आपण अन्न खातो तसेच बनतो का?

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
16 May 2010 - 2:45 am

मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या...

दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उरकल्यावरसुद्धा.... रोज तासभरतरी जिममध्ये जाणारी मी २० मिनिटात परत आले...मग थोड्या वेळाने एक फळ खाल्लं तेव्हा कुठे जरा बरं वाटलं....मग तुमच काय मत आहे? म्हणजे आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते यावर...

****************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 May 2010 - 2:56 am | शुचि

माझं जरा अति "इमोशनल" असतं. अन्नापेक्षा कोणी आणि कोणत्या भावनेनी खायला घतलय त्यावर माझा मूड खरच..... आई शपत बनतो. आईच्या हातचं खायचे तसं छान नंतर कधीच वाटलं नाही :(

पिझ्झा म्हणशील तर मला वाटतं मलाही "डिप्रेशन" येतं मे बी गिल्टी वाटून असेल. याउलट पालक खाल्ला तर खूप तरतरीत वाटतं. फळांनी लवकर पोट भरतं. फळं बेस्ट. थोडं "रीडींग बिट्वीन द लाइन्स" कर. बेस्ट म्हणजे मूड वगैरे सगळ्या दृष्टीनी.

दहीभातानी शांत वाटतं असा अनुभव आहे खरा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 4:48 am | शिल्पा ब

दहि भात मलाही आवडतो...रात्री झोपताना खाल्ला कि शांत झोप लागते.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

16 May 2010 - 11:03 am | टारझन

हाहाहा ... आमचा मुड जेवायला काय आहे ? त्यावरुन बणतो ... हिरव्या भाज्या असला की मुड एकदम खराब होतो .. चिक्कन-मट्टण-फिष असले की दिलखुष :)

पहा बॉ... पुन्हा शितावरुन भाताची परिक्षा होतेय !! =))

बाकी शिळं खाल्लं की त्रास होणारंच .. कोटे मजबुत करावे ...
आणि तुम्ही म्हणता तसं असेल तर आमच्या इथे रोज सकाळी "माय भाआआआकर" म्हणुन आवाज येतो .. त्यांना लोकं आदल्या दिवशीचं जे असेल ते देतात .. ती लोकं मला दुपारी मस्त ताणुन देताना दिसतत .. णो टेण्शण ! ;)

असो

(कैच्याकै) टारझन

पांथस्थ's picture

17 May 2010 - 12:00 am | पांथस्थ

आणि तुम्ही म्हणता तसं असेल तर आमच्या इथे रोज सकाळी "माय भाआआआकर" म्हणुन आवाज येतो .. त्यांना लोकं आदल्या दिवशीचं जे असेल ते देतात .. ती लोकं मला दुपारी मस्त ताणुन देताना दिसतत .. णो टेण्शण !

रात्रीची उरलेली शिळी खिचडी सकाळी नाश्त्याला खाल्ली कि आपली तर एकदम ब्रम्हानंदी टाळी लागते!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

Pain's picture

19 May 2010 - 12:16 am | Pain

फळांनी लवकर पोट भरतं

फळे काउंटही होत नाहीत. इतर कुठल्याही खाण्यापेक्षा फळे खाल्ल्यानंतर परत भूक लागण्याचा वेळ सगळ्यात कमी आहे.
(कारणः high fiber content, which is good)
आरोग्याला चान्गली म्हणुन फळे खावीत, जेवणाऐवजी नाही.

विकास's picture

16 May 2010 - 3:30 am | विकास

प्रत्यक्ष उत्तर माहीत नाही, पण, गीतेमधील (गीताईतील) खालील ओळी या संदर्भात भारतीय तत्वज्ञानाला काय वाटते ते सांगतातः

आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि । तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥ ७ ॥

सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी । रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥

खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक । दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥

रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे । निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥

- गीताई अध्याय १७

सीडीसीचे हे विश्लेषण करणारे टूल आपला आहार कसा आहे, हे चांगले दाखवते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 4:40 am | शिल्पा ब

गीताईतले श्लोक खूप काही सांगून सांगून जातात...तुमचा प्रतिसाद आवडला...मला ह्या ओळी माहिती नव्हत्या...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अरुण मनोहर's picture

16 May 2010 - 3:50 am | अरुण मनोहर

माझेही असेच मत आहे.
तामस अन्न सतत खाल्याने तामसी विचार येतात.
दीर्घ काळ फक्त तामस अन्नच खाल्ले, तर शरिरावर वाईट परिणाम तर होतीलच, पण वृत्ती मधे तामसीपणा येण्याची शक्यता खूप वाढते.
ह्यावर काही संशोधन झाले असेल, विदा उपलब्ध असेल, तर वाचायला आवडेल.
मिपाचे बहुशृत वाचक कदाचित ह्यावर प्रकाश टाकू शकतील.

शैलेन्द्र's picture

16 May 2010 - 1:51 pm | शैलेन्द्र

असं असतं तर सगळे एस्किमो तामसी आणी सगळे जैन सात्वीक झाले असते. पण (सुदैवाने) असं होत नाही.

(राजस) शैलेंद्र

पांथस्थ's picture

16 May 2010 - 11:02 pm | पांथस्थ

बराबर हाय.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

संदीप चित्रे's picture

18 May 2010 - 5:24 am | संदीप चित्रे

शाकाहारी होता असं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय ;)
चूभूदेघे !

गोगोल's picture

16 May 2010 - 4:42 am | गोगोल

म्हणूनच खूप कांदा पण खाऊ नये...

शैलेन्द्र's picture

17 May 2010 - 11:42 am | शैलेन्द्र

विशीष्ट वेळी कांदा खावु नये म्हणतात, पण त्याचे कारण वेगळे आहे. (खरंतरं त्या विशीष्ट वेळी सात्वीक गुणांची फारशी गरज नसते.)

शुचि's picture

18 May 2010 - 4:48 am | शुचि

मला कळलं :) ..... उशीरा का होईना डोक्यात प्रकाश पडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

18 May 2010 - 5:30 am | पंगा

मला कळलं :) ..... उशीरा का होईना डोक्यात प्रकाश पडला.

अग्दि बळ्बोध अहे नै? =))

- पंडित गागाभट्ट

शैलेन्द्र's picture

18 May 2010 - 6:06 pm | शैलेन्द्र

कळल्याबद्दल धन्यवाद ;-)

संदीप चित्रे's picture

18 May 2010 - 5:28 am | संदीप चित्रे

विशिष्ठ वेळेसाधी कच्चा कांदा जरूर खावा असं म्हणतात ;)
(अधिक माहितीसाठी 'अ‍ॅफ्रोडिझियाक' हा शब्द इंग्लिशमधे टायपून गुगलबाबा झिंदाबाद करून बघावे.)

