२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

स्वानन्द's picture
स्वानन्द in जनातलं, मनातलं
11 Dec 2009 - 12:57 am

नमस्कार मित्रहो,

आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो.

तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला. आणि दुसरीकडून लिमकाची छोटी बाटली. अडकलेल्या कामावर विचार करता करता सहज म्हणून बाटली वर लिहिलेल्या किमती कडे लक्ष गेलं. ८/-.
आरामात वडापाव आणि लिमका चा आस्वाद घेऊन मी पैसे देण्यासाठी तपरीवाल्याकडे गेलो. ५० रु ची नोट दिली. त्याने चाळीस रुपये परत दिले. मी २-३ सेकंद तसाच उभा राहिलो तो २ रुपयाचं नाणं देईल म्हणून. पण माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहायला लागला. दोन रुपयांची मागणी केल्यावर म्हणाला १० रु. किम्मत आहे. संवाद काहीसा असा.
मी : दोन रुपये?
तो : हो गया ना बराबर.
मी : किती ला आहे?
तो : १० को हे.
मी : कहाँ? ८ को है...
तो: उस पे लिखा है ना...
मी : बाटली दाखवून ... कितना लिखा है?
तो : हॉं ...तो ठंडा करने का २ रुपया एक्स्ट्रा होता है.
मी: (परत तोच प्रसंग रीपीट होतोय हे जाणवून...) ऐसा कुछ होता नही है...ये सब मिलाके ही कंपनी किमत तय करती है. वैसे भी तूने तो ठंडा भी नही दिया था..
तो : तो क्या हुवा... ये सब साफ रखने का वगैरा होता है ना...और इतना है, तो पहले कीमत पूछा करो और फिर लेना है तो लो
मी : वो तो मै अगली बार करुंगा ही...अभी २ रुपया दे
तो : ( काही उत्तर न देता दुसरीकडे बघत राहतो )
मी : एक काम कर... २ सेंटर फ्रेश दे दे...
तो : लेकीन उसमेसे नही होगा...अलग २ रुपये देने होंगे
मी : दे तो सही...
तो देतो. मी तिथेच उभा राहून एक सेंटर फ्रेश खातो आणि तिथून सावकाश निघून जातो. तो मागे ओरडत राहतो. मी लक्ष देत नाही. अंगाला हात लावलाच तर आपण ही दोन लावून द्यायच्या तयारीत राहून चालत राहतो.

प्रसंग इथेच संपला. पण पुढचा बराच वेळ चालू राहीलं ते विचारांच चक्र.
खरंच एवढं करायची गरज होती का? दोन रुपयांसाठी?
पण मग आपणच एकीकडे तत्त्वाच्या गोष्टी करतो... आणि मग जेव्हा प्रत्यक्ष काही करायची वेळ येते तेव्हा मग मागे का हटायचं?
( पण १०० गोष्टी बोलणं आणि त्यातली किमान एक्क गोष्ट प्रत्याक्षात करून दाखवणं यात अक्षरशः जमीन -अस्मानाचा फरक आहे हे मात्र जाणवलं. प्रत्यक्षात असा विरोध करण्यासाठी प्रचंड मानसीक तकतीची गरज असते..मानसीक आणि शिवाय गरज पडल्यास शारीरिक ही . मानसिक एवढ्यासाठी कारण आजूबाजूचे लोक फक्त बघत उभे राहतात काहीच बोलत नाहीत. आणी याचा एक वेगलाच दबाव जाणवतो...एकटे असल्याचा दबाव)
शिवाय आणखीही अनेक विचार येऊ लागले :
समजा खरच प्रसंग हात्घाईवर आला असता, तर माझ्या PM ने मलाच झापला असता...
आमच्या customer ने कदाचित वर पर्यंत हा प्रकार नेला असता...आणी विना कारण मलाच मनस्ताप सहन करावा लागला असता. ( आम्हाला customer site ला काम करावं लागतं )
पण म्हणून जर मी गप्प बसलो तर मी सुद्धा त्यांच्यातलाच एक नाही ठरणार का ...जे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ?(आणि त्यामुळे पुन्हा अशा प्रवृत्तींना वाढायला कारणीभूत ठरतात )

आणखी एक प्रश्न पडला तो म्हणजे असं कुणा कुणाशी भांडणार? सगळ्यांनाच चलता है ची सवय लागलेली..त्यामुळे असे लोक तर जागो जागी भेटणार... मग करावं तरी काय? ( खास करून घरा जवळील दुकानदार ). शिवाय मॉल वाले तर काय sofisticated चोर.

तुम्हाला काय वाटतं? हा तर इतका छोटा प्रसंग आहे की तुम्ही सुद्धा हे कधी ना कधी अनुभवलंच असेल्...तुम्ही अशा वेळी काय करता? आपली मते जांणून घ्यायला नक्कीच आवडेल.

स्वानन्द
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग

मुक्तकसमाजजीवनमानविचारमतमाहिती

प्रतिक्रिया

रेवती's picture

11 Dec 2009 - 1:30 am | रेवती

आपले हार्दिक अभिनंदन!
एकदा बर्‍याच वर्षांपूर्वी मी रिक्षावाल्याशी हुज्जत घालून ठरवलेल्या भाड्यापेक्षा जास्त घेतलेला १ रू. परत घेतला होता सकाळी साडेसहा वाजता. माझे काका मात्र असल्या लोकांशी सकाळी भांडत बसू नकोस म्हणत होते पण मला भांडायची खुमखुमी आहेच आधीपासून.;)

रेवती

हर्षद आनंदी's picture

11 Dec 2009 - 1:46 am | हर्षद आनंदी

एक नंबर.. ह्यांना असाच धडा शिकविला पाहिजे.

त्याला विचारायचे, थंड करायला लागणार्‍या वीजेचे पैसे किती वेळा भरतोस, आणि ते कनेक्शन लीगल आहे का?

स्वारगेट्ला महाड-मुंबई स्टँडवर एक टपरी आहे. त्याच्याकडे कोल्ड्रींक १५, २५ अश्या भावात मिळते. एकदा आधी तिथल्या पोराशी, मग त्याच्या मालकाशी वाद घालुन २० किमतीचे माझा कोल्ड्रींक २० लाच घेतले. त्यात तो हिंदी आणि मी मराठी, त्यामुळे अजुनच मजा आली. त्याला मराठी व्यवस्थित समजत होते, पण बोलत नव्हता मग मला अजुनच चेव आला.

पण नंतर विचार करायला लागलो, ह्यांच्याशी कोणीही भांडेल, पण बार मध्ये बसुन दारू पिताना, त्या दारुची, कोल्ड्रींकची, सिगरेट्ची किती जास्त कींमत वसुल केली जात असेल? प्रत्येक गोष्ट M.R.P. ला विकणार्‍या दुकानदारांकडुन M.R.P. वर सुट मिळण्यासाठी कितीवेळा भांडतो?

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Dec 2009 - 2:16 am | अक्षय पुर्णपात्रे

मी : एक काम कर... २ सेंटर फ्रेश दे दे...
तो : लेकीन उसमेसे नही होगा...अलग २ रुपये देने होंगे

श्री स्वानंद, सेंटर फ्रेशची किंमत दोन रुपये आहे की नाही हे तपासून पाहीले होते का?

विशाल कुलकर्णी's picture

11 Dec 2009 - 11:48 am | विशाल कुलकर्णी

अक्षयजी, सेंटर फ्रेशची १ गोळी १ रुपयाला येते आणि हे बहुतेकांना माहीत असते. तेव्हा दोन रुपयाच्या बदल्यात २ सेंटर फ्रेश हा योग्य व्यवहार आहे.

स्वानंदराव, अभिनंदन ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 2:32 am | निमीत्त मात्र

लिम्का वगैरे कृत्रिम शितपेये प्यायचे टाळणे अधिक सोपा आणि सुरक्षीत मार्ग ठरला असता.

स्वानन्द's picture

11 Dec 2009 - 11:14 am | स्वानन्द

लिमका च्या ऐवजी माझा किंवा मँगोला समजा...मुद्दा तोच राहतो. बरोबर ना?

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

पाषाणभेद's picture

11 Dec 2009 - 4:43 am | पाषाणभेद

तुमचे हार्दिक अभिनंदन! आणि तुमच्या धोरणास जाहिर पाठिंबा!!

तुमच्यासारखीच हु़क्की मला पण येते कधीकधी पण आजकाल माझी जास्तच 'डोंबीवली फास्ट' होतेय.

------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

भानस's picture

11 Dec 2009 - 6:33 am | भानस

माझाही पाठिंबा. उद्या कोणा म्हातारबाबा कडे दोन रूपये कमी असतील तर त्याला देईल का हा?

