~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

मृगनयनी's picture
मृगनयनी in जनातलं, मनातलं
21 May 2010 - 10:25 am

राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान!
२१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!.....

राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~*

STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU....... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

मांडणीवावरइतिहाससमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

भारद्वाज's picture

21 May 2010 - 10:28 am | भारद्वाज

:( :''( :(

पुष्कर जोशी's picture

22 May 2013 - 10:26 am | पुष्कर जोशी

Rajeev Gandhi

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2013 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर्मन फारसं समजत नाही. जेवढं काही समजलं त्याप्रमाणे राजीव गांधी हे डिक्टेटर होते, शहा पहलवी, सद्दाम हुसेन, पॅलेस्टाईनचे अबु निदाल इ. सारखे असं दिसमजलं.

हे जर बरोबर समजलं असेल तर लोकशाही देशाचा पंतप्रधान, राजेशाहीचा राजा, देशाचा डिक्टेटर आणि अस्तित्त्वात नसणार्‍या देशाचा नेता यांची तुलना का केली हे काही समजलं नाही. या सगळ्यांना एकाच बातमीच बसवण्याचा अट्टाहासही कळत नाही. स्विस बँकेत किती पैसा आहे हे तर सुब्रमण्याम स्वामीही सांगतात. कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

श्रीगुरुजी's picture

23 May 2013 - 2:35 pm | श्रीगुरुजी

>>> स्विस बँकेत किती पैसा आहे हे तर सुब्रमण्याम स्वामीही सांगतात. कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

सुब्रह्मण्यम स्वामी काय सांगतात याच्याकडे आपल्या सुसंस्कृत, मितभाषी, हाडाचे राजकारणी नसलेले, शांत, अर्थतज्ज्ञ, कणखर, कमालीचे स्वच्छ इ. गुणांची खाण असलेल्या पंतप्रधानांनी किंवा इतर कोणीही दुर्लक्ष केलं तरी सर्वोच्च न्यायालय मात्र त्यांचे सांगणे लक्ष देऊन ऐकते आणि म्हणूनच आज राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, २जी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श इमारत घोटाळा, दक्षता आयोग प्रमुख घोटाळा इ. घोटाळे बाहेर येऊन संबधित मंडळी आत गेली आहेत.

स्पंदना's picture

21 May 2010 - 10:59 am | स्पंदना

येस वी स्टील मीस यु

:<

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

शशिकांत ओक's picture

21 May 2010 - 11:06 am | शशिकांत ओक

भारतीय उपखंडाला वेगळे वळण देऊ शकणारे तडफदार पण दुर्दैवी व्यक्तिमत्व.
भावपुर्ण आदरांजली.....

शशिकांत

आंबोळी's picture

21 May 2010 - 1:13 pm | आंबोळी

गांधी आडनाव सोडले तर फार काही पोटेंशिअल होते असे वाटत नाही... तडफदार तर फार दुरची गोष्ट...
एंगेदार (हम करेंगे, देखेंगे) भाषणे ही रटाळ असत...

दुर्दैवी ठिक आहे.
(यांच्या जाण्यामुळेच ९०/९१ ला काँग्रेस सत्तेत येऊ शकली अन्यथा त्या निवडणूकीत काँग्रेस जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हती.)

आंबोळी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सॅम पित्रोदासारख्या गुणी लोकांना भारतात परत आणलं राजीव गांधीनीच! मलाही त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही, पण कोणी लिहील्यास वाचायला जरूर आवडेल.

अदिती

अवांतरः मराठीत लिहीताना राजीव'जी अशी "आप्पाची टोपी" लावण्याचे शुद्धलेखनाचे नियम नवीन आहेत का?

वाहीदा's picture

21 May 2010 - 3:31 pm | वाहीदा

बरेच लोकांचा समज आहे की सॅम पित्रोदा यांना राजीव गांधी यांनी बोलाविले पण सुरवातीला त्यांची अन राजीव गांधी यांची ओळख ही नव्हती. १९८१ साली सॅमने इंदिरागांधींना अनाहुत पत्र लिहीले होते त्या पत्रात भारतातिल काही समस्या सोडविणे शक्य आहे पण फारसे कोणी संवेदनक्षम नाही की जागरूक नाही त्यामुळे सोपे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहे ,कोणीही थेट काम करायला तयार नाही असे नमुद केले होते
त्यावेळी इंदिराजींनी सॅमला बोलावून घेतले तिच त्यांची पहिली भेट होती. सॅमने दिल्लीत राहून काम करायला सुरवात केली. त्याने हातात घेतला टेलीफोन म्हणजेच संदेशवहनाचा प्रश्न.

त्या़काळी भारतात ५० टक्के फोन बंद तरी असायचे किंवा उरलेल्या फोनवरुन चुकीचे नंबर तरी लागायचे हा जागतिक विनोदाचा भाग झाला होता.

राजीव गांधींनी जी टेक्नोलोजी मिशन्स स्थापन केली, त्याचे सुत्रसंचालन सॅम कडे दिले. त्यातून खरी टेलिकोम क्रांती सुरु झाली. राजीव - सॅम ही टीम नसती तर आज जे मोबाईल टेलिफोनचे जाळे दिसते ते दिसलेच नसते.
सॅमने १९८५ साली टेलिकोम क्रांती सुरु केली अन अवघ्या ३ वर्षात टेलिफोन फेक्स चे जाळे पसरले.

१९८७ साली मुंबईहुन डोंबिवली ला पण फोन लावणे जिकरीचे होते. ४-४ तास एस-टी-डी लाईन मिळत नसे . आज भारतातुन कुठूनही अगदी दुबई , वाशिंग्टन ला पण तत्काळ फोन करता येतो. हि क्रांती राजीव-सॅम यांच्या टेक्नोलोजी मिशन ने आणली.

सॅम उत्तम चित्र कार ही आहेत

सॅम पित्रोदा- वयाच्या सत्तरीत आलेल्या या माणसाची सळसळ विशीतल्या माणसाला लाजविल अशीच आहे. <:P

आता कोणीही अंबानी फंबानी / महाजन मुंडेंचे नाव घ्या पण खरे टेलिकोम चे शिल्पकार अंकल सॅमच आहेत

~ वाहीदा

मृगनयनी's picture

21 May 2010 - 5:42 pm | मृगनयनी

धन्यवाद वाहिदा!..... खरोखर ज्ञानात अधिक भर पडली.....
_____

अतिअवांतर :

देशात आज ७०%(भोळी) जनता अशी आहे, की जी "राहुल गांधीं" मध्ये 'राजीव गान्धीं' ना बघतेय.. (आणि प्रियान्का गान्धी-वधेरां'..मध्ये "इन्दिरा"जीं ना) :)

सोनिया गान्धी यांना अजूनही "परके" मानणारे लोक आहेत.. (आणि ते का नसावेत... हा वादाचा मुद्दा होऊ शकतो!!!)

कुणी काहीही म्हणा....पण अनेक टीका, टोमणे सहन करत, आज या "मॅडम" सगळ्यांना "कन्ट्रोल" मध्ये ठेवून 'एकहाती' देश चालवत आहेत.... हे निश्चितच कौतुकास्पद आहे!

|| जय हिन्द ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आंबोळी's picture

21 May 2010 - 5:47 pm | आंबोळी

>>आज या "मॅडम" सगळ्यांना "कन्ट्रोल" मध्ये ठेवून 'एकहाती' देश चालवत आहेत....
असहमत...
आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा.... काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय.... त्यांच्या पेक्षा किती तरी उत्तम प्रशासक आणि नेते काँग्रेसमधे आणि इतर पक्षात आहेत....
वरती म्हणल्याप्रमाणे हा फक्त गांधी आडनावाचा परिणाम आहे. त्या आडनावाशिवाय काँग्रेस पक्ष एकदम गलितगात्र होतो.

आंबोळी

काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय
एका स्त्री ने देश चालविणे चुकीचे आहे का ? कि एका स्त्री ला महत्व मिळणे चुकीचे आहे ????
अन शेवटी हि लोकशाही आहे, ती कोणा एका मुळे चालत नाही .

इंदिरा गांधी , राणी लक्ष्मी बाई , रजिया सुलतान देखील स्रीयाच होत्या .
As an Administrator, Indira Gandhi Was a Class apart ! bening Woman and being able to Lead India in right Direction is really really Admirable . . Unfortunatley people realised Indira Gandhi's value after her assasination.

~ वाहीदा

आंबोळी's picture

21 May 2010 - 6:13 pm | आंबोळी

>>एका स्त्री ने देश चालविणे चुकीचे आहे का ?
तुम्ही विषय चुकीच्या दिशेने घेउन चाललाय...

आंबोळी

मृगनयनी's picture

21 May 2010 - 6:10 pm | मृगनयनी

आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा.... काँग्रेजी नेत्यांच्या नपुंसक वृत्ती मुळे बाईंना येवढे महत्व मिळतय.... त्यांच्या पेक्षा किती तरी उत्तम प्रशासक आणि नेते काँग्रेसमधे आणि इतर पक्षात आहेत....वरती म्हणल्याप्रमाणे हा फक्त गांधी आडनावाचा परिणाम आहे. त्या आडनावाशिवाय काँग्रेस पक्ष एकदम गलितगात्र होतो.

आज "मॅडम"च्या शिवाय कॉन्ग्रेसचं पानही हलत नाही... हे विदारक असलं तरी सत्य आहे. नपुंसक वृत्तीचे नेते उत्तम प्रशासक होऊच शकत नाही,,, मग भले ती नपुंसकता... कशीही आलेली असो!...

आणि "गांधी" ह्या नावाचा दबदबा निर्माण केला... तो इन्दिरा' जी आणि राजीव'जींनी... हे तर सर्वज्ञात आहे!.. पण तो टिकवायला सोनिया गांधींनाही काहीतरी कष्ट पडलेच असणार ना!

इतर पक्षांची सूत्रे त्यांच्या अंतर्गत राजकारणातच फिरत आणि गुन्तत असल्यामुळे त्यांच्या नेत्यांमधले प्रशासकीय सुप्त गुण गंजून गेलेले आहेत.. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!

आज सोनियांच्या हातात "सत्ता" आहे... म्हणून देशात कॉन्ग्रेस'चे वर्चस्व अधिक आहे... मग भले कारण काही का असेना.... पण सगळा "कॉन्ग्रेस" त्यांना वचकून असतो... "एकहाती" कारभारामुळे इतर पक्षांपेक्षा "कॉन्ग्रेस" मध्ये बर्‍यापैकी "सिस्टीम" आहे..

कदाचित 'परकीय लोकांचं आकर्षण" भारताला नेहमीच वाटत आलंय ' ( परकीयांनी गाजवलेला अधिकार - असा अर्थ घ्यावा)... हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं!

असो... कारण काही का असेना... पण या देशाच्या "नाड्या" सोनिया गांधींच्या हातात आहे... हे नक्की!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मितभाषी's picture

21 May 2010 - 6:31 pm | मितभाषी

कदाचित 'परकीय लोकांचं आकर्षण" भारताला नेहमीच वाटत आलंय ' ( परकीयांनी गाजवलेला अधिकार - असा अर्थ घ्यावा)... हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं!

>>>>>
ही अशी बेफाम विधाने कुठल्या आधारावर करता तुम्ही.

गांधी घराण्याला सर आँखोपे घेणार्‍या हिन्दुस्थानी जनतेच्या विचारसरणितच मुळ दोष आहे.

कारण गुनवता अनुंवशिक नसते.

आंबोळी's picture

22 May 2010 - 9:20 am | आंबोळी

"गांधी" ह्या नावाचा दबदबा निर्माण केला... तो इन्दिरा' जी आणि राजीव'जींनी... हे तर सर्वज्ञात आहे!.. पण तो टिकवायला सोनिया गांधींनाही काहीतरी कष्ट पडलेच असणार ना!
आज सोनियांच्या हातात "सत्ता" आहे... म्हणून देशात कॉन्ग्रेस'चे वर्चस्व अधिक आहे... मग भले कारण काही का असेना.... पण सगळा "कॉन्ग्रेस" त्यांना वचकून असतो... "एकहाती" कारभारामुळे इतर पक्षांपेक्षा "कॉन्ग्रेस" मध्ये बर्‍यापैकी "सिस्टीम" आहे..

