एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
10 Oct 2008 - 4:20 pm

दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ...
स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी !
अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ...
वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत ....

आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा. अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली. हे सर्व करत असताना आठवण मात्र घरातल्या धामधुमीची, उत्साहाची व खास मराठमोळ्या डौलात साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचीच होती.

आज दसरा म्हणजे विजयादशमी, अरे हा तर महत्वाचा दिवस, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात मोत्याचा तुरा व महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील अजुन एक महत्वाची घटना दरवर्षी ह्याच मुहुर्ताला घडते ना? मग आज काही हालचाल आहे का नाही ? तसाच आहे का आजपण सळसळता उत्साह, डौल, सारंजाम व मराठी अभिमानाची शान ? चला, जरा पेपर चाळुयात, पाहु या काही आलयं का त्यात ? का गेल्या काही वर्षांसारखी कुठली तरी नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती येऊन ही परंपरा खंडीत तर झाली नाही ?
हुश्श ! होणार आहे ह्या वर्षी, पुर्वीपेक्षा मोठ्ठ्या प्रमाणात, जरा जास्तच उत्साहात, डौलात व मुर्तीमंत मराठी टेचात हा सोहळा होणार आहे ...
पेपरात तर भरभरुन येत नाही, आपण कसे वाचले नाही ?
जाऊ दे, आता कुठे पहायला मिळते का ते पाहु , दाखवतील ना कुठेतरी ह्या प्रचंड आंतरजाल विश्वात ...
कित्येक प्रसंग आपण लाईव्ह पाहिले आहे, हा जर पहायला मिळाला तर "आजी सोनीयाचा दिन असे अमॄताचा क्षण " हे अनुभवायला मिळेल ...

चायला, २ वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे ५,३० !!!
छे, सोहळा सुरु झाला असेल, कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे, माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे.
कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची ....

च्यायला ह्या भैय्या चॅनेल्सचे काहीतरी वेगळेच चालले आहे, सारखी त्या मनमोहन आणि सोनीयाच्या दिल्लीच्या प्रगतीमैदानातल्या "रामलीलेचे क्षणचित्रे" अथवा अन्य काही फुटकळ. च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ...

हुश्श्श !!! हुर्रे ....
सापडली , स्टार माझा ची लिंक मिळाली, ह्यावर आहे लाईव्ह टेलीकास्ट ...
शेवटी स्टार माझा त्याच्या किर्तीला जागला म्हणायचा ....

आयचा घो, साक्षात तोच सोहळा सुरु आहे, आता मरु दे काम , हेच पहात रहावे ....

"एकच दिवस, एकच मैदान, एकच वक्ता, गेले ४३ वर्षे
शिवसेनेचा दसरा मेळावा, स्थळ : शिवाजी पार्क ;मुंबई, वक्ता : बाळासाहेब ठाकरे "

अर्रे बापरे, काय गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत साहेबांना ऐकायला व त्यांचे विचार ऐकायला, च्यायला कसली ही प्रेरणा व केवढे हे प्रेम ...
गर्दीवर नजर ठरत नाही, अक्षरशः लाखांच्या संख्येने लोक येतात भौ , जबरदस्त ...
अख्खे मैदान भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे, अवघा हिंदुत्वाचा जागर म्हणता येईल ....

काय पाहतो आहे मी, साक्षात "उद्धव ठाकरे" अक्षरशः प्रचंड जनसमुदायाला संबोधीत करत आहेत, थोडा लेटाच झाला साईट उघडायला, आधी कोण कोण बोलले, काय काय बोलले, कुणाला फाडले, काही कळायला मार्ग नाही, असो हे पहात रहावे ....

