फक्त ५ रुपयांसाठी.....

रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरातुन बाहेर आलो,माझ्या मनात अनेक विचार घोळत होते.सावरकरांसारख्या अनेक देश भक्तांमुळे आज आपल्याला हा स्वराज्याचा दिवस पाहावयास मिळत आहे पण हे स्वराज्य खरचं सुराज्य झाले आहे का ?.....
अशाच विचारात असताना आमचा रत्नागिरी ते कोल्हापुर हा प्रवास सुरु झाला.लाल माती,जांभ्या दगडाची कौलारु घरे..इथली माणसे, सर्व काही पाहत होतो न्याहाळत होतो.हा सर्व प्रवास एस.टी मधुन चालला होता,एस.टी च्या प्रवास म्हणजे एक धमाल असते दर वेळी एक तरी मजेदार अनुभव मिळतो.
बस आता मलकापुर स्थानकात आली होती व ती काही वेळ थांबणार होती.उतरणारे प्रवासी उतरले व नवीन प्रवासी बस मधे चढले,ही एकाच दरवाजातुन होणारी कसरत अगदी बघण्यासारखी असते.या सर्व कोलाहलात काही स्त्री विक्रेत्यांचे आवाज कानावर पडले.....
जांभळ घ्या जांभळ्..करवंद घ्या करवंद.. मी त्या बाईला आवाज दिला ए कशी दिली ग जांभळ.. ती म्हणाली ५ रु.ला, आणि करवंद? मी विचारले.. ती म्हणला ती सुद्धा ५ रु.ला आहेत....
बरं मग मला तु दोन्ही दे.. तो कोकणचा रानमेवा खाण्याची इच्छा तर मला झालीच होती.(तोवर माझा वाळकी (काकडी) खाण्याचासुद्धा विचार चालु झाला) त्या बाईकडुन द्रोणातील जांभळे व करवंद खायला सुरुवात केली. करवंदे तर चवीला मस्तच होती...... मला मग ती अजुन खावीशी वाटली.
पण हे काय त्या विक्रेत्या कुठेच दिसत नव्हत्या !!!! मी बस च्या खाली उतरलो व त्या स्री विक्रेत्या कुठे दिसतायत का ते पाहु लागलो.
शेवटी त्या दिसल्या त्या तिघी जणी एका जागी एकत्र बसल्या होत्या.हिरवी साडी ,डोक्यावर पदर आणि कपाळा वर मोठ गोल लाल कुंकु लावलेल्या त्या बायकां पैकी दोघी जणींकडे जांभळ व करवंदे होती आणि तिसरीकडे मात्र वेगळीच छोटी फळे होती. मी करवंद घेतली व सहजच त्या तिसर्‍या बाईला विचारल ताई हे कुठल फळ आहे ?
ती म्हणाली याला निरली म्हणतात्.....(ती बहुधा निरलीच म्हणाली होती पण नक्की आठवत नाही की तेच नाव आहे त्या फळाच )
ओ घ्या ना घ्या ना... ती मला म्हणाली,,तिची टोपली पुर्ण भरलेली होती...बहुधा सकाळ पासुन तिची काहीच विक्री झालेली नसावी.
मी ती फळ आधी कधीच पाहिलेली नव्हती त्यात मनात विचार आला की चव कशी असेल त्याची ?छान असेल का? पण मग तिची टोपली भरलेली का आहे?म्हणजे ते फळ जास्त कोणी खात नसणार.....
ओ दादा घ्या ना घ्या ना...ती अगदी काकुळतीला येऊन मला विनवत होती,,,,मी माझ पाकीट काढल पण त्यामधे सुट्टे ५ रुपये नव्हते..
मी तिला म्हंटल की माझ्या कडे सुट्टे नाहीत्...आणि मी तिथुन निघालो व बस मधे येऊन बसलो.....
पण हे काय ती बाई माझ्या मागो माग बस मधे चढली व जिथ मी बसलो होतो तिथे आली व परत तेच म्हणु लागली ओ दादा घ्या की घ्या ना थोडी तरी...
शेवटी माझ्या वडीलांकडुन ५ रु. घेतले व त्या बाई कडुन द्रोणभर ती निरली घेतली ,तो पर्यन्त बस सुरु झाली व त्या बाईची खाली उतरण्यासाठी तारांबळ उडाली ,,,मास्तर ओरडु लागला ए उतर लवकर ..... त्या घाईत सुद्धा त्या बाईची नजर माझ्या हातातील वाळक्यांकडे गेली ती पटकन म्हणाली मला देता का ते खायला?...... मी पटकन माझ्या हातातल एक मोठ वाळक तिला दिल व ती लगबगीने बस मधुन उतरुन गेली.....
दिवसभर रणरणत्या उन्हात भुकेने उपाशी असलेल्या त्या बाईची त्या ५ रु. बोहनी झाली होती..... परत माझ्या मनात विचार सुरु झाले की अजुन किती लोक तिच्या कडुन ती छोटी फळे विकत घेतील? का ते ५ रु. तिची दिवसाची कमाई असेल?????