विजुभाऊ's picture

11 Dec 2009 - 10:08 am | विजुभाऊ

तत्वासाठी भांडऊन झाल्यावर श्रमपरिहार म्हणून दारु पिताना हाटेलात २०० /२५०रू क्वार्टर मिळणार्‍या बाटलीतले द्रव्य २०० /२५०रू ला एक पेग या दराने घेताना कोणीच कधीच वादविवाद करताना दिसत नाही . हे एक कोडेच आहे

jaypal's picture

11 Dec 2009 - 11:06 am | jaypal

दारु पिण्यास (अंमला खाली नसुनही वादविवाद घालण्यास) आधी आपल्याकडे अधिकृत परवाना असावा लागतो. तो कितीजण घेतात? तसा परवाना असल्यास किंमत हा विषय वगळता असली व नकली दर्जा वरुन हरकत घेता येते (वाद ही घालता येतो)
महराष्ट्रशासन परवाना शुल्क = अजिवन रु.१०००/- (केवळ महराष्ट्रा पुरता मर्यादीत)

संजा's picture

11 Dec 2009 - 1:29 pm | संजा

आपली ऊर्जा नेहमी महत्वाच्या प्रायारिटीज वर खर्च करणे चांगले.
महत्वाच्या प्रायारिटीज नसती ल तर प्रश्नच नाही

जयपाल - आपल्याकडे परवाना आसेल तर बारमालकाने दारू पूरवणे सक्तीचे आसते काय ?

स्वानन्द's picture

11 Dec 2009 - 12:16 pm | स्वानन्द

भाऊ,
आम्ही (म्हणजे मी )मद्याच्या बाटलीपासून ( म्हणजे मद्द्यापासून ) दूर राहतो. त्यामुळे हा प्रसंग माझ्याबाबतीत कधी घडत नाही.

हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते.

हॉटेल मध्ये जास्त किंमत लावणे ( service charge च्या नावाखाली ) कायद्याच्या द्र्रुष्टीने योग्य आहे की नाही यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

शाहरुख's picture

11 Dec 2009 - 12:33 pm | शाहरुख

जर मद्यालयात मंद दिवे , समोर नाचणार्‍या बायका या 'सोयींचे' पैसे बाटलीसाठी लावल्याचे चालत असेल तर स्टॉलवाल्याने थंड करण्याचे पैसे लावले तर ते चूक कसे ?

शितपेयाच्या बाटलीवर असे लिहिले असते का की "८ रुपयात १० डिग्री तापमानाची बाटली दिली पाहिजे" ?

(अगोदर किंमत विचारून मग वस्तू खरेदी करणारा) शाहरुख

स्वानन्द's picture

11 Dec 2009 - 12:56 pm | स्वानन्द

पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो.

तेव्हा माझ्या मते MRP पेक्षा जास्त किंमत घेणे योग्य नाही, लिमका च्या बाटली साठी देखील.
( उदाहरणादाखल, कधी आईस्क्रीम चा family pack घ्यायला गेला तर, थंड करायचे म्हणून जास्त पैसे घेत नाहीत हे आपण पाहिलेच असेल. )

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

शाहरुख's picture

11 Dec 2009 - 1:12 pm | शाहरुख

>>पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो.

कंपनीने एम.आर.पी. ठरवताना विक्रेत्याचा सर्व खर्च जाऊन होणारा फायदा विचारात घेतला असणारच पण असे कायदेशीर बंधन बहूतेक नसावे की थंडच पेय विकले पाहिजे म्हणून... त्याचा फायदा हे विक्रेते घेतात पण तो गुन्हा नाही असे मला वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2009 - 1:33 pm | प्रकाश घाटपांडे

समजा विक्रेत्याने पाळावयाच्या कायदेशीर तरतुदी एवढाच निकष लावला तर कुणाही विक्रेत्याला पळता भुई थोडी होईल. आपल्याला जगताना आपण सदासर्वदा कायदेशीर वागतो का? बेकायदेशीर कृत्य करणारे अनेक असतात फक्त ते पकडले गेले तर आरोप आणी न्यायालयात सिद्ध झाले तर गुन्हेगार. शिक्षा भोगुन आल्यावर परत सर्वासामन्य निरपरधार नागरिक. गुन्ह्याची शिक्षा भोगुन झाल्यावर तो गुन्हेगार रहात नाही.
कायदेशीर नसणार्‍या परंतु व्यवहारात चालणार्‍या अनेक बाबी आपण अवतीभवती पहातो. वरील उदाहरणात कायदेशीर विक्री करायची झाली तर त्या एम आर पी मध्ये थंड असण्याची किंमत देखील अंतर्भुत आहे. यावर टीव्हीवर चर्चा झाल्याचे पुसट आठवते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

