युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Feb 2013 - 3:53 pm

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काही वेळा चोवीस तासात २०००० ज्यूंना ठार मारण्याची कामगिरी या तुकड्यांनी पार पाडली होती आणि हे फक्त ऑशविट्झमधे.....बाकी ठिकाणी असेच काहीतरी होत असणार...

या कैद्यांपैकी सोंडरकमांडो झालेला एक कैदी जोसेफ साकर याने त्याच्या आठवणी सांगताना सांगितले, ‘त्यांच्यापैकी बहुतेक जणांना ते मरणार आहेत हे माहीत होते. ते वातावरणच तसे होते. त्यांना मरणाची चाहूल लागायची. ते घाबरले होते. आया त्यांच्या मुलांना कवटाळून बसत...काही टाहो फोडत तर काही लाज गेल्यामुळे चूप बसत. मुले बिचारी मुलांसारखी वागत, त्यांच्या आईवडिलांच्या हातासाठी चाचपडत, आईवडील शोधून शोधून दमून जात. या सगळ्या प्रकाराची त्या बिचार्या मुलांना कल्पना असेल का ? कशी असणार ? या कैद्यांना पुढे काय होणार आहे याची कल्पना येऊ नये म्हणून त्यांच्या कपडे अडकविण्याच्या खुंट्यांना क्रमांक दिले होते. जेव्हा ते कपडे काढत तेव्हा त्यांना त्या खुंट्यांचे क्रमांक लक्षात ठेवायला सांगण्यात येत. जणू काही ते परत तेथे ते कपडे घालायला येणार होते. गॅसच्या कोठड्यांपर्यंत जाणार्‍या हॉलमधील रस्त्यावर कडेला विश्रांतीसाठी बाकडीही टाकली होती.’
सोंडरकमांडो........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एकदा का कैदी त्या गॅसच्या कोठडीमधे शिरले की ते संपल्यातच जमा होत. न्युरेंबर्गमधे गळफास घ्यायच्या अगोदर रुडॉल्फ हेसने त्याच्या आठवणीत निर्लज्जपणे या झायक्लॉन-बी बद्दल टिप्पणी केली -
‘माझा अनुभव असा आहे की झायक्लॉन-बीने माणसे पटापट मरत आणि निश्चित मरत. जर खोल्या कोरड्या आणि हवाबंद असल्या तर हे काम अजूनच जलदगतीने होई. यात माणसे कोंबली व तो विषारी वायू आत टाकायला जर पुरेशी छिद्रे असतील तर यातून एकही माणूस जिवंत रहायची सुतराम शक्यता नसे. मी तरी या गॅस कोठड्यांतून एकही कैदी यात जिवंत राहिलेला बघितला नाही.’

रुडॉल्फ हेस.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्या गॅस कोठड्यातील शेवटची तीस मिनिटे या जगाच्या पाठीवरील कुठलाही माणूस विचार करू शकणार नाही एवढी भयंकर असत. या गॅस कोठड्यातील सर्वात अधुनिक अशा दोन ऑशविट्झ येथे होत्या. त्यांची नावे होती क्रेमेटोरिया-२ आणि क्रेमेटोरिया-३ या कोठड्यांमधे जाळीच्या खांबात याच्या वड्या टाकल्यावर हा वायू आत सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरत असे. (बहुदा त्यात एखादा पंखा असेल) पण काही जुनाट गॅस भट्ट्यांमधे तो वायू जमिनीलगत साठून रहात असे व हळू हळू वरच्या दिशेला जात असे. आतमधे जगण्याच्या धडपडीमधे ताकदवान कैदी तुलनेने कमकुवत असणार्‍या कैद्यांना पायाखाली घेऊन छताजवळ जायचा प्रयत्न करत. जोसेफ साकर याने त्याच्या मुलाखतीत सांगितले, ‘त्या कोठडीतील कैद्यांना आता ते मरणार आहेत हे कळले होते. जगण्याच्या धडपडीत ते जास्तीत जास्त वर जायचा प्रयत्न करत. त्या भयानक वायूमुळे कधी कधी त्या माणसांची कातडी सोलून निघायची.’ कैदी दरवाजे व भिंती नखांनी ओरबडायचे आणि त्यांचे भेसूर रडणे व किंचाळणे त्या जाडजूड दरवाजाच्या बाहेरही ऐकू यायचे. साँडरकमांडो दरवाजा उघडून जेव्हा आत शिरायचे तेव्हा त्यांच्या नजरेस जे दृष्य पडायचे ते फार म्हणजे फार भयानक असायचे. त्यांचा इतिहास ज्यांनी लिहिला त्याने आठवणींत नमूद केले आहे, ‘दार उघडल्यावर त्यांचा नजरेस काळीनीळी पडलेली प्रेते पडत. त्या प्रेतांचे चेहेरे वाकडे तिकडे, वेदनेने पिळवटलेले असत. डोळे विस्फारलेले व त्या डोळ्यात त्या शेवटच्या क्षणात होणार्‍या वेदनांचे प्रतिबींब पडलेले असे.’

