वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं.
अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले. कोंबंड कितीही झाकल तरी आरवत तसे "इराक युद्धातील रासायनीक शस्त्रांनी झालेल्या गोपनीय दुखापती" हे न्युयॉर्क टाईम्सने दिलेले वृत्त मूळातूनच वाचण्यासारखे आहे.
सद्दाम हुसेनच्या इराकला ज्याकाही मुळ कारणाने आमेरीकेने अंकीत केले असेल पण वर उघडपणे दिलेले कारण सद्दाम नवी रासायनिक आयुधे बनवतोय असे दिले जात होते. इराक युद्धात नव्या रासायनीक आयुधांचे पुरावे तर आमेरीकेला गवसले नाहीत. पण इराकमध्ये रासायनीक शस्त्रे होतीही आमेरीकन सैनिकांना दुखापतीही झाल्या, एवढेच वाक्य वाचले तर विशेष काही नाही. शत्रुपक्षाच्या कोठ्यातील रासायनीक शस्त्रामुळे आपल्या सैनिकांना झालेल्या हानी कशामुळे झाल्या हे इतर जगापासून आमेरीकेस गुप्त ठेवण्याचे वस्तुतः काही कारण नसावे. पण गोपनीयता या स्तराची ठेवली कि दुखापत झालेल्या आमेरीकन सैनिकांना सुविहीत वैद्यकीय मदतही मिळणार नाही. कारण वैद्यकीय मदतीच्या निमीत्ताने वस्तुस्थिती स्विकारली की पुरावे बाहेर येतात. अस काय असेल त्या पुराव्यांमध्ये ?
तर आमेरीकन सैनिकांना दुखापती पोहोचवणारी रासायनीक शस्त्रे नवी नव्हती १९८०च्या दशकात इराण विरुद्ध लढताना सद्दामने बनवली इराण विरुद्ध युद्ध संपल्या नंतर त्यांचा वापर थांबवलेल्या नंतर उरलेली शस्त्रे होती ही. जुनी का असेनात शत्रुपक्षा कडे रासायनीक शस्त्रे मिळाली हे आमेरीकी सरकारने ओरडून सांगावयास हरकत नव्हती पण घडले उलटे ऑपरेशन गोपनीयता सुरु झाले. का ? तर इराण विरुद्धच्या लढाईत सद्दामने वापरलेल्या रासायनिक शस्त्रांचे डिझाईन आमेरीकी आणि उत्पादन युरोपियाई देशांतील कंपन्यांच्या साहाय्याने झाले होते. इराण विरुद्ध आमेरीका आणि युरोप एवढे आंधळे झाले होते की इराकला रासायनीक शस्त्रांबाबत मदत स्वत;च्याच कंपन्यांकडून होताना डोळे मिटून घेतले होते.
दुसर्यासांठी खोदलेला खड्डा आप्तस्वकीयांच्या कामाला येतो तसे सद्दाम पडल्या नंतरच्या काळात जिथे जिथे जुन्या उर्वरीत रासायनीक शस्त्र साठ्यापाशी आमेरिकी सैनिक पोहोचू लागले तिथे तिथे हानी होणे चालू झाले पण आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा रासायनीक शस्त्रांची विल्हेवाट पुरावे जतनकरून विशीष्ट प्रक्रीयेने करणे अभिप्रेत असते. आणि आमेरिकी सरकारला हे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर बाहेर येऊन नको होते कारण त्यात त्यांचीच पोलखोल झाली असती. मग आपले शेजारी राष्ट्र जसे सैनिकी वेषा शिवाय त्यांच्या सैनिकांना अतिरेकी म्हणून पाठवते आणि पुरावे नको म्हणून त्यांचे देहपण स्विकारत नाही तसे हे आमेरीकन वागणे. ते ही सर्वसामान्य आमेरीकन माणसाच्या हितासाठी नव्हे तर विशीष्ट आमेरीकन कंपन्यांची आणि त्यांना सरकारातून आशिर्वाद देणार्यांची पोलखोल होऊ नये म्हणून.
तर आमच्या मित्र यादीत नव्याने सामील झालेले असे "इराक युद्धातील रासायनीक शस्त्रांनी झालेल्या गोपनीय दुखापती" हे न्युयॉर्क टाईम्सने दर्शविलेले राष्ट्र आणि त्यांची त्यांच्याच सामान्य सैनिकांना भारी पडलेली रासायनीक गोपनीयता. आणि एवढेकरुन डॉलरात दावे सेटलकरण्या पलिकडे तेथे या बाबत फारसे काही होणार नाही. भारतात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आपसूक मिळतो काही ना काही दबाव असतो तसे आमेरीकन दबाव व्यापारीकरणास अधिक विकले गेले असल्यामुळे त्यांच्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आपल्या विधान परिषदेतील पदविधर मतदार संघात जसे रजिस्ट्रेशन करून मग मतदान तसे काहीसे असावे. हि आमेरीकन लोकशाही अधिक लोकशाही मार्गाने जात नाही तो पर्यंत त्यांच्या यशाने डोळे दिपलेले आपण ऐसीवर या वर्षीच्या दिवाळी अंकात आलेल्या संजीव खांडेकरांच्या नांगी गळू लागलेले फुलपाखरू आणि लाकूडतोड्याची गोष्ट अशा लहान सहान काव्य लेखांकडे किती लक्ष देऊ या बद्दल साशंकताच वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यात नवल ते काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipयुनियन कार्बाइड चा भारतीय
होय त्यांच्या मदती शिवाय
चांगला लेख
युनियन कार्बाईडचा आणि भारतीय
इंग्रजी विकिपीडियावर हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }भारतीय लोकांनाच काही पडले
एकुणच "युनियन कार्बाईडचा "
खून केलेल्यांना न्यायालयाने