(५ रु.ची किंम्म्त समजुन असलेला)
मदनबाण.....

ह्म्म

भुक अन तहान .. शेवटची शाश्वत सत्यं !

-
(भुक काय असते ठावुक असणारा) आंद्या

अवांतरः मदनराव ते फळ होते कोणते मग ? चव कशी होती ?

सही !!

मदनराव,
फळ चवीला सो-सो असेल म्हणुन तिच्याकडे कोणी फिरकलं नसावं !!!

अवांतर: एक एक रुपयाला सायंदैनिक विकणारा एक रडवेला चेहरा मला कधी तरी त्याचे दैनिके विकली गेली नाही की घेण्याचा आग्रह करतो तेव्हा आम्ही नाइलाजाने दहा एक रुपयाची घेतोच आणि रद्दीत टाकतो. हमभी किसीको पेट के लिये रोते हुये नही देख सकते !!!

खरंय..

लेख चांगला जमला आहे. पु. ले. शु.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उदास..

छ्या! वरील हकिकत वाचून उदास वाटले...

तात्या.

इतकं सत्य सोसवत नाही.

एवढच म्हणु शकतो.आणखी काय.
चांगला लेख.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मदन्या,

लेख चांगला झाला. चटका लावून गेला तूझा अनूभव.

इतकं सत्य सोसवत नाही.
बरोबर बोललास मनोबा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बापरे

खूप वाईट वाटलं वाचुन्...
मी कधी निरली ची फळं पाहिली नाहीत रे कशी होती ती?
(५ रु वाचवण्यासाठी रिक्षा ऐवजी बस ने जाणारी)
वरदा

दर्द

कोकण भागात इतर भागा॑पेक्षा गरिबी जास्त आहे, मी एकदा पालीला गेले होते, कोकणातील पाऊस कसा असतो ते माहितच असेल ,तेव्हा एक वयस्कर बाई फक्त अ॑गावर गोनपाट गु॑डालुन बसली होती, मला माझ्या मैत्रीणीला ते पाहुन खुप वाईट वाटले, आम्हाला आमची आजी डोळ्यासमोर आली, आणि आम्ही दोघीही तीच्याकडे गेलो आणि पैसे दिले आणि साडी घे म्हणुन सा॑गितले, पण तीने काय पोटाला आहे का म्हणुन विचारले तेव्हा आमच्याकडे खाण्याचे काहीच नव्हते. आणि आम्ही ते आणुन ही दिले नाही कारण आम्हाला उशीर होत होता, आणि अगोदरच पैसे दिले असल्यामुळे खाण्यासाठी आणखी पैसे देणे गरजेचे वाटले नाही. पण तीचा तो सुरकुत्या पडलेला चेहरा अजुन डोळ्या समोरुन जात नाही.

शितल

अगं अशा कितीतरी आज्या न्यूजर्सीत सुद्धा दिसतात...४ इंच बर्फ पडलेला असताना नायलॉन च्या सुळसुळीत साड्या आणि कुठलंही जॅकेट न घालता भाजी कणीक उचलून आणत असतात्..मी एकदा दया येऊन विचारलं तर म्हणाली इथे दोन वेळा खायला तरी मिळतं थंडी परवडली पोटाची भूक सहन होत नाही...तिथे भारतात १५ दिवस काहीही न खाता काढलेत त्यामानानी हे सुख आहे म्हणे.....

??? कळलं नाही.

माफ करा वरदा ताइ/राव्/जी
पण कळलं नाही ,काय म्हणताय ते.
"..तिथे भारतात १५ दिवस काहीही न खाता काढलेत त्यामानानी हे सुख आहे म्हणे"

म्हणजे त्या आजी भारतातुन न्यु जेर्सी मधे गेल्या का?
आणि आपल्याकडे जर त्या १५-१५ दिवस उपाशी रहात असतील,
तर तिकडे गेल्या तरी कशा?
(म्हणजे, पास पोर्ट,व्हिजा ह्या सगळ्याचा खर्च कसा केला?)