व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...
फारच वाईट मारतो आहे सगळ्यांची, सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेत आहे. वा काय बोलतो आहे "मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत येऊन मुंबई कुणाची असे विचारण्याची हिंमत कशी होते कुणाची ?". जबरदस्त, भारी ठोकला, असेच बोलायला पाहिजे, माजलेत हे उपरे. त्याचावर होणार्‍या कमजोरपणाच्या टीकेबद्दल काय बोलतो हा ? दिले ह्याने उत्तर, म्हणे " हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मांजराची पिल्ले नव्हे वाघाचे बछडे जन्माला घातले आहेत. शिवसेनाप्रमुखांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, इतर कुणी काळजी करु नये "
ये हुई ना बात, जबरदस्त उत्तर दिले. ह्या लोकांच्या भुमीका व त्यामगेचे राजकीय डावपेच गेले चुलीत, दमदार बोलतो आहे नक्की, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे ?

अरे सगळे हाच बोलतो आहे, "साहेब" येणार आहेत की नाही ? कुठे तशी घोषणाही होताना दिसत नाही ? नक्की काय होणार ?

बेश्ट, उद्धवने भाषण आवरते घेतले व " शिवसेनाप्रमुखांचे शिवतिर्थावर आगमन" ही घोषणा झाली ...
हुर्रे, साहेब आले. लोकांना आशांना त्यांनी ठेच पोहचु दिली नाही ....
कुठे आहेत साहेब ? कुठे आहेत ? आता कसे दिसतात ? वय खुप वाढले आहे ? नुसतेच येणार की भाषण पण करणार ?

आले ... आले रे ... साहेब आले रे !!!
"साहेबांना" लिफ्टमधुन स्टेजवर आणण्यात येत आहे, अरेरे बघता बघता वार्धक्याने ह्या सिंहालासुद्धा सोडले नाही. चेहर्‍यावर वय स्पष्ट दिसत आहे ...
अनेक संकटे स्वतःच्या निधड्या छातीवर झेलणारे बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या आधारने पाऊले टाकत आहेत ...
आले, स्टेजवर आले ते, आल्याआल्या " मॉंसाहेब, प्रबोधनकार व बिंदुमाधव" च्या प्रतिमांना हार घातला. चांगले आहे, आपल्याला साथ देणार्‍यांचे विस्मरण कधीही न होऊ देणे हे कधीही स्तुतीपरच ...
शेवटी समोर आले ते, स्टेजच्या मध्यभागी आले, खरच थकले आहेत आता, त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवले व भोवती कोंडाळे आहे ....

सर्व जमाव शांत !!! एकदम चिडीचुप शांतता ...

बाळासाहेब स्वतःच्या ताकतीवर उठले, बाकीच्यांना बाजुला सारुन समोर जमलेल्या विशाल, अगणित जनसमुदायाला नमस्कार केला व खास त्यांच्या स्टाईलीत अभिवादन केले ....
आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....
जिओ बाळासाहेब, जिओ ....

जनसमुदायला काय करावे कळेना, प्रचंड जयघोष सुरु " बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद " !!!
उद्धव, मनोहर जोशी आणि इतर गलबलुन गेलेले दिसत आहेत. खुप सोसले साहेबांनी व अजुनही हिंमत नाही हरलेत ...

त्यांना खुर्चीवर बसवुन त्यांच्यापुढे माईक ठेवण्यात आला, साहेबांनी सुरवात केली ....
" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... "

जिंकले !!!! अगदी शब्दश : जिंकले .....

पुढचे सांगण्यात अर्थ नाही, माझी शब्दसंपदा दुबळी पडत चालली आहे, फक्त डोळेभरुन पाहुन घेतले आणि धन्य झालो ....
तसेही सगळे सविस्तर पेपरमध्ये आलेच आहे ...
मला मात्र दसर्‍याची उत्तम भेट मिळाली .... धन्य झालो !!!

डिस्लेमर : हे लिखाण कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा "उदोउदो" करण्यासाठी लिहलेले नाही. मी पाहिलेल्या एका अभुतपुर्व घटनेचे माझ्या अतिक्षुद्र लेखणीतुन हे वर्णन. कसलाही "पक्षसापेक्षत्वाचा आरोप" आम्ही आत्ताच फेटाळतो ...

