छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
19 Aug 2014 - 2:30 pm

नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.

या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.

स्पर्धेचे अन्य नियमः

१)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील.

स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

हे ठिकाणकलाजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

27 Aug 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

श्रीरंगनं सुचवलंय :

उदा. प्रतिक्रियेमध्ये सदस्याने लिहावे

मत # १ - अबक यांचे दुसरे चित्र
मत # २ - कखग यांचे पहिले चित्र
मत # ३ - अबक यांचे पहिले चित्र

१) त्यापेक्षा, प्रत्येक स्पर्धकाचे एकाखाली एक सलग तीन फोटो असा नवा धागा असावा.
२) पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत १ ते ... असा रनींग नंबर द्यावा.
३) सदस्यांनी प्रतिसादात :
फोटो क्रमांक ... - १ गुण
फोटो क्रमांक ... - २ गुण
फोटो क्रमांक .... - ३ गुण

लिहीलं की झालं!

दिव्यश्री's picture

27 Aug 2014 - 4:00 pm | दिव्यश्री

सगळे फोटो मस्त आहेत , आवडले . :)