न्युरेंबर्गमधे साक्ष देतांना ऑट्टो मॉल नावाच्या ऑशविट्झच्या एका तुरूंग रक्षकाने आयांनी कपड्यांच्या ढिगात लपवलेल्या लहान बाळांची, सापडल्यावर काय अवस्था व्हायची याबद्दल सांगितले, ‘या खोल्यातून कैद्यांची रवानगी केल्यानंतर ते ही मुले घेऊन त्यांना त्या गॅस कोठड्यांमधे अक्षरश: फेकत.’ याच रक्षकाला झायक्लॉन-बी वायुचा परिणाम किती वेळाने कसा होतो याचा अभ्यास करायला सांगण्यात आले होते. त्या संदर्भात त्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले, ‘गॅस आत टाकल्यावर साधारणत: दीड मिनिटात खोलातून येणारे आवाज यायचे बंद व्हायचे’ हे आवाज कसले होते असे विचारले गेल्यावर त्याने सांगितले, ‘ते रडत व किंचाळत.’ इतर काही साक्षीदारांनी या लागणार्‍या वेळावर शिकामोर्तब केल्यामुळे हे खरे असावे हे गृहीत धरायला हरकत नसावी.

झायक्लॉन-बी
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कधी कधी एखाद्या सोंडरकमांडोला प्रेतांमधे आपल्या कुटूंबियांची प्रेते सापडायची. हेसने त्याच्या आठवणीत लिहिले आहे की ‘कित्येकदा यातील काहींना आपल्या बायकोचे बोट धरून तिला भट्टीकडे न्यावे लागे. ते करून ते शांतपणे जेवणासाठी टेबलाभोवती निर्विकार चेहर्‍याने बसत.’ याच्या उलट एका सोंडरकमांडोने आपल्या आईबरोबर गॅस कोठडीमधे शांतपणे प्रवेश केला व तो तेथे आईबरोबरच विषारी वायूला सामोरे गेला. दुर्दैवाने इतर ज्यू कैदी सोंडरकमांडोंचा तिरस्कार करत व त्यांना नाझींचे हस्तक समजत. लेखक प्रायमो लेव्हीने लिहिले आहे की ‘सोंडरकमांडो नाझींचे हस्तक नव्हते पण ते त्या रेषेवर उभे होते. हे नसते तर नाझींचे काम फार अवघड झाले असते. अर्थात ते काम यांनी केले नसते तर त्यांना ठार करण्यात आले असते व त्यांच्या जागी युक्रेन, बाल्टीक व बेलोरशियन नागरिकांची भरती केली गेली असती. जीव वाचवण्यासाठी या लोकांनी हे काम आनंदाने स्वीकारले असते.