व्यक्तीपुजक मानसिकता पाहून थक्क झालो.
तुम्हाला प्रणाम.

आंबोळी

मृगनयनी's picture

22 May 2010 - 11:17 am | मृगनयनी

व्यक्तीपुजक मानसिकता पाहून थक्क झालो.

कृपया, पूर्वग्रहदूषित गैरसमज नसावा......

आज कॉन्ग्रेस मधला एक तरी नेता असा दाखवा... की जो स्वतःच्या (इन्डिव्हिज्युअल) अकलेचा वापर करून चालतो...

अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचच उदाहरण घ्या....
पुण्यात साहित्यसंमेलनाच्या पूर्वनियोजित उद्घाटनाला "अशोक चव्हाण" मॅडमच्या आदेशानुसार येऊ शकले नाही.. (आणि एक भाषण कमी झाल्यामुळे अमिताभ'जींच्या कवितेचा आस्वाद पुणेकरांना जास्त घेता आला.. ;) )

'विलासराव देशमुखांपासून नारायण राण्यांपर्यंत प्रत्येकजण (चरफडत का होईना.. पण) मॅडम'ची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करतो!...

'रमेश बागवें'सारखे नेते 'राहुल बाबा'चे बूट पण प्रेमाने छातीशी कवटाळून ठेवतात.....

हे असं आजवर कुठल्या पक्षात पाहिलेलं नाही!

याला काय म्हणतात ?

आंबोळी, माझी मानसिकता पडताळण्यापेक्षा कॉन्ग्रेस-वाल्यांच्या या मानसिकतेला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा... :-?

कदाचित... यालाच "व्यक्तिपूजा" म्हणत असावे बहुधा! ;)

भारत देशाची एक सुजाण नागरिक म्हणून मी जेव्हा काँग्रेस-पक्षाकडे आणि त्यांच्या नेत्यांकडे बघते... तेव्हा सोनिया गांधींच्या तालावर नाचणार्‍या खादीच्या / कॉटनच्या कपड्यातल्या ,जाड्या जाड्या पोट सुटलेल्या बाहुल्याच मला दिसतात...

कदाचित सोनियांपेक्षा जास्त कुशल राजकारणी या देशात, इतर पक्षात असतीलही.... पण त्यांचे ऐकतंय कोण ? :-? त्यांच्या पक्षातलीच लोकं त्यांना पुढे येऊ देत नाहीत.... तर मग आम जनतेला त्यांचा उपयोग कसा होणार ?

सासूबाईंमुळे आणि पतीदेवांमुळे कॉन्ग्रेस'ची जबाबदारी सोनियांवर पडली.... आणि ती त्या समर्थपणे पेलत आहेत.... हेच आजचे चित्र आहे...

ते बदलायचे की तसेच ठेवायचे... हे येणारा काळच ठरवेल....
:)

तुम्हाला प्रणाम.

तुमचे मंगल असो! आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो! :)

आंबोळी

(पक्षनिरपेक्ष, तटस्थ ) -मृगनयनी.

जय हिन्द | जय महाराष्ट्र | जय परशुराम | जय गाडगेबाबा |
जय भवानी | जय शिवाजी | जय सियाराम | जय राधेश्याम |

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

५० फक्त's picture

22 May 2011 - 12:01 am | ५० फक्त

''आज कॉन्ग्रेस मधला एक तरी नेता असा दाखवा... की जो स्वतःच्या (इन्डिव्हिज्युअल) अकलेचा वापर करून चालतो...''- यावर मी एवढेच म्हणेन, की सोनियाचा असा एक तरी निर्णय सागा जी ती स्वताच्या अकलेनं घेते. एका राज्याच्या महिला मुख्यमंत्री स्त्रीला त्या पदावरुन हटवु शकत नाही, उगा जगात जे अमेरिका करते ते इथं देशात करायचा प्रयत्न करुन काही साध्य होत नाही. उदाहरण - उत्तर प्रदेश,कर्नाटक वैग्रे.

''सासूबाईंमुळे आणि पतीदेवांमुळे कॉन्ग्रेस'ची जबाबदारी सोनियांवर पडली.... आणि ती त्या समर्थपणे पेलत आहेत.... हेच आजचे चित्र आहे...'' - एकदम बरोबर सोनिया फक्त काँग्रेसचीच जबाबदारी पेलत आहेत आणि तिचा मुखवटा करुन तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे कुशल राजकारणी कुशलपणे देशाचे राजकारण करत आहेत. या सरकारचा मुखवटा मनमोहन सिंग नाहीत तर सोनिया गांधी आहेत. मनमोहन सिंग हे निश्चितच सोनिया गांधी पेक्षा कुशल, चतुर आणि क्रुर राजकारणी आहेत. एक लक्षात घ्या जेंव्हा तुम्ही एखाद्या सत्ता नको असलेल्याला सत्ता देता तेंव्हा त्याच्याकडुन ती काढुन घेण्याची धमकी देउन हवी ती कामे करुन घेउ शकत नाही, कारण एखादे काम करायला नकार देउन तो सत्ता सोडायला तयार असेल तर तुम्ही काहीच करु शकत नाही.

गेल्या ५-७ वर्षात बारामती - अकलुज भागात काम करणा-या एखाद्या पत्रकाराला भेटा म्हणजे राजकारण कोण करतगे,का आणि कसं आणि कुठं याचा अंदाज येईल थोडासा.

येत्या मध्यावधी निवडणूकीत शक्यता ही आहे की या माय लेकरापैकी एक जण मारला गेल्याशिवाय काँग्रेस पुन्हा सत्तेत येउ शकत नाही, फार वे़ळ नाही, डिझेल्चे रेट मार्केट रिलेट आणि घरगुती गॅस ५५०/- ते ६२५/- करण्याचा निर्णय ही या सरकारची शेवटची विकेट आहे आण ती पडल्याशिवाय देश चालु शकणार नाही.

मितभाषी's picture

21 May 2010 - 6:36 pm | मितभाषी

आजुन देशाला इतकी भिक लागलेली नाहि की कुणी तो एक हाती चालवावा....
>>>>>
अगदी बरोबर.
बोफोर्समध्ये हात काळे केले. आई संकटात असताना इटलित तोंड लपवुन बसला. गुप्तहेर खात्याने अनेक वेळा इशारा देवुनही अति प्रसिध्दीच्या हव्यासापायी फुकापुदडी जिव गमावुन बसला.

अशा माणसाला 'तडफदार' म्हणणे म्हणजे तडफदारीचा अपमान आहे.

स्वलेकर's picture

5 Sep 2013 - 5:45 pm | स्वलेकर

परफेक्ट !

टारझन's picture

21 May 2010 - 1:24 pm | टारझन

आंबोळीस प्लस वन

आणि वरुन मिळालेलं गांधी आडनाव सुद्धा दत्तक घेतलेलं आहे :)
असो ...

मृगनयनी's picture

21 May 2010 - 2:29 pm | मृगनयनी

"कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले.

९० व्या शतकात कॉम्पुटर'ला नाके मुरडणार्‍यांची संख्या कमी नव्हती.
'कॉम्पुटर ' भारतात येऊ नये म्हणुन ..पार २ दिवस संसद बन्द पाडेपर्यंत काहींची मजल गेलेली होती. पण तरीही भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून राजीव'जींनी कॉम्पुटर'द्वारे आय. टी. क्षेत्रातील भारताचे स्थान सुनिश्चित केले.

________________

"बोफोर्स" प्रकरणामुळे किन्वा अन्य काही कारणांमुळे राजीव'जी जरी बदनाम झालेले होते.... तरी पण क्षणार्धात मानवी बॉम्ब हल्ल्याला बळी पडलेल्या राजीव'जींचा अपमृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेला.. :|

आजही -राजीव'जींचा मृत्यू, त्यावेळी टी.व्ही. वर दाखवले जाणारे त्यांचे अंत्यसंस्कार, जनमानसाचा टाहो... इ. गोष्टी आठवून मन विषण्ण होते....

त्यामुळे 'राजकारणी' म्हणून कोणाचं त्यांच्याबद्दल काहीही मत असलं तरीही, त्यांचा असा ... देहाच्या छिन्नविछिन्न चिन्धड्या उडून ...अकाली मृत्यू व्हायला नको होता.... असे आजही वाटते... आणि नकळत डोळे पाणावतात...

_______________

Rajeev'ji...... really miss you......... :|

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आंबोळी's picture

21 May 2010 - 2:41 pm | आंबोळी

>>पण तरीही भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून
हे अत्ता म्हणणे सोपे आहे हो....
>>तरी पण क्षणार्धात मानवी बॉम्ब हल्ल्याला बळी पडलेल्या राजीव'जींचा अपमृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेला..
असा मृत्यू कुणालाच येऊ नये... राजीव गांधींच्या नशिबी आला याचे नक्कीच वाईट वाटतय....
पण.....

>>जनमानसाचा टाहो... मन विषण्ण होते.... चटका लावून गेला.. आणि नकळत डोळे पाणावतात...
हे अतीच फिल्मी होतय....

आंबोळी

पंगा's picture

22 May 2010 - 10:44 am | पंगा

असा मृत्यू कुणालाच येऊ नये... राजीव गांधींच्या नशिबी आला याचे नक्कीच वाईट वाटतय....

+१.

>>जनमानसाचा टाहो... मन विषण्ण होते.... चटका लावून गेला.. आणि नकळत डोळे पाणावतात...

हे अतीच फिल्मी होतय....

याबद्दलही +१. खास करून ते 'जनमानसाचा टाहो'बद्दल. राजीव गांधींच्या मृत्यूच्या घटनेवरून त्या काळात निघालेले लोकप्रिय अश्लील आणि पाणचट विनोद या कानांनी ऐकलेले आहेत. घाणेरड्या विनोदांना 'टाहो' म्हणायला लागले काय हल्ली?

- पंडित गागाभट्ट

मृगनयनी's picture

22 May 2010 - 11:41 am | मृगनयनी

हे अतीच फिल्मी होतय....

याबद्दलही +१. खास करून ते 'जनमानसाचा टाहो'बद्दल. राजीव गांधींच्या मृत्यूच्या घटनेवरून त्या काळात निघालेले लोकप्रिय अश्लील आणि पाणचट विनोद या कानांनी ऐकलेले आहेत. घाणेरड्या विनोदांना 'टाहो' म्हणायला लागले काय हल्ली?

पंगा'जी... राजीव'जींचा मृत्यू झाला... तेव्हा मी बर्‍यापैकी लहान होते..
'आपल्या लाडक्या पंतप्रधानांना एका बाईने बॉम्बचा वापर करून मारून टाकले' येवढेच तेव्हा माहित होते... त्यावेळी टी.व्ही. वर दाखवला जाणारा आक्रोश... लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया..राजीव'जींची जळती चिता....... इ. सर्व गोष्टी मनामध्ये इतक्या खोलवर रुजल्या आहेत... की ते सर्व आठवले... तरी आजही खरंच रडू येते....

May be... राजीवजींचा अपमृत्यू ज्याप्रकारे झाला... तो प्रकार खूपच भीषण होता.... आणि माझ्या मनातून तो काही केल्या जात नाहीये.. माझं मन जास्त सेन्सीटीव्ह आहे... म्हणूनही असेल असं कदाचित! :-?

कदाचित 'अशी' प्रतिक्रिया माझ्यापुरती च मर्यादित असू शकते.....
'स्ट्रॉन्ग' मनाच्या माणसांवर या घटनेचा कदाचित जास्त परिणाम झालेलाही नसेल!

बाकी सुदैवाने 'ते' पाणचट जोक्स वगैरे... माझ्या तरी ऐकीवात नाही! :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

वाहीदा's picture

21 May 2010 - 3:38 pm | वाहीदा

कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले.

अगदी खरे आहे !!
~ वाहीदा

मितभाषी's picture

21 May 2010 - 7:13 pm | मितभाषी

>>>"कॉम्पुटर" प्रणाली भारतात आणण्याचे महत्वपूर्व कार्य "राजीव गांधीं" यांच्यामुळे शक्य झाले.

