वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले)

चिंटु's picture
चिंटु in जनातलं, मनातलं
2 Aug 2011 - 2:44 pm

नमस्कार!
मागच्या भागात बरेच प्रतिसाद आलेत. कित्येकांनी व्यनितुनही आस्थेने चौकशी केली. आभार कसे हेच मानावेत कळत नसल्याने आपलीच माणसे मानुन औपचारिकता बाजुला ठेवतोय.
आजच सदाशिव पेठेतल्या डॉ चपळगावकर् ह्यांना पुनश्च भेटुन आलो. मणक्याच्या मानेकडल्या आणि कमरेकडल्या भागांचा एक्स रे दाखवला. त्यांनी मागच्या भेटीत प्राथमिक अंदाज म्हणुन वर्तवलेलीच शक्यताच खरी ठरली.
मी उभा राहिलो की उजवा खांदा हा डाव्या खांद्याच्या किंचित खाली राहतो. ह्याचं कारण म्हणजे, दोन्हीच्या उंचीत अत्यल्प का असेना फरक आहे! हा काही कुठल्या औषधाने बरा होणार नाही. फक्त काही हलकेसे एक्सरसाइज पुरेसे आहेत.उजव्या पायाच्या बुटाला अतिरिक्त सोल बसवण्यास सांगितलय्.तसच घरात फिरतानाही चप्पल घालण्यास सांगितली आहे, आणि त्यातही उजव्या बाजुला एक जास्तीचा सोल लावण्यास सांगितलेलं आहे. तीनेक आठवड्यात आराम पडेल असा त्यांचा अंदाज (आणि आराम पडावा अशी माझी इच्छा) आहे.तुम्ही सगळ्यांनी खुप काही सांगितलत, धीर दिलात, बरं वाटलं. त्यातलाच एक सल्ला बुटात अतिरिक्त "सोल" घालुन फिरण्याचा होता, तोच डॉक्टरांनीही सांगितला.

थँक्स. धन्यवाद. आभार.

पुढील ख्याली-खुशाली कळवत राहिनच. माझा जुन्या धाग्यावरचा प्रतिसाद खाली गेला असता म्हणुन इथे मुद्दाम नवीन धागा काढुन स्वतःची खुशाली कळवतोय्.चिंता नसावी.

राहणीऔषधोपचारप्रकटनअनुभवमाहितीमदत

प्रतिक्रिया

छान! गुडघेदुखी लवकरच थांबावी अशा शुभेच्छा. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Aug 2011 - 2:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला उपाय सापडला तर एकदाचा. भोग सरल्या शिवाय रोग हटत नाही का वैद्य भेटत नाही असे काही तरी लहानपणी ऐकले होते.

देवाकडे मनापासुन प्रार्थेना तुम्हाला लवकरच आराम पडुदे आणि तुमचे पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जाउदे.

तब्बेतीची काळजी घ्या, आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे भेटत रहा,

सोत्रि's picture

2 Aug 2011 - 2:59 pm | सोत्रि

निदान होणे महत्वाचे, ते झाले.
आता लवकरच खडखडीत बरे व्हा.

- (शुभचिंतक) सोकाजी

गणपा's picture

2 Aug 2011 - 3:27 pm | गणपा

कल्जी घेने. :)

वपाडाव's picture

2 Aug 2011 - 3:33 pm | वपाडाव

या गुडघेदुखीतुन इतक्या त्वरेने ठणठणीत बरे व्हा....
की दुसर्या गुडघेदुखीत अडकायला मोकळे... ;)

वा वा बरे झाले.
गुडघे दुखी चे कारण काही विशीष्ठ व्यायाम नाहीत हे कळाले हे बरे झाले

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

छान छान. अभिनंदन.

आता पुन्हा सदाशिव पेठेत आलात की भेटा, बसु मस्त ;)

निवेदिता-ताई's picture

2 Aug 2011 - 5:31 pm | निवेदिता-ताई

गुडघेदुखी लवकरच थांबावी अशा ..........शुभेच्छा.............:)

स्मिता.'s picture

2 Aug 2011 - 5:38 pm | स्मिता.

चला, एकदाचे निदान झाले हे बरे झाले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर गुडघेदुखीतून सुटका होण्यासाठी शुभेच्छा!

अरे वा. तुम्हाला लवकरच आराम मिळो.

दुखण्याचे निदान झाले म्हणून बरे वाटले.
अतोनात औषधे घेण्यापेक्षा इलाज खूपच सुसह्य आहेत.
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!

यावर उपाय एकच कोणितरी धागा काढा

वाचा या गुडघेदुखीतुन (एकदाचं) - भाग १ - १.०००१

जाई.'s picture

2 Aug 2011 - 11:49 pm | जाई.

गेट वेल सून
गुडलक

सविता००१'s picture

3 Aug 2011 - 2:03 pm | सविता००१

आता लवकर बरे व्हा!

X ray रीपोर्ट इथे देत आहे:-

मानेचा, मणक्याचा, कंबरेचा वगैरे एक्स रे काढला होता.

L.S SPINE : A.P. & LATERAL VIEWS
A.P AND LATERAL VIEWS OF L.S. spine REVEAL THAT THE l5 IS SACRALISED.
Intervertebral space between L4-L5 is narrowed with suggestion of dissc prolapse.
Remaining intervertebral spaces present normal width.
Spinous and transverse processes are sharply outlined.
Both S.I. joints reveals normal architecture.
IMPRESSION:- L5 is sacralised with ? PID L4-L5

CERVICAL SPINE: A.P. &LATERAL VIEWS
A.P. and lateral views of cervical spine reveal that the spine shows loss of normal lordosis.
Narrowing of the intervertebral space between c4-c5 is seen.
Remaining intervertebral spaces present normal width.
Spinous and transverse processes are sharply outlined.
Rudimentry cervical rib is seen on left side.
IMPRESSION:- Cervical spondylossis with rudimentry cervical rib on left side.