वर लिहिलेले सगळे खरे असले तरी एक आपण लक्षात घेतले पाहिजे की या कैद्यांना सोंडरकमांडो होणे किंवा मृत्यू स्विकारणे हे दोनच पर्याय उपलब्ध होते. या छावण्यांमधे शक्य असेल तेव्हा कैद्यांना लपून छपून अन्नही तेच पुरवत. शिवाय नाझींच्या विरुद्ध या छावण्यांमधे जो एकच उठाव झाला तो ही सोंडरकमांडोनीच केला होता. ७ ऑक्टोबर १९४४ रोजी जेव्हा क्रेमोटोरियम-४ मधे सोंडरकमांडोंची गॅस कोठडीमधे जाण्यासाठी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी मिळेल त्या हत्यारांनी नाझी एस्. एस् रक्षकांवर हल्ला चढवला. यात त्यांनी त्या भट्टीलाच आग लावली व तीन नाझी रक्षकांना ठार केले आणि बारा नाझी सैनिक जखमी केले. त्या छावणीतील स्त्री कैद्यांनी लपून छपून आणलेल्या स्फोटकापासून हातबाँब तयार करून ती भट्टीही उध्वस्त केली पण हा उठाव संध्याकाळपर्यंत संपुष्टात आला. कोणालाही त्या तुरुंगातून पलायन करता आले नाही. या प्रयत्नात २५० कैदी ठार झाले तर दुसर्‍या दिवशी २०० जणांना ठार करण्यात आले. ज्या स्त्री कैद्यांनी स्फोटकांची चोरटी वाहतूक केली होती त्या इस्टर वाजब्लम, रेजिना साफिरझाटन, आला गर्टनर आणि रोझा रोबोटा यांना हालहाल करून सात दिवसांनी ठार मारण्यात आले. नाझींच्या सॉबीबॉर, ट्रेब्लिंका व ऑशविट्झ येथे झालेल्या उठावात सोंडरकमांडोंचाच हात होता. याच्या मागचे एक महत्वाचे कारण होते की त्या छावण्यांमधे असे करायची शारिरीक शक्ती फक्त यांच्याकडेच होती. युद्ध संपल्यावर नाझींच्या विरोधात साक्ष देण्यास उपयोगी पडेल अशी माहिती त्यांनीच पत्र्याच्या अनेक डब्यात जमिनीत पुरून ठेवली. या सगळ्या कहाण्या वेळोवेळी प्रकाशीतही झाल्या आहेत. या लिहिणार्‍यांपैकी झालमन ग्राडोवस्कीने त्यात स्वत:लाच प्रश्न विचारला, ‘‘मला आता या सगळ्याचे दु:खही होत नाही व माझ्या डोळ्यात अश्रूही येत नाहीत. आमच्या संवेदना गोठल्या आहेत का ? आम्ही भावनाशून्य झालो आहोत का ? काय झाले आहे आम्हाला ? याचे उत्तरही त्यानेच लिहून ठेवले आहे, ‘‘आमच्या आयुष्यात पद्धतशीरपणे होत असलेले मृत्यू हीच एक जिवंत गोष्ट आहे. ते बघून बघून आमच्या भावना मेल्या आहेत, आम्ही गोंधळून गेलो आहोत आणि आमच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत.’’