हो का? बरे झाले हे जन्माला आले. नाहीतर आम्हाला काँप्युटर पहायलाही मिळाला नसता. =)) =))

पंगा's picture

22 May 2010 - 11:04 pm | पंगा

राजीव गांधींबद्दल बाकी काहीही म्हणा, पण संगणक कशाशी खातात हे देशात फारसे कोणालाच माहीत नसण्याच्या आणि म्हणूनच संगणक आणि संगणकीकरण यांना जोरदार आंधळा विरोध असण्याच्या काळात त्यांनी थोडा पुढचा विचार करून संगणकीकरण संकल्पना आणि संगणक उद्योग भारतात रुजवण्याच्या दृष्टीने नेटाने जो पुढाकार घेतला, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

त्या काळातला हा आंधळा विरोध मी पाहिलेला आहे. फार कशाला, त्या काळात कॉलेजात असणारे आमच्यासारखे बरेच अतिशहाणेही सुरुवातीसुरुवातीला विरोधात असत. कारण एक म्हणजे अक्कल नव्हती, अनुभव नव्हता आणि यातून पुढे कायकाय होऊ शकते याची फारशी कोणालाच कल्पना किंवा दूरदृष्टी नव्हती. शिवाय भारतासारख्या देशाला ही 'नसती थेरे' परवडणार काय, याने माणसाची गरज राहणार नाही, लोकांच्या नोकर्‍या जातील, आधीच एवढी बेरोजगारी त्यात भरपूर आणि वाढती लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशाला हे घातक ठरेल, यासारख्या अनेक चमत्कारिक कल्पना डोक्यात होत्या आणि जनतेत लोकप्रिय होत्या. पुढे या क्षेत्रात काम करू लागल्यावर त्यातला फोलपणा कळू लागला. (कल्पनेतला. क्षेत्रातला नव्हे. त्याला पुष्कळ वेळ लागला.) मात्र जनतेत असल्या कल्पना फैलावलेल्या असताना याला सामाजिक आणि राजकीय पातळीवर किती टोकाचा विरोध होऊ शकत असेल याची कल्पना करता येईल.

या असल्या विरोधाच्या नाकावर टिच्चून आपली कल्पना पुढे दामटणे, यह भी कोई कम बात नहीं है, गुरु|

- पंडित गागाभट्ट

नितिन थत्ते's picture

22 May 2010 - 1:53 pm | नितिन थत्ते

>>बरे झाले हे जन्माला आले. नाहीतर आम्हाला काँप्युटर पहायलाही मिळाला नसता

यातील उपरोध मान्य करायचा तर यापुढे कुठल्याच व्यक्तीबद्दल काहीच म्हणायला नको.

चापेकरांनी रॅण्डला मारले नसते तरी रॅण्ड केव्हातरी मेलाच असता. ऑपॉप म्हातारा होऊन. ;)
टिळक, भगतसिंग, गांधी, सुभाष बोस नसते तरी भारताला स्वातंत्र्य मिळालेच असते. (ब्रिटिश गेले कारण लुटण्यासारखे काही उरले नव्हते आणि महायुद्धात प्रचंड हानी झाली होती हे आपले लाडके मत असतेच नाहीतरी).
इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये बांगलादेश मुक्त केलाच नसता तरी केव्हातरी तो मुक्त झालाच असता.
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला नसता तरी केव्हातरी तो मांडला गेला असताच.

नितिन थत्ते

वाहीदा's picture

22 May 2010 - 2:12 pm | वाहीदा

ब्रिटिश गेले कारण लुटण्यासारखे काही उरले नव्हते
=)) =)) =))
हा प्रतिसाद वाचून हसू आवरत नाही .. धन्य आहात तुम्ही !
~ वाहीदा

मृगनयनी's picture

22 May 2010 - 2:30 pm | मृगनयनी

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला नसता तरी केव्हातरी तो मांडला गेला असताच.

+१

ह्या सगळ्यापेक्षा 'अॅडम & इव्ह' मधल्या इव्ह' ने "ते" सफरचंद खाल्लंच नसतं...... तर हा मानवजातीचा उपद्व्याप उद्भवलाच नसता! ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2010 - 4:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खराय! सगळीच वानरं अजूनही दगडगोटे उचलत बसली असती!!

अदिती

मृगनयनी's picture

22 May 2010 - 4:35 pm | मृगनयनी

छे छे!.... काही विक्षिप्त माकडं एकमेकांच्या शेपट्यांनाच नाड्या समजून ते ओढत बसली असती!

=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मितभाषी's picture

21 May 2010 - 7:16 pm | मितभाषी

९० व्या शतकात कॉम्पुटर'ला नाके मुरडणार्‍यांची संख्या कमी नव्हती>>>>>>>>

=)) =)) =)) =)) =))

बाब्बव ठार मेलो.

भारद्वाज's picture

21 May 2010 - 2:17 pm | भारद्वाज

एंगेदार ...शब्द लई आवडला :)

sagarparadkar's picture

21 May 2010 - 6:50 pm | sagarparadkar

अहो थोडंसं मागे जावून आठवून पहा ...

राजीवजींनी २१ व्या शतकाचा नारा दिला तर सर्वजण त्यांची यथेच्छ टवाळी करायला लागले.
त्यांनी संगणक व टेलीकम्युनिकेशन या क्षेत्रांची खर्या अर्थाने क्रान्ती घडवली , म्हणून तर आज आपण इंटरनेटवर ही एव्हढी चर्चा करू शकतो आहोत.

त्या वेळ्च्या विरोधी पक्षीयांकडे एव्ह्ढी दूरद्रुष्टी होती का?

देवीलाल यांनी तर शेतकर्यांच्या सभेत आरोप केला होता की वीज निर्मिती करून सर्व कस काढलेले पाणी तुम्हा शेतकर्यांन्ना शेतीसाठी दिले जाते ... =))

आता बोला ...

पंगा's picture

25 May 2010 - 9:23 pm | पंगा

एंगेदार (हम करेंगे, देखेंगे) भाषणे ही रटाळ असत...

याच भाषणांमुळे राजीव गांधींच्या काळात काहीजण भारताला 'बनाना रिपब्लिक' म्हणत असल्याचेही ऐकलेले आहे. ('हमें बनाना है...')

(शिवाय 'देश के कोने कोने में' हेही असायचे अनेकदा. आता देश के कोने कोने में बनानाच बनाना झाल्यावर देशाचे बनाना रिपब्लिक नाही होणार तर मग दुसरे काय होणार?)

- पंडित गागाभट्ट

टारझन's picture

26 May 2010 - 7:57 am | टारझन

=)) =)) =)) =))
पंग्याची प्रतिक्रीया "ठो ठो ठो " आणि "धो धो धो "
=)) =)) =)) =))
मस्त रे ...

- टारिव गांधी
हमें मिसलपांव के कोनेकोने मे अवांतर जाल बनाना है !

टारझन's picture

21 May 2010 - 3:42 pm | टारझन

खर्रं आहे!!!
आज राजिव गांधी नसते तर भारत संगणकापासुन वंचित राहिला असता :)

विकास's picture

21 May 2010 - 5:43 pm | विकास

आज राजिव गांधी नसते तर भारत संगणकापासुन वंचित राहिला असता

यामधे एक टंकनदोष आढळला... आपल्याला, "णसते" असे म्हणायचे आहे का? :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2010 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार

राजीव गांधींनी शांतीसेना पाठवण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का अयोग्य हे जाणुन घ्यायला आवडेल. तसेच काही ठिकाणी वाचल्यानुसार शांतीसेनेच्या पथकाकडून श्रीलंकेतील काही सामान्य जनतेवर अत्याचार केले गेले हे कितपत खरे आहे ?

शांतीसेना पाठवण्याच्या निर्णयाचा त्यांना आणी भारताला काय फटका बसला ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

21 May 2010 - 6:47 pm | छोटा डॉन

कोण हे राजीव गांधी ?
धन्यवाद !

------
डॉन्या अभ्यंकर

क्लिंटन's picture

21 May 2010 - 7:10 pm | क्लिंटन

मी राजकारण वाचायला लागल्यापासून कॉंग्रेस पक्षाचा विरोधकच राहिलो आहे. पण तरीही काही गोष्टी स्पष्ट केल्याच पाहिजेत.

१. इंदिरा गांधींच्या दोन मुलांमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये खूप अंतर होते. संजय हा आक्रस्ताळा तर राजीव शांत आणि नम्र होता. संजयने आणिबाणीच्या काळात घातलेला धुमाकुळाविषयी तर काय बोलावे? संजयचे अपघाती निधन झाल्यानंतर वर्षभराने राजीव गांधी राजकारणात आले.त्यापूर्वीच्या काळात घरातच निरंकुश सत्ता असतानाही आणि त्या सत्तेचा स्वत:चा सख्खा भाऊ दुरूपयोग करत असतानाही राजीव गांधींनी यापैकी काही केल्याचे दिसत नाही. आणिबाणीवर (बहुदा इंदिरा गांधींचे सचिव पी.एन.धर यांनी लिहिलेल्या) पुस्तकात संजयने इंद्रकुमार गुजराल यांची माहिती आणि प्रसारण मंत्री पदावरून आणिबाणीदरम्यान उचलबांगडी कशी करवली आणि त्या जागी विद्याचरण शुक्ला या ’सेन्सॉरशीप फेम’ मंत्र्याला कसे आणले याची माहिती आहे. वास्तविक संजय हा कोणतेही घटनात्मक पद भूषवित नव्हता. त्याला सरकारमध्ये अशी ढवळाढवळ करायचा काय अधिकार होता? राजीव गांधी मात्र या काळात राजकारणापासून पूर्णपणे आलिप्त होते. आपण बरे आणि आपली वैमानिकाची नोकरी आणि बायकामुले बरी असा सरळसोट विचार राजीव गांधींचा होता.

राजीव गांधी जर विरोधक म्हणतात तितके वाईट होते तर त्यांनी घरात निरंकुश सत्ता असताना त्या सत्तेपासून स्वत:ला दूर का ठेवले?

२. राजीव गांधींकडे भारताला नव्या युगात न्यायचा एक दृष्टीकोन होता हे त्यांच्या अगदी कट्टर शत्रूलाही नाकारता येणार नाही. भारतात आज जी संगणक आणि मोबाईल क्रांती दिसत आहे त्याची पायाभरणी राजीव गांधींनी केली होती. २०१० च्या जगात हास्यास्पद वाटेल पण राजीवजींनी टेलिफोन धोरण अवलंबायला सुरवात केल्यानंतर सुरवातीच्या काळात ’भारतात अर्ध्या लोकांना दोन वेळचे खायला मिळत नाही. मग करायचेत काय टेलिफोन’ अशा स्वरूपाची टिकाही त्यांच्यावर झाली होती. मला वाटते शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी केलेली ’इंडिया’ आणि ’भारत’ अशी विभागणी त्याच काळातली.

भारताला आज आंतरराष्ट्रीय समुदायात जो मान आहे त्यामागे काही महत्वाची कारणे आहेत असे मला वाटते. राजीवजींचे संगणक आणि टेलिफोन क्षेत्रातील दूरदृष्टीचे धोरण हे त्यातील एक आहे असे मला वाटते. (इतर कारणे: लालबहादूर शास्त्रींनी सुरू केलेली आणि इंदिरा गांधींनी पूर्ण केलेली हरित क्रांती, नरसिंह राव-मनमोहन सिंह यांचे १९९१ चे नवे आर्थिक धोरण आणि १९९८ मध्ये घेतलेल्या अणुचाचण्या असे मला वाटते).

३. राजीव गांधींना मुळातच राजकारणात पडायचे नव्हते हे जगजाहिरच आहे. संजयच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींना आधार देण्यासाठी ते राजकारणात आले आणि मग ते त्याच जंजाळात फसले. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरही राजीव गांधींनी पंतप्रधान होऊ नये अशी गळ सोनिया गांधींनी त्यांच्याकडे घातली असे
या डॉक्युमेन्टरीमध्ये म्हटले आहे. तसेच राजीव गांधींच्या निकोलस न्युजंट यांनी लिहिलेल्या चरित्रातही तसाच उल्लेख आहे असे वाचल्याचे आठवते. पंतप्रधानपद ही आपल्यावर लादलेली जबाबदारी आहे असे राजीव गांधींना वाटत होते असेही त्या चरित्रात म्हटले आहे. एक राजकारणी म्हणून धूर्त आणि चाणक्यनितीचे खेळ करण्यात राजीव गांधींना अपयश आले आणि त्यामुळेच त्यांच्या काळात कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. पण म्हणून राजीव गांधी हे हलकट, नालायक होते असे कशावरून सिध्द होते?