अवांतर : मी दिलेले "लेखाचे शिर्षक" मला अजुन परफेक्ट वाटत नाही. जोग्य व समर्पक शिर्षक सुचविल्यास आपला मी आभारी राहिन. धन्यवाद !!!

समाजजीवनमानराजकारणप्रकटनअनुभवप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

10 Oct 2008 - 4:39 pm | अभिरत भिरभि-या

शीर्षक वाचुन असे वाटले की म्हैसुरच्या दसर्‍याचा वृतांत आला की काय?
असो लेख चांगला आहे .. कारण मते पटो न पटोत, या माणसाच करिष्मा वादातीत आहे.

शीर्षकाच्या नावासाठी आमची दोन पैसे सुचोवणी ..
तुमच्याच लेखात लिहिले आहे तसे ..
शेर जरी बुढा झाला पण ...

टारझन's picture

10 Oct 2008 - 6:28 pm | टारझन

कारण मते पटो न पटोत, या माणसाच करिष्मा वादातीत आहे.
असेच म्हणतो ,,,

शिर्षक : ढाण्या वाघ

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

यशोधरा's picture

10 Oct 2008 - 6:09 pm | यशोधरा

यू टूबवर असले तर पहायला हवे..

छोटा डॉन's picture

10 Oct 2008 - 6:11 pm | छोटा डॉन

" यु ट्युब" वर काय पहावे लागेल ?
मला नाही समजले अजिबात ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा's picture

10 Oct 2008 - 6:29 pm | यशोधरा

ठाकरेंचे भाषण आहे का बघण्यासाठी उपलब्ध ते...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2008 - 6:28 pm | बिपिन कार्यकर्ते

भारी लिहिलंय डानराव. मी कधी गेलो नाहिये. आणि काल रात्री कुठल्यातरी वाहिनीवर क्षणचित्रं दाखवत होते. बाळासाहेब शेर खरेच पण त्यांची प्रकृति खूपच खराब वाटली. खोकत वगैरे होते.

अवांतरः बाळासाहेब, राज, उध्दव... सगळे एकत्र आले पाहिजेत रे... वेगळे वेगळे राहून नुकसानच आहे.

बिपिन.

रम्या's picture

10 Oct 2008 - 6:25 pm | रम्या

आम्हीही बाळासाहेबांचे चाहाते! वाघच तो! शब्दांवर जबरदस्त पकड! शिवाजी पार्क भरून गर्दी खेचू शकणार्‍या काही व्यक्तिमत्वांपैकी एक.
पण मला एक प्रश्न पडलाय. ही प्रचंड गर्दी शिवसेना या पक्षासाठी आहे, बाळासाहेबांसाठी आहे की उद्धव ठाकरेंसाठी?
बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो. पण बाळासाहेबांच्या पश्चात खरोखरच शिवाजी पार्क पुन्हा भरेल?

(बाळासाहेबांचा चाहता) रम्या

छोटा डॉन's picture

10 Oct 2008 - 6:34 pm | छोटा डॉन

आम्हीही बाळासाहेबांचे चाहाते! वाघच तो! शब्दांवर जबरदस्त पकड! शिवाजी पार्क भरून गर्दी खेचू शकणार्‍या काही व्यक्तिमत्वांपैकी एक.

+१,
सहमत आहे ...

कालची गर्दी ही "बाळासाहेबांसाठी" होती नक्कीच, ते आल्यावर जमावाचा जो जयघोष झाला त्यावरुन खात्री पटते ...
काल सबकुछ बाळासाहेब होते ....

