वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले)
नमस्कार!
मागच्या भागात बरेच प्रतिसाद आलेत. कित्येकांनी व्यनितुनही आस्थेने चौकशी केली. आभार कसे हेच मानावेत कळत नसल्याने आपलीच माणसे मानुन औपचारिकता बाजुला ठेवतोय.
आजच सदाशिव पेठेतल्या डॉ चपळगावकर् ह्यांना पुनश्च भेटुन आलो. मणक्याच्या मानेकडल्या आणि कमरेकडल्या भागांचा एक्स रे दाखवला. त्यांनी मागच्या भेटीत प्राथमिक अंदाज म्हणुन वर्तवलेलीच शक्यताच खरी ठरली.
मी उभा राहिलो की उजवा खांदा हा डाव्या खांद्याच्या किंचित खाली राहतो. ह्याचं कारण म्हणजे, दोन्हीच्या उंचीत अत्यल्प का असेना फरक आहे! हा काही कुठल्या औषधाने बरा होणार नाही. फक्त काही हलकेसे एक्सरसाइज पुरेसे आहेत.उजव्या पायाच्या बुटाला अतिरिक्त सोल बसवण्यास सांगितलय्.तसच घरात फिरतानाही चप्पल घालण्यास सांगितली आहे, आणि त्यातही उजव्या बाजुला एक जास्तीचा सोल लावण्यास सांगितलेलं आहे. तीनेक आठवड्यात आराम पडेल असा त्यांचा अंदाज (आणि आराम पडावा अशी माझी इच्छा) आहे.तुम्ही सगळ्यांनी खुप काही सांगितलत, धीर दिलात, बरं वाटलं. त्यातलाच एक सल्ला बुटात अतिरिक्त "सोल" घालुन फिरण्याचा होता, तोच डॉक्टरांनीही सांगितला.
थँक्स. धन्यवाद. आभार.
पुढील ख्याली-खुशाली कळवत राहिनच. माझा जुन्या धाग्यावरचा प्रतिसाद खाली गेला असता म्हणुन इथे मुद्दाम नवीन धागा काढुन स्वतःची खुशाली कळवतोय्.चिंता नसावी.
वाचन
7324
प्रतिक्रिया
15