४. प्रश्न राहिला कॉंग्रेस पक्षातील घराणेशाहीचा. आपल्याला नेता म्हणून कोण पाहिजे हे त्या पक्षातील लोकांना ठरवायचा पूर्ण अधिकार आहे. जर त्या पक्षाला गांधी घराण्यातीलच कोणी व्यक्ती नेतेपदी पाहिजे असेल तर तो त्यांचा प्रश्न झाला. अनेक लोक म्हणतात की राजीव गांधींना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून पंतप्रधान केले. मला ते पटत नाही. फार तर त्यांना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले हे मान्य करता येईल. पण पंतप्रधान म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले होते. आपल्या राज्यव्यवस्थेत कोणाही व्यक्तीला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेल तर पंतप्रधान बनता येते. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून अशा वैध मार्गानेच निवडून आले होते. मग त्याविषयी तक्रार का?

असो. मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते. राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना यशस्वी पंतप्रधान असे म्हणायला अवघड जाते. त्यांचे श्रीलंका धोरण फसलेच. भारताला एक नवी आधुनिक दिशा द्यायची त्यांच्याकडे क्षमता होती असे मला वाटते. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही. त्यांना श्रध्दांजली

विल्यम जेफरसन क्लिंटन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 7:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार, क्लिंटन आणि वाहीदा!

अदिती

राजीवजींना विरोध कोण करते बघा-- भाजीपचे (भारतीय जीना पक्षाचे) नेते. भारतीय राजकारणातील विरोधाभास कसा स्पष्टपणे दिसतो बघा.

१९७७ च्या निवडणुकींमध्ये विरोधकांनी संजय गांधी, प्रकाशचंद्र सेठी, विद्याचरण शुक्ला, बन्सीलाल आणि जगमोहन या आणिबाणीदरम्यान बदनाम झालेल्यांवर टिकेचा भडीमार केला. पण नंतरच्या काळात कधीना कधी याच भाजपने प्रकाशचंद्र सेठींचा अपवाद वगळता इतर सर्वांना कधीना कधी डोक्यावर घेतले होते.

१. स्वत: संजय गांधींचे १९८० मध्ये निधन झाले. नंतरच्या काळात इंदिरा गांधी आणि मेनका गांधी यांच्यात कडाक्याची भांडणे झाली आणि मेनकांना घर सोडावे लागले. नंतरच्या काळात मेनका गांधी कॉंग्रेसमधून बाहेर पडून संजय गांधींच्या ’विचारांचा’ प्रसार करण्यासाठी ’राष्ट्रीय संजय विचार मंच’ नावाचा पक्ष स्थापन केला होता. आजही संजय गांधींच्या आणिबाणीदरम्यानच्या भूमिकेवर अर्थातच मेनका गांधी मौन पाळतात. याच मेनका गांधी भाजपच्या खासदार आहेत. वाजपेयी सरकारमध्ये त्या मंत्रीपण होत्या. संजयपुत्र वरूण गांधीने आजपर्यंत कोणतेही मोठे काम केलेले नाही पण त्याच्या बेलगाम भाषेवरून आक्रस्ताळेपणात तो संजयची गादी चालवणार असे दिसते.

२. विद्याचरण शुक्ला २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून छत्तिसगडमधील महासमंद लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या अजित जोगींकडून पराभूत झाले.

३. बन्सीलाल १९९६ ते १९९९ या काळात हरियाणाचे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. तसेच भाजप त्या सरकारमध्ये सामील होता.

४. जगमोहन १९९६ ते २००४ या काळात नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे खासदार होते. त्यांनी १९९० मध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगली कामगिरी केली असे म्हणतात पण ते आणिबाणीदरम्यान ’तुर्कमान गेट’ प्रकरणी बदनाम झालेच होते.

संजय प्रतिनिधी असलेली आक्रस्ताळी मंडळी नंतरच्या काळात भाजीपबरोबर संलग्न झाली आणि संजयपेक्षा अनंतपटीने सुसंस्कृत असलेल्या राजीव गांधींचे समर्थन कॉंग्रेसमध्येच राहिले. हा भारतीय राजकारणातील एक मोठा विरोधाभास आहे. आणि तरीही भाजप राजीव गांधींना टिकेचे धनी बनवतेच. असो.

विल्यम जेफरसन क्लिंटन

सत्ता मिळवली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. १९८४ ला इन्दीरा लाट होती तर १९८९ ला पराभव झाला होता. हो १९९१ ला त्यन्च्या बलीदाना मुळे सत्ता मिळली खरी. नहितर तेव्हही काही खरे न्हवते.

क्लिंटन's picture

22 May 2010 - 11:04 am | क्लिंटन

मान्य. राजीव गांधींनी १९८४ ची निवडणुक जिंकली असे म्हणण्यापेक्षा मृत इंदिरा गांधींनी ती जिंकली असे म्हटले तरी चालेल.

१९८० मध्ये इंदिरा गांधींचे पुनरागमन झाल्यानंतरच्या काळात इतक्या समस्या भेडसावू लागल्या. त्यामुळे विरोधकांनी आपापसात न भांडता काही प्रमाणात तरी एकी दाखवली असती तर इंदिराजींना १९८५ मधील निवडणुक जिंकणे कठिण गेले असते असे राजकिय निरीक्षक मानू लागले होते (संदर्भ: इंदर मल्होत्रा यांनी लिहिलेले इंदिरा गांधींचे चरित्र) पण सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईनंतर परिस्थिती थोड्या प्रमाणात बदलली आणि इंदिराजींची हत्या झाल्यावर तर कॉंग्रेसच्या झंझावातात विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले. त्यात इंदिरा हत्येचा वाटा मोठा आहे.

माझा मुद्दा निवडणुक कोणी जिंकली हा मुळातच नाही. माझा मुद्दा आहे की राजीवजींना लोकसभेत बहुमताचा पाठिंबा होता आणि त्यामुळे आपल्या राज्यव्यवस्थेत त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा होता. गांधी घराण्यातलाच कोणीही लोकसभेत बहुमत नसेल तर पंतप्रधान बनू शकणारच नाही आणि जर गांधी घराण्यातील कोणाकडे (किंवा अन्य कोणाकडेही) लोकसभेत बहुमत असेल तर त्या व्यक्तीस पंतप्रधान बनण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तेव्हा राजीवजींच्या पंतप्रधानपदास्चा घराणेशाहीशी संबंध का जोडतात हे मला कळलेले नाही.

विल्यम जेफरसन क्लिंटन

वाहीदा's picture

22 May 2010 - 11:41 am | वाहीदा

क्लिंटन ,
तुमचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहीतिपुर्ण ... आवडला :-)
~ वाहीदा

मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते. राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना यशस्वी पंतप्रधान असे म्हणायला अवघड जाते.

+१. 'सरळमार्गी'पेक्षासुद्धा 'काही चांगले उद्देश मनात बाळगून असलेले' म्हणता येईल. (Well-meaning.) त्यातले त्यांना जमले किती हा वेगळा मुद्दा. इतर राजकारण्यांच्या तुलनेने स्वच्छ असावेत. बोफोर्स अलाहिदा. 'धूर्तपणा नव्हता' खराच, शिवाय माणसाची पारख, कोणावर किती विश्वास ठेवावा आणि किती अवलंबून राहावे, या बाबतीत थोडे कच्चे असावेत. त्यामुळे आपल्याच माणसांनी टांग देण्याचे बळी पडत असावेत. बोफोर्स प्रकरणात म्हणूनच मोरू झाला असावा. पण एकंदरीत त्यातल्या त्यात 'चांगला, विश्वास ठेवण्यालायक माणूस' किंवा 'विचारांची काही एक निश्चित दिशा असलेला माणूस' वाटायचा खरा. मात्र एकंदरीत तितकेसे प्रभावी किंवा यशस्वी ठरले नाहीत हे मान्य करता येईल.

- पंडित गागाभट्ट

चिरोटा's picture

21 May 2010 - 7:27 pm | चिरोटा

मला वाटते की राजीव गांधी हे एक सरळमार्गी पंतप्रधान होते

सहमत.

आपल्याला नेता म्हणून कोण पाहिजे हे त्या पक्षातील लोकांना ठरवायचा पूर्ण अधिकार आहे

बरोबर्.पूर्वी घराणीशाहीच्या नावाने बोंब मारणारे महाराष्ट्रात घराणेशाहीच राबवत आहेत व त्यांचे मित्रपक्षही माना डोलवत आहेत.भारतात कुठलाही पक्ष असो, पक्ष चालवणार्‍यांची मानसिकता सारखीच असते.निवडणूका जिंकायच्या असतील तर पैसा आणि लोकांमधली छबी ह्या दोन्ही गोष्टींना महत्व आहे.काँग्रेसने ह्या गोष्टींचा पूर्वीपासुन वापर केला.ईतर पक्षांनीही नंतर तोच कित्ता गिरवला.

एक राजकारणी म्हणून धूर्त आणि चाणक्यनितीचे खेळ करण्यात राजीव गांधींना अपयश आले

९१ साली चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा वायफळ कारण देवून राजीव गांधींनी काढून घेतला होता.

भारताला एक नवी आधुनिक दिशा द्यायची त्यांच्याकडे क्षमता होती असे मला वाटते

सहमत.
त्यांना श्रध्दांजली
P = NP

अरुंधती's picture

21 May 2010 - 7:27 pm | अरुंधती

राजीव गांधींविषयी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्या काळातील त्यांचा माध्यमांसमोर संयत वावर, अचानक अंगावर आलेली जबाबदारी इ.इ. गोष्टींमुळे का कोण जाणे, त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती मनात दाटून यायची. आणि त्याचा कॉन्ग्रेसला भरपूर फायदा झाला. रातोरात त्यांना कॉन्ग्रेसचा उत्तराधिकारी मिळाला. त्यांच्या हत्येनंतर पुन्हा तीच सहानुभूती उर्वरित गांधी कुटुंबियांना मिळत आहे व मिळत राहील. भारतातील ते अघोषित राजघराणे आहे व भारतीय लोक त्यांची प्रजा! म्हणजे असं चित्र तरी दिसतं! म्हणूनच इतके भ्रष्टाचाराचे, जबाबदारी पुरी न पाडण्याचे आरोप होऊनसुध्दा तेच लोक आज सत्तेच्या केंद्रस्थानी दिसतात.

अवांतर : राजीव गांधी माणूस दिसायला देखणा! त्यांचे हसरे, प्रसन्न छायाचित्र बघायला छान वाटते. इतर म्हातार्‍या-कोतार्‍या राजकारण्यांच्या चेहर्‍यांच्या तुलनेत त्यांचा चेहरा खूपच फोटोजनिक होता असे आपले माझे मत! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

कानडाऊ योगेशु's picture

21 May 2010 - 7:33 pm | कानडाऊ योगेशु

राजीव गांधीना आदरयुक्त श्रध्दांजली.
त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करण्याइतके ज्ञान माझ्याकडे नाही.
पण क्लिंटनरावांचा प्रतिसाद आवडला.

सध्याच्या परिस्थिती कसाही असला तरी काँग्रेस पक्षाखेरीज देशाला नेतृत्व देण्याची क्षमता अजुन कुठल्या दुसर्या पक्षात आहे?
प्रमोद महाजनांनंतर भाजपाची हालत तर पाहवेनासी झाली आहे.

राजीव गांधींपेक्षा मॅडम कांकणभर जास्तच धूर्त व चाणाक्ष वाटतात.
पंतप्रधान होण्याची संधी असतानाही "अंतरात्मा की आवाज" वगैरे मेलोड्रामा करुन समस्त विरोधकांच्या थोतरीत मारली होती.