>> पण बाळासाहेबांच्या पश्चात खरोखरच शिवाजी पार्क पुन्हा भरेल?
का नाही, जरुर भरेल ... अशी धमक असलेले लोक आहेत अजुन.
शिवाय मराठी माणसाच्या कल्याणासाठी हाक देणार्‍या कुणाच्याही मागे शिवाजी पार्क भरेल एवढी जनता नक्की धाऊन येईल ...
मग तो ठाकरे आडनावाचा असो अगर नसो ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन!
तुमच्या शब्दात केलेले या अद्वितीय सोहळ्याचे वर्णन मस्तच जमुन आले आहे.
कालची माझी देखिल अवस्था अशीच होती. नशिबाने काल इथे हवामान उत्तम असल्याकारणाने झी २४ तास चे प्रक्षेपण कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता सुरु होते.लाख लाख दुवा दिला मी काल झी २४ तास या वृत्तवाहीनीला.
आज वडिलांची उणिव प्रकर्षाने जाणवली कारण २००४ पर्यंत या सोहळ्याचा वृत्तांत त्यांच्या मुखातुन ऐकायची सवय जडलेली.त्यांनी केलेल वर्णन म्हणजे "याची देहि याची डोळा" आपण तो सोहळा अनुभवलाय असेच असायचे आज तुमचे लिखाण वाचुन त्यांची खुप आठवण आली .मी स्वतह ९३ साला पर्यंत वडिलांबरोबर या सोहळ्याला हजेरी लावत असे.
सेनेच्या दसर्‍या मेळाव्याच दिमाखच न्यारा .
कालचे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण उत्तमच झाले. मुंबई आमच्याच बापाची हे ठणकावुन सांगणारा उध्दव आवडुन गेला ............................पण सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती माननिय बाळासाहेबांना बघायची,त्यांचे विचार ऐकायची.उत्कंठा वाढत होती आणि माननिय बाळासाहेबांचे व्यासपीठावर आगमन झाले .पण त्यांना बघुन काळजात चर्र झाले. नकळत हात जोडुन बाळासाहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे म्हणुन देवाची प्रार्थना केली. त्यांच्या" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... " या चिरपरिचीत संबोधनाने अंगावर काटा उभा राहीला .सौम्य शब्दात राजला दिलेली समज ऐकल्यावर अजुनही कुठे तरी आत राज बद्दल प्रेमाचा ओलावा आहे हे दिसुन आले.आवाज खोलवर गेला असला तरी आवाजातील जरब जरा देखिल कमी झालेय असे वाटले नाही.
भाषण करताना त्यांना त्रास होत होता ,मधेच खोकल्याची उबळ आली तेंव्हा खरच खुप वाईट वाटले.मनात आल त्यांना शिवतिर्थावर आणण्याच अट्टाहास करायला नको होता उध्दवने .त्याही परिस्थितीत ते जवळपास ३५ मिनिटे बोलले.मधे काही मुद्यांचे त्यांना विस्मरण होत होते आणि उद्धव व पंत त्यांना आठवण करुन देत होते.ते पाहुन पोटात गलबलले.एक क्षण मनात आले वय शेवटि माणसाला परावलंबी बनवते हेच खरं!
सोहळा संपन्न झाल्यावर घरी परतणारा प्रत्येक श्रोता ,शिवसैनिक हा स्वतह बरोबर विचारांचे सोने घेवुन गेलाच पण त्याच बरोबर बाळासाहेबांच्या तब्येतीची काळजी देखिल घेवुन गेला असेल्..............सोहळ्याला उपस्थित तमाम अबाल वृध्दांनी दसर्‍याच्या सुमुहुर्तावर आई भवानी कडे माननिय बाळासाहेबांसाठी उदंड आयुष्याची कामना केली असेल....................आई भवानी त्यांची इच्छा पुर्ण करो.................!
मधेच मनात आल न जाणो त्या गर्दित राज वेषांतर करुन आला असेल आणि आपल्या गुरुंचे विचार ऐकत असेल आणि समजा तसे नसेल तरी निदान घरी तो देखिल दुरचित्रवाहीनी समोरच आपल्या लाडक्या काकांचे दर्शन घेण्यासाठी बसला असेल.
कालचा सोहळा पाहुन मन तृप्त झाले हे खरेच ,पण तरिही मी मनोमन देवाला राज व उध्दव यांचे पुन्हा एकदा मनोमिलन व्हावे यासाठी साकडे घातले.आज ना उद्या तो दिवस उगवेल याची खात्री आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
राज व उध्दव यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी परत एक व्हावे या प्रतिक्षेत असलेली.व जन्माने शिवसैनिक असलेली.

