दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात...
कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल :) )
दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून.
व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते.
लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात.
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते.
ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे.
ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.
आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते.
ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते.
तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो.
त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
प्रतिक्रिया
24 Mar 2013 - 8:48 pm | सुबोध खरे
अदिती ताई
मी लष्करात २३ वर्षे काढलेली आहेत तेथे प्रत्येक पार्टीत दारू हि असतेच आणि त्याला कोणत्याही तर्हेचा taboo नाही. काश्रात एखादा अधिकारी दारू पिउन तर्र झाला तर दुसर्या दिवशी त्याला कमांडिंग अधिकाऱ्या कडून समाज दिली जाते आणि जर तो सुधारला नाही तर त्याच्या पार्टीत दारू पिण्यावर नियंत्रण आणले जाते अति झाले तर त्यावर पूर्ण बंदी पण आणली जाते.
त्यामुळे प्रमाणात पिणारे लोक मी शेकड्यांनी/हजारांनी पाहिलेले आहेत.
दारू पिऊन लोकांना जो आनंद मिळतो तो ही विटाळलेला आहे अशी भूमिका मी कुठे घेतली हे मला दाखवाल का?मी फक्त एवढेच म्हणत आहे कि दारू पिणे किंवा न पिणे या दोन्ही गोष्टी उदात्ततेच्या पातळीवर आणू नका. ज्यांना दारू प्यायची नाही त्यांना कमी लेखू नका तसेच जे दसरू पितात ते फार गुन्हा करीत आहेत असेही म्हणू नका
विधवा स्त्रियांची परिस्थिती फारच वाईट होती/ आहे याचा इथे काय संबंध आहे? हे कळले नाही.
मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये.हि मला जरा अतिशयोक्ती वाटते.
"तरीही दारू वाईटच असा सरसकटीकरणाचा धोका विज्ञानाचं शिक्षण घेतलेला माणूस घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे"
कोणत्याही औषधाचे हे परिणाम असतात तसेच दुष्परिणाम हि असतातच पण औषधाचे परिणाम जर दुष्परिणामापेक्षा जास्त असतील तरच ते वापरले जाते.दुर्दैवाने दारूचे परिणाम आणि दुष्परिणाम यात दुष्परीणामाचे पारडे जड आहे म्हणून दारूला अन्न किंवा औषधाच्या पातळीवर आणणे बरोबर नाही असे मला वाटते
बाकी सर्वजन सुजाण आहेतच
आपला अज्ञानी
सुबोध
25 Mar 2013 - 9:33 am | चौकटराजा
धाग्याचा विषय दारू म्हणजे काय असा आहे. दारू पिणे चांगले की वाईट असा नाही. तरीही मोठा अहं ने इथे प्रतिसाद येताहेत व मूळ ज्ञानात्मक धागा बाजूला पडून सगळेच बर्ट्राड रसेल असल्यासारखे अवांतरा मागे धावयायत ! मग मी मागे का राहू ? दारू मी पिऊन बघितलेली आहे अगदी काही ही न घालता. त्यावेळी जबर भिजलो होतो पावसात म्हणून प्यालो थोडीशी व खरंच सांगतो मस्त गरम वाटलो. बाकी चवीला म्हणाल तर उसाचा ताजा रस मला दारूच्या चवीपेक्षा जास्त आवडतो.
दारू प्यायल्याने अगदी वाताहत झालेली आयुष्य आहूबाजूला पाहिली आहेत. पण दारू पिणे ही काय हीन दर्जाची सवय आहे असे मला वाटत नाही. मला दारू आवडत नाही हे नक्की. शेवटी अतिरेकी परमेशवर भक्तीने तासंतास पूजा करीत बसणे व जराही व्यायाम न करणे यात निसर्ग कोणत्या माणसाच्या बाजूने कौल देईल हे महत्वाचे ! अति सर्वत्र वर्जयेत.
अतिरेकी आईसक्रीम खाल्याने खाणार्याच्या शरीरात चरबी वाढेल पण आएसक्रीमच्या प्रभावाखाली बायकोला मारहाण केली अशी बातमी आपण कोणी वाचली आहे का? दारू व ततत्सम भाउबंद व इतर पदार्थांचा अतिरेक यात आपहानी , परहानी असा फरक नक्कीच आहे.