या सगळ्या छळातून व युद्धातून जिवंत राहिलेल्या ऐशीपैकी बर्‍याच सोंडरकंमांडो कैद्यांनी युद्धानंतर मुलाखती दिल्या त्यात त्यांनी त्यांच्या वागणूकीचे स्पष्टीकरण देताना म्हटले की त्यांनी यांत्रिकपणे माणसे मारली कारण त्यांना नाझीं विरूद्ध साक्ष देण्यासाठी जिवंत राहणे अत्यंत आवश्यक वाटत होते. हतबलता, मद्यपान व मृत्यू यांनी एका वेगळ्या मानसिकतेला जन्म दिला. या मानसिकतेच्या (सोंडरकमांडोंचा गुंतागुंतीचा नैतिक अध:पात) पार्श्वभुमीवर या असहाय्य खाटिकांना काम करणे भाग पडले. आश्चर्य म्हणजे या सोंडरकमांडोमधे आत्महत्येचे प्रमाण अत्यंत अल्प होते. त्यांचा इतिहास ज्यांनी लिहिला आहे त्याने म्हटले आहे की ‘त्यांना पुढे काय होणार आहे हे माहीत होते तरी त्यांना एकाही ज्यूचा प्राण वाचवता आला नाही. गॅसच्या कोठड्यांमधे जाताना स्त्रिया आपली बाळे, हत्याकांडातून वाचतील या आशेने सोंडरकमांडोंच्या हातात कोंबत, त्यातील एकाही तान्ह्या बाळाला ते वाचवू शकले नाहीत.’

कैद्यांच्या कपड्यावरील खुणा...........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सोंडरकमांडोंना ते ’गेहानिस्ट्रेगर असल्यामुळे, म्हणजे बरीच गुपिते माहीत असल्यामुळे एकत्र ठेवण्यात येई. त्यांना त्यांच्या पदाचा राजिनामा अर्थातच देता येत नसे. त्या भट्ट्यांमधे जाण्याआधी या महायुद्धाचा अंत व्हावा अशी आशा करणे एवढेच त्यांच्या हातात होते. ज्यू कैद्यांना गॅसस्नानासाठी नेल्यावर त्या दुर्दैवी जिवांच्या सामानांची पहिल्यांदा तपासणी करायचे काम यांच्याकडे असल्यामुळे त्या सामानातील खाद्यपदार्थ यांच्या हातात पडत. शिवाय यांना शारीरीक काम करावे लागत असल्यामुळे यांना जास्त खायला मिळत असे. जर्मन सैनिकही ते अमानुष काम करावे लागण्याच्या भितीने यांना सांभाळत. त्यांना कैद्याचे कपडे न घालण्याची मुभा असे. प्रेते जाळायच्या भट्ट्यांवरच्या मजल्यावर खोल्यात यांना झोपायला खाटा व गाद्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यांना थोडाफार आराम करायची परवानगी होती व एस्. एस् सैनिक यांना जरा मोकळीक देत. साकर म्हणाला ‘आम्हाला अन्न, कपडे आणि विश्रांती याची ददात नव्हती.’ सर्व कैद्यांच्या हातावर त्यांचा कैदी क्रमांक गोंदलेला असे. या खेरीज सोंडरकमांडोंच्या शर्टांवर एक रेड क्रॉस रंगवलेला असे. कैद्यांची जातकुळी ओळखण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या खुणा केलेल्या असत. उदाहरणार्थ ज्यूंना त्यांच्या पोषाखावर स्पष्ट दिसेल असा डेव्हिडचा पिवळा तारा लावावा लागे. ख्रिश्चनांचा एका पंथ ‘जेहोव्हा विटनेस’ च्या अनुयायांना त्यांच्या कपड्यांवर जांभळ्या पट्ट्या लावाव्या लागत. समलैंगीक असणार्‍यांना गुलाबी तर जिप्सींना काळ्या रंगाच्या पट्ट्या कपड्यांवर शिवाव्या लागत. रशियन वंशाच्या कैद्यांना RU ही अक्षरे कपड्यांवर लिहावी लागत. १९४३ सालापासून सर्व कैद्यांना दंडावर किंवा हातावर कोपराच्या खाली कैदी क्रमांक गोंदवावा लागे. कधीकधी हा क्रमांक पायावर किंवा मांड्यांवरही लिहिण्यात येई.

