नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Aug 2020 - 3:29 pm

कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..

'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!
पितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना
नाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत
धोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.

बरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे
पण हे मात्र
सुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह
मास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान
विद्यार्थ्याने चालवलेल्या छोट्याश्या
गावातल्या पेप्रातपण यायचे

नातवंडांकडन अडकित्ते शोधवून घेताना
कल्हईवाल्याला धारवाला पाठवण्यास
सांगण्याचा निरोप देण्यास सांगायचे
कधी पोस्टकार्ड कधी आंतरदेशीय वाचताना
कधी नाणी मोजताना, कधी पानदान लावताना
पानदान न वाजलेले दिवस आठवायचे
उठता बसता काँग्रेसच्या नावे
लाखोली वाहून इंदीराजींना मत मात्र द्यायचे

आता ना आजोबांची पानदानं र्‍हायली ना खानदानं र्‍हायली
पण पिळांचा रंग नव्यापिढ्यातून काय ऊतरत नाही.

कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..

प्रेर्ना अर्थातच

अनर्थशास्त्रआजीआठवणीआयुष्याच्या वाटेवरकविता माझीकालगंगाजिलबीभूछत्रीमुक्त कविताविडम्बनमुक्तकविडंबनआईस्क्रीमपारंपरिक पाककृतीराहणीव्यक्तिचित्रराजकारण

प्रतिक्रिया

सदस्य११'s picture

10 Aug 2020 - 6:25 pm | सदस्य११

तुमचा पेर्णास्रोत अधिक चांगला आहे

माहितगार's picture

10 Aug 2020 - 6:31 pm | माहितगार

प्रेर्ना स्रोत तर बेजोडच आहे, पण नही जम्या हे पण एकदम मान्य