@आणि घराणेशाही वगैरे बद्दल..
जे कॉग्रेंसमधल्या घराणेशाही बद्दल बोंबलत होते त्यांनी काय तारे तोडले हे आपण पाहतच आहोत.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

डावखुरा's picture

21 May 2010 - 8:59 pm | डावखुरा

या लेखातील दुर्मिळ छायाचित्रे आणि अरुताई,भेंडी काका,क्लिंटन ,वहीदा,नयनीतै...यानी फारच छान माहीती दिली...
छान माहितीपुर्ण धागा....
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!" :)

पक्या's picture

21 May 2010 - 9:29 pm | पक्या

राजीव गांधींना श्रध्दांजली .
क्लिंटन यांचा माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला.
लेखातील छायाचित्रे पण छान आहेत. राजीव गांधींबद्द्ल कोणाचे कसेही मत असले तरी भारताला एक देखणा आणि हसर्‍या व्यक्तीमत्त्वाचा पंतप्रधान मिळाला होता ह्यावर कोणाचेच दुमत नसेल . :)
-जय महाराष्ट्र , जय मराठी !

हुप्प्या's picture

21 May 2010 - 9:50 pm | हुप्प्या

मेल्या म्हशीला मणभर दूध असे म्हणायची पद्धत आहे. राजीव गांधींनी टेलिकॉमसाठी जे काही केले ते चांगलेच केले. अर्थात त्यांच्या मासाहेबांनी हे आधीच हाती घेतले असते तर आपल्याला जास्त फायदा झाला असता.
बोफोर्स हे एक प्रकरण होते तसे शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणे ही राजीव गांधींनी केलेली एक घोडचूक. रानटी, धर्मपिसाट, जुन्या चालीरीति उराशी कवटाळून बसणार्‍या मुल्ला मौलवींची दाढी कुरवाळण्याचे हे नसते धंदे करून देशाला विशेषतः मुस्लिम जनतेला कित्येक वर्षे मागे नेले. मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे. ही घातक प्रथा पडल्यामुळे बाकीचे धर्मही मलापण हे हवे ते हवे असे करणार हे नक्की.
दुसरे म्हणजे रामजन्मभूमीचे स्थळ हिंदूंना खुले करुन दिले. त्यामुळे जी आग भडकली आहे तिच्या ठिणग्या आजही उडत आहेत. परिणामांना तोंड द्यायची ताकद नसताना, परिणाम ओळखायची कुवत नसताना मतांकरता
असले सवंग उपाय करून पुढील अनेक वर्षांकरता लोकांचे वाटोळे करायचे हे धंदे.
कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील. त्याबद्दल विरोधकांनी राजीव गांधींचे आभार मानायला हवेत.

एक शंका, राजीवजीनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता असे ऐकून आहे. तरीही त्यांचे जाहीर अंत्यसंस्कार हे हिंदू पद्धतीने झाले असे आठवते. ही त्यांची इच्छा होती का सहानुभूती मिळवण्याकरता केलेली ढोंगबाजी?

क्लिंटन's picture

22 May 2010 - 12:11 am | क्लिंटन

शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणे ही राजीव गांधींनी केलेली एक घोडचूक.

मान्य. राजीव गांधींच्या कारकिर्दीला लागलेल्या डागांमध्ये हा एक डाग नक्कीच आहे.

मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे.

या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती.

काही प्रश्न:
१. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते?
२. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला?
३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय?

याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.

ही घातक प्रथा पडल्यामुळे बाकीचे धर्मही मलापण हे हवे ते हवे असे करणार हे नक्की.

गेल्या २५ वर्षांमध्ये इतर कोणत्या धर्माने (त्या धर्माच्या लोकांनी) अशा मागण्या केल्या आहेत?

कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील.

एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते.

आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते.

आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन )

या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता.

काही प्रश्न:
१. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे.
२. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का?
३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले?
४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले?
५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?
६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?)

मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा?

राजीवजीनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता असे ऐकून आहे.

नक्की संदर्भ देऊ शकाल का? अशा ऐकिव माहितीला किती महत्व द्यावे?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

शिल्पा ब's picture

22 May 2010 - 12:19 am | शिल्पा ब

काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. हा तर आपल्या राज्यकर्त्यांच्या जुना गुण आहे...जरा खुट्ट वाजणार म्हंटले कि घातले लोटांगण...खंबीरपणा कसा तो नाहीच...कशाला घाबरतात देव जाणे.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आंबोळी's picture

22 May 2010 - 11:11 am | आंबोळी

मेल्या म्हशीला मणभर दूध

हे लै आवडल....
सहमत

आंबोळी

मितभाषी's picture

22 May 2010 - 4:49 pm | मितभाषी

मेल्या म्हशीला मणभर दूध>>>

=)) =))

७० हजार कोटीचा काल फायदा झाला हे मला पटते. :|

तसेच लॉर्ड मॉउंट्बॅटन जन्माला आले म्हणुन १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,त्याप्रमाणे राजीव गांधी भारतात जन्माला आले म्हणुन भारताला संगणकाची ओळख झाली हे पण पटले. :D

वेताळ

मितभाषी's picture

22 May 2010 - 5:01 pm | मितभाषी

तसेच लॉर्ड मॉउंट्बॅटन जन्माला आले म्हणुन १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,त्याप्रमाणे राजीव गांधी भारतात जन्माला आले म्हणुन भारताला संगणकाची ओळख झाली हे पण पटले.
>>>>>>>>>

=)) =)) =)) =))

राजीवजींची हत्या अत्यंत क्रुर पधदतीने झाली हे एक वेळेस मान्य केले तरी म्हणुन ते हिन्दुस्थानचे हिरो होवु शकत नाहीत.
म्हणुनच ते जनमाणसाचा आक्रोश वगैरे फिल्मी वर्णन अस्थायी वाटले.

परंपरेने मिळालेल्या सत्तेची खुर्ची उबवण्यापलिकडे त्यांनी भरीव असे काहीही केलेले स्मरणात नाही. काँग्रेस पक्षात अनेक योग्यतेचे तरुण होतेच कि त्यावेळी.

यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढायचे सोडुन दुसरे काय केले. तर यांनी फक्त डोक्यावर गोल पांढर्‍या टोप्या चढवुन इफ्तार पार्ट्या झोडल्या.

पंगा's picture

22 May 2010 - 10:52 pm | पंगा

म्हणुनच ते जनमाणसाचा आक्रोश वगैरे फिल्मी वर्णन अस्थायी वाटले.

"अस्थायी" नाही. "अस्थानी".

"अस्थायी" बोले तो, unstable.
"अस्थानी" बोले तो, out of place.

अर्थ बदलून जातो ना बे!

- पंडित गागाभट्ट

श्रावण मोडक's picture

22 May 2010 - 12:27 am | श्रावण मोडक

मी फक्त क्लिंटनच्या प्रतिसादांसाठी हा धागा वाचतोय.
या धाग्यावरील प्रतिसाद स्वतंत्रपणे काढून त्याला एकत्र गुंफले तर क्लिंटनचा एक उत्तम लेख होऊ शकेल. राजीव गांधींविषयी आवश्यक माहिती देणारा, त्याचवेळी त्या माहितीच्या मूल्यांकनाची एक चौकटही दाखवणारा.

विकास's picture

22 May 2010 - 1:29 am | विकास

या धाग्यावरील प्रतिसाद स्वतंत्रपणे काढून त्याला एकत्र गुंफले तर क्लिंटनचा एक उत्तम लेख होऊ शकेल.

अशीच विनंती त्यांना आत्ता खरडीद्वारे केली आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मस्त कलंदर's picture

22 May 2010 - 3:47 pm | मस्त कलंदर

अगदी सहमत..
क्लिंटन आणि विकास , माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विकास's picture

22 May 2010 - 3:07 am | विकास

वर विशेषकरून क्लिंटन यांनी अनेक मुद्दे आणले आहेत तसेच इतरांनी देखील आणले आहेत. हे उत्तर त्या सर्वांना एकत्रित आहे असे समजावे:

सर्वप्रथम राजीव गांधींच्या काळात चांगल्या घडलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या नेतृत्वाखाली घडल्या असे नक्कीच म्हणता येईल, त्यांचा विचार करू

  1. वर आलेली एक गोष्ट म्हणजे टेलीकम्युनिकेशन्स आणि तत्सम विषयातील मोठा फरक. सॅम पित्रोदा यांचे नाव वर आले आहेच.
  2. जॉर्ज बूश (पहीले) यांनी सुपरकाँप्युटींग भारताला न देण्याचे ठरवले आणि त्या संदर्भात उद्दामपणा केला. त्यावेळी भारतीय शास्त्रज्ञांनी तो प्रकल्प जिद्दीने उचलला आणि राजीवजींनी त्याला सक्रीय पाठींबा दिला - तो म्हणजे परम प्रकल्प. ज्याने भारताचे अधुनिक तांत्रिक क्षेत्रातील नाव वर आले. विजय भटकर सगळ्यांना माहीत असतीलच. यावर बरेच काही लिहीता येईल. पण तुर्तास इतकेच.
  3. लोंगोवाल करार करून पंजाब प्रश्नावर तोडगा काढण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न. तसाच करार आसाम स्टूडंट्स युनियन (आसू) बरोबर केला आणि मला वाटते मिझोराममधे पण. यातील प्रत्येकाला काही अंशी यश आले. अपयश आले असले तरी टिका करण्यासारखे नाही.
  4. आईने केलेली ऑपरेशन ब्लूस्टारच्या वेळची संवाद न करण्याची चूक, ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेस भरून काढली आणि यशस्वी ऑपरेशन केले.
  5. अरूणाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला. हे खूप महत्वाचे होते आणि आजही आहे. (वरील करार तसेच अरूणाचल प्रदेशाच्या बाबतीत तत्कालीन गृहसचीव राम प्रधान यांचा महत्वाचा भाग होता).
  6. बाकी एक स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व मिळाले. त्यात वर एका प्रतिसादात आल्याप्रमाणे, दिसणे उपयोगी पडले. पण तो दोष होऊ शकत नाही.

मात्र जसे वर उल्लेखलेल्या गोष्टी नक्कीच स्पृहणीय आहेत, तशाच त्यांच्या तितक्याच मोठ्या चुका पण झाल्या आहेतः

  1. सगळ्यात मोठ्ठी चूक ही शहाबानो प्रकरण. वर क्लिंटन यांच्या हिंदूकोड बिलाच्या मुद्यापेक्षा ही मोठी घोडचूक होती. कारण नेहरूंनी घटना दुरूस्ती केली नव्हती. त्यांच्या नातवाने सुप्रिमकोर्टाचा निर्णय उलटवायला घटनाच बदलली. आणि ती देखील आमच्या कडे ३/४ बहुमत आहे आम्ही काही करू शकतो या माजाने.
  2. श्रीलंकेत पाठवलेली शांतीसेना. कुठलाही प्लॅन न करता केलेले हे कृत्य होते. वर एका प्रतिसादात त्या सैनिकांनी तेथे जाऊन अत्याचार केले असे म्हणले आहे. वास्तवीक उलटेच झाले होते. हे भारताचे व्हिएटनाम होते. त्यात सैनिकांचे हाल झाले. तेथे मरून आणि त्याहीपेक्षा माघार घेतल्यावर येथे आल्यावर जी वाईट ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे. त्याचेच फळ एका अर्थी त्यांनी भोगले जसे इंदीरा गांधींनी पंजाबमुळे भोगले.

पंतप्रधान असताना शेवटच्या काळात ते वैयक्तिक कितीही चांगले असू शकतील असे वाटले तरी त्यांचे "सत्तेच्या दलालांवर" (हे त्यांचे शब्द आहेत) काहीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले. मग उगाच "हम उनको उनकी नानी याद दिलायेंगे" वगैरे सारखे पोकळ टाळ्याखाऊ बोलणे करणे चालू झाले. थोडक्यात नेतृत्व म्हणून कच्चेच ठरले. फक्त जिथे जिथे त्यांना चांगले सल्लागार मिळाले तेथे तेथे त्यांचे निर्णय यशस्वी ठरले. स्वतःच्या दिशा देणे हा वेगळाच मुद्दा झाला. हे वास्तव आहे असे वाटते.