शुचि's picture

16 May 2010 - 5:11 am | शुचि

सापडलं ग शिल्पा - कंसातलं ज्ञानेश्वरीतलं आहे. बाहेरचा श्लोक गीतेतला.

आयु: सत्त्वबलारोग्यसुख्प्रीतीवर्धना:|
रस्या: स्निग्धा: स्थिरा ह्रिद्या आहारा: सात्विकप्रिया:||
(तरी सत्वगुणाकडे|जे दैवे भोक्ता पडे|तै मधुरी रसी वाढे|मेचु तया||
आंगेचि द्रव्ये सुरसे| जे आंगेचि पदार्थ गोडसे|आंगेचि स्नेहे बहुवसे|सुपक्वे जिये||)

अशा सात्विक आहाराचा परिणाम ज्ञानेश्वर सांगतात -
आंगे साने परीणामे थोरू|जैसे गुरुमुखीचे अक्षरू :)

कटवम्ललवणातुष्णतीक्ष्णरूक्षविदाहीनः|
अहारा राजसास्येष्टा दु:खशोकामयप्रदा:||
(तरी मारे उणे काळकुट|तेणे माने जे कडुवट||का चुनियाहून्ही दासट|आम्ल हन||
कणीकीते जैसे पाणी| तैसेच मीठ बांधया आणि|तेतुलीच मेळवणी|रसांतरांची||)

अशा राजस आहाराचा परीणाम ज्ञानेश्वर सांगतात -
ते आहार नव्हती घेतले|व्याधीव्याळ जे सुतले|ते चेववावया घातले|माजवण पोटी||

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत|
उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तमसंप्रियम||
(निपजले अन्न तैसे| दुपहरी का येरे दिवसे|अतिकरे तै तमसे घेइजे ते||
नातरी अर्ध उकडिले|का निपट करपोनी गेले|तैसेही खाय चुकले|रसां जे ये वो||)

अशा तामस अहाराचा परीणाम ज्ञानेश्वरांनी काय सांगीतलाय नेमका मला कळला नाहीये.

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 7:36 am | शिल्पा ब

बहुतेक करपलेले ,शिळे अन्न तामस असते हा अर्थ असावा...मला संस्कृत वगैरे भाषा काही समजत नाहीत...तुला बरे एवढे जुने संदर्भ सापडले !!! मला माहिती नव्हते अगदी गीता आणि ज्ञानेश्वरीत काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगितले असेल...हेच science सुद्धा सांगते कि शिळे, करपलेले अन्न खाऊ नये...ताजे, रसदार अन्न, फळे खावीत...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

राघव's picture

18 May 2010 - 10:58 pm | राघव

सात्विक-तामस आहार..
माझ्या मते, जर अन्न बनवणारा अन् अन्न खाणारा, या दोघांच्याही मनात जसे विचार असतील तसा वृत्तीवर फरक पडत जातो.
आपल्याकडे एक पद्धत आहे.. जेवण्याआधी अन्नाभोवती पाणी फिरवण्याची. का फिरवायचं असतं असं पाणी? आपल्यातल्या भगवंताला नैवेद्य दाखवून जेवायची ही पद्धत आहे. अन् भगवंताचा प्रसाद हा वाईट कसा असेल? हे सर्व फक्त अन्नाशी नाही तर आपल्या मनातल्या भावांवर अवलंबून आहे.

श्रीरामकृष्ण परमहंसांच्या दोन गोष्टी आहेत -
- एकदा एक व्यापारी त्यांचे दर्शन घ्यायला येतो. येतांना मिठाईचा डब्बा घेऊन येतो. ठाकुर त्याच्याशी जास्त बोलत नाहीत. तो जातांना ती मिठाई त्यांच्यापुढे ठेवतो अन् निघून जातो. तो गेल्यावर ती मिठाई ते स्वतःही खात नाहीत अन् दुसर्‍यांनाही खाऊ देत नाहीत. का? तर म्हणे, "तो व्यापारी इतका स्वार्थी आहे की एक छोटीशी वस्तू देतांनाही हजार इच्छा जोडून देईल. मग ते आपल्या वृत्तींवर परिणाम केल्याशिवाय कसे राहील?"

- एकदा नरेंद्रनाथ मुद्दाम मांसाहार करतात. ठाकुरांकडे ते कळेल याच भावनेने त्यांनी तसे केलेले असते. काही लोक अपेक्षेप्रमाणे जाऊन ठाकुरांपुढे त्याबद्दल गरळ ओकतात. ठाकुर त्यावर म्हणतात - "त्याने काहीही खाल्ले तरी त्याला काही फरक पडणार नाही. तो ध्यानसिद्द योगी आहे. पण तुमच्यापैकी कुणी जर असे केले असते तर मी तुमच्याशी बोलूही शकलो नसतो."

आपल्या मनाची योग्यता कशी, यावर बरेच काही अवलंबून असते. बाकी ज्याचा त्याचा मार्ग.

राघव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जेवण्याआधी अन्नाभोवती पाणी फिरवण्याची. का फिरवायचं असतं असं पाणी?

बहुदा मुंग्या आपल्या पानात शिरू नयेत म्हणून!

अदिती

पंगा's picture

18 May 2010 - 11:27 pm | पंगा

बहुदा मुंग्या आपल्या पानात शिरू नयेत म्हणून!

असेच काहीतरी असावे. नक्की काय ते माहीत नाही, पण भगवंताच्या नैवेद्याशी संबंध नसावा. कारण बर्‍यापैकी व्यावहारिक आणि धर्मनिरपेक्ष असावे.

- पंडित गागाभट्ट

राघव's picture

19 May 2010 - 12:07 am | राघव

तुमचा संदर्भ बरोबर आहे पण पूर्णपणे नाही. चित्राहुतीची संकल्पना ही ईश्वर अन् पंचमहाभूतांना स्मरून आहे. जेव्हा संबंध वृत्तीशी येतो तेव्हा "केवळ" अन्नाचा अन् मुंग्यांचा संदर्भ (बरोबर असला तरीही) असत नाही. अन् तसेही फक्त काय खातो यावर वृत्ती बनत नाही. जर खरोखरच आपण मनातल्या मनात भगवंताला स्मरून, प्रेमाने नैवेद्य दाखवून खाल्ले तर बिघडले कुठे? विचार जसे येतात, जातात - टिकतात, त्यातून वृत्ती बनत जाते. जर चांगले विचार ठेवून याकडे बघीतले तर वृत्ती आपोआपच चांगली बनणार नाही का?

आणि हो, धर्मनिरपेक्ष वगैरे चर्चा इथे नको. ज्यापण धर्माचे असाल त्यात सांगीतलेल्या ईश्वराचे कृतज्ञ भावनेने स्मरण करून जेवू शकतो. नैवेद्यासाठी पाणी फिरवण्याची पद्धत नसली तरीही. स्मरण महत्त्वाचे, भाव महत्त्वाचा.

