एकात एक...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
7 Mar 2012 - 6:05 pm

भात लावायचाच ना भांड्यात..
मूठभर डाळ त्यातच टाकू..
होऊन जाईल एकात एक..

भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट..
लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं..
ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात..
चहासोबत पेपरही संपवू..
होऊन जाईल एकात एक..

आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर..
रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल..
नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..
होऊन जाईल एकात एक..

बायकोसोबत एरवी एकांत कुठला मिळायला...
गणपतिपुळ्याला जाऊ.. समुद्राकाठी रिसॉर्ट...व्हरांड्यात बियरमधून दिसणारा सोनेरी समुद्र..अन डोळ्यांना थंडावा..
दगदगीतून अनवाईंड व्हायला हवं...स्वतःला शोधायला हवं..
....देऊळही आहे.. जोडीने दर्शनही करु..
होऊन जाईल एकात एक..

पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब....
लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस..
वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस..
आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग..
आहारनियंत्रण.. योगासनं..
डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..
उपवास आणि श्वासोच्छवास..
या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी..
होऊन जाईल.. एकात एक..

मुक्तकजीवनमानराहणीभूगोलप्रकटनविचारप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

7 Mar 2012 - 6:09 pm | मी-सौरभ

मस्त जमलयं (नेहमीप्रमाणे) :)

(एकात अजून एक असावा असे दिसणार्‍या गविंचा पंखा)

विजुभाऊ's picture

25 Jul 2012 - 12:46 pm | विजुभाऊ

प्र का टा आ

प्यारे१'s picture

25 Jul 2012 - 12:57 pm | प्यारे१

भौ,

प्र का टा म 'घा' क???? ;)

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 6:12 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच..
गवि रॉक्स!!!

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 6:16 pm | सांजसंध्या

छानच :)

प्रदीप's picture

7 Mar 2012 - 6:23 pm | प्रदीप

.

तिमा's picture

8 Mar 2012 - 12:03 pm | तिमा

असेच म्हणतो, छान गवि टच!

गवि साहेब, अप्रतिम पण रस्ता चुकलात,

खर तर हि मुक्त काव्य आहे ते काव्य ह्या गटात हव होत.

राग मानु नये

असहमत..

हे ही एकात एक आहे. ;)

चिमी's picture

7 Mar 2012 - 6:24 pm | चिमी

मस्तच
तुमच्या पंख्यांमधे अजुन एक
-चिमी :-)

राजो's picture

7 Mar 2012 - 6:30 pm | राजो

अ प्र ति म !!!!

प्रास's picture

7 Mar 2012 - 6:43 pm | प्रास

मस्त लिहिलयस रे!

पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब....
लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस..
वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस..
आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग..
आहारनियंत्रण.. योगासनं..
डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..
उपवास आणि श्वासोच्छवास..
या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी..

हे तर मनाला जास्त भिडलं.

"बाकी होऊन जाईल... एकात एक" हे जर धृवपद मानलं तर एकूण लिखाणाचा बाज या गाण्यासारखा वाटतोय -

*

काय बोल्तो? ;-)

इरसाल's picture

7 Mar 2012 - 6:44 pm | इरसाल

सुंदर आणी सुरेख..............

अन्या दातार's picture

7 Mar 2012 - 6:55 pm | अन्या दातार

कॅमेरा असलेलाच मोबाईल घेऊ
दुसरा कॅमेरा घ्यायची गरज नाही. होऊन जाईल एकात एक

या सगळ्या एकात एक करता येणार्‍या गोष्टींना मिपा किंवा तत्सम मराठी संस्थळे अपवाद असावीत. कुठेही प्रतिसाद व लेख एकात एक आढळणार नाहीत

सोत्रि's picture

7 Mar 2012 - 6:59 pm | सोत्रि

गवि रॉक्स!

- (जगणं उरकणारा) सोकाजी

तर्री's picture

7 Mar 2012 - 7:03 pm | तर्री

गवि घरण्याला साजेसे लेखन.

कविता करित होतोत की लेख ?
जमले आहेच एकात एक .

अमितसांगली's picture

7 Mar 2012 - 7:08 pm | अमितसांगली

लय भारी...आवडल सगळ एकात एक

धन्या's picture

7 Mar 2012 - 7:38 pm | धन्या

मस्त...

डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..

आताच फुड कोर्टमधलं अक्षरधाराचं पुस्तक प्रदर्शन पाहून आलो. ढीगांनी दिसली अशी पुस्तकं. :)

मन१'s picture

7 Mar 2012 - 7:44 pm | मन१

मस्त...

वपाडाव's picture

7 Mar 2012 - 7:50 pm | वपाडाव

गवि टच...

सुहास झेले's picture

7 Mar 2012 - 8:55 pm | सुहास झेले

टिपिकल गवि.... नेहमीप्रमाणे अफलातून लेखन :) :)

रेवती's picture

7 Mar 2012 - 9:20 pm | रेवती

छान.

जाई.'s picture

7 Mar 2012 - 9:23 pm | जाई.

छान नेहमीप्रमाणेच

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

योगायोगवादी काव्य... :-)

जयवी's picture

8 Mar 2012 - 12:15 am | जयवी

आवडेश :)

धनंजय's picture

8 Mar 2012 - 1:00 am | धनंजय

फारच छान

मिसळ's picture

8 Mar 2012 - 1:03 am | मिसळ

थोड्या शब्दात बरच काहि सांगून जाणारं!

नंदन's picture

8 Mar 2012 - 1:31 am | नंदन

नेहमीप्रमाणेच अप्रतिम. मोजके, थेट शब्द; नेमकी वाक्यं.
(या स्फुटावर कोणी '+१' असा प्रतिसाद दिला, तर तो काव्यगत न्याय म्हणावा लागेल :))

पैसा's picture

8 Mar 2012 - 8:01 am | पैसा

+१ झालं एकात एक!! ;)

गवि, मस्त लिहिलंय, धन्यवाद.

पप्पु अंकल's picture

8 Mar 2012 - 8:11 am | पप्पु अंकल

तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचतोय नव्हे आवडीने वाचतोय……

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2012 - 8:31 am | नगरीनिरंजन

कमीतकमी शब्दांत बरोबर नस पकडण्याची हातोटी विलक्षण आहे!
आवडले.
या एकात एकच्या मागे सतत पैसा वाचवणे हा उद्देश असतो का? भरभरून जगण्याऐवजी आपण सतत कॅल्क्युलेटीव्ह का असतो वगैरे. बरेच दिवस हा विषय छळत होताच.

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 2:42 pm | वपाडाव

या एकात एकच्या मागे सतत पैसा वाचवणे हा उद्देश असतो का?

ननि, पैश्यासोबतच वेळही वाचत असावा म्हणुन कदाचित...

भरभरून जगण्याऐवजी आपण सतत कॅल्क्युलेटीव्ह का असतो वगैरे

सहमत...

कापूसकोन्ड्या's picture

9 Mar 2012 - 7:08 pm | कापूसकोन्ड्या

हो ना
पैसा वाचतो नी वेळ ही ! होउन जाउन द्या एकात एक !

सहज's picture

8 Mar 2012 - 8:44 am | सहज

फारच सुंदर कविता गवि!!

फारएन्डची क्रांती, चिगोची ईशान्य फॅक्ट फाईल, विमुक्ताचे पुनरागमन, मितानतैंच्या महत्त्वाच्या विषयावर सुरु झालेल्या लेखांची सुरवात, मिपाकर बंदा-खुर्दांना सगळ्यांनाच दंडवत , क्या बात क्या बात क्या बात, ग्रँड सॅल्युट द्यायचा होता.

होउन जाउ दे एकात एक!

सहज चक्रवर्ती
डान्स मिपा डान्स!

सहजमामांना सन्यास सोडायला भाग पाडलं म्हणजे बघा...

गवि, कविता आवडली.

सर्वसाक्षी's picture

8 Mar 2012 - 10:06 am | सर्वसाक्षी

एकिकरण आवडल

किसन शिंदे's picture

8 Mar 2012 - 10:09 am | किसन शिंदे

तुमचं कोणतंही लेखन असो, आपल्याला तर जाम आवडतं ब्वा.

sneharani's picture

8 Mar 2012 - 11:04 am | sneharani

मस्त लिहलय!!
:)

श्रीरंग's picture

8 Mar 2012 - 11:27 am | श्रीरंग

अप्रतीम!! :)

फारएन्ड's picture

8 Mar 2012 - 12:39 pm | फारएन्ड

त्या "म्हणून" प्रमाणेच ही ही आवडली. तेथेही कोणीतरी लिहीले होते त्याप्रमाणे कमी शब्दात जबरी इफेक्ट!

बरेच दिवसात कोणाशी मनमोकळा बोललो नाहिय्ये.
मिपावर लिहीन म्हणतो....होऊन जाईल एकात एक.........

खूप दिवस आपलं चर्चेचं गुर्‍हाळ चाललंय.. शनिवार-शुक्रवार-रविवार..कधी ना कधी भेटू..
पण आलीच नाही वेळ अजून..
बोलायचंय बसून याची खात्री बाळगा..
आता असं करा ना... काढा एखादं काम माझ्या गावी...मग त्यानंतर बसू रात्री..
कामही होईल..बसणंही होईल..
होऊन जाईल एकात एक.. :)

विजुभाऊ's picture

8 Mar 2012 - 2:27 pm | विजुभाऊ

जिंदगी मै तुमसे कभी रूबरू मिलना चाहता था.
तुम राह देखती रही... मै अपना आशियां बसाता रहा.
जिंदगी जीने केलीये होती है ये भूल गया
जीने की तैय्यारीयो मे सारी जिंदगी बीत गयी

विजुभाऊ's picture

8 Mar 2012 - 2:27 pm | विजुभाऊ

जिंदगी मै तुमसे कभी रूबरू मिलना चाहता था.
तुम राह देखती रही... मै अपना आशियां बसाता रहा.
जिंदगी जीने केलीये होती है ये भूल गया
जीने की तैय्यारीयो मे सारी जिंदगी बीत गयी

स्मिता.'s picture

8 Mar 2012 - 2:21 pm | स्मिता.

छान लिहिलंय. आजकाल सगळ्याच गोष्टी जेवध्या एकात एक होतिल तेवढ्या करयाची सवयच लागलीये.

कपिलमुनी's picture

8 Mar 2012 - 2:35 pm | कपिलमुनी

तुमच्या प्रतिभा ज्या सहजतेने विहारत गगनी पोचली आहे ते बघुन गगन विहारी या नावाची आठवण झाली ..

मराठमोळा's picture

8 Mar 2012 - 4:20 pm | मराठमोळा

मुक्तक आवडलं..
मध्यम वर्गीयांच्या ठराविक रक्कम महिन्याकाठी मिळणार्‍या चौकटीतल्या आयुष्यात असेच प्रसंग वारंवार येत राहतात.
(आता एकात एक करुन मध्यम वर्गीय कोन यावर दंगा झाला नाही म्हणजे मिळवली ;) )

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 4:32 pm | चौकटराजा

गवि नि कवि हे ही एकात एकच आहे की !
विधाता कोब्रा असला पाहिजे त्याने एकाच माणसात दोन वल्ली निर्माण करून म्हटले
पृथ्वीवर झाली गर्दी माणसांची
ना पार्कींगला जागा
घाई वहाने उचलण्याची
गवि नावाचा लेखक निर्मावा
त्याच वेळी कविला त्यात सामावावा
म्हणजे साधले की नाही एकात एक ??

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 4:44 pm | वपाडाव

मानगये... चौकटराजा...

क्यालेंडर + ऑर्गनायझर + एम पी ३ प्लेयर + एफ एम रेडियो +इंटरनेट ब्राउजर + क्यामेरा + पेन ड्राईव्ह + ब्याटरी = अलार्म घड्याळ + एस एम एस + एम एम एस + व्हिडीऑ प्लेअर + फोन. चालायच. होऊन जातं एकात एक

मल्टी टास्कींगचा जमाना आहे. वेळ कमी काम जास्त. त्यामुळे 'एकात एक' चालायचंच.
कधी तरी मात्र एकच एक गोष्ट करावी पूर्ण मन लाऊन आणि ती करण्याचाच आनंद अनुभवावा.

मृत्युन्जय's picture

9 Mar 2012 - 1:08 pm | मृत्युन्जय

( मी आधीदेखील म्हणलो होतो आणि परत म्हणतो गवि म्हणजे मिपाचे एक फाईंड आहेत :) )

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 4:21 pm | चौकटराजा

अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? )
इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ?
ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 4:22 pm | चौकटराजा

अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? )
इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ?
ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 4:24 pm | चौकटराजा

अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? )
इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ?
ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !

स्पंदना's picture

11 Mar 2012 - 11:30 am | स्पंदना

छान . फारच छान.

रघु सावंत's picture

11 Mar 2012 - 9:19 pm | रघु सावंत

गवि घरण्याला साजेसे लेखन केलतं असे सारेजण म्हणत आलेत .
मी हे प्रथमच तुमचं लिखाण वाचतोय. माझी प्रतिक्रीया म्हणाल तर ती संसारिक माणसाची प्रतिमा असावी असे वाटते.एकच सुट्टी कामं अनेक .एकच मनं पण कल्पना अनेक .तुमचं इतरही लेखन मी वेळातवेळ काढुन वाचेन .प्रथम तुमच्या बद्दल मी रामदास काकां कडून माहिती घेईन सवड काढून भेट घेईनचं
रघू सावंत

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Mar 2012 - 12:05 am | विश्वनाथ मेहेंदळे

कमीत कमी शब्दात बरेच काही सांगायचे तुमचे कसब लाजवाब आहे.

बऱ्याच दिवसात आपले बोलणे झाले नव्हते. म्हटले इथेच प्रतिसाद देऊन टाकू. होऊन जाईल एकात एक !!! :-)

साती's picture

13 Mar 2012 - 2:21 am | साती

भारीच आहे हे.
भेकरट की भेरकट?

यकु's picture

13 Mar 2012 - 5:55 am | यकु

पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब....
लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस..
वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस..
आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग..
आहारनियंत्रण.. योगासनं..
डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..
उपवास आणि श्वासोच्छवास..
या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी..
होऊन जाईल.. एकात एक..

कळस आहे!
______/\______!!
शेवटी एकाचा दोन, अर्थात क्रॅक झालो. ;-)