आता क्लिंटन यांच्या दोनच प्रश्नांना उत्तरे: सर्वप्रथम, यात भाजपाची बाजू घेणे हा उद्देश नाही... मी भारतात सध्या रहातही नाही आणि त्या अर्थाने राजकारणाशी संबंधही नाही..

राजीवजींना विरोध कोण करते बघा-- भाजीपचे (भारतीय जीना पक्षाचे) नेते. भारतीय राजकारणातील विरोधाभास कसा स्पष्टपणे दिसतो बघा.

राजीवजींच्या विरुद्ध भाजपा आणि संघ परीवार हा केवळ शहाबानोप्रकरणामुळे गेला होता. हिंदू द्वेष्टे व्हिपी सिंग यांनी राजीव द्वेष हा बोफोर्स च्या निमित्ताने चालू केला आणि "तुमच्याहून अधिक स्वच्छ" हे राजीवजींना दाखवण्याच्या निमित्ताने वाढवत ठेवला. भाजपाने त्याचा राजकीय फायदा नक्कीच उचलला. विशेष करून बोफोर्स संदर्भात. आजही त्यात भ्रष्टाचार झाला नाही हे कोणी अमान्य करत नाही, फक्त किती झाला आणि त्यात राजीव किती सहभागी होते हा मुद्दा कुणालाच कळू शकणार नाही. तसेच थोडेफार, काँग्रेसने जॉर्ज फर्नांडीस यांच्या विरुद्ध आवाज उठवला, सत्तेत आल्यावर चौकशा समित्या बसवल्या आणि आता स्वतःच त्यांच्या विरुद्धच्या चौकशा विशेष प्रसिद्धी न देता थांबवल्या आहेत.

बाकी पॉलीटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज हे प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवावे. गांधीचे पुतळे काढून नथुरामचे ठेवा असे म्हणणारे भुजबळ हे नंतरच्या लगेचच्या निवडणूकीत काँग्रेसला चालले होते हे वास्तव आहे. तेच वास्तव समाजवादी विचारसरणीत देखील असेल. कदाचीत एकमेव अपवाद असेल तर तो कम्युनिस्टांचा, पण मग त्यांना भारतापेक्षा चीन चालतो हे अजून एक भयानक प्रकरण... मात्र वरील प्रतिसादात असे दिसते की असे केवळ भाजपनेच केले अथवा असे भाजपने करू नये.

अनेक लोक म्हणतात की राजीव गांधींना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून पंतप्रधान केले. मला ते पटत नाही. फार तर त्यांना इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले हे मान्य करता येईल. पण पंतप्रधान म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले होते.

हे विधान अर्धसत्य आहे. पूर्ण नसण्याचे थोडे कारण इतकेच, की काही झाले तरी ते केवळ गांधी-नेहरू घराण्यातील म्हणून इंदिरा गांधींच्या निधनानंतर पंतप्रधान होऊ शकले. वास्तवीक कायद्याप्रमाणे विचार केल्यास मंत्रीमंडळात "नेक्स्ट इन लाईन" असलेले (मला वाटते) प्रणवकुमार मुखर्जी अथवा नरसिंहराव हे हंगामी पंतप्रधान होयला हवे होते. मात्र राजीव स्वतः मंत्रीमंडळात देखील नव्हते. ते कलकत्यात होते. त्यांना बोलावून त्यांचा शपथविधी करवून मग इंदीरागांधींच्या निधनाची बातमी जाहीर केली गेली. नंतर अर्थातच ते ८५च्या निवडणूकात स्वबळ आणि इंदिराहत्येच्या सहानभूती लाटेवर निवडून आले. त्या घटनेला खूपच प्रसिद्धी मिळाल्याने, अगदी पाश्चात्य देशातील एका (ब्रिटीश की अमेरिकन) बाईची पण मुलाखतीत "बिचार्‍याची आई गेली" असली प्रतिक्रीया वाचल्याचे आठवते. तेथे भारतातील जनतेचे काय विचारता? मुखर्जी आणि राव यांना त्याकाळात हंगामी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल (राजकीय पॉवर वनवासाची) शिक्षा झाली होती असे आठवते.

असो. यावरील इतर मुद्यांवर वेगळी डोळस चर्चा झाली तर उत्तम असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

क्लिंटन's picture

22 May 2010 - 9:11 am | क्लिंटन

कारण नेहरूंनी घटना दुरूस्ती केली नव्हती. त्यांच्या नातवाने सुप्रिमकोर्टाचा निर्णय उलटवायला घटनाच बदलली.

शाहबानो प्रकरणी राजीव सरकारने नक्की कोणती (किती क्रमांकाची) घटनादुरूस्ती केली? कारण या यादीमध्ये तर राजीव सरकारच्या काळात अशी कोणती घटनादुरूस्ती केल्याचे म्हटलेले नाही. मिलीगॅझेट या भारतीय मुस्लिमांच्या मासिकातील ताहिर महमूद यांचा हा लेख तर अशी कोणतीच घटनादुरूस्ती केली नाही असे म्हणतो. तसेच राजीव सरकारने Muslim Womens Act 1986 पास केला आणि २८ सप्टेंबर २००१ मध्ये दुसऱ्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा ’घटनाबाह्य किंवा देशहितविरोधी किंवा स्त्रीहितविरोधी’ नाही असे स्पष्टपणे म्हटले. घटनादुरूस्ती ही हिंदुत्ववादी संघटनांनी पसरवलेली भूलथाप आहे असेही हा लेख म्हणतो. हा लेख मिलीगॅझेटमध्ये आला असल्यामुळे पूर्णपणे पूर्वग्रह नसलेला असेल असे वाटत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचा २००१ मधील निर्णय कुठे बघायला मिळाला (इंटरनेटवर) तर चांगले होईल.

केंद्र किंवा राज्य सरकारने केलेला कोणताही कायदा घटनाविरोधी असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्दबादल करू शकते. तसे अधिकार न्यायालयाला आहेत. घटनेच्या ९व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले कायदे मात्र न्यायालयाच्या कक्षेबाहेर आहेत. २-३ वर्षांपूर्वी त्या परिशिष्टातील कायदेपण न्यायालयाच्या अधिकारकक्षेबाहेर नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असे वाचल्याचे आठवते. पहिल्या घटनादुरूस्तीद्वारे १९५१ साली हे नववे परिशिष्ट घटनेला जोडण्यात आले.त्यात जमिनदारीविरोधी कायद्यांचा समावेश होता. त्यानंतर १९९४ मध्ये तामिळनाडूत ५०% पेक्षा जास्त आरक्षण ठेवायचा कायदा नवव्या परिशिष्टात जोडण्यात आला. नवव्या परिशिष्टात कोणताही कायदा जोडायलाही घटनादुरूस्तीची गरज आहे. सरकार मनात येईल तो कायदा नवव्या परिशिष्टात घटनादुरूस्तीशिवाय टाकून मोकळे होऊ शकत नाही. कारण घटनेतला एक शब्द बदलायचा/ नवीन जोडायचा असेल तरी घटनादुरूस्ती करावी लागते असे वाटते.

माझा स्वत:चा मुस्लिम धर्मांधतेला आणि धर्माच्या नावावर केलेल्या हिंसाचाराला प्रखर विरोध आहे हे ज्यांनी माझे मनोगतापासून मिपावरचे लिखाण वाचले आहे त्यांना तर नक्कीच माहित आहे. पण वस्तुनिष्ठ अभ्यास करताना सत्य परिस्थिती काय आहे हे बघणे महत्वाचे आहे हे तर नक्कीच.जर अशी घटनादुरूस्ती राजीव सरकारने केली नसेल तर वारंवार तसे का ठासून सांगितले जाते?

त्यांचे "सत्तेच्या दलालांवर" (हे त्यांचे शब्द आहेत) काहीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले.

यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. अनेक प्रसंगी त्यांचे नेतृत्व कमी पडले. मला स्वत:ला असे वाटते की राजकारणात गरजेचा असलेला धूर्तपणा ते करू शकले नाहीत हे त्यामागचे कारण आहे.

मात्र वरील प्रतिसादात असे दिसते की असे केवळ भाजपनेच केले अथवा असे भाजपने करू नये.

मान्य. असा संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. माझ्या स्वत:च्या लिखाणात अलिकडच्या काळात भाजपवर जास्त टिका असते याचे एक कारण आहे. मागे म्हटल्याप्रमाणे एके काळी मी भाजपचा कट्टर समर्थक होतो. कधीकधी वाटते की माझे भाजप समर्थन अडवाणी आणि वाजपेयींपेक्षाही जास्त कट्टर होते. त्या पक्षाला मी आपले मानले होते. आणि त्यामुळेच त्यांनी केलेल्या अपेक्षाभंगाचे दु:ख जास्त होते.

वास्तवीक कायद्याप्रमाणे विचार केल्यास मंत्रीमंडळात "नेक्स्ट इन लाईन" असलेले (मला वाटते) प्रणवकुमार मुखर्जी अथवा नरसिंहराव हे हंगामी पंतप्रधान होयला हवे होते.

या बाबतीत राज्यघटना काहीच बोलत नाही. किंबहुना राज्यघटनेच्या दृष्टीने हंगामी पंतप्रधान नसतोच. तसा उल्लेख राज्यघटनेत नाही. तसेच काही कारणाने पंतप्रधानाची जागा रिकामी झाल्यास (राजीनामा, निधन) किंवा कधीही लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही व्यक्तीस पंतप्रधान होता येईल.त्यासाठी ती व्यक्ती ’नेक्स्ट इन लाईन’ असायला पाहिजे असे नाही. उद्या तात्या अभ्यंकरांना जर लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेल तर ते ही भारताचे पंतप्रधान बनू शकतात. पण बहुतांश वेळी अशी ’नेक्स्ट इन लाईन’ व्यक्तीच बहुमताचा पाठिंबा मिळवू शकते आणि पंतप्रधान बनू शकते. पण तसा नियम नाही.

निकोलस न्यूजन्ट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रात असे वाचले आहे की इंदिराजींवर गोळ्या झाडल्या आणि त्या वाचायची शक्यता फारच कमी आहे हे कळताच राष्ट्रपती झैल सिंह येमेन दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीला यायला निघाले. ते विमानात असताना त्यांनी राजीव गांधींना पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे असे त्यांनी ठरविले. ते दिल्लीला परतल्यावर कॉंग्रेस संसदीय पक्षाचे राष्ट्रपतींना राजीव गांधींना नवा नेता नियुक्त केल्याचे पत्र कॉंग्रेस नेते जी.के. मूपनार यांनी त्यांना दिले आणि त्यानंतर राजीव गांधींचा शपथविधी झाला. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली होती का याची कल्पना नाही पण तशी ती झाली असे म्हणायला वाव नक्कीच आहे.

समजा कॉंग्रेस संसदीय पक्षाने राजीव गांधींऐवजी प्रणव मुखर्जींना आपला नेता म्हणून निवडले असते तर राष्ट्रपतींवर प्रणव मुखर्जींना पंतप्रधान म्हणून शपथ द्यायचे बंधन होते का? तर तसे नाही. कारण पंतप्रधान म्हणून कोणाला नेमावे हा केवळ राष्ट्रपतींचा विशेषाधिकार असतो. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून ७व्या लोकसभेत (१९८०-८४) सभागृहाला सामोरे गेले असतील असे वाटत नाही कारण इंदिरा गांधींवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आठवड्यातच ८ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांची घोषणा झाली. अशा परिस्थितीत संसदेचे अधिवेशन झाले असायची शक्यता कमीच.तेव्हा राजीव गांधींकडे बहुमत नसते तर त्यांचा ७व्या लोकसभेत पराभव व्हायची शक्यता नव्हती. पण ८ व्या लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांपैकी बहुमताचा त्यांना पाठिंबा होता हे कसे नाकारता येईल?तो तसा नसता तर ते पंतप्रधान म्हणून ५ वर्षे टिकू कसे शकले?

मुखर्जी आणि राव यांना त्याकाळात हंगामी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल (राजकीय पॉवर वनवासाची) शिक्षा झाली होती असे आठवते.

राव यांना नाही तर प्रणव मुखर्जी १९८६ ते १९९२ या काळात कॉंग्रेसबाहेर होते. ज्या चार मंत्र्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी राजीव गांधींबरोबर शपथ घेतली त्यात नरसिंह रावांचा समावेश होता आणि त्यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. शीखविरोधी दंगलीदरम्यान अकार्यक्षमतेचा आरोप त्यांच्यावर होतो याचे कारण त्या काळात ते गृहमंत्री होते. प्रणव मुखर्जींना मात्र मंत्रीमंडळात स्थान नव्हते.

विल्यम जेफरसन क्लिंटन

विकास's picture

22 May 2010 - 6:04 pm | विकास

खालील उत्तर माझ्या मर्यादीत माहितीवर आणि थोडेफार इंटरनेट सर्च वर आधारीत. मर्यादीत याचा अर्थ - मी काही याचा अभ्यासक म्हणून अभ्यास केलेला नाही. तसा येथे कुणाचाही असल्यास अवश्य भर घालावी:

शहाबानो खटला हा फौजदारी कायद्याच्या (क्रिमिनल प्रोसिजर कोड) १२५ कलमाखाली चालू होता. या कलमा अंतर्गत धर्माचा विचार न होता केवळ स्त्री इतकाच विचार होता. जो "सेक्यूलर इंडीयाचा" भाग होता/आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा या संदर्भाने होता. अगदी थोडक्यातः

Clause ( b ) of the Explanation to section 125 (1) of the Code, which defines "wife" as including a divorced wife, contains no words of limitation to justify the exclusion of Muslim women from its scope. Wife, means a wife as defined, irrespective of the religion professed by her or by her husband. Therefore, a divorced Muslim woman so long as she has not married, is a wife for the purpose of section 125.

अर्थात याचा संबंध हा कुठल्याही धर्माशी नसून व्यक्तिस्वातंत्र्य आणि हक्काशी, तेही स्त्रीयांच्या हक्काशी आहे, जे घटनेने सर्वांना समान दिले आहेत. सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा बर्‍याचदा "केस लॉ" ठरतो. अर्थात पुढील सर्वच निर्णयांवर कायदा नसतानाही कायदाच ठरतो. मुस्लीम समाजाला, किमान त्यातील काहींना त्यामुळे हे त्यांच्या धर्मावर केलेले आक्रमण वाटले. तसे वाटले ह्यावर कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. तसे वाटणे आणि त्या विरुद्ध बोलणे ह्याचे स्वातंत्र्य देखील घटनेने प्रत्येकाला दिले आहे. मात्र त्याला देशाच्या अधिकृत नेतृत्वाने कसे हाताळावे हा येथे मुद्दा आहे. राजीव सरकारने तिथेच गडबड केली. आणि Muslim Womens Act 1986 हा कायदा अस्तित्त्वात आणून मुस्लीम महीलेस असलेले इतर महीलांसारखे स्वातंत्र्य काढून टाकले. त्यामुळे हे जर शाब्दीक च्छल केला तर घटना दुरूस्ती नाही असे म्हणता येईल. पण केस लॉ हा जसा लॉ नसतो तरी असतो, तसेच या संदर्भात घटनेने दिलेले हक्क एखाद्या कायद्याने काढणे हे देखील घटनादुरूस्ती किमान घटनेला बायपास करणे असते असे म्हणता येईल.

यात माझ्या लेखी आक्षेपार्ह काय घडले?
जर कोणी आवाज उठवला तर आम्ही तो संसदेचा वापर करत, बायपास करू शकतो. (येथे मुसलमान असतील पण असे हिंदू अथवा अजून कोणी असले तरी घडता कामा नये). हा अत्यंत चुकीचा संदेश देशातील जनतेला मिळाला आणि आधीच होत असलेल्या लोकशाहीच्या थट्टेचे क्रूर थट्टेत झपाट्याने त्यांच्या आणि नंतरच्या काळात परीवर्तन घडले. आज पर्यंत ते सातत्याने होत आहे. पक्ष कुठलाही असूंदेत....

माझा स्वत:चा मुस्लिम धर्मांधतेला आणि धर्माच्या नावावर केलेल्या हिंसाचाराला प्रखर विरोध आहे
येथे हा प्रश्न नाही, तसे जस्टीफिकेशन पण जरूरीचे नाही. माझा मुसलमानच काय, कुठल्याही धर्मांधतेला विरोधच आहे आणि मला माहीत आहे तुमचा देखील. पण एकदा का असे देशात धर्मांधता नको म्हणून ठरवले की अगदी राजकीय तडजोडीचे निर्णय घेताना पण कसे घ्यावेत ह्यातून नेतॄत्व ठरते.

भाजपवर जास्त टिका असते याचे एक कारण आहे. मागे म्हटल्याप्रमाणे एके काळी मी भाजपचा कट्टर समर्थक होतो.

हे समजू शकतो. हा प्रकार कोणीच सामान्य (राजकारणात नसलेल्या) माणसाने करू नये असे वाटते. माझ्या लिखाणावरून मी भाजपाचा म्हणणारे महाभाग पाहीले आहेत. पण भाजपाचे नेते पण असे म्हणणार नाहीत... :) असे जेंव्हा आपण होतो तेंव्हा भ्रमनिरास हा होतोच. भारतीय जनतेने असा भ्रमनिरास जनता पार्टीच्या सरकारच्या शेवटी पाहीला होता. नंतर उरला तो केवळ सिनिसिझम. तेच अनेक हिंदुत्ववाद्यांचे रालोआच्या काळात झाले. मात्र मी अनेक मोठ्या लोकांना भेटलो आहे, ज्यांच्या राजकीय पक्षांकडून कधीच अपेक्षा नव्हत्या - जरी वर्तमानपत्रे काही छापून आणत असली तरी. त्यांचे म्हणणे सिंपल - आपण समाजात काम करतो ते करत राहू या, कुठल्याच राजकारण्यांकडून काही घडेल याची अपेक्षा करू नका...मी अनेकांना निवडणूकांच्या वेळेस सांगायचो. की आलटून पालटून किमान दोन प्रमुख पक्षातील माणसांना निवडून द्या. त्यात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सगळेच आले. काही वर्षांनी त्यांना त्यांची राजनिती स्वतःचे जॉब्ज वाचवण्यासाठी तरी खर्‍या अर्थाने लोकाभिमुख आणि देशाभिमुख करावी लागेल.

असो. तुर्तास आपल्या वरील प्रतिसादास इतकेच उत्तर. राव संदर्भात चूक मान्य. आठवणींचा गोंधळ झाला. मात्र, त्यांना जरी गॄहखाते दिले होते तरी नंतर नव्याने तयार केलेल्या मनुष्यबळ विकासाचे मंत्री करून त्यांची पदोन्नती केली असे देखील म्हणले गेले होते. त्यामुळे माझा गोंधळ झाला.

धन्यवाद

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रदीप's picture

22 May 2010 - 9:29 am | प्रदीप

अत्यंत माहितीपूर्ण चर्चा, विशेषतः क्लिंटन व विकास ह्यांचे प्रतिसाद.

राजीव गांधींचे नाव आले की हमखास बोफोर्सचा उल्लेख होतो. त्यात त्यांचा अथवा त्यांच्या निकटवर्तीयांचा हात किती होता, ह्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही. पण मला वाटते, असल्या आरोपांच्या संदर्भात एक पॅटर्न लक्षात घ्यावयास व्हावा. आपल्या सामाजिक जीवनास नोकरशाहीची जबरदस्त मगरमिठी आहे. राजकारण्यांचीही आहे आणी आपण त्यांच्यावर सदैव (रास्त) आगपाखड करत असतोच. पण राजकारणी निदान काही अंशी का होईना, जनतेस अकाऊंटेबल तरी आहेत. निवडणूकांतून त्यांचे उच्चाटन होऊ शकते. नोकरशहांचे तसे नाही. त्यांना अकाउंटेबलिटीच नाही. असल्या वातावरणात, त्यांच्यावर कसलेही सरळ अथवा आडून वार कुणी केले, की मग त्या व्यक्तिची खैर नसते. राजीवच्या बाबतीत हेच झाले. आता नक्की संदर्भ वगैरे नाहीत पण 'स्वछ, चारित्र्यवान' अशी त्याची प्रतिमा असतांना, काही नोकरशहांचे त्याने जाहीर अपमान केले होते. त्यानंतर बोफोर्स प्रकरण 'बाहेर' आले. जॉर्जचे तेच झाले. मला आठवते त्यानुसार लडाख/लेह ह्या अति उंच व दुर्गम टापूत कार्यरत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या बर्फावर चालणार्‍या गाड्यांची खरेदीविषयी नोकरशहांनी नेहमीप्रमाणेच घोळ घातलेला होता, कागद इथून तिथे जात होते. हे लक्षात आल्यावर जॉर्ज ह्यांनी काही संबंधित नोकरशहांना मुद्दाम त्या दुर्गम भागात पाठवले. त्यानंतर त्याच्यावर, कधी नव्हे ते व तसले, खाबूगिरीचे आरोप झाले.

श्रावण मोडक's picture

22 May 2010 - 10:59 am | श्रावण मोडक

नोकरशहांबाबत प्रदीप यांनी लिहिलेल्या मुद्याशी सहमत. राजीव, जॉर्ज म्हणूनच नव्हे तर एरवीही अनेकदा असे घडले आहे. नोकरशहांना अकाऊंटेबल करण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यात अनेक चांगल्याही राजकारण्यांचा बळी जातो.
येथे आणखी एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. अंतिमतः राजकारण्याकडे जे सत्तेचे पद असते त्या आधारे नोकरशहांना चाप बसवण्याचे काम आपल्याकडे पुरेशा हिंमतीने झालेले नाही. ते करण्याची जबाबदारीही राजकारण्यांचीच आहे. पण राजकारणी जाते-सूप हा न्याय ध्यानात घेतच नाहीत आणि व्यवस्था आहे अशी राहण्यास मदत होत जाते. अनेकदा होते असे की, 'प्रशासनावर मांड असलेला नेता' अशी ज्याची प्रतिमा असते तो नेता वास्तवात या नोकशाहीला हाताशी धरूनच अनेक नको ते उद्योग करत असतो. ही नोकरशाहीला आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी राजकारण्यांना टाळता येणार नाही. अरूण भाटिया हे एक उदाहरण दोन्ही बाजू टोकावर गेल्यावर काय घडते ते दाखवण्यासाठी पुरेसे बोलके आहे.

समंजस's picture

22 May 2010 - 12:26 pm | समंजस

राजीव गांधी यांना विनम्र आदरांजली!!!!

(धागा आदरांजलीशी संबधीत असल्यामुळे, त्यांच्या गुणदोषांवर चर्चा करणे मला व्यक्तीशः बरं वाटत नाही.
शिर्षस्थानी कोणताही नेता असू देत, सत्तेत राहण्याकरीता जातीय मतांचं राजकारण खेळणे हे कॉन्ग्रेस पक्षाचं वैशीष्टय आहे. मग ते जुनं शहाबानो प्रकरण असू देत की सध्याचं अफझलगुरू प्रकरण.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2010 - 4:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास आणि क्लिंटन यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण साठवली आहे.

अदिती

तिमा's picture

23 May 2010 - 12:54 pm | तिमा

सर्व प्रतिसाद वाचल्यावर त्यांचे दोन भाग पडतात असे वाटते.
एक म्हणजे निपक्षपाती भूमिका नसल्याने गुडघ्यात मेंदु असल्यासारखे प्रतिसाद आणि क्लिंटनसाहेबांसारखे अभ्यासपूर्ण संतुलित प्रतिसाद.
एखादा माणूस संपूर्णपणे चांगला वा वाईट असत नाही. तरी त्याचे मूल्यमापन योग्य रीतीने करता आले पाहिजे.
मिपावर मला नेहेमीच काही विचारी मंडळी तर काही मॉब सायकॉलॉजी असलेली मंडळी दिसतात.
असो, शेवटी ही लोकशाही आहे.

क्लिंटन's picture

26 May 2010 - 1:39 am | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

मला या चर्चेचा TRP विनाकारण वाढवायचा नाही. तरीही हे लिहिणे गरजेचे वाटते.