असो. ज्याचे त्याचे मत.
राघव

पंगा's picture

19 May 2010 - 12:14 am | पंगा

जर खरोखरच आपण मनातल्या मनात भगवंताला स्मरून, प्रेमाने नैवेद्य दाखवून खाल्ले तर बिघडले कुठे?

मी कधी म्हणालो बिघडते म्हणून?

ज्यापण धर्माचे असाल त्यात सांगीतलेल्या ईश्वराचे कृतज्ञ भावनेने स्मरण करून जेवू शकतो.

मग जेवा की! मी अडवलेय का? मी फक्त एवढेच म्हणालो की ताटाभोवती पाणी फिरवण्याच्या प्रथेचा आणि देवाला नैवेद्य दाखवण्याचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. तुम्हाला नसेल तसे वाटत तर राहिले! मामला खतम!

- पंडित गागाभट्ट

Pain's picture

18 May 2010 - 11:56 pm | Pain

मला वाटते ते नैवेद्य दाखवण्यासाठी करतात. पाणी सोडणे हे एखाद्या गोष्टीवरून आपला हक्क सोडण्याचे प्रतीक आहे.

पुर्वी दान देताना उदक सोडायचे (संदर्भः शुक्राचार्य्-झारी गोष्ट)

नितिन थत्ते's picture

16 May 2010 - 8:13 am | नितिन थत्ते

च्या**, मनात तामसी विचार येऊ नयेत असा आग्रह कशाला ते कळत नाही.

>>दहि भात मलाही आवडतो...रात्री झोपताना खाल्ला कि शांत झोप लागते

रात्री दही अजिबात खाऊ नये असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

अवांतरः या थिअरीप्रमाणे अवाजवी सात्विक आहार घेतला की १८ व्या वर्षी संन्यास, २५ व्या वर्षी समाधी वगैरे विचार मनात येत असतील का?

अतिअवांतरः मिसळपाव या संकेतस्थळावर तरी सात्विक आहाराची चर्चा ब्यान असावी का?

अति अति अवांतरः शिल्पा ब आणि शुचि यांनी 'अहो रूपं अहो ध्वनी'चा प्रयोग कमी करावा.

नितिन थत्ते

शुचि's picture

16 May 2010 - 8:32 am | शुचि

'अहो रूपं अहो ध्वनी'चा म्हणजे काय? डोक्यावरून गेलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नितिन थत्ते's picture

16 May 2010 - 8:41 am | नितिन थत्ते

उंट आणि गाढव एकमेकांचे कौतुक करत असतात.
गाढव उंटाला म्हणते "वा:, काय रूप रे तुझे !"
उंट गाढवाला म्हणतो, "वा:, काय आवाज आहे रे तुझा!".

यात तुम्हा दोघींना उंट किंवा गाढव म्हणायचा हेतू नाही. पण तुमचं दोघींचं "काय बै तुला एकेक छान विषय सुचतात गं" वगैरे चाललंय म्हणून जरा वेखंडाची मात्रा दिली.
(आता वेखंडाची मात्रा दिली म्हणजे काय हे विचारू नका).

नितिन थत्ते

पंगा's picture

16 May 2010 - 10:07 am | पंगा

(जहाँ तक याद आता है... फ़रमाया है:)

उष्ट्राणां हि विवाहेषु मन्त्रान् गायन्ति गर्दभाः।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनि:॥

- पंडित गागाभट्ट

Nile's picture

16 May 2010 - 11:34 am | Nile

थत्ते काका पेटले च्यायला! काय खाउन प्रतिसाद दिलात हो?? ;)

बाकी मिपा सद्ध्या जरा जास्तीच बायकी होत चाल्लंय का रे निळ्या? ;)

-Nile

पंगा's picture

16 May 2010 - 11:37 am | पंगा

काय खाउन प्रतिसाद दिलात हो??

दही! ते पण रात च्या टाइमला... (अब चाचा जी की खैर नहीं... =D>)

- पंडित गागाभट्ट

शुचि's picture

16 May 2010 - 4:13 pm | शुचि

शनिवारची पार्टी जोर्दार झालेली दिसतीये. म्हणून तामसिक खाऊ नये फार. ;)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नितिन थत्ते's picture

16 May 2010 - 11:48 pm | नितिन थत्ते

पार्टी शुक्रवारीच झाली होती. :)

नितिन थत्ते

वेताळ's picture

17 May 2010 - 12:05 pm | वेताळ

एकदम सही ;)
वेताळ

पंगा's picture

16 May 2010 - 10:16 am | पंगा

अवांतरः या थिअरीप्रमाणे अवाजवी सात्विक आहार घेतला की १८ व्या वर्षी संन्यास, २५ व्या वर्षी समाधी वगैरे विचार मनात येत असतील का?

यह बात कुछ हज़्म नहीं हुई| काफ़ी सवाल पैदा होते हैं|

किती सात्त्विक आहार म्हणजे "अवाजवी"?

आयुष्यभर केवळ सात्त्विक आहारच खाणार्‍यांची संख्या किती आणि त्यात १८व्या वर्षी संन्यास, २५व्या वर्षी समाधी वगैरे घेणार्‍यांचे, तसे विचार मनात येणार्‍यांचे प्रमाण किती, याचा काही अभ्यास झाला आहे काय? तसा काही विदा आहे काय? :-?

और अगर ऐसी बात है, तो यह सैल्फ़-डिफ़ीटिंग प्रपौज़ल नज़र आता है| क्यों कि कोई अगर सिर्फ़ सात्त्विक ही खानेवाला या वाली हो भी, तो वह २५ साल की उम्र के पहले, बिना शादी-ब्यहे, बिना बच्चे पैदा किये समाधि धारण किए मर जाएगा या जाएगी| तो फिर सिर्फ़ सात्त्विक ही खानेवालों की अगली पीढ़ी कहाँ से पैदा होगी?

और इन की हालत देख कर सिर्फ़ सात्त्विक ही खाने के पीछे कौन दौड़ेगा?

वैसे भारत में सिर्फ़ सात्त्विक ही खाने वालों की, या सिर्फ़ सात्त्विक ही खा पाने वालों की, जनसंख्या फिर भी काफ़ी होगी| कारण कुछ भी हो, भला वह धार्मिक हो, सांस्कृतिक हो या अर्थस्थिति की मजबूरी हो| फिर आप की थियौरी के मुताबिक़ भारत की सदा बढ़ती आबादी का राज़ क्या है?

वैसे भी आप की थियौरी में अगर कुछ दम है, तो फिर तो यह सात्त्विक आहार नाम की चीज़ भारत की बढ़ती आबादी की समस्या के हल के हिसाब से अच्छी बात माननी चाहिए, और आम तौर पर इस का प्रचार करना चाहिए| ज्यादातर जनता अगर सिर्फ़ सात्त्विक आहार ही खाएगी, तो, जैसा कि पहले ऊपर दिखाया जा चुका है, २५ साल की उम्र के पहले ही बिना ब्यहे, बिना अगली पीढ़ी पैदा किए समाधि पाएगी, यानी कि मर जाएगी, तो बढ़ती जनसंख्या की समस्या अपने आप ही काबू में आ जाएगी| इसे तो एक तरह का "नैचरल बर्थ कंट्रौल" या "नैचरल पाप्युलेशन कंट्रौल" का तरीका मानना चाहिए, और परिवार कल्याण मंत्रालय को इस तरीके की सिफ़ारिश करनी चाहिए|

अति अति अवांतरः शिल्पा ब आणि शुचि यांनी 'अहो रूपं अहो ध्वनी'चा प्रयोग कमी करावा.

भाऊसाहेब, जरा सांभाळून! इस का "इम्प्लाइड़" मतलब बहुत खतरनाक है| कोणाच्या ध्यानात आला तर पंगा होऊन जाईल आहे. =))

अतिअवांतरः मिसळपाव या संकेतस्थळावर तरी सात्विक आहाराची चर्चा ब्यान असावी का?

क्यों भाई? यहाँ की इमर्जैन्सी उठ गयी ऐसा कुछ सुना था हम ने? :O

आणि अशा अफलातून (कुटुंब)कल्याणकारी योजनेवर बैन काय म्हणून? :-?

च्या**, मनात तामसी विचार येऊ नयेत असा आग्रह कशाला ते कळत नाही.

और फिर भारत की बढ़ती जनसंख्या का क्या करोगे, भाईसाहब? क्या आप अपने देश की भलाई नहीं चाहते? ("पैट्रियटिज़्म इज़ दी लास्ट रेफ़्यूज आफ़ ऐ स्कौंड्रल" - सैम्युएल जानसन| ;-) )

रात्री दही अजिबात खाऊ नये असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

आपण बेलाशक खाऊ शकता, भाऊसाहेब, ते आयुर्वेद, हौमियोपैदी वगैरह मानलेच पाहिजे असा कोणता कायदा नाही आहे. ;-)

वैसे भी रात को दही खाने से अगर आप को कुछ नहीं हुआ तो उस में आप का कोई नुकसान नहीं है, और अगर आप को कुछ हुआ तो उस में हमारा कोई नुकसान नहीं है| दोन्ही बाजूंहून विन-विन सिचुऐशन! =))

मग पाहणार करून प्रयोग? :D

- पंडित गागाभट्ट

टारझन's picture

16 May 2010 - 11:08 am | टारझन

तुम्ही " ~ पंडित गागाभट्ट" अशी सहि करत जा =))

~ पाचुंदा
एक तामसी आहार

पंगा's picture

16 May 2010 - 11:11 am | पंगा

यह "~" क्या होता है, गुरु? :?

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 11:23 am | शिल्पा ब

हे हिंदी पिल्लू इथे कशाला आलय ? लिहायचं तर मराठी लिहा नाहीतर फुटा....हि मराठी site आहे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

17 May 2010 - 12:01 pm | शैलेन्द्र

मालकांनी हा चार्ज तुम्हांला दीला का?

आनी हे वाक्य अस नुसत न लिहिता त्याबरोबर एक फोटो टाकायचा असतो ना?

टारझन's picture

17 May 2010 - 12:35 pm | टारझन

हे हिंदी पिल्लू इथे कशाला आलय ? लिहायचं तर मराठी लिहा नाहीतर फुटा....हि मराठी site आहे...

=)) =)) =)) इथे हिंदीच काय , इंग्रजी देखील पिल्लु आहे ... ते लिहीतंही नाहीत .. आणि फुटतंही नाहीत :)

~ केवडा

झिन्ग's picture

17 May 2010 - 5:07 pm | झिन्ग

>>इथे हिंदीच काय , इंग्रजी देखील पिल्लु आहे ... ते लिहीतंही नाहीत .. आणि फुटतंही नाहीत

लय जबरा हाणलाय.

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 9:41 pm | शिल्पा ब

टारोबा तुम्ही फारच ताणता बुवा .... :)) :D

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रभो's picture

17 May 2010 - 10:43 pm | प्रभो

>>टारोबा तुम्ही फारच ताणता बुवा ...

जास्त ताणू नका हो...तुटेल बरंका...

शैलेन्द्र's picture

18 May 2010 - 6:09 pm | शैलेन्द्र

ते हंसाच पील्लु आहे (असं त्याला वाटतं)

विकास's picture

16 May 2010 - 10:15 am | विकास

या थिअरीप्रमाणे अवाजवी सात्विक आहार घेतला की १८ व्या वर्षी संन्यास, २५ व्या वर्षी समाधी वगैरे विचार मनात येत असतील का?

सात्विक व्यक्ती म्हणजे संन्यासी हे कुठे लिहीले आहे? चला आता तुमची या संदर्भात शिकवणी घेणे गरजेचे आहे असे दिसते ;)

मिसळपाव या संकेतस्थळावर तरी सात्विक आहाराची चर्चा ब्यान असावी का?

जर तुमचे "अवांतर" गृहीतकाच्या सम्दर्भात हे विधान असेल तर, अजिबात नाही. ऑलरेडी अनेकांना आता संन्यास घ्याव्यासा वाटू लागला आहे. आणि ते देखील सात्विक आहार न घेता. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नितिन थत्ते's picture

16 May 2010 - 11:57 pm | नितिन थत्ते

>>तुमची या संदर्भात शिकवणी घेणे गरजेचे आहे
मेलो. आता पाच पानी सात्विक प्रतिसाद खावा लागणार.

मिसळपाववर सात्विक आहाराची चर्चा......
इथे झणझणित, मासालेदार, तेलकट वगैरे पदार्थ खाणे कसे वाईट हे सांगितले जात आहे. आता या सर्वगुणांनी संपन्न असणार्‍या पदार्थाचे नाव ज्या संकेतस्थळाला दिले आहे त्या स्थळावर तरी सात्विक आहाराचे जास्त गुणगान नसावे असे वाटते.

नितिन थत्ते

टारझन's picture

17 May 2010 - 12:13 am | टारझन

>>> मेलो. आता पाच पानी सात्विक प्रतिसाद खावा लागणार.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) आगायायायायायायायाया !!
=)) थत्ते चचा फुल्ल्ल फॉर्मात
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

इकासराव .. किमान १० पाणी सात्विक प्रतिसादाशिवाय सोडु नका थत्त्यांना =))

(पेक्षक) टी

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 9:44 am | शिल्पा ब

"काय बै तुला एकेक छान विषय सुचतात गं" वगैरे चाललंय म्हणून जरा वेखंडाची मात्रा दिली.
बरं म्हंटल असं तर काय बिघडतंय? आणि काय असं मांडू नये तो विषय मांडला मी? तुम्ही एखादा रोजच्या व्यवहारात उपयोगी येईल असं विषय मांडा...नसेल सुचत तर इथे त्यानुषंगाने प्रतिसाद द्या...म्हणींसाठी हवं तर वेगळा धागा उघडू....हवं तर तुम्ही उघडा म्हणींचा धागा...आणि आयुर्वेद काय म्हणतेय हे सगळ्यांना माहिती असतं तर कशाला असे धागे उघडावे लागले असते?

अवांतर : थत्ते साहेब, तुम्ही कोण आहात हे बघायला तुमचे profile बघितले त्यातील आजच्या पिढीला अमुक लेखक माहिती नसतील वगैरे वाचले त्यावरून तुम्ही बरेच senior असावे असे वाटते....तर तुमचे ज्ञान जरा आमच्याबरोबर share करा...मी लहान मुलांना खर्च आटोक्यात ठेवण्याविषयी धागा उघडलंय इथे तुमचे अनुभव कळवा जेणेकरून आम्हाला फायदा होईल...कसें ?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शिशिर's picture

16 May 2010 - 9:45 am | शिशिर

संस्कृत श्लोक...........

उष्ट्रानां विवाहेषु गीत गायंती गर्दभं,
परस्परं प्रशन्सयती, अहो रुपं, अहो ध्वनी.

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 9:49 am | शिल्पा ब

मूळ विषयाला सोडून कोणी इतरच काही बोलायला लागले कि एक मराठी म्हण आहे.."कोणाला कश्याच आणि बोडकीला केसाचं"....इथे मी कोणाला बोडकी म्हंटलेले नाही हे लक्षात घ्यावे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

16 May 2010 - 10:12 am | पंगा

बोडकीला केसाचं

"बोडकी" बोले तो केशवपन हुई विधवा होती है, नहीं?

इथे मी कोणाला बोडकी म्हंटलेले नाही हे लक्षात घ्यावे...

म्हणायला पण नाही पाहिजे. मज़ाक मे भी नहीं और रूपक के तौर पे भी नहीं| एकदम ग़लत बात आहे ही!

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 10:52 am | शिल्पा ब

आम्ही कोणाला काय प्रतुत्तर द्यायचे ते प्रतिसादावर अवलंबून आहे...

**************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

16 May 2010 - 11:07 am | पंगा

यह "प्रतुत्तर" किस चीज़ का नाम है भाई?

आम्ही समजतो त्याचे अनुसार "प्रत" बोलले तर ती "कौपी" असते. मग प्रतुत्तर बोलले तर काय, "कौपीकैट रिस्पौन्स"?

बोलले तर कोणाची कौपी मारून उत्तर?

- पंडित गागाभट्ट

हे एखादा धागा काढण ठीक आहे, तेवढाच आमचा रिकामा वेळ जातो वाचण्यात आणि विचार करण्यात. पण एकमेकांची पाठच त्या निमीत्ताने खाजवायची असेल तर व्यनि आहेतच. ती सोय तुम्हाला संपादकानी दिली नसेल तर इतर चॅट च्या sites आहेत. अशा गोष्टीना पक्षी धाग्याना intelectual चे धागे म्हणतात.

नितिन थत्ते's picture

18 May 2010 - 8:41 am | नितिन थत्ते

चला आता विषयाला धरून लिहितो.

गीताईतल्या वर उद्धृत केलेल्या वचनांप्रमाणे तामसी आहार म्हणून फक्त शिळ्या, नासलेल्या अन्नाचा उल्लेख केला आहे.

पण इथे आपण ज्या मसालेदार, तेलकट जंकफूडचा उल्लेख करतो आहोत तो तर राजस आहार आहे. या राजस आहारालाच इथे तामसी म्हटले जात आहे (Anything that is not saatvik is taamasi) आणि हा 'राजस' आहार केल्याने मनात 'तामसी' विचार येतात असे काहीसे आपण म्हणत आहोत.

राजस आहार केल्याने काय तोटे होतात ते बहुधा कुठे सांगितलेले नाही. आधुनिक काळात हे तोटे सांगितले जात आहेत डॉक्टर वगैरे लोकांकडून.

नितिन थत्ते

विकास's picture

18 May 2010 - 9:04 am | विकास

या राजस आहारालाच इथे तामसी म्हटले जात आहे (Anything that is not saatvik is taamasi) आणि हा 'राजस' आहार केल्याने मनात 'तामसी' विचार येतात असे काहीसे आपण म्हणत आहोत.

ते अर्थातच बरोबर नाही.

राजस आहार केल्याने काय तोटे होतात ते बहुधा कुठे सांगितलेले नाही.

खालील ओळीत (अधोरेखीत) थोडेफार उत्तर येते का?

खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक । दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥९॥

अर्थात मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे केवळ गीतेत (तत्वज्ञान म्हणून) आहे म्हणून मान्य करण्याची गरज नाही. पण यात तथ्य असावे असे वाटते.

मात्र खाण्यावरून स्वभावाच्या भारतीय तत्वज्ञानाच्या (सत्व-रज-तम) व्याख्यांवर जायचे कारण नाही. कारण खाणे हा एक भाग आहे, ज्याचा स्वभावावर परीणाम पडू शकतो. पण ते एकच कारण नाही...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Pain's picture

16 May 2010 - 11:09 am | Pain

आपल्या शरीरातील ९८% (approx.) अणु एका वर्षात बदलले जातात. म्हणजे आपण जे खातो ते actually आपण बनतो.

अन्न आणि ते खाउन होणारा मूड यांचा काहिही सम्बन्ध नाही.
सन्तुलित आहार आणि स्वच्छतेची काळजी घेतली की झाले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 May 2010 - 8:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अणू का पेशी? ७०% बदलले तर फार फरक पडेल का हो?

अदिती

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 9:22 pm | शिल्पा ब

शरीरातल्या पेशी सतत बदलत असतात हे सत्य आहे...पण वरील विधानाबाबत काही माहिती नाही...आणि अणु बदलणे म्हणजे नक्की काय हेसुद्धा कळले नाही...l

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

17 May 2010 - 12:07 am | Pain

कुठ्ल्याही doctor* ला विचारा आणि खात्री करा.

Pain's picture

17 May 2010 - 12:04 am | Pain

पेशी, खरेतर उती. पण त्या अणु/ रेणूनी (molecules) बनलेल्या असल्याने कुठलाही शब्द चालेल.
आणि बदलतात म्हणजे पहिल्या नष्ट होतात आणि दुसर्या* त्यांची जागा घेतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त ७०% प्रक्रिया पुर्ण झाल्यास ती व्यक्ती जगणार नाही.

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 11:37 am | शिल्पा ब

आपल्या शरीरातील ९८% (approx.) अणु एका वर्षात बदलले जातात. म्हणजे आपण जे खातो ते actually आपण बनतो.

पेशी, खरेतर उती. पण त्या अणु/ रेणूनी (molecules) बनलेल्या असल्याने कुठलाही शब्द चालेल.
आणि बदलतात म्हणजे पहिल्या नष्ट होतात आणि दुसर्या* त्यांची जागा घेतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त ७०% प्रक्रिया पुर्ण झाल्यास ती व्यक्ती जगणार नाही.

वाह !!! ७० % पूर्ण झाले तर माणूस जगणार नाही पण ९० % अणु एका वर्षात बदलले जातात...
..आपण काय लिहितोय याचे तरी भान ठेवायचे?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

"...फक्त ७०% प्रक्रिया पुर्ण झाल्यास ती व्यक्ती जगणार नाही...."

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

Pain's picture

17 May 2010 - 12:37 pm | Pain

वाह !!! ७० % पूर्ण झाले तर माणूस जगणार नाही पण ९० % अणु एका वर्षात बदलले जातात...
..आपण काय लिहितोय याचे तरी भान ठेवायचे?

तुम्ही गोन्धळ करत आहात. ७० आणि ९० हे आकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांचे आहेत. (उद. ७० पेरु आणि १०० आंबे!)

नीट पहा, शरीरातील एकूण अणू/पेशी या पैकी ९८% झिजतात्/ मरतात.
त्या ९८% पैकि १००% पेशी बदलल्या गेल्या पाहिजेत. (त्यांची जागा घेणार्या* नवीन निर्माण झाल्या पाहिजेत)
आता ही ९८% पेशी बदलण्याची प्रक्रिया अदिती म्हणतात त्याप्रमणे फक्त ७०% पुर्ण झाली, तर त्या माणसाच्या शरीरात [२%+९८% मधील ७०% = ०.०२+०.७*०.९८=०.७०६,] म्हणजे ७०.६% च पेशी राहतील. असा बिचारा माणूस कसे जगणार ?

ही प्रक्रिया कायम चालु असते. अचानक ३१ डिसेंबरला नाही :)) वेगवेगळ्या पेशींचे आयुर्मान आणि काम निरनिराळे असते.

मनीषा's picture

16 May 2010 - 11:56 am | मनीषा

नेहमी नेहमी सात्वीक आहार खाणारे पण अती तामसी आचार, विचार असणारे लोक मला माहिती आहेत....

पिझ्झा खाल्ल्याने मला अजिबात डिप्रेशन येत नाही (शिल्पाताई चिवडा, ढोकळा, फरसाण,शेव, सामोसे हे सात्विक का तामसी ? )

मला वाटतं जर वृत्ती समाधानी, आनंदी असेल , अहंकार अथवा द्वेषभावना मनामधे नसेल तर कुठलेही अन्न हे पूर्णब्रम्ह असते.

शिल्पा ब's picture

16 May 2010 - 9:25 pm | शिल्पा ब

फरसाण वगैरे आपण फार फार तर एक मुठ खातो...त्यामुळे विशेष बदल होण्याची शक्यता वाटत नाही...फार फार तर पोटात उष्ण वाटते...त्यावर दुध प्याले कि झाले...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

17 May 2010 - 10:54 pm | पंगा

फरसाण वगैरे आपण फार फार तर एक मुठ खातो...त्यामुळे विशेष बदल होण्याची शक्यता वाटत नाही...फार फार तर पोटात उष्ण वाटते...

काही पण! ते मिक्श्चर वगैरह - क्या बोलते हैं... हाँ, फरसाण - आम्ही बचपनापासून बसले बैठकीला डिब्ब्याचे हिसाबानी खात आलो आहोत. तंग येऊन आमची माताजींवर डिब्बा छिपवण्याची बारी यायची, पण आम्हास उष्ण वगैरह वाटलेची याद नाही.

त्यावर दुध प्याले कि झाले...

दूध की और अपनी कभी जमी नहीं लेकिन... आम्ही दूध प्यायले की गैस, बदहज़्मी, उल्टी की भावना वगैरह पकडलीच ही गैरंटी! उम्र गुज़र गयी उस पर क़ाबू पाते हुए| (मतलब दूध नक्की सात्त्विक की तामसी?)

- पंडित गागाभट्ट

Pain's picture

18 May 2010 - 8:47 am | Pain

दूध की और अपनी कभी जमी नहीं लेकिन... आम्ही दूध प्यायले की गैस, बदहज़्मी, उल्टी की भावना

lactose intolerance ?

पंगा's picture

18 May 2010 - 9:03 am | पंगा

Short of discussing my symptoms and my medical history in the minutest possible detail so deeply interesting to the public at large, असू शकेल. पण Lactose intolerance बोले तो फक्त दुधाने का आणि आइस्क्रीमने का नाही, हे कळत नाही.

- पंडित गागाभट्ट

Pain's picture

19 May 2010 - 12:04 am | Pain

मलाही याचे कारण माहित नाही. तुमच्या आधीच्या प्रतिसादावरुन तसा तर्क केला.

पांथस्थ's picture

16 May 2010 - 11:58 pm | पांथस्थ

मला वाटतं जर वृत्ती समाधानी, आनंदी असेल , अहंकार अथवा द्वेषभावना मनामधे नसेल तर कुठलेही अन्न हे पूर्णब्रम्ह असते.

अतिशय योग्य बोललात.

याबाबत माझा अनुभव सांगतो. मी गेल्या वर्षाभरापासुन शुध्द शाकाहाराकडे वळलो आहे (वर्ष पुर्ण व्हायला अजुन ६ दिवस बाकी आहेत, असो). यातले सुरवातीचे काहि महिने (साधारणपणे ५) मी कांदा,लसुण देखील सोडुन दिला होता. शाकाहाराकडे वळण्याआधी मी शुद्ध मांसाहारी होतो. आठवड्यातले जास्तीत जास्त दिवस दोन्ही वेळ मांसाहार करण्याकडे माझा भर असायचा :)

गेल्या वर्षाभराचा आढावा घेतला तर माझ्या मनात सात्विक भावाची काही वाढ झाली आहे असे मी (आणि माझ्या जवळच्या परीचयातली लोकं) तरि नाही म्हणु शकत.

जन्मापासुन शाकाहारी असलेली अनेक तामसी लोकं माझ्या परीचयाची आहेत. त्याचप्रमाणे मांसाहार करणारी अनेक सात्विक लोकही मी पाहिलेली आहेत. तेव्हा मनीषा यांनी म्हटल्याप्रमाणे सगळे मनाच्या संस्कारांचे खेळ आहेत.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

Pain's picture

17 May 2010 - 12:15 am | Pain

अगदी बरोबर.

अन्न हे पुर्णब्रम्ह. त्याला नावे ठेवू नयेत. आपल्या डोक्यातल्या केमिकल लोच्याचे खापर अन्नावर का फोडतात देव जाणे.
कधी ट्रेकला जा, उपास पडल्याशिवाय अन्न/ पाण्याची किंमत कळणार नाही.

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 11:14 am | शिल्पा ब

नावं कोण ठेवतंय? प्रत्येक गोष्टीचे काही चांगले वाईट परिणाम असतात...पण हे डोक्यात केमिकल लोच्या असणार्यांना काही कळणार नाही...

अवांतर...दर शनिवार रविवार hiking ला जायची आमची सवय आहे....
स्वगत : अन्न पाण्याची किंमत सांगणार हे कोण टिकोजीराव....विषय काय...बोलतायेत काय? वरती दिलेले श्लोक वाचायचे कष्ट कशाला घेतील तर ना? तेसुद्धा न कळायला यांच्या डोक्यातला केमिकल लोच्याच कारणीभूत दिसतोय?


***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

17 May 2010 - 11:55 am | शैलेन्द्र

"नावं कोण ठेवतंय? प्रत्येक गोष्टीचे काही चांगले वाईट परिणाम असतात..."

जरुर असतात, पण शाकाहारी सात्वीक आहार म्हणजे सात्विक वृत्ती व तामसी आहार म्हणजे तामसीपणा इतकं सरळ गणित नाही आहे.

(मटन व पुरण्पोळी खाल्यावर सारखाच जड्पणा अनुभवनारा) शैलेन्द्र.

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 12:10 pm | शिल्पा ब

वरचा विकास यांचा प्रतिसाद वाचवा...शिळे, उष्टे ( आणि आताच्या काळातील greasy : हे माझे मत ) तामसप्रिय जेवण असे म्हंटले आहे...म्हणजेच रोज ताजे, रसदार अन्न खावे...चित्त प्रसन्न राहते...हासुद्धा माझा अनुभव.... फळ, भाज्या खाल्ल्याने शरीर व्यवस्थित काम करते...म्हणजे पोट,हृदय..डॉक्टरला विचारावे...मांसाहार कधी कधी ठीक आहे..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

17 May 2010 - 1:09 pm | शैलेन्द्र

कोणत्याही गोष्टीच अस जनरलायझेशन नसतं, काय खाणे चांगले, हे मुख्यत: तेथील हवामानावर ठरते. साधा सोपा उपाय म्हणजे "स्थानीक" पदार्थ खावेत. ध्रुवावर राहनारे एस्कीमो ९९% मांस खातात, आणी तो पृथ्वीवरील एक दिर्घायु वंश आहे. त्यांनी फळ्/भाज्या खाल्ल्या तर त्यांची आइसकँडी होइल. किंबहुना, वेगवेगळ्या हवामानात राहणारे लोक काय खातात हे पाहणे धक्कादायक असते, जसे नागपुर, सोलापुर, हैद्राबाद या अतीउष्ण प्रदेशातील लोक अती-तीखट पदार्थ खातात, जे शास्त्राप्रमाने चुकीच आहे. पण त्या लोकांना त्याचा काही त्रास होतो असं जाणवत नाही.

थोडक्यात, चांगला आणी वाईट आहार हा स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष असतो. अन्न हे पुर्णब्रम्ह आहे, ते कधीही वाइट नसते.(डीस्क्लेमर- जर ते वाइट असेल तर आमचे अन्न नसते.)

पंगा's picture

17 May 2010 - 10:58 pm | पंगा

म्हणजेच रोज ताजे, रसदार अन्न खावे...

पुरणपोळी ताजीहून कितीतरी गुना शिळी अच्छी लागते हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे काय? (पुरणपोळी सात्त्विक की तामसी?)

- पंडित गागाभट्ट

पंगा's picture

17 May 2010 - 10:40 pm | पंगा

मांसाहार कधी कधी ठीक आहे..

कधी कधी म्हणजे नेमका कधी कधी? वीकली / मंथली कोटा कितना? त्याचे परमिट / राशन कार्ड वगैरह साठी कोठे अर्ज़ी करणे लागेल?

- पंडित गागाभट्ट

शिळे, उष्टे ( आणि आताच्या काळातील greasy : हे माझे मत ) तामसप्रिय जेवण असे म्हंटले आहे...

ते खूप सारे लोक रातचा बासी चावल या रोटी या डबल रोटी (ब्रैड)चे सकाळीसकाळी फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह बनवून खातात, ते सारे तामसी? (ताज़ा बासमती चावलचे फोडणी भात कोणी बनवते काय?)

वैसे आम्हाला पण हे फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह खूप आवडते. खास करून दहीबरोबर... मतलब आम्ही तामसी. गर्व से कहो...

- पंडित गागाभट्ट

Pain's picture

17 May 2010 - 12:48 pm | Pain

सल्ला कधी दिला ? आणि hiking नाही, मला वेगळेच सांगायचे होते पण तो दुसरा विषय होइल. १ मिनिट, ते खोडतो.

च्यायला फक्त त्याच प्रतिसादावर संपादनाची सुविधा नाहीये! अस कस ?
जाउदे.
आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते

हा वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे प्लेसिबो इफेक्ट आहे. अन्न आणि आरोग्य यांचा सम्बन्ध असतो, व्रुत्तीचा नाही.

पंगा's picture

17 May 2010 - 10:26 pm | पंगा

कधी ट्रेकला जा

= 'Go take a hike'??? ;)

- पंडित गागाभट्ट

तिमा's picture

16 May 2010 - 12:24 pm | तिमा

धागा कसाही असू दे, पण प्रतिसाद भरकटू नयेत अशी विनंती. तसेच मराठीचा जास्तीत् जास्त वापर व्हावा ही अपेक्षा. मधेच दुसरी भाषा वाचायला खटकते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भारद्वाज's picture

16 May 2010 - 3:46 pm | भारद्वाज

उगाच 'पंगा' सुरू करतात काही लोक 8}
बाकी अन्नावर स्वभाव अवलंबून असतोच शिवाय आजूबाजूची परीस्थितीही आपला प्रभाव पाडत असतेच. किंबहुना परीस्थितीच जास्त परिणामकारक असते असे माझे मत आहे.
उदा. शाकाहारी हिटलर-क्रूरकर्मा
जय महाराष्ट्र

पाषाणभेद's picture

16 May 2010 - 11:43 pm | पाषाणभेद

या पंग्याला मी मागे दोन तीन वेळा "मराठीत लिही", "मराठीत लिही" असे बजावले होते. त्या बेट्याला मराठी लिहीलेले समजते. त्याचा प्रतिसादही तो हिंदीत अनूषंगीक देतो. येथील मराठी अन हिंदी टाईप करण्याची पद्धत एकच असतांना तो हिंदीतच का लिहीतो ते समजत नाही. संपादकांनी मनावर घेणे. नाहीतर मला लॉगईन आय डी द्या. मी उडवतो ते हिंदाळलेले प्रतिसाद.

हिंदी च्या भरपूर साईटी आहेत. जा तिकडे म्हणावं.

पंगा भाऊ, काय रे? तुला समजत नाही का रे? क्या हिंदी में बोलू की, यहाँ मराठी में लिखीए, भाई| यह मराठी संकेतस्थल है|
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

विकास's picture

18 May 2010 - 4:36 am | विकास

मिपावर मराठीत लिहीणेच योग्य आहे. एखाद्यावेळेस संदर्भ देताना, तो प्रत्यक्ष संदर्भ, हिंदी, इंग्रजी मधे दिला तर समजू शकते पण प्रतिसादच्या प्रतिसाद हिंदी/इंग्रजीत देऊ नये हे योग्य.

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. असे या संकेतस्थळाच्या स्वगृहावर लिहीलेले आहे ते याच साठी. :)

बाकी प्रत्येकाचे विचार एकमेकांशी जुळले पाहीजेत अशातला भाग नाही. त्यातून थोडीफार मस्करी होणे पण समजू शकते. एका अर्थाने तो मिपाचा स्वभावधर्मच आहे पण मस्करीची कुस्करी होणार नाहीना याची देखील काळजी घ्यावी. संपादकांनी ती नंतर, घेण्यापेक्षा सभासदांनी लिहीतानाच ती घेतली तर उत्तम! ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पंगा's picture

18 May 2010 - 5:23 am | पंगा

मिपावर मराठीत लिहीणेच योग्य आहे. एखाद्यावेळेस संदर्भ देताना, तो प्रत्यक्ष संदर्भ, हिंदी, इंग्रजी मधे दिला तर समजू शकते पण प्रतिसादच्या प्रतिसाद हिंदी/इंग्रजीत देऊ नये हे योग्य.

ठीक आहे सरजी. खालील प्रतिसादांतल्या / लेखांतल्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषेत यापुढे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेण्यात येतील. काळजी नसावी.

http://www.misalpav.com/node/12235#comment-193286
http://www.misalpav.com/node/12337#comment-195309
http://www.misalpav.com/node/11039#comment-177068 (या प्रतिसादातल्याप्रमाणे व्याकरणाचे नियम पाळण्याची विशेष खबरदारी घेतली जाईल.)
http://www.misalpav.com/node/11661 (हा धागा काही मराठीत नसावा, जवळजवळ आख्खा लेख उर्दूत आहे अशी शंका येते. तसे असेल तरी उर्दू शेरोशायरीबद्दल आहे म्हणून बहुतेक खपून जाईल. मात्र मराठीत असेल तर तशी मराठी लिहिण्याची यापुढे कल्जि घेत्लि जैल. खत्रि बल्गवि.)

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.

'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी' बोले तो 'फक्त अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी'? आणि 'अस्सल मराठी' बोले तो?

'शुद्धलेखन फाट्यावर मारणे' = अस्सल मराठी? 'कल्जि घेने' = अस्सल मराठी? 'मोकलाया दाहि दिशा' = अस्सल मराठी? वरच्या लेखांमधली / प्रतिसादांमधली भाषा अस्सल मराठी? मग खालिस हिंदी काय वाईट?

आणि कोणी चांगल्या हिंदीत लिहिले तर तो एकदम भय्या? मराठी माणूस चांगली हिंदी लिहू/समजू शकतच नाही याबद्दल ठाम 'आत्मविश्वास', हं? =))

पण पंगा घ्यायला जाम मजा आली हां! ;)

- पंडित गागाभट्ट

विकास's picture

18 May 2010 - 6:40 am | विकास

ठीक आहे सरजी. खालील प्रतिसादांतल्या / लेखांतल्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषेत यापुढे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेण्यात येतील.

धन्यवाद :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पंगा's picture

18 May 2010 - 8:34 am | पंगा

वर दिलेल्या प्रतिसादांतली / लेखांतली भाषा ही 'प्रमाण मराठी' आहे याची खातरजमा करून दिल्याबद्दल (कन्फ़र्म केल्याबद्दल) तुम्हालाही धन्यवाद!

यापुढे अशाच 'प्रमाण मराठी'त प्रतिसाद लिहिण्याचे प्रयत्न केले जातील. (म्हणजे आधी याहून नेमके वेगळे काय करत होतो? :?)

- (खुंटा हलवून बळकट्ट) पंडित गागाभट्ट

पंगा's picture

18 May 2010 - 5:40 am | पंगा

('सवाल' हा शब्द मराठीत चालून जाईल, नै?)

मस्करीची कुस्करी होणार नाहीना याची देखील काळजी घ्यावी.

'फाटकी हिंदी भाषा', 'एकमेकांचे मुके घेत खपणे' वगैरे वगैरे ही मस्करी, की कुस्करी? :?

- पंडित गागाभट्ट

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 4:29 pm | इन्द्र्राज पवार

"....रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात....

आपल्या लेखातील हा एक मुद्दा बराचसा पटण्यासारखा आहे. मन ताजे राखण्यासाठी आईने केलेली एक गरम गरम भाकरी, भरपूर कांदा घातलेला झुणका, साथीला घट्ट दह्याची वाटी... इतके जरी असले तरी माझा दिवस अत्यंत उत्साहात जातो. (मी दुपारच्या भोजनात भात घेत नाही... )... आता हे आईने ताजे ताजे करून दिले म्हणून मला उत्साह आला कि त्या पदार्थांचाच स्थायी भाव आहे याबद्दल दुमत होऊ शकेल, पण हेही तितकेच खरे कि इतकेच जर खायचे असेल तर ते 'ताजे' का असू नये असेही वाटते. तुम्ही म्हणता तसा पिझ्झा प्रकार इकडे कोल्हापुरातही बराचसा बोकाळला आहे, आणि ती खाणारी मंडळी देखील.

"....दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले..."

याला कारण आदले दिवशीचा पिझ्झाच असेल तर तुमचा मुद्दा नक्कीच विचार करण्याजोगा आहे. पण डिप्रेशन हे अन्य पदार्थ खाल्लामुळेदेखील येते. मी तर एकदा वास्तुशांती कार्यक्रमाला गेलो असता तिथे तर जिलेबी मसालेभाताचे चमचमीत जेवण होते. पण तिथून आल्यानंतर का कोण जाणे उरलेला दिवस मला अतिशय डीप्रेसिव्ह गेला, त्याला कारण म्हणजे आमचाही प्लॉट त्या एरीयातच आहे.... आणि ज्याने आता बंगला बांधला त्याचा शेजार आम्हाला नको आहे. जागा चांगली, पण आता आमच्या नजरेत त्याची किंमत शून्य. कदाचित यामुळेदेखील इतके चांगले अन्न खाऊनदेखिल उदासिनता आली असेल. थोडक्यात विविध कारण मीमांसा असू शकतात. (अती आहार हे देखील एक कारण आहे....)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"