की अर्थ समजण्यात माझी काही गल्लत होतिये?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

>

>>अगं अशा कितीतरी आज्या न्यूजर्सीत सुद्धा दिसतात...४ इंच बर्फ पडलेला असताना नायलॉन च्या सुळसुळीत साड्या आणि कुठलंही जॅकेट न घालता भाजी कणीक उचलून आणत असतात्..मी >>>एकदा दया येऊन विचारलं तर म्हणाली इथे दोन वेळा खायला तरी मिळतं थंडी परवडली पोटाची भूक सहन होत नाही...तिथे भारतात १५ दिवस काहीही न खाता काढलेत त्यामानानी हे सुख >>आहे म्हणे.....

१५ दिवस न खाता, बाप रे, मला तर एक दिवसाचा उपवास पण सहन होत नाही.

..उजेडा॑त

..उजेडा॑त पाह्यच॑य काय..दरीद्र्य॑च ना?" अ॑तू बर्व्याचे को॑कण अजून तसेच आहे हे वाचून वाईट वाटले..

अहो मनोबा

इथले गुजराथी लोक अशा खूप बायकांना इल्लीगली आणतात गावकडून्..कसं ते मला नाही माहित्..पण त्यांना त्यांच्या बिझनेस साठि कुठलीही कुरकुर न करता काम करणारी अशी माणसं लागतात मग एकदा खर्च करतात आणि त्यांना आणतात इथे परत कधीही न जाण्याच्या अटीवरच...आणि एकही पैसा पगार देत नाहीत फक्त दोन वेळेचं उरलंसुरलं जेवण...पण तेही त्या बायकांसाठी खूप असतं...

पण मला एक कळाल नाही

तीने तुमच्या कडून काकडी का मागीतली? तिला तिच्याजवळ असणारी फळं सुदधा खाता आली असती ना?

रवी.

जास्त भाव....

तीने तुमच्या कडून काकडी का मागीतली? तिला तिच्याजवळ असणारी फळं सुदधा खाता आली असती ना?

काकडी जास्त भावात विकता येते. अनोळखी फळांपेक्षा ओळखीच्या काकडीला मागणीही जास्त असणार.

काकडी का मागीतली?

ती जी फळ विकत होती ती चवीने आंबट--गोड पण जरा आंबटपणा जास्त असलेली होती,,,ती भुकेलेली असल्यामुळ (तिच्या चेहेर्‍यावरचा भाव पाहुन तरी मला तसे वाटले..... ) व बाहेर कडक उन असल्यामुळेच बहुधा तिने माझ्या कडुन ते वाळके मागितले असावे अस मला वाटत.....

मदनबाण.....

..उजेडा॑त

..उजेडा॑त पाह्यच॑य काय..दरीद्र्य॑च ना?" अ॑तू बर्व्याचे को॑कण अजून तसेच आहे हे वाचून वाईट वाटले..

नुकताच याच विषयावरती नारायण राण्यानी विलासरावाना मन्त्रीमन्न्डळाच्या बैठकीत मारलेला टोमणा आठवला. 'सिन्धुदुर्ग जिल्ह्याचे दर डोई उत्पन्न नान्देड आणि विदर्भ - मराठवादड्यातील इतर जिल्ह्यान्पेक्शा जास्त आहे'

त्यामुळे कोकण अजुन गरीब आहे हे पटायला थोडे अवघड जाते.

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

माझा हि एक अनुभव

अहो, कोकणातच काय, मुंबईच्या आसपासच्या आदिवासी पाड्यावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे. डोंगरमाथ्यावर हिंडताना आदिवासींच्या पाड्यातून येणं जाणं होतं. वाटेत एखादा कातकरी दिसतो. त्याची अवस्था काही फार चांगली नसते.
मित्रासोबत नेरळ हून नाखिंडला जात होतो. अर्धा पहाड चढल्यानंतर पायवाट ओळखू येईना म्हणून मित्राच्या सल्य्या नुसार एका उंच जागेवर झाडाच्या थंडगार सावलीत ताणून द्यायचा विचार सुरू होता. खाली दरीत आदिवासी पाडा दिसत होता. जेवून झोपावं म्हाणून जेवणाचा डबा उघडला. दिवाळीचे दिवस होते. त्यामुळे डब्यात लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या असला फराळ होता. नेरळहून वडे बांधून आणले होते. ते खाणार एवढ्यात एक कातकरी चालत जाताना दिसला.
अंगात जुना पुराणा, फाटका, जीर्ण झालेला, जागोजागी फाटलेला, मळकटलेला कुर्ता, कंबरेला एक फडकं नुसतच गुंडाळलेलं. गवत कापायची एक विळी कमरेला बांधलेली. अनवाणीच. चेहरा उन्हातान्हात फिरून रापलेला.
त्याच्या जवळ गडावर जाण्याची पायवाट विचारली. चौकशी झाल्यानंतर वडे खायची विनंती केली. त्याने ते काही न बोलता खल्ले. आमच्या जवळचे पाणीही दिले. असाच बसून राहिला होता. त्याच्या बरोबर गप्पा मारायला सुरवात केली.
"पावसाळ्यात जेवण काय बनवता घरी?"
"पावसाळ्यात काय जंगलातली खेकडी पकडतो त्याचं कालवण खातो. जंगलातल्या रानभाज्या असतात त्या खातो. पावसाळ्यात थोड्या जमीनीवर तांदूळ पिकवतो."
"दिवाळीत विशेष काय बनवता का?"
"बनवतो तर."
"काय बनवता?"
"बाजारातून कडधान्य आणतो. त्याची उसळ बनवतो"
मला आश्चर्य वाटलं. सणासुदीला कडधान्याची उसळ? या कडधान्याला मी तर नेहमीच नाक मुरडतो.
"कधी चकल्या, करंज्या बनवता का?"
"नाही बुवा"
मी माझ्याकडच्या चकल्या, करंज्या, लाडू त्याला दिल्या. त्याने ते सर्वच आवडीने खल्लं. जाताना वडे ठेवलेला कागद व्यवस्थित बाधूंन घेऊन जाऊ लागला. का विचारले तर म्हाणाला, "वड्यातली चटणी फार छान लागते. घरची माणसं खातील".

मला फार वाईट वाटलं. सणासुदीला कडधान्याची उसळ खाणार्‍यांनी जीवनाकडून काय अपेक्षा कराव्यात?
आणी ही अवस्था मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावरच्या आदिवासी पाड्यावरची. दुर्गम पाड्यांवर काय असेल त्याची तर फक्त कल्पनाच केलेली बरी.

घारापुरी बेटावर एका आदीवासी आजी कडून एक कळशीभरून प्यायचं पाणी घेतलं. जाताना तिने आमचं जेवणाचं खरकटं सांडलेले वर्तमान पत्राचे कागद जमा करून घेतले. का विचारले तर म्हणाली. हे असले कागद आम्हाला कुठे मिळत नाही हो. मिळतात तेव्हा साठवून ठेवतो!!!

अरेरे..

रम्या,
तुमचा अनुभव फारच वाईट होता हो..विषण्ण वाटलं वाचल्यावर.
छ्या: आपण साले २१ शतक आणि चंद्रावर उपग्रह सोडायच्या गोष्टी करतो आणि आपलेच भाऊबंद दिवाळीला अप्रुप म्हणून कडधान्याची उसळ खातात Sad
साला पाणी आलं डोळ्यात वाचून.

अशा ठिकाणी काही मदत करण्याची सोय आहे का? एखादी संस्था वगैरे? ते 'आदिवासी कल्याण' चे पैसे जमवाय्चे फॉर्म्स वगैरे खोटारडे सरकारी घोडे नकोयत...कोणी खरंखुरं काम करणारं ज्याला काही मदत केली तर ती खरंच पोचेल असं...अभय बंग, राणी बंग ह्यांच्यासारखं?

असेच म्हणतो

अशी माहिती हवी आहे. धन्यवाद.

चा॑गला विचार आहे, पण कृतीत आलातर अती उत्तम

मी ही तेच म्हणते आपण सर्व मिपा करा॑नी काही रक्कम अशा अदिवासी भागातील लोका॑च्या साठी दिली तर छान वाटेल. आपण असे स॑घटना /लोक शोधु की जे ह्या आदिवासी लोका॑साठी स्वय॑प्रेरणेने काम करतात, आणि आपण त्या॑ना पैसे दिले तरी त्या आदिवासी लोका॑पर्यत ही मदत अन्नधान्य, औषधे, मुला॑च्या शिक्षणासाठी (पुस्तके,वह्या, पेन, पेन्सिल )ह्या रूपात पोचेल, पहिला एखाद्या भागात जाऊन तेथील गरज काय आणि त्या॑ना काय मदत केली गेली पाहिजे हे पहायला हवे.

जीवनशाळा

नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवनशाळांचा विचार करायला हरकत नाही. पुनर्वसन वसाहतींबरोबरच बुडालेल्या भागातही अशा काही शाळा चालवल्या जातात. तिथल्या मुलांसाठी अशी मदत उपयुक्त ठरू शकेल.

मी ऐक NGO

मी ऐक NGO साठी काम करतो. विश्वस्त म्हनून
मराठी लोकान्सथी काम करते.
तुम्ही पण मदत करू शकता.

http://www.maimarathi.org

मदतीसंदर्भात माहिती

इकडे इंदूरमध्येही तीच परिस्थिती आहे. इथल्या कुठल्याही खायच्या जागी म्हणजे छप्पन दुकान, सिख मोहल्ला आणि सराफा इथे कुठेही गेल्यावर तोंड वेंगाडून मागणारी लहान मुले, बायका दिसतात. आतून पिळवटून येतो. त्यांच्यासमोर खायला पण कसं तरी वाटतं. आपल्याला बरे पैसे मिळतात याचीही कधी कधी लाज वाटते. माझ्या ओळखीत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. सुरेश तांबोळी नावाचे. माझ्या परीने शक्य तेवढी मदत मी त्यांना करतो. त्यांचे वय ७२ आहे. कोकण रेल्वेत इंजिनयर होते. पण समाजासाठी काही तरी करण्याचा त्यांना ध्यास आहे. म्हणून नोकरीत असतानाही ते इगतपुरीत गरीबांसाठी मोफत शिकवण्या घ्यायचे. आता सध्या ते इगतपुरीजवळ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठा प्रोजेक्ट उभारताहेत. त्यासाठी काही बांधकामही झाले आहे. याशिवाय पनवेल तालुक्यात खेडोपाडी त्यांनी बालवाड्या सुरू केल्या आहेत. इगतपुरी तालुक्यात ज्ञानदीप मंडळांचे जाळे विणले आहे. बरेच काही काम त्यांनी केले आहे. त्यांच्या नव्य प्रकल्पाबद्दलची माहिती येथे वाचायला मिळेल.
http://bhochak.mywebdunia.com/2008/01/28/1201512480000.html

धन्यवाद,

इगतपुरी तालुक्यात ज्ञानदीप मंडळांचे जाळे विणले आहे. बरेच काही काम त्यांनी केले आहे. त्यांच्या नव्य प्रकल्पाबद्दलची माहिती येथे वाचायला मिळेल.

धन्यवाद भोचक गुरुजी!

तात्या.

मदतीसंदर्भात माहिती

इकडे इंदूरमध्येही तीच परिस्थिती आहे. इथल्या कुठल्याही खायच्या जागी म्हणजे छप्पन दुकान, सिख मोहल्ला आणि सराफा इथे कुठेही गेल्यावर तोंड वेंगाडून मागणारी लहान मुले, बायका दिसतात. आतून पिळवटून येतो. त्यांच्यासमोर खायला पण कसं तरी वाटतं. आपल्याला बरे पैसे मिळतात याचीही कधी कधी लाज वाटते. माझ्या ओळखीत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. सुरेश तांबोळी नावाचे. माझ्या परीने शक्य तेवढी मदत मी त्यांना करतो. त्यांचे वय ७२ आहे. कोकण रेल्वेत इंजिनयर होते. पण समाजासाठी काही तरी करण्याचा त्यांना ध्यास आहे. म्हणून नोकरीत असतानाही ते इगतपुरीत गरीबांसाठी मोफत शिकवण्या घ्यायचे. आता सध्या ते इगतपुरीजवळ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठा प्रोजेक्ट उभारताहेत. त्यासाठी काही बांधकामही झाले आहे. याशिवाय पनवेल तालुक्यात खेडोपाडी त्यांनी बालवाड्या सुरू केल्या आहेत. इगतपुरी तालुक्यात ज्ञानदीप मंडळांचे जाळे विणले आहे. बरेच काही काम त्यांनी केले आहे. त्यांच्या नव्य प्रकल्पाबद्दलची माहिती येथे वाचायला मिळेल.
http://bhochak.mywebdunia.com/2008/01/28/1201512480000.html

www.bhookh.com

या संकेतस्थळाला मिळालेल्या हरेक टिचकीतुन १ कप धान्य गरिबांना देण्यात येते असं वाचलय.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)