25 Mar 2013 - 5:04 pm | निनाद मुक्काम प...
धाग्याचा विषय दारू म्हणजे काय असा आहे. दारू पिणे चांगले की वाईट असा नाही. तरीही मोठा अहं
माझ्या आक्षेपाचे सार एका वाक्यात मांडल्याबद्दल विशेष आभार
सोत्री ह्यांचे पूर्वीचे धागे काढून पहा ,
अनेक मान्यवर दारू न पिणाऱ्या माणसांनी त्यावर दिलखुलास प्रतिसाद दिले आहे कारण त्यांना सोत्री ह्यांच्या धाग्याचे उद्दिष्ट चांगलेच ठाऊक असते.
24 Mar 2013 - 11:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
निनाद, या धाग्यावरचे तुझे प्रतिसाद विनाकारण अग्रेसिव्ह आहेत. तुला मते मांडायची आहेत, मांड. समोरचा भांडत असेल तर तू ही भांड. पण सुबोध खरे इतक्या व्यवस्थितपणे आणि शांतपणे मुद्दे मांडत असताना, तुझे बोलणे उगाचच तिरकस झाले आहे. सदर मुद्दा इतका मनाला लावून घ्यायचे काही खास कारण नाही. He has his opinion. You have your. You can agree to disagree. खरे पाहता त्यांनी काही गरज नसताना वर एकदा माफी पण मागितली आहे. असे असताना तू अजूनही काहीश्या अनादराने लिहितो आहेस. थोडा शांत होऊन विचार कर.
इथे अनेक जणांनी तुझे वागणे पटले नाही असे लिहिले आहे वर. मिपावर तुझा चाहता वर्ग आहे. आणि गेली २ वर्षे अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन तू तो निर्माण केला आहेस. तुझ्याबद्दल एक प्रकारची आपुलकी या लोकांना आहे म्हणून तुला सांगताहेत, नाहीतर सरळ दुर्लक्ष केले असते.
आणि हो, मुद्द्यावरून चर्चा करताना आकांडतांडव, आक्रस्ताळेपणा करणे हे पाशवी शक्तींचे काम आहे. तुझा आयडी ह्याक तर नाही ना केला कुणा पाशवी शक्तीने ;-) (ह घ्या रे सगळ्यांनी)
24 Mar 2013 - 2:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हवे ते घाला हो बायांनो. माझ्या डोक्याची काशी घातली जाण्याच्या आत थांबतो. जे बोललो त्यापेक्षा स्पष्ट बोलण्याची ताकद आता माझ्यात नाही. जितं त्वया !!! अभिनंदन....
24 Mar 2013 - 4:31 pm | सोत्रि
विमे, हे काही झेपले नाही. असा प्रतिसाद तुमच्याकडून यावा हे पटत नाही.
कितीही मतभेद असले तरीही इथे सगळे वाद - प्रतिवाद हे जिंकण्यासाठी असतात का?
- (समंजस) सोकाजी
24 Mar 2013 - 10:22 pm | प्यारे१
जल्ला सगले येकदमच धुलवड खेलू लागलेत! ;)
सोत्रिच्या दारवाची निशा... दुसरा काय? :)
24 Mar 2013 - 10:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी हे वाद प्रतिवाद जिंकण्यासाठी करत नाही. पण इथे समोरचा तसे करत असेल असे वाटले म्हणून माघार घेतली.
वादात प्रवीण असलेला माणूस काहीही सिद्ध करू शकतो. माझा एक मित्र आहे, तो वादविवाद स्पर्धेत तो कुठल्याही बाजूने वाद घालून जिंकू शकतो. पण मला असले वांझोटे वाद घालण्यात रस नाही. कारण त्याने जिंकण्याचे समाधान मिळते, पण त्यापुढे काहीच होत नाही.
"मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये." हे विधान विनोद म्हणून ऐकू, खोटे बोलण्याचा प्रकार समजू की अत्यंत मर्यादित अनुभवविश्व आणि त्याहून मर्यादित कल्पनाशक्ती याचा अनोखा संगम समजू, हे कळले नाही. शिवाय एका विशिष्ट विधानाला प्रतिवाद करताना उलट्या बाजूला तर्क ताणून धरणे आणि केवळ आपल्याला सोयीस्कर अर्थ काढून वाद घालणे हे माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. म्हणून तत्सम कारणांनी माझ्या बाजूने वाद बंद केला.
एकूणच मिपावर वाद घालायचा आताशा कंटाळा येतो. :-)
25 Mar 2013 - 12:57 am | कवितानागेश
एकूणच मिपावर वाद घालायचा आताशा कंटाळा येतो