"अनामिका"

आनंदयात्री's picture

10 Oct 2008 - 7:00 pm | आनंदयात्री

हिंदुहृदयसम्राटांची जादु ही सगळी !!
सपोज त्यांनी डिक्लेअर केले असते की यावेळेस बोलणार नाय .. तरी एवढीच गर्दी जमली असती !!

जय भवानी .. जय शिवाजी !!

मोकाट वळू's picture

10 Oct 2008 - 10:55 pm | मोकाट वळू

वाघ म्हातारा झाला म्हनून गवत खात नाहि....!!!
खरच बाळासाहेबान्च वय झालय्....पण बोलन्यात तीच धमक नि उत्साह...

साहेबाना उदन्ड आयुश्य लाभो.....

.....एक मराठी

सर्वसाक्षी's picture

10 Oct 2008 - 11:10 pm | सर्वसाक्षी

बाळासाहेबांना पाहुन जुन्या आठवणी डोके वर काढतात. सत्तर च्या सुमाराचे बाळ ठाकरे हे वेगळेच. प्रामाणिकपणे सांगायचे तर जेव्हा जेव्हा मी राज ठाकरेंचे भाषण ऐकतो/ पाहतो तेव्हा डोळ्यापुढे सत्तरच्या दशकातले बाळासाहेब आठवतात.

तेव्हा अनेक शत्रू जीवावर ऊठलेले असताना बाळासाहेबांना झेड सुरक्षा म्हणजे काय हे माहित नव्हते, त्यांच्या भोवतीचे सैनिकांचे कडे अक्षरशः अभेद्य होते. ते खरोखरीचे मंतरलेले दिवस होते. बाळासहेबांचे सहकारी एकापेक्षा एक भारी - 'भटक्या' प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, मुंबईचे सर्वात लहान महापौर झालेले सुधीरभाउ, दत्ताची साळवी, दताजी नलावडे....

इडलीला टक्कर देण्यासाठी मराठी माणसाला वडापावचे आव्हान उभे करीत स्वतःला रोजगार निर्माण करण्याचे आव्हान देणारे बाळासाहेब आणि कबुतरखाना, रानडे मार्ग, डिसिल्वा शाळा, पोपटलाल चाळ, खांडके इमारती येथे त्या हाकेला ओ देत भगव्या टोप्या घालुन वडापावच्या गाड्या झटक्यात लावणारे सैनिक. पैकी ४-५ वर्षांपूर्वी कबुतरखान्याच्या व्यायामशाळेच्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या गाडीवर वडापाव खाताना मित्राला ती हकिकत संगताना ऐकुन भारावलेले काका अजुन आठवतात. गाडी पस्तीस वर्षे लावतोय असे अभिमानाने सांगत होते.

एरवी सेनेला गुंड म्हणाणारे देखिल कबुल करतात की हिंदु मुसलमान दंग्यात मुंबईकराला आधार होता तो सेनेचा! दरवर्षी हिंदुंची कुरापत काढणार्‍या धर्मांध व उन्मत्त अशा भिवंडीच्या मुसलमानांना सेनेने एकदाच असा हाग्या मार दिला की पुन्हा दंगलीचे नाव नाही.

मला रजत कपूरने घेतलेल्या मुलाखतीतील बाळासाहेबांचे मार्मिक उदगार नेहेमी आठवतात. अहिंसा आणि हिंसा असा काहीसा घोळ घालणार्‍या रजत कपूरला त्यांनी ठणकावुन सांगितले होते " शिवाजी राजे जेव्हा अफझलखानाला भेटाला गेले तेव्हा हत्यारबंद होऊन गेले होते. जर ते पंचा नेसून आणि हातात शेळी घेऊन गेले असते तर त्यांचा अफझलखान झाला असता"

नंदा प्रधान's picture

11 Oct 2008 - 6:58 am | नंदा प्रधान

सही बोललात सक्षी. कुणाला तरी कमी लेखल्या खेरीज कुनाचे मोठेपण कधी सिद्ध झाले आहे का?

(शेळी खाणारा अहिंसावादी) नंदा

सुक्या's picture

11 Oct 2008 - 1:53 am | सुक्या

च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ...

काटे आले अंगावर. माणसाने इतकेही संवेदनाहीन असु नये. उत्साहाच्या भरात तुम्ही ते लिहीलं हे मान्य आहे, पण तेवढं लेखातुन काढुन टाका. बाकी सोहळ्याचे वर्णन सुरेख आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विसोबा खेचर's picture

11 Oct 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

८० च्या उत्तर दशकापासून यांची अनेक भाषणे ऐकली दसरा मेळाव्यातली. लै मजा यायची..

आज मुंबईत मराठी माणसाचा जो काही दरारा शिल्लक आहे तो केवळ यांच्यामुळेच आहे असे नक्कीच म्हणावे लागेल..

साक्षि म्हणतो ते बरोबर आहे. आज लोकं राजमध्येच तरूणपणीचे बाळासाहेब पाहतात. उद्धवला घरातच राजकारण असल्यामुळे त्यात आपसूक पडावं लागलं, परंतु बाळासाहेबांच्या त्यात स्पार्क नाही. बाळासाहेबांचं पुत्रप्रेम आडवं आलं नसतं तर आज राजकडेच सेनेची सर्व सूत्र असती..बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यानेच ती उत्तम रितीने सांभाळली असती..! उद्धवकडे स्वत:चा असा काहीच करिष्मा नाही. केवळ वडिलांच्या नाव असल्यामुळे लोक त्याला मानतात..

असो...

तात्या.

नंदा प्रधान's picture

11 Oct 2008 - 6:56 am | नंदा प्रधान

असहमत डान्याच्या लेखातील ह्या ओळी पुन्हा वाचाव्यात. तुम्ही दसर्‍याचे भाषण ऐकले तरी आहेत का?

व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...

-नंदा

वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा..शिवसेना!!!

अभिरत भिरभि-या's picture

13 Oct 2008 - 12:40 pm | अभिरत भिरभि-या

सिंहाचा छावा/संयमी व्यक्ती वगैरे वगैरे ...
ज्यांनी जन्मभर गांधी घराण्याच्या घराणेशाहीला विरोध केला त्यांना शेवटी घराणेशाहीच्या आश्रयाला का जावे लागले हो ?

शुभा's picture

11 Oct 2008 - 12:45 pm | शुभा

बालासाहेबानी कोनाकोनाला वन्दन केले
कै. प्रमोद नवलकरान्चा फोतो तिथे असायला हवा होता

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Oct 2008 - 1:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

च्यायला या मिपा वर पण राजकारण आले खुप वाईट झाले राव
मरुदे ते राजकारण यार
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

सखाराम_गटणे™'s picture

12 Oct 2008 - 12:13 pm | सखाराम_गटणे™

>>राजकारण म्हणजे गजकर्ण
सहमत (०%)
मिपा राजकारणानिवाय जगुच शकत नाही.

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)

छोटा डॉन's picture

12 Oct 2008 - 12:35 pm | छोटा डॉन

राजकारण म्हणजे गजकर्ण

स्पष्ट असहमत. राजकारण जरी एक "गलिच्छ गटार" असले तरी ते साफ करायला आपल्याला किंवा कोणा शहाण्याला त्यात उतरायलाच पाहिजे ....
नुसते ते "गजकर्ण" म्हणुन शिव्या देऊन प्रश्न सुटत नाहीत ....
जर असे वातते की हे खराब आहे तर तुम्ही जावा ना मदतान करायला, निवडणुक लढवायला. कोण नको म्हटले आहे ?
बाजु आण मते दमदार असतील तर लोक नक्की पाठीशी उभे राहतील, तशीही आता "सुशिक्षीतांनी राजकारणात" पडुन देश चालवायचे कार्य हातात घ्यायची वेळ आलीच आहे ...
असो. जास्तच अवांतर विषयांतर होत आहे ...