छायाचित्र 7 हातावर गोंदलेला कैदी क्रमांक
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
या छळछावण्यात कामाला असलेल्या एस् एस रक्षकांच्या व त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या इतर दलांच्या क्रुरतेला सीमा नव्हत्या. या छळातून या लोकांना विकृत आनंद मिळत असे. या रक्षकांच्या विनोदाच्या कल्पनाही अती भयंकर असत. सॉबीबॉरमधून वाचलेल्या ६० ज्यू कैद्यांपैकी एका मोशे श्कारेक नावाच्या कैद्याने आठवणीत सांगितले, ‘एस्. एस् स्टाफ सार्जंट पॉल ग्रॉट समोर दिसलेल्या कुठल्याही ज्यू कैद्याला पकडत असे व त्याला वाईनची एक पूर्ण बाटली आणि एक किलो सॉसेज काही मिनिटात खायला लावत असे. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्या बिचार्या कैद्याने ते खाल्यावर त्याला तोंड उघडायला लावून तो त्यात मुतत असे.’ कुठल्याही कारखान्यात असतात तशा या मृत्यूच्या कारखान्यातही कामाच्या पाळ्या होत्या, पर्यवेक्षक होते (यांना कँपोस असे म्हणत), कनव्हेयर बेल्ट होते, व हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवायच्या पद्धतीही विकसीत केल्या गेल्या होत्या. विषारी वायूच्या कोठड्यांमधे जाणार्‍या कैद्यांना काय सांगायचे याच्या सविस्तर व अचूक सुचना सोंडरकमांडोना देण्यात येत जेणेकरून कैदी त्या कोठडीमधे कटकट न करता जातील. सोंडरकमांडो त्या कैद्यांना शक्यतो घाबरवत नसत कारण भितीने ते आधीच अर्धमेले झालेले असत. साकरने म्हणतो, ‘मी शक्यतो त्यांच्या नजरेला नजर देणे टाळत असे. माझ्या डोळ्यातील भाव त्यांनी वाचू नयेत अशी माझी इच्छा होती.’ साकरने नंतर कबूली दिली की तो आणि त्याचे साथीदार माणसे मारायची यंत्रे झाली होते. पण तो म्हणाला, ‘आम्ही माणसे मारायची यंत्रे झालो होतो खरे पण आमच्या भावना जिवंत होत्या. आम्हीही आतल्या आत रडत असू. आमच्या अवती भोवती जे काही चालले होते त्याने आमच्या मनावर निश्चितच विपरीत परिणाम होत होता. आम्हाला विचार करायला वेळच नव्हता आणि विचार करणे ही त्यावेळी फार गुंतागुंतीची अवघड बाब होती. विचार केला असता तर आम्ही सर्वजण ठार वेडे झालो असतो. म्हणून आम्ही सगळ्या विचारांना कोंडून ठेवले होते.’ साकर इतर कैद्यांमधे लपला म्हणून वाचला नाहीतर रशियन सैन्याने सुटका करायच्या अगोदर एकच दिवस एस्. एस् सैनिक त्याला शोधत होते. (हा महिना होता जानेवारी १९४५)

