बडवा (१)
लेखनप्रकार
त्या पोलिसानी मागून विनोदला धरला. उचल्ला. एका हातात गचांडी आणी दुसर्या हातात गांडीवरची पैंट. विनोद च्या हातातली कुदळ गळून पडली होती. गळा आवळल्यान गोरा चेहरा लाल होऊ लागला. किश्या न ताबड्तोप हालचाल केली. विनोद ला अस धरल्यान खाड्कन रक्त चडलं त्याच्या डोळ्यात. किश्यान सरळ पोलिस इंन्स्पेक्टरच्या रोव्हॉल्वर ला हात घातला. त्याक्षणी इंन्स्पेक्टरन धाडकन विनोदला खालती आदळला. आणी किश्याच्या खणखणीत मुस्काडात ठेवून दिली. दोघाना सांगीतलं "नीचे बैठो''. आळीपाळीनं दोघाना चार चार लाथा लगावल्या. आदळला गेल्यान आधीच ओठ फाटला होता विनोदचा. रक्त वहात होतं तरीही दात ओठ चावत तो ओरडला '' जय भवानी'' ....... ''जय शिवाजी '' किश्यानही साथ दिली.
नीनू यारू ? मराठी ? संताप संताप झाला त्याचा. कानडी पाटी ऊखडतात काय? चांगली अद्दल घडवली पाहीजे ह्या शिवसेनावाल्याना. रात्रि टिपू सुलतान नगर मधली ड्युटी म्हणजे काहि ना काहि तरी लफड व्हायचच. इंस्न्पेक्टर बन्गोंडाला सवयच होती त्याची. पण त्याच्या कर्यक्षेत्रात एकही लफड फार मोठं होउ द्यायचा नाही तो. ही विशितली फाल्तू मराटी पोरं, आज अस्सा दांडू देउ त्याना की सारा बेळगाव याद राखेल.
इंन्स्पेक्टर साठी हिशोब सरळ होता. पोरं बडवायचि , साहेब तर खुश होइलच , पण कानडी पेपर मधे झक्कपैकी फोटो पण छापुन येइल. इंन्पेक्टर बन्गोंडा हि तशी अजब वल्ली होती. प्रामाणिक आणी हिरोइक तरुण. देशभक्त, कडक आणि स्वतच्या मायबोलिवर - कानडीवर जिवापाड प्रेम करणारा. पण तितकाच भडक आणि उथळ. टिपू सुल्तान नगरची जी कानडी पाटी हि पोर उखडू पाहत होती; त्या पाटीखालिच गाडावं साल्याना !.................पण ..... थोड्या लाथा हाणल्यावर बर वाट्लं त्याला. पोराच्याही थोबाडातून रक्त वाहत होतं. ........तेही पाहून राग थोडा कमी झाला त्याचा.
' बिचारं तरूण पोरगं, कपडे बरे होते... चेहराही चांगला गोरा गोमटा होता. बर्या घरचा वाटतोय . बरोबरचा मात्र गूंडय . विनाकारण या राजकारण्यांच्या नादि लागतात आणि करिअर खराब करून घेतात. चांगलं बडवून काढ्ल्याशिवाय अक्कल येणार नाही भडव्याना' .. असा विचार करत इंन्स्पेक्टर बनगोंडा चालू लागला, आणि त्या पाटी काढणार्या पोराना शिव्या घालत, त्यांची वरात पोलिस स्टेशन कडे ढकलू लागला.
दोन्ही पोरं जुना मार विसरून जणु काहि झालच नाही अशा थाटात छाति पुढे काढुन चालत होती. एकमेकाशी मराठीत बोलत होती आणी टाळ्या देउन हसत होती. ह्या बनगोंड्याला बिल्कूल भिक घालणार न्हवते ते. त्यांच्या मराठी गप्पांचा अर्थ काय असावा ह्याचा अंदाज करत इंस्पेक्टर त्याना ढकलत होता. पण त्यांची बेगुमान आणि निडर वागणुक त्याचा संताप वाढवत होती. ह्यांची कशी सालटी सोलावित? हा इंन्स्पेक्टर बन्गोंडाचा विचार पूर्ण होइपर्यंत ते सगळे पोलिस स्टेशन मधे पोचले होते. उद्या बेळगाव मधल्या पेपर मधे काय बातमी द्यायची याचा विचार करत बन्गोंड्यान दुकलीकडे रोखून पाहिल .......
विनोद च्या डोळ्यात बघत आणी एका हाताने त्याची गचांडी धरत इंन्स्पेक्ट्रर बन्गोंडा ने विचारले -मराठी हं ?
निन्ना हेस्सार्येन्नू ? नाम क्या है तेरा ?
" विनोद बडवे ... और सुनो मराठी -- कानडी कुछ नही जानता मै. गर्व से कहो हम हींदू है. ये टीपू सुल्तान कटुवे का नाम नही चलेगा इधर.उसके नाम का सिर्फ बोर्ड ही नही निकालूंगा मै, उसके नाजायझ औलादोंको पाकिस्तआन भी भगाउंगा. जो उखाडना है उखाडले ....''
बनगोंड्याच्या हाताची पकड ढिली होत होती. आणी डोळ्यातला राग निवळत होता ......
(क्रमशः)
वाचने
9081
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
जबराट्ट ! खतरनाक !! सुरुवात
राजे ! लवकर लवकर येउ द्या
व्वाहवा...राजे... मला अंदाज
सुरुवात एकदम जबरदस्त आणि
एकदम जबराट सुरुवात!!! पुढचे
वास्तव...! संपूर्ण प्रतिसाद
मस्त सुरुवात, काहीच अंदाज येत
"क्लब क्रमशः" मध्ये अजुन एक
मस्त, झकास, वेगवान. पुढचा भाग
अजून कुणा 'सेक्युलर'
In reply to अजून कुणा 'सेक्युलर' by प्यारे१
वाचलं पण....
लय भारी.. पुढचा भाग येऊ द्या
सूचना
In reply to सूचना by राजघराणं
चांगलय!!
हा धागा अजून कसा उडाला नाही?
In reply to हा धागा अजून कसा उडाला नाही? by परिकथेतील राजकुमार
जर हा धागा नियमात बसत नाही तर
In reply to जर हा धागा नियमात बसत नाही तर by प्यारे१
@या लेखामधुन कोणावरही चिखलफेक
In reply to जर हा धागा नियमात बसत नाही तर by प्यारे१
ऑ?
In reply to ऑ? by नितिन थत्ते
परानं दुसर्या एका धाग्यावर
In reply to हा धागा अजून कसा उडाला नाही? by परिकथेतील राजकुमार
आज या धाग्याला परवानगी दिली
In reply to आज या धाग्याला परवानगी दिली by विजुभाऊ
ओ विजुभाउ
In reply to हा धागा अजून कसा उडाला नाही? by परिकथेतील राजकुमार
प्रवाहा विरुध्ध प्रतिसाद दिला
वाचतोय... सुरूवात तर चांगली
वाट
छान सुरुवात!
वाचतेय
मस्त लिहिलय