बरं, मिपावर राजकारण हा विषय व्यर्ज्य आहे का ? उलट मी मिपा हे एक उत्कॄष्ट व्यासपीठ मानतो अशा चर्चांसाठी ....
मग असा प्रतिसाद का ?
आपल्याला जर अजिबातच इच्छा नसेल तर सोडुन द्या ना, उगाच असे प्रतिसाद देऊन विषयांतर घडवु नका ....

अवांतर : मी लेखातच लिहले आहे की हा लेख कसलेही राजकारण, नेते व पक्ष यांचा "उदोउदो" करत नाही. हा फक्त माझ्या शब्दात मी पाहिलेला एक सोहळा आहे.
मग अशा परिस्थीती असे प्रतिसाद टाकणे कितपत योग्य ? जर अजिबात आवडाले नसेल तर चक्क दुर्लक्ष करा ना ...
यामुळे बाकीच्यांचा मुडऑफ होतो व अनावश्यक फाटे फुटतात त्याचे काय ?
कॄपया माझे म्हणणे पॉसीटीव्हली घेणे. धन्यवाद !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2008 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

डानरावांच्या सगळ्या मुद्यांशी १००% सहमत. एवढा डिस्क्लेमर टाकला होताच त्याने. आणि बर्‍याच लोकांनी पण लिहिले होते की बाळासाहेबांविषयी काहिही मत असले तरी लेखातील भावनांशी सहमत म्हणून.

बिपिन.

गणा मास्तर's picture

11 Oct 2008 - 9:41 pm | गणा मास्तर

बाप माणसावर बाप लेख लिहिलास रे !!!
शिर्षक आहे तेच जबरदस्त
वर्तमानपत्रातले खास स्फुट वाचल्यासारखे वाटले.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2008 - 10:29 pm | स्वाती दिनेश

कारण मते पटो न पटोत, या माणसाचा करिष्मा वादातीत आहे.
असेच म्हणते.
डॉन्या, लेख छान लिहिला आहेस.यशो म्हणते तसे यु ट्यूबवर भाषण मिळते का पहायला हवे.
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2008 - 10:52 pm | llपुण्याचे पेशवेll

अजूनही बाळासाहेबांची बुध्दी तल्लख आहे याचा प्रत्यय आलाच या वर्षी 'गात्रे थकली पण आत्मा नाही थकला'.
आवाज कोणाचा? 'शिवसेनेचा'
:)
पुण्याचे पेशवे

http://www.saamana.com/2008/Oct/14/Link/Main4.htm

वरिल लिंकवर तुम्ही पाहू शकता की सामनाने सुद्धा ह्या लेखाची दखल घेतली आहे.

खादाडमाऊ

आनंदयात्री's picture

14 Oct 2008 - 12:44 pm | आनंदयात्री

सामनाने मिपाचे "जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास कौतुक केले आहे.
अभिनंदन तात्या :)

मिसळपावचा विजय असो ..
छोट्या डॉनचा विजय असो ..
तात्या अभ्यंकरांचा विजय असो ..

हे धतड ततड ..धतड ततड ..धतड ततड ..धतड ततड !!

मनस्वी's picture

14 Oct 2008 - 12:52 pm | मनस्वी

मनस्वी

धमाल मुलगा's picture

14 Oct 2008 - 12:59 pm | धमाल मुलगा

जोरदार अभिनंदन!!!!

अरे, गेल्या आठवड्यात "आझा ब्लॉग" मध्ये चमकलेले मिपाचे सदस्य, आता सामनाने घेतलेली ही दखल :)

ह्या परिवाराचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे !!!!

सामनाने मिपाचे "जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास कौतुक केले आहे.
टाळ्या टाळ्या टाळ्या !!!

झकासराव's picture

14 Oct 2008 - 1:37 pm | झकासराव

डॉन्याचा विजय असो.
मिसळपावचा विजय असो.
सामनाचा विजय असो.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

झकासराव's picture

14 Oct 2008 - 1:38 pm | झकासराव

डॉन्याचा विजय असो.
मिसळपावचा विजय असो.
सामनाचा विजय असो.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Oct 2008 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्‍या अन मराठीचे जागतिक स्पंदन मानल्या जाणार्‍या" असे दिलखुलास मिसळपावचे कौतुक केले आहे.

सामनातील सदरील बातमी वाचून खूपच आनंद झाला. मिपाचे आणि तात्या अभ्यंकराचे मनःपुर्वक अभिनंदन !!!

-दिलीप बिरुटे
(आनंदीत)

धमाल मुलगा's picture

14 Oct 2008 - 12:00 pm | धमाल मुलगा

क्या बात है डान्या!

साला, सगळ्या सगळ्या भावना पोहोचल्या रे!!!
वाचतानाच अंगावर काटा आला, तर पाहताना काय अवस्था झाली असेल?

तुझा हा लेख म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्या प्रेरणास्थानाला विजयादशमीच्या प्रथेप्रमाणे वाहिलेलं सोनंच जणू! आम्हीही तुझ्यासोबत 'मम्' म्हणु इच्छितो!
अर्थात हा लेख त्या एका 'बाळ ठाकरे' पासुन 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' झालेल्या एका तुफानी झंझावाताला भावनापुर्णतेने वाहिलेला असल्याने इथे त्यांचं, उध्दव ठाकरेंचं किंवा राज ठाकरेंचं काय चुकतं किंवा काय बरोबर ह्याची चर्चा मी करत नाही, ते इथे अप्रस्तुत ठरेल. पण एकच म्हणु इच्छितो, बाळासाहेबांनी रांगड्या मरहट्ट्यांना गोळा करुन त्यांना समजेल अशा रांगड्या भाषेत आपले विचार मांडले..नेहमीच! उध्दव आता त्याच सेनेला रांगडेपणाबरोबर एक कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी देऊ पाहताहेत. काळच ठरवेल हे योग्य की अयोग्य ते.

आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....
जिओ बाळासाहेब, जिओ ....

अगदी अगदी!! १०००००००% सहमत!
पण साला गलबलुन आलं यार, बाळासाहेबांची वृध्दत्वानं केलेली ही क्रुर चेष्टा पाहुन :( अक्षरशः डोळ्यात पाणी उभं राहिलं रे!

असो,
इथं एक दुर्मिळ (कारण, ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी "काय दुर्मिळ फोटो आहे" असं मला ऐकवलं म्हणुन मीही त्याला दुर्मिळ फोटो म्हणतोय.) असा फोटो द्यायचा मोह आवरत नाहीय्ये, म्हणुन डान्या खास तुझ्यासाठी आणि तमाम ठाकरेप्रेमींसाठी हा फोटो!

विसोबा खेचर's picture

14 Oct 2008 - 4:01 pm | विसोबा खेचर

सामना वृत्तसंस्थेने मिपावरील चर्चेची दखल घेतली याबद्दल मिसळपाव डॉट कॉम सामना वृत्तसंस्थेची आभारी आहे..

मिपाच्या सर्व सभासदांमुळेच केवळ मिपाला शोभा आहे याचीही मिपाला कृतज्ञ जाणीव आहे...

तात्या.

चिन्या१९८५'s picture

15 Oct 2008 - 12:20 am | चिन्या१९८५

शिवसेनाप्रमुख जबरदस्त आहेत. मी पण स्टार माझाच्या वेबसाईटवरुन भाषण ऐकल्.त्यांना खोकला आल्यावर फारच वाईट वाटल्.पण तरीही भाषण जबरदस्तच होत.वाघ म्हातारा झाला तरी डरकाळी देण विसरत नाही आणि त्याच्या डरकाळीमधे तीच शक्ती असते.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/