जे कैदी रेल्वे स्टेशनवर होणार्‍या प्राथमिक निवडीतून वाचले ते कमनशिबी होते असे म्हणायला हवे त्यांच्या पुढे काय वाढून ठेवले होते याची त्यांना कल्पना नव्हती. ठराविक काळाने सर्व बरॅकची नियमीत तपासणी होत असे. जे कामाला अयोग्य वाटत त्यांची ताबडतोब गॅसच्या कोठड्यांकडे रवानगी व्हायची. कामाला एखादा योग्य आहे की अयोग्य हे ते एस्. एस् सैनिक त्यांच्या मनाप्रमाणे ठरवत. इस्पितळात ही ‘निवड’ एस्. एस् डॉक्टर करत. मरायला टेकलेल्या रोग्यांची सर्रास कत्तल करण्यात येत असे. इतिहासकार गिडीऑन ग्रेगने लिहिले आहे की सात विभागात या ‘निवडीचे’ काम काम अखंड चालत असे व ज्याच्या विरूद्ध कोणी तक्रार करू शकत नसे. ही निवड करणार्‍या अधिकार्‍यांच्या हातात एक छडी असे. या छडीने हे अधिकारी मारहाण करत पण प्रामुख्याने याचा उपयोग कैद्यांच्या जवळ न जाता कैद्याची निवड करण्यासाठी होई. कैद्यांचा शारीरीक स्पर्ष, रोग होण्याच्या भितीने कोणत्याही परिस्थितीत टाळला जाई. प्रायमो लेव्हीने त्याच्या पुस्तकात लिहितो, ‘या निवडीतून सुटका करायचे प्रयत्न होत होते पण सुटका फार दुर्मिळ होती कारण ही निवड फार काळजीपूर्वक केली जायची. जर्मनांनी यात बरेच लक्ष घातले होते व अचूक पद्धत विकसीत केली होती.’ एका रात्री तहान लागलेल्या लेव्हीने (कैदी क्रमांक १७४५१७) आपल्या कोठडीची खिडकी उघडली. त्याने खिडकीवर जमलेला बर्फ हातात घेतला मात्र बाहेर उभ्या असलेल्या जर्मन सैनिकाने तो हिसकावून घेतला. लेव्हीने त्याला विचारले, का ? त्याला उत्तर मिळाले, येथे ‘का’ ला उत्तर नाही.’’ पण खरे तर त्याला उत्तर होते. जर्मनांना हे कैदी अशा अवस्थेत ठेवायचे होते की ते काम तर करू शकतील पण ते अशक्तही राहतील व काही दिवसात मरणपंथाला लागतील. ते मेल्यावर त्यांची जागा लगेचच पुढचा कैदी घेत असल्यामुळे काम करणार्‍यांची वानवा नसे.

लेव्हीच्या कोठडीतील एका कून नावाच्या कैद्याने त्याची गॅस कोठडीसाठी एका दिवशी निवड न झाल्यामुळे देवाची प्रार्थना करुन आभार मानले. ते बघितल्यावर लेव्हीने त्याच्या मनात त्या वेळी काय विचार आले त्याची आठवण सांगितली, ‘कूनला उद्या त्याची पाळी येणार आहे हे समजत नाही का ? त्याला हे उमजत नाही का, की आज जे झाले ते अत्यंत घृणास्पद होते. मानवाची कुठलीही प्रार्थना, क्षमा, प्रायश्चित्त मानवाचे हे पाप धूवू शकत नाही.

जर मी परमेश्वर असतो तर कूनच्याच काय कुठल्याही मानवाच्या प्रार्थनेवर थुंकलो असतो................’

भट्टी........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी.
पुढचा भाग १६ मार्च नंतर.........

इतिहासकथालेख

प्रतिक्रिया

इरसाल's picture

22 Feb 2013 - 4:02 pm | इरसाल

अस मधे थांबु नका. १६ मार्च म्हणजे फारच उशीर.
अतिशय छान लिहीत आहात. वाचवत नाहीए पण रहावत पण नाहीए

जयंत कुलकर्णी's picture

22 Feb 2013 - 4:40 pm | जयंत कुलकर्णी

गावाला जाणार आहे..........

मन१'s picture

22 Feb 2013 - 4:20 pm | मन१

.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Feb 2013 - 5:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

देवा....

प्रचेतस's picture

22 Feb 2013 - 6:26 pm | प्रचेतस

भयानक आहे.

पैसा's picture

22 Feb 2013 - 6:45 pm | पैसा

भयानक

जर्मनी बद्दल तिरस्कार अजुन वाढला.

कपिलमुनी's picture

22 Feb 2013 - 8:04 pm | कपिलमुनी

सारासार तिरस्कार करू नका आणि समर्थनही !!