अनेकदा मी मिपावरील माझे लेख/प्रतिसाद माझ्या मराठी ब्लॉगवरही पोस्ट करतो. आणि माझा ब्लॉग ’मराठी ब्लॉगविश्व’ वर निगडीत केलेला असल्याने मला माझ्या ब्लॉगवरही काही प्रतिसाद येतात. राजीव गांधींवरच्या या लेखावरील प्रतिसादावर आणखी काही प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर आले. त्याची उत्तरे मी माझ्या ब्लॉगवरच एकूण तीन भागांमध्ये दिली आहेत. त्याचा दुवा राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिसादास माझे उत्तर -- भाग ३ आहे आणि त्यातच यापूर्वीच्या लेखांचाही दुवा दिला आहे. मूळ पोस्टवर आलेल्या प्रतिसादाला उत्तर भाग १ मध्ये, भाग १ वर आलेल्या प्रतिसादास उत्तर भाग २ मध्ये आणि भाग २ ला आलेल्या प्रतिसादाचे उत्तर भाग ३ मध्ये दिले आहे.

ती चर्चा वाचायला काही मिपाकर तरी इच्छुक असतील असे वाटते म्हणून हा प्रतिसाद.

--विल्यम जेफरसन क्लिंटन

मृगनयनी's picture

21 May 2011 - 3:31 pm | मृगनयनी

आज २१ मे. २०११. :|

राजीव'जींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! :|

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

Rajeev'jee.... Still Love You... Still Miss You.....

राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

जयंत कुलकर्णी's picture

21 May 2011 - 6:57 pm | जयंत कुलकर्णी

अगदि टाईम्स नाऊ वर चाललेल्या चर्चसारखे वाटले. म्हणजे कसे ती चर्चा कशी स्पेक्ट्रम राजाच्या भ्रष्टाचारावर चालू होते आणि भाजपमधे पण हेच चाललेले आहे यावर संपते. राजाच्या भ्रष्टाचाराचा स्पेक्ट्रम केव्हाच चर्चेआड होतो.
सगळे एक नंबरचे राजकारणी.
शेवटी वाईट गोष्टींच्या प्रमाणावरच चर्चा करावी अशी सुचना आहे. म्हणजे कसे --- तुमची इतकी वर्षे सत्ता, तुम्हाला एकूण एवढी मते, तुमचा एवढा भ्रष्टाचार...... आमची एवढी वर्षे सत्ता, आमची मते एवढी, आमचा भ्रष्टाचार एवढा..... आता बोला कोण चांगले आणि कोण वाईट....

:-) :-)

आंबोळी's picture

22 May 2011 - 10:11 pm | आंबोळी

कालची आमटी आज उकळून(नवीन फोडणीही न देता) वाढण्याच्या मृगनयनींजींच्या प्रयत्नांपुढे नतमस्तक
आंबोळी

आम्बोळी'जी!... शिळ्या आमटातलं पाणी एक ग्रॅमने वाढवल्याबद्दल आभार!! राजीवजींची पुण्यतिथी सत्कारणी लागली म्हणायची!! ;)

नरेशकुमार's picture

23 May 2011 - 6:09 pm | नरेशकुमार

मसाले कमी पडत असतिल तर मागनी करन्यात यावी.
इथे वर्शानुवर्शे दळुन दळुन दळललेले मसाले मिळतील.

मृगनयनी's picture

21 May 2012 - 10:14 am | मृगनयनी

*~*~*~ राजीव'जींना सर्व (सूज्ञ) मिसळपावीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धान्जली~*~*~*

राजीव'जी.... आज इतक्या वर्षांनन्तरही.. तुमचा तो हसरा, उमदा, आश्वासक चेहरा आठवत राहतो.....

तुमची बोफोर्स'सारखी इतरही काही प्रकरणे सर्वज्ञात असूनही का कुणास ठाऊक.. पण तुमच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटत आलेला आहे...

तुमच्यासारखा "पन्तप्रधान" होणे आता कधीच शक्य नाही.....

LOVE YOU... MISS YOU.... RAJEEV'JI ...

:|

अवान्तर :- राजीव'जी तुमच्या थोडेफार सद् गुण आणि कर्तव्यनिष्ठा (आणि अक्कलही) तुमच्या मातृमुखी मुलामध्ये असती.. तर कदाचित देशाचे कल्याण झाले असते...

राजघराणं's picture

21 May 2012 - 6:36 pm | राजघराणं

.

मृगनयनी's picture

21 May 2012 - 6:57 pm | मृगनयनी

:( :( :(

भारतीय राजकारणात फक्त आणि फक्त '"नाठाळ" लोकच लागतात! नाहीतर तर मग त्यांची "घर का ना घाट का.. सिर्फ आण्णा के मोर्चे का" अशी अवस्था होते. राजीव'जी खानदानी राजकारणी होते. अर्थात ते त्यांच्या आईइतकेही पार पोचलेले वगैरे नव्हते!!! तुलनेने कमी नाठाळ होते.

अर्थात एक गोष्ट मात्र खरी, की त्यांच्या बद्दल तमाम भारतीयांना जो विश्वास आणि आदर वाटायचा.. तो आत्तापर्यन्त कुठल्याही पन्तप्रधानाबद्दल वाटलेला नाही ( अंशतः अपवाद- अटलबिहारी वाजपेयी)

कम्प्युटर प्रणाली फक्त राजीव'जींमुळे इन्डियात आली... (याचा ऑलरेडी वर सविस्तर उल्लेख आहे..) तसेच त्यांचे व्यक्तिमत्वही पन्तप्रधानपदास सुसह्य, योग्य होते.

त्यामुळे त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला.. त्याबद्दल जास्त हळहळ वाटते...

उलट सध्याचे काही (तोन्ड वाकडे असणारे) राजकारणी पाहिले, की राजीव'जींच्या ऐवजी ह्या लोकांच्या बाबतीत का असे झाले नाही.. असा सहजविचार मनात डोकावतो!.. (पक्षी: नाठाळपणा आणि निर्लज्जपणा इतका या लोकांमध्ये ठासून भरला आहे...राजीवजींपेक्षा कैक पटीने जास्त!!... त्यामुळे....)

विजय_आंग्रे's picture

21 May 2012 - 7:11 pm | विजय_आंग्रे

हा(जी), हा(जी), करायची सवय काँग्रेजवाल्यांना कदाचीत मो.क. गांधी नंतर आलेल्या आणि त्यांचेच आडनाव घेतलेल्या या इतर गांधी आडनावाच्या बाटग्यानी लावली.

मॅडमजी, राहुलजी,

अविनाशकुलकर्णी's picture

21 May 2012 - 10:17 pm | अविनाशकुलकर्णी

क्लिंटन's picture

21 May 2012 - 10:31 pm | क्लिंटन

कुलकर्णीकाका,

या फोटोतला पगडीधारी कोण? बियंत सिंह हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या बलवंत सिंह राजौनाच्या चेहऱ्यात आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यात बरेच साम्य दिसत आहे. जरा हा फोटो बघून सांगता का? तशीच मिशी, तशीच दुभंगलेली दाढी!! तुम्ही दिलेल्या फोटोतली व्यक्ती नक्की कोण? बलवंत सिंह राजौना तर नव्हे?

अविनाश'जी... वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!! पण या सगळ्यांमध्ये एक साम्य म्हणजे हे सगळे लोक "अविवाहित" आहेत. ;) अटल'जी, कलाम'जी, अण्णा हजारे (आय थिन्क न. मोदी पण)..... ह्या सगळ्यांना लग्न म्हणजे काय हे माहित नाही.. यांना मुलंबाळं नाहीत... त्यामुळे मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी यांना काहीही करायचे नाही. त्यामुळे थोड्याफार नि:स्वार्थीपणे हे सगळे अविवाहित लोक देशासाठी वेळ देऊ शकतात. ;)

परन्तु गान्धी घराण्याचे मात्र असे नाही. त्या घराण्यातल्या "वरूण गान्धी" पर्यन्तच्या सगळ्या पिढ्यांचे लग्न झालेले आहे. मातृमुखी आल्पशिक्षित राहुल गान्धी पण अफगाणिस्तानाचे अघोषित जावई आहेत.

ते जाऊदेत... पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही.
तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला.

आणि तसेही गांधी घराणेशाहीविरुद्ध ओरडणार्‍या आणि मुलंबाळं असणार्‍या राजकारण्यांनीही शेवटी आपल्याच मुलाला-नातवाला राजकीय वारसदार बनवले आहे.. अगदी मुलापेक्षा कितीतरी पटीने उजव्या असलेल्या पुतण्याला डावलले गेले... (पक्षी: बाळ, उद्धव, आदित्य, राज ठाकरे...)

आता बाय चान्स कधी कुणाला महानगरपालिका चालवायला मिळते.. तर कुणाला देश!!!... शेवटी दोन्ही ठिकाणी निवडून आपणच देतो ना!.. इथे राजकारणात घुतल्या तान्दळासारखे कुणीच्च नसते..त्यामुळे फक्त गान्धी घराणे तेवढे वाईट.. आणि बाकीचे सगळे चान्गले... असे म्हणणे चुकीचे ठरते.

:)

शिल्पा ब's picture

21 May 2012 - 11:49 pm | शिल्पा ब

<<<पण आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी उचित तजवीज करणं.. हा प्रत्येक मनुष्याचा धर्मच असतो. आणि या मानवी धर्मापासून इतर अनेक राजकारणी, फिल्म इन्डस्ट्री देखील दूर नाही.
तोच कित्ता गान्धी घराण्याने गिरवला.

किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !

मृगनयनी's picture

22 May 2012 - 3:05 pm | मृगनयनी

किती हजार कोटी म्हणजे उचीत समजायचे? एक आपला अडाणी प्रश्न !

हेहेहे.... कितीही कोटी मिळाले... तरी कमीच्च असतात.. जोपर्यन्त इन्कम्टॅक्स आणि सीबीआय वाले यांची मालमत्ता अधिकृत घोषित करून न भरलेल्या टॅक्सवरती कार्यवाही करत नाहीत.. तोपर्यन्त सगळं उचितच समजायचं!!! ..

तरी बरं.. गान्धी घराणेवाले स्वतःकडे आणि स्वतःच्या नावावर बर्‍यापैकी सम्पत्ती असल्याचे जाहीर तरी करतात.

नाही तर अजित पवार!... त्यांचा मुलगा म्हणे पुण्यात शिकयला आहे.. तो लॅन्ड माफिया अविनाश भोसले (सन & सॅन्डवाला) च्या एका आलिशान बन्गल्यात भाडेतत्वावर राहतो.. त्या बन्गल्याचे डिपॉझिट आहे १ कोटी रुपये.. आणि मन्थली भाडे आहे.. ५ कोटी!... अर्थात तशी स्टॅम्पपेपरवर आणि इतर कागदोपत्री नोन्द आहे म्हणे!!!!... :)

क्लिंटन's picture

22 May 2012 - 9:21 am | क्लिंटन

वरच्या फोटोतल्या महारथींबद्दल नि:संशय आदर आहेच!!!

मृगनयनीजी तुमच्या प्रतिसादातील एका वाक्याला हा उपप्रतिसाद असला तरी तो तुम्हाला किंवा कोणाही एकाला उद्देशून नाही. तुम्ही राजीव गांधींच्या फ्यान आहात याची कल्पना आहे. (गांधी घराण्यातील इतर व्यक्तिंविषयीची तुमची मते माहित नाहीत).

वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कुलकर्णी काकांनी दिलेल्या फोटोतील पगडीधारी व्यक्ती दहशतवादी बलवंत सिंह राजौना आहे असे मला वाटते.हे चुकीचे असल्यास बरोबर माहिती द्यावी ही विनंती.

गांधी घराण्यातील व्यक्तींची (किंवा कोणाचीही) आंधळी भक्ती नको हे अगदी मान्य.पण त्याचबरोबर आंधळा द्वेषही नको ना? गांधी घराण्यातील व्यक्तिंचा इतका आंधळा द्वेष करावा की एखादा दहशतवादी पण नि:संशय आदर देण्यायोग्य महारथी वाटावा हे कितपत योग्य आहे?आणि अशा मनुष्याचा फोटो कलामसाहेब, वाजपेयी, अण्णा हजारेंच्या फोटोबरोबर देऊन तो फोटो प्रसिध्द केलेल्याला नक्की काय म्हणायचे आहे कोणास ठाऊक?