जरुरत है, जरुरत है......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
10 May 2015 - 5:03 pm

मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?”
नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!”
“मग?”
“पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम? मी प्रवास पुढे चालू ठेवला.इस्तंबूलला पोहचलो. इथेही नशिबाने साथ दिली. एका स्त्रीशी ओळख झाली. ती धर्मपरायण होती, तिला बाहेरचे जग माहित होते. तिची काव्यशास्त्रविनोदबुद्धी अजोड होती.”
“मग?”
“पण ...... रुपात मार खात होती. बेगम कशी देखणी हवी! चारचौघात उठून दिसणारी. मी शोध जारी ठेवला. पुढे इजिप्तला पोहचलो. नशीब सोबतीला होतेच. तिथेही एक स्त्री गाठ पडली!” सांगता सांगता , मुल्ला नसरुद्दिनचे डोळे चमकले. तंद्रीत पुढे सांगू लागला,
“तिने मला जेवायला बोलावले. अप्रतिम लावण्यवती. मवाळ अंतः करणाची. नीतिमान. धर्मपरायण. काव्यशास्त्रविनोद जाणण्याची तरल बुद्धीमत्ता. दुनियादारी माहित असणारी! सर्वगुणसंपन्न! मला हवी होती तशी आदर्श स्त्री मिळाली मला!”
“मग का नाही निकाह केला?”
मुल्ला नसरुद्दीनच्या डोळ्यातली चमक विझली. थोडासा निराश, पण विचारमग्न होऊन म्हणाला, “काय सांगू दोस्त! तिला नवरा म्हणून आदर्श पुरुष हवा होता. ती पण एका आदर्श पुरुषाच्या शोधात होती!”
[मुल्ला नसरुद्दीनच्या पारंपारिक कथा.]

वाङ्मयकथाविनोदसमाजजीवनमानप्रकटनविचारभाषांतर

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 5:16 pm | द-बाहुबली

_/\_

श्रीरंग_जोशी's picture

10 May 2015 - 5:50 pm | श्रीरंग_जोशी

अहाहा, खासंच आहे रुपककथा :-) .

नूतन सावंत's picture

10 May 2015 - 6:41 pm | नूतन सावंत

शोध कधी संपत नाही हे खरे.कधी याचा तर कधी तिचा.

रेवती's picture

10 May 2015 - 9:12 pm | रेवती

मनोरंजक कथा.

विनोद१८'s picture

10 May 2015 - 9:31 pm | विनोद१८

ही कथा बरेच काही सांगून गेली.

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2015 - 6:54 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

पैसा's picture

10 May 2015 - 9:36 pm | पैसा

जे मिळतंय त्यात खुश रहायला जमतं का बघा नाहीतर शोधत रहा!

सविता००१'s picture

10 May 2015 - 10:01 pm | सविता००१

सुंदर कथा

अंतरा आनंद's picture

11 May 2015 - 6:20 am | अंतरा आनंद

अगदी असचं असतं.:)

स्वीत स्वाति's picture

11 May 2015 - 8:48 am | स्वीत स्वाति

+++१११

कपिलमुनी's picture

11 May 2015 - 4:28 pm | कपिलमुनी

_/\_

स्पंदना's picture

11 May 2015 - 4:36 pm | स्पंदना

ते काय म्हणतात ना
दुसर्‍याच्या डओळ्यातल कुसळ दिसत..तसा प्रकार. अन मग तसाच कुसळ शोधणारा दुसरा मिळाला की धक्का बसतो.

अभिजीत अवलिया's picture

13 May 2015 - 1:22 am | अभिजीत अवलिया

सहमत

एस's picture

11 May 2015 - 5:11 pm | एस

वाह!

मोहनराव's picture

11 May 2015 - 5:19 pm | मोहनराव

छान कथा!

मृत्युन्जय's picture

11 May 2015 - 5:31 pm | मृत्युन्जय

मस्त कथा. :)

सूड's picture

11 May 2015 - 8:53 pm | सूड

खास !!

उगा काहितरीच's picture

11 May 2015 - 10:10 pm | उगा काहितरीच

जरा इजिप्त वालीचा पत्ता मिळेल का ;)

रुपी's picture

11 May 2015 - 11:39 pm | रुपी

मस्तच!

रातराणी's picture

12 May 2015 - 12:44 am | रातराणी

मस्तय! आवडली गोष्ट :)

विजुभाऊ's picture

12 May 2015 - 5:03 pm | विजुभाऊ

क्या बात है......