देवदत्त's picture

12 Dec 2009 - 10:50 am | देवदत्त

कायदेशीर होते म्हणून का ते माहित नाही, पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्या शीतपेयांच्या बाटल्यांवर 'सर्व्ह चिल्ल्ड' (Serve Chilled) असे छापलेले असायचे. म्हणजेच ते पेय थंड करून दिले पाहिजे. आता ते छापलेले नसते. बहुधा त्याचा फायदा घेतला जातो. (किंवा विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार ते काढले गेले असेही असू शकते) पण हो, त्या वेळी बाटल्यांवर किंमत छापलेली नसायची.

आणि हो, एम आर पी मध्ये सर्व खर्च धरलेला असतो हेही ऐकले वाचले होते. त्यामुळे त्यापेक्षा जास्त किंमतीत कोणी विकू शकत नाही, पण ग्राहकही ते कमी किंमतीत मागू शकतो आणि विक्रेत्याला फायदा होत असेल तर त्यापेक्षा कमी किंमतीत तो विकू शकतो.

jaypal's picture

11 Dec 2009 - 12:34 pm | jaypal

>हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते.

स्वानन्दा, दर= MRP+ २०% टॅक्स.
परवाना आसेल तरच पक्के बिल मिळते.(अन्यथा नकली माल "गळ्यात"पडण्याची शक्यता आधिक)तसेच परवान्याशिवाय वाहतुक करणे/बाळगणे कायद्याने दंडणिय आहे(उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज)

स्वानन्द's picture

11 Dec 2009 - 1:02 pm | स्वानन्द

>>उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज

अत्यंत मौलीक माहीती, जयपाल भाऊ!
धन्यु.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

विमुक्त's picture

11 Dec 2009 - 12:14 pm | विमुक्त

पुणे-मुंबई मेगाहायवे वर तर फारच लुबाडतात... १० रु च चिप्सच पाकिट १५ रु ला विकतात... चहा पण १०रु च्या खाली नाही मिळत...

सहज's picture

11 Dec 2009 - 12:21 pm | सहज

ग्राहक शिक्षण व चळवळ!

अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन आधीपासुन करायचे हाच सध्या तरी एकमेव उपाय आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2009 - 1:01 pm | प्रकाश घाटपांडे

पोलिस खात्यातील बिनतारी नोकरीत प्रत्येक ठिकाणी तत्त्वासाठी वादविवाद घालत बसायाचा नंतर नंतर कंटाळा आला. बिनडोक गोष्टींसाठी यस सर! यस सर! करायचा कंटाळा आला. शेवटी अन्यायाचा भाग आला तेव्हा सामाजिक न्यायासाठी वैयक्तिक अन्याय क्षम्य मानण्याचे ठरवुन अकाली बिनतारी जगातुन भावनिक राजीनाम्याला स्वेच्छानिवृत्तीचे कवच देउन बाहेर पडलो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मदनबाण's picture

11 Dec 2009 - 2:09 pm | मदनबाण

घामाचा पैसा असताना १ रु. देखील का म्हणुन जास्त ध्यायचा ?
कोणती कंपनी कर्मचार्‍याचा पगार आहे त्या पेक्षा जास्त देते? नाही देत ना... मग तुम्ही छापील किंमती पेक्षा जास्त पैसे देणे अयोग्यच आहे.
स्वानंद तुम्ही जे केलतं ते योग्यच आहे.हा ज्यांच्याकडे पैसा जास्त झाला असेल तर त्यांनी तो कशाही प्रकारे वाटावा !!!
एमआरपी वर देखील भाव करता येतो असे कुठे तरी वाचल्याचे आठवते.

फक्त ५ रुपयांसाठी..... :--- http://www.misalpav.com/node/1680

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

jaypal's picture

11 Dec 2009 - 2:14 pm | jaypal

प्रश्न २ रु. किंवा ५ रु. चा नाहीच मुळी.
म्हातारी मेल्याच दुखः नाही पण काळ सोकावतोय

कानडाऊ योगेशु's picture

11 Dec 2009 - 4:59 pm | कानडाऊ योगेशु

"नेव्हर स्वेट द स्मॉल स्टफ" ह्या पुस्तकांत बहुदा अश्याच गोष्टींबद्दल सांगितले आहे.
बरेच दुकानदार/बस कंडक्टर हे सुट्ट्या पैशांची अडचण होते म्हणुन असे करत असावेत.मागे एकदा मी बसने जाताना मी ११ रु.च्या तिकिटाचे १० रू + एकुलते एक असलेले २ रू चे नाणे असे १२ रू. दिले आणि उतरताना कंडक्टर कडुन १ रू. पुन्हा घेतला. पहिल्यांदी त्याच्या चेहर्यावर आश्चर्य होते मग त्याला सांगितले कि परत जाताना ह्याच बसने जायचेय आणि तेव्हा ११ रु. लागतीलच की.! तो हसला आणि एक रुपया दिला.

कुठल्याही मल्टीप्लेक्स मध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ / पेयपदार्थ आतमध्ये नेण्याची परवानगी नसते.तिथे तर अक्षरशः ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात आणि एम.आर.पीच्या नियमला बगल देण्यासाठी ही पेये व्हेंडिंग मशीन मधुन मल्टीप्लेक्सच्या स्वतःच्या ग्लासातुन सर्व्ह केली जातात.
२ रू साठी जर एवढी डोकेफोड करावी लागत असेल तर मल्टीप्लेक्स सारख्या ठिकाणी काय काय करावे लागेल ह्याचा विचार करतो आहे.
...आणि तत्वे/सचोटी/प्रामाणिकपणा ह्या गोष्टीसुध्दा आपण सोय पाहुनच वापरतो..
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

11 Dec 2009 - 5:19 pm | कानडाऊ योगेशु

मल्टीप्लेक्स मधली अजुन एक गोची अशी की तिथे सगळाच उच्चभ्रु माहोल असतो त्यामुळे विक्रेता सांगेल त्या किमतीत आपल्याला हवे असणारे जिन्न्स घ्यावे लागतात आणि चेहर्यावर उगाच एक स्मार्ट (????)(ई)स्माईल ठेवावे लागते हे दर्शविण्यासाठी कि ... I can afford it!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मदनबाण's picture

11 Dec 2009 - 5:39 pm | मदनबाण

काय आहे महाराष्ट्राचे मायबाप सरकार दयाळु आहे त्यामुळेच त्यांनी मधे मॉल्स,मल्टीप्लेक्स यांना वीज दरात सवलत जाहीर केली होती आणि त्यानंतर मनसे ने या विषयावर आंदोलनही केले होते.
ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात
दयाळु सरकारला जर सामान्य जनतेची काळजी असेल तर ते या बद्धल योग्य ती कारवाई करतील्,नाहीतर उच्चभ्रु लोक राज्यात जास्त संख्येने असावेत असा त्यांचा कयास असावा.

(मल्टीप्लेक्समधे मराठी चित्रपट पाहणारा)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

स्वानन्द's picture

11 Dec 2009 - 6:08 pm | स्वानन्द

खरं बोललात, आणि म्हणूनच मी म्हटलं की प्रत्यक्षात असा विरोध करताना बरंच मानसिक बळ वापरावं लागतं. आणि मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं शांत बसणं किंवा ( काही पण कारणावरून वाद घालतोय हा) अशाप्रकारचा कटाक्ष आपल्याला एकटं असल्याची जाणीव करून देतो.

पण, आपल्याला यावर काही करता येईल का अशावेळी? काही सोप्या क्ल्रूप्ती आहेत का कुणाकडे?

मल्तिप्लेक्स मध्ये चित्रपट पाहणारा... पण तेथील शितपेये, पॉप्कॉर्न कटाक्षाने टाळणारा...

स्वानन्द
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

अमृतांजन's picture

11 Dec 2009 - 5:13 pm | अमृतांजन

औषधांवरील प्रॉफिट मार्जिन, वैद्यकीय सेवा (उदा. फुल्ली सिरॅमिक दात उत्पादन मुल्य आणी विक्रीमुल्य ह्यातील तफावत) , पुणे-मुंबई एक्प्रेस्स हायवेवरील पेट्रोलपंपावरील मीटर मधील भानगड जर पाहिलेत तर तुम्ही त्यावेळेपासुन रिक्षावाले, हे असले छोटे दुकानदार ह्यांच्यांशी प्रेमाने वागायला सुरुवात कराल.

अमोल केळकर's picture

12 Dec 2009 - 2:05 pm | अमोल केळकर

आपले अभिनंदन
यापुढे आपले अनुकरण करावे असा विचार आहे.
तसेच समोरचा हिंदीत बोलत असल्यास मराठीतच भांडणार आहे
( अवांतर :- दुकानदार मराठी असेल तर २ रु माफ करावेत का ? :) )

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा