२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....
नमस्कार मित्रहो,
आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो.
तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला. आणि दुसरीकडून लिमकाची छोटी बाटली. अडकलेल्या कामावर विचार करता करता सहज म्हणून बाटली वर लिहिलेल्या किमती कडे लक्ष गेलं. ८/-.
आरामात वडापाव आणि लिमका चा आस्वाद घेऊन मी पैसे देण्यासाठी तपरीवाल्याकडे गेलो. ५० रु ची नोट दिली. त्याने चाळीस रुपये परत दिले. मी २-३ सेकंद तसाच उभा राहिलो तो २ रुपयाचं नाणं देईल म्हणून. पण माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहायला लागला. दोन रुपयांची मागणी केल्यावर म्हणाला १० रु. किम्मत आहे. संवाद काहीसा असा.
मी : दोन रुपये?
तो : हो गया ना बराबर.
मी : किती ला आहे?
तो : १० को हे.
मी : कहाँ? ८ को है...
तो: उस पे लिखा है ना...
मी : बाटली दाखवून ... कितना लिखा है?
तो : हॉं ...तो ठंडा करने का २ रुपया एक्स्ट्रा होता है.
मी: (परत तोच प्रसंग रीपीट होतोय हे जाणवून...) ऐसा कुछ होता नही है...ये सब मिलाके ही कंपनी किमत तय करती है. वैसे भी तूने तो ठंडा भी नही दिया था..
तो : तो क्या हुवा... ये सब साफ रखने का वगैरा होता है ना...और इतना है, तो पहले कीमत पूछा करो और फिर लेना है तो लो
मी : वो तो मै अगली बार करुंगा ही...अभी २ रुपया दे
तो : ( काही उत्तर न देता दुसरीकडे बघत राहतो )
मी : एक काम कर... २ सेंटर फ्रेश दे दे...
तो : लेकीन उसमेसे नही होगा...अलग २ रुपये देने होंगे
मी : दे तो सही...
तो देतो. मी तिथेच उभा राहून एक सेंटर फ्रेश खातो आणि तिथून सावकाश निघून जातो. तो मागे ओरडत राहतो. मी लक्ष देत नाही. अंगाला हात लावलाच तर आपण ही दोन लावून द्यायच्या तयारीत राहून चालत राहतो.
प्रसंग इथेच संपला. पण पुढचा बराच वेळ चालू राहीलं ते विचारांच चक्र.
खरंच एवढं करायची गरज होती का? दोन रुपयांसाठी?
पण मग आपणच एकीकडे तत्त्वाच्या गोष्टी करतो... आणि मग जेव्हा प्रत्यक्ष काही करायची वेळ येते तेव्हा मग मागे का हटायचं?
( पण १०० गोष्टी बोलणं आणि त्यातली किमान एक्क गोष्ट प्रत्याक्षात करून दाखवणं यात अक्षरशः जमीन -अस्मानाचा फरक आहे हे मात्र जाणवलं. प्रत्यक्षात असा विरोध करण्यासाठी प्रचंड मानसीक तकतीची गरज असते..मानसीक आणि शिवाय गरज पडल्यास शारीरिक ही . मानसिक एवढ्यासाठी कारण आजूबाजूचे लोक फक्त बघत उभे राहतात काहीच बोलत नाहीत. आणी याचा एक वेगलाच दबाव जाणवतो...एकटे असल्याचा दबाव)
शिवाय आणखीही अनेक विचार येऊ लागले :
समजा खरच प्रसंग हात्घाईवर आला असता, तर माझ्या PM ने मलाच झापला असता...
आमच्या customer ने कदाचित वर पर्यंत हा प्रकार नेला असता...आणी विना कारण मलाच मनस्ताप सहन करावा लागला असता. ( आम्हाला customer site ला काम करावं लागतं )
पण म्हणून जर मी गप्प बसलो तर मी सुद्धा त्यांच्यातलाच एक नाही ठरणार का ...जे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ?(आणि त्यामुळे पुन्हा अशा प्रवृत्तींना वाढायला कारणीभूत ठरतात )
आणखी एक प्रश्न पडला तो म्हणजे असं कुणा कुणाशी भांडणार? सगळ्यांनाच चलता है ची सवय लागलेली..त्यामुळे असे लोक तर जागो जागी भेटणार... मग करावं तरी काय? ( खास करून घरा जवळील दुकानदार ). शिवाय मॉल वाले तर काय sofisticated चोर.
तुम्हाला काय वाटतं? हा तर इतका छोटा प्रसंग आहे की तुम्ही सुद्धा हे कधी ना कधी अनुभवलंच असेल्...तुम्ही अशा वेळी काय करता? आपली मते जांणून घ्यायला नक्कीच आवडेल.
स्वानन्द
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग
वाचने
7923
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
आपले
लय भारी...
शंका
In reply to शंका by अक्षय पुर्णपात्रे
अक्षयजी,
लिम्का
In reply to लिम्का by निमीत्त मात्र
लिमका च्या
तुमचे
हार्दिक अभिनंदन!
तत्वासाठी
In reply to तत्वासाठी by विजुभाऊ
मद्यालयात जाउन
In reply to मद्यालयात जाउन by jaypal
आपली ऊर्जा
In reply to तत्वासाठी by विजुभाऊ
भाऊ, आम्ही
In reply to भाऊ, आम्ही by स्वानन्द
जर
In reply to जर by शाहरुख
पण मला
In reply to पण मला by स्वानन्द
>>पण मला
In reply to >>पण मला by शाहरुख
कायदेशीर
In reply to >>पण मला by शाहरुख
Serve Chilled
In reply to भाऊ, आम्ही by स्वानन्द
तरंगायच आसेल तर
In reply to तरंगायच आसेल तर by jaypal
>>उदा.तु
पुणे-मुंबई
ह्म्म
तत्वासाठी! स्वेच्छानिवृत्ती
घामाचा
In reply to घामाचा by मदनबाण
बाणा बरोबर आहे तुझ
"नेव्हर
In reply to "नेव्हर by कानडाऊ योगेशु
मल्टीप्ले
In reply to मल्टीप्ले by कानडाऊ योगेशु
काय आहे
In reply to मल्टीप्ले by कानडाऊ योगेशु
खरं
प्रॉफिट मार्जिन
आपले