५० फक्त's picture

23 Feb 2013 - 9:43 am | ५० फक्त

+१ कपिलमुनी,

अतिअतिअवांतर -

श्री. जयंत कुलकर्णींना एक विनंती, या विषयातलं, म्हणजे इतिहासातली तुमची आवड वादातीत आहे, तुम्ही इथं जसं हिटलरच्या किंवा त्याच्या सहका-यांच्या कृरतेबद्दल लिहित आहात, तसंच इतरांच्या म्हणजे रशियन,अमेरिकन,अफगाणी आणि पार ब्रिटिश, मुघल, स्पॅनिश यांच्याबद्दल सुद्धा लिहाल का, काय आहे हे उगाच गोबेल्स सारखं वाटायला लागलंय. तिथं हिटलरच्या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे, जगात कृर तो एक हिटलरच बाकी सगळे अगदी सत्याग्रही असं चित्र निर्माण होतं आहे. तुम्हाला विनंती याचसाठी की तुम्ही या बाकीच्यांच्या बाबतीत देखील अभ्यास करुन काही लिहु शकाल, इतर जण जास्तीत जास्त विकिपिडिया आणि गुगल करुन लिका देतील बाकी काही नाही.

जयंत कुलकर्णी's picture

23 Feb 2013 - 1:39 pm | जयंत कुलकर्णी

माझे बाकीचे लेख विसरलात की काय ? त्यात मी रशियन, इटालियन, जपानी क्रूरतेबद्दल लिहिलेअ आहे. पण मी ते क्रूरतेबद्दल लिहावे म्हणूम लिहिले नाही हे खरे आहे. हे मात्र मी त्याबद्दलच लिहिले आहे हेही खरे आहे. गोबेल्स आणि या लिखाणातील एक मोठा फरक आहे तो म्हणजे हे सगळे घटना घडून झाल्यावर त्यांच्याच कागदपत्रांवर आधारित आहे. त्यामुळे हा प्रचार नाही. अल्बर्ट स्पीअरवर मी लिहिलेले आपण वाचले असेल असे वाटते त्यात गोबेल्सविषयीही लिहिले आहे. मग मी ही सत्यकथा का लिहिली ? त्याचे स्पष्टीकरण कदाचित मी शेवटी देईन किंव कदाचित दुसरे कोणीतेरीही देऊ शकेल........

मोदक's picture

23 Feb 2013 - 12:41 am | मोदक

:-(

अग्निकोल्हा's picture

23 Feb 2013 - 3:55 am | अग्निकोल्हा

व्हेरि बॅड!

स्पा's picture

23 Feb 2013 - 9:50 am | स्पा

वाचवत नाहीये

मन१'s picture

19 Mar 2013 - 5:33 pm | मन१

+१

लाल टोपी's picture

23 Feb 2013 - 1:13 pm | लाल टोपी

इतरांनी केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला तरी या घटनांमधील वास्तव पुसले जाणार आहे का? की आणखी काही लोक क्रूर होते म्हणून तुलनेत हिटलर दयाळू ठरतो? जयंत जी संवेद्नाशील विषय खुपच तटस्थ् पणे लिहला आहे.

बांवरे's picture

23 Feb 2013 - 3:18 pm | बांवरे

काय किड्यामुंग्यांसारखे मारले आहे. :( :(

पिंगू's picture

19 Mar 2013 - 5:08 pm | पिंगू

:(

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 5:35 pm | बॅटमॅन

:( .............

शिल्पा ब's picture

20 Mar 2013 - 12:08 am | शिल्पा ब

निष्पाप लोकांना, मुलांना मारुन नेमकं काय मिळालं? भयानक मनोविकृती असलेली लोकं होते हे !

अवांतर होतंय पण मुसलमान मनोवृत्तीसुद्धा हीच आहे. फक्त हिटलर एवढी ताकद नाही म्हणुन सगळी दहशतवाद करणं चालु आहे नाहीतर अशा भट्ट्या अजुनही दिसल्या असत्या.

:(

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2017 - 11:22 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबर!