण काही नाही ती परीक्षाच होती पण प्रत्येकाचे आई वडील ,सोडायला आलेले इतर नातेवाइक यांच्या रगाड्यात ती बिचारी मुले हरवुन गेली होती ..कधीकधी पुढे विश्वरुपी जंजाळात हरवुन जातात तशी ..आणी सगळे कसे टेंशनमध्ये जणू काही यांच्या अंगावर आभाळच कोसळलय की काय आणि पोरांचे तर कान फाटत चालले होते याच्या सुचना त्याच्या सुचना,हे कर ते करु नकोस ..काय आणि काय पेपरमध्ये लिहायला कसे आठवणार कोणास ठावुक....बाकी त्याला एका गोष्टीची मात्र प्रचिती आली ..त्याने खुपदा ऐकलेले की सध्याच्या शिक्षणपद्धतीत पुढच्या जीवनात उपयुक्त काही नाही ..पण तो म्हणाला की कोण असे म्हणतेय बरे ,ते पहा ती मुले कशी इव्हेंट मॅन्जेमेट शिकत आहेत आणि त्यांचे पालक कशी त्यांची प्रॅक्टीकल परीक्षा घेत आहेत.एकाचवेळी हातात पुस्तक ,डोक्यात पेपरचे विचार, कानावर पडणार्‍या सुचना ,मित्राना शोधणारे डोळे .अग आई ग! काय समन्वय साधतात ही पोरे ,मानले बुवा! त्यामुळे यावेळी तर तो अजुनच उत्सुक होता काय होते ते बघायला इथे काही फटाके वगैरे वाजले नाहीत आणि हो सुरक्षा पण कडक होती पण शेवटी हा फॉरेनर त्यामुळे पठ्या बिनधास्त शिरला केंद्रात. तर सगळे कसे शांत शांत डोक्याला हत लावुन बसलेली पोरे आणि हनुवटीला हात लावुन बसलेले शिक्षक मध्येच एखादे उत्तर आठवल्यास न लपवता येण्याजोगा आनंद ..मग तशातच ते उत्तर लिहिणे आणि काही येत नसेल तर स्वतःच स्वताला दोष देत बसणे ..सिंदबादच्या डोक्यात एकच अहो कशाला ते नाटक वगैरे .अहो इथेच केवढ्या व्यक्तीरेखा ,किती भावना बघायला मिळतात तुम्हाला. अर्थात एखादा तोंडावरची माशी पण तीन तास उठणार नाही अशा तन्मयतेने बसलेला असतो पण त्याच्यासाठी माइम आहेच की ..वा ही दुनिया नाटकच शेवटी आणि हो आत काहीच नाही बाहेर बघा सगळे पालक चिंताग्रस्त जणू मुलांवर प्रश्नरुपी पाकिस्तान ने हल्ला केलेला आहे आणि ते गाईड रुपी अमेरिका बाहेर आपल्याकडे(पालक) विसरलेले आहे मग काय ..स्वतःच्या पोरांवर यांचा विश्वासच नाही. त्यांच्याकडे आहेत पडलेले चेहरे आणि घड्याळाकडे बघणार्‍या नजरा. हा पठ्ठा इतकी वर्षे फिरतोय पण वेळेची खरी किंमत त्याला त्यावेळी समजली असावी .आणि हो मग पोरे बाहेर आली. आल्या आल्या आपल्या मात्यापित्यांकडे नजरेचा कटाक्ष ..पेपर चांगला गेला असेल तर हास्य नाहीतर नव्या नवरीसारखा चेहरा लपवायचा ...आणि पालक पण जणु आपला मुलगा गड जिंकुन आला अशा अविर्भावात. आणि मग प्रश्नांची सरबत्ती मग हे बरोबर आले का ते बरोबर आले का काय आणि काय आणि चुकुन एखादा प्रश्न चुकलाच तर पालक असे काही सर्वांसमोर ओरडतात की याने काही खुनच केला आहे .हे सगळे सिंदबादला नवीन होते निदान नव्यासारखे भासत होते आणि जशी पोरे पुढच्या लढाइला पळाली तसा हा पण पळाला

मग काय दुसर्‍या ठिकाणी गेला तिथे पोरे हसत होती .असा काय बदल झाला त्याला समजेना कदाचीत शिक्षण मंत्र्यानी मुलाना पास व्हावे म्हणून पेपरचे मर्क फुकट देवु केले की काय !मग आत गेल्यावर समजले की शिक्षक आणि पोरे दोघे मिळुन गाइडरुपी ब्रम्हास्त्र घेवुन पेपर सोडवत आहेत त्याला पुन्हा कसेसे झाले आणि काल ऐकलेले एका पोराचे वाक्य आठवले "अरे पव्या आपण एवढे राबतोय रे पण यशाचे काय गॅरंटी काय आणि गावागावातल्या पोरांशी आपण कसा लढा देणार त्यात आगोदरच वीस टक्के शाळेकडे आहेत म्हणजे वर्षभर शिक्षकांचे ऐकायचे त्यांचे कामे करायची आणि इथे काही सरानी असे केले तर ,आणि अरे पपर पण फुटतात म्हणे " ही वाक्ये किति खरी किती खोटी ते त्याला समजले नाही अहो जिथे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाला ते समजलेले नाही त्तर मग ह्यो बापडा काय कामाचा ....असो पण एकुण दहावी परीक्षा ही काय सामान्य बाब नाही हे त्याने ओळखले तरी तो १५ दिवस शाळेत जात होताच .किती दिवस ती परिक्षा शेवटी तोच कंटाळला ,हा पण दिवस वाढल्याने अनुभव संख्या वाढली ..सगळे अनुभव आले त्याला अगदी परीक्षा असुनही टेंशन फ्री असलेली मुले त्याने पाहिली ,अगदी जिद्दिने पेपर लिहिणारी अपंग मुले दिसली ( इथे त्याला हॉकिंग आठवला असणार) आणि हो रात्र शाळेत जावुन पेपर देणारी मुले त्याने पाहिली आणि ते पाहिल्यावर त्याला त्या फोर व्हीलर मधुन येणार्‍या एका एका प्रश्नावर भांडणार्‍या मुलांची कीव वाटु लागली हे सांङायला नकोच. एव्हाना कॉपी पकडली जाणे ,पेपर फुटणे, पुस्तकाबाहेरचा प्रश्न असे सगळे प्रकार घडलेले होतेच पण विषेश म्हणजे परीक्षा देताना कोणाच्याच चेहर्‍यवर आनंद दिसत नव्हता आपण भविष्याकडे वाटचाल करतोय याची जाणीव असण्याची तर बातच सोडा .होती ती फक्त धास्ती आणि लांबलेल्या परीक्षेचा कंटाळा ..बाकी शेवटचा दिवस मात्र सिंदाबाद साठी वेगळा ठरला आज तिथे कोणीही पालक नव्हते. होती ती मुले आणि पेपर संपल्यावर त्या मुलानी काय दंगा घातला .अग आइ ग रंगपंचमी काय ,हॉटेलात खणे काय एकमेकांच्या घरी आणि पिक्चरला जाणे काय ..

अगदी जन्मठेपेतुन सुटल्यासारखे वाटत होते त्याना .मग काय सिंदबादही सुखवला निदान २ महिने त्याना या टेंशन मधुन रीलीफ मिळणार म्हणुन! पण त्याला याचीही जाणीव झाली की २ महिन्यानी परत टेंशन ,रीझल्टचे ,अपेक्षित कॉलेजला ऍड्मिशन मिळावे त्याचे ,आणि आता तर ९०% च्यावर सगळे असल्याने काटाकाटीच नुसती...असु दे राहु दे म्हणाला ....विचार करुन डोके फुटुन जाइल असे वाटले त्याला आणि त्याने कलटी मारली

बाकी तो आता या परिक्षाना कंटाळला होता तरी त्याने जाता जाता ५ वी ते नववीची परीक्षा बघितली आणि त्याला हसु आले इथे तसे काही नव्हते फ्क्त थोडे टेंशन पण ते असायचेच आणि हो धास्ती कसली तर पेपरला कोणी किती पुरवण्या घेतल्या, म्हणे जास्त पुरवण्या घेतल्या की जास्त मार्क म्हणे !मग काय काय टॅक्टीज एका पानावर एकच प्रश्न वगैरे...जाम हसला तो आणि पुढे गेला निदान शेवट तरी चांगला झाला म्हणायचा हिंदी पिक्चर सारखा

नेहमी प्रमाणे सिंदाबाद पुढे गेला पण हा विषय घोळत होताच डोक्यात त्याच्या.. त्याने काय पाहिले नाही ?सगळे बघितले- गैरप्रकार ,खरा अभ्यास करणारी मुले टेंशन आणि त्याचा होणारा विस्फोट्,अगदी अर्धा मार्क गेला म्हणून रडणारे आई वडील ,पेपर असुनही निवांत असणारा एखादा अवलिया ,कडक शिक्षक आण स्वार्थापोटी विकले गेलेले सर,कधी पेपरमध्ये आलेली आत्महत्येची बातमी इत्यादी ..पण पहिल्यांदाच त्याला काही निश्कर्ष काढता आला नाही हे परीक्षाविश्व त्याला समजलेच नाही, यांच्या भविश्याबद्दल त्याला काही बोलता येइना त्या मुलांच्या भविश्याप्रमाणे तोही दोलायमान राहिला शेवटी तो इतकेच म्हणु शकला की ही पद्धत योग्य का अयोग्य ठाउक नाही ,याने यश मिळते का, जीवनात फायदा होतो का माहित नाही आणि समजणार देखील नाही पण ही परिस्थीती बघुन एवढेच वाटते की जरी भारत महासत्ता बनला तरी ही सिस्टीम काही योग्य नाही .या शिक्षणाच्या सिस्टीमच्या बेसीक मध्येच घोळ आहे आणि तो निघेपर्यंत ह्या मुलांचे जीवनविषयक बेसीक कच्चेच राहणार असे वाटते जावु दे .....पुर्के(शिक्षणमंत्री) बघुन घेतील नाहीतर विचार करुन माझे डोके फुटायचे

धोरणमांडणीवाङ्मयसाहित्यिकसमाजशिक्षणप्रकटनलेखमत

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

27 Mar 2009 - 11:19 pm | विनायक पाचलग

माझा हा लेख लोकाना आवडला का नाही ते समजलेले नाही
पण हे लिहायला मला ज्या घटनेवरुन सुचले ती घटना मात्र नक्कीच विचार करायला लावणारी आहे
आज कोल्हापुरात एक टोळके सापडले जे गेली ७ वर्षे बनावट विद्यार्थी बसवत आहे
आज सापडलेली काही तरुण मुले या सगळ्या उद्योगात प्रविण होती
आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे कला प्रांतात( आर्ट्स) जो भाग सहसा सोपा मानला जातो
आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या सुत्रधाराने स्वतःचे नाव देखील ____ एक्झाम असे ठेवले आहे
गेले २ वर्षे तोअ आप्लया गाडीवर देखील नंबर प्लेट न लावता एक्झाम हा लोगो लावतो
याला काय म्हनाय्चे
शिक्षणाची नैतिकता इतकी ढासळली अहे का

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 4:19 pm | योगी९००

शिक्षणाच्या सिस्टीमच्या बेसीक मध्येच घोळ आहे आणि तो निघेपर्यंत ह्या मुलांचे जीवनविषयक बेसीक कच्चेच राहणार असे वाटते जावु दे
हे पटलं..

बर्‍याच दिवसांनी एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु.

हे लेखन खुप विचार आणि मेहनत करून घेतले आहेस असे दिसते. शुद्धलेखन चुका कमी असल्याने पुर्ण लेख वाचवला गेला. शेवटचा भाग तर खतरनाक लिहिला आहेस.

खादाडमाऊ

दशानन's picture

28 Mar 2009 - 4:57 pm | दशानन

>>एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु.

हेच म्हणतो.

लेखन सुधरत आहे मित्रा, लगे रहो !
कमीत कमी दोन दिवसा आड एक लेख येऊ देत तुझ्या कुपीतून.

अनंता's picture

28 Mar 2009 - 5:27 pm | अनंता

चांगलं लिहू लागलायस आजकाल.
शुभेच्छा.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

विनायक पाचलग's picture

28 Mar 2009 - 7:36 pm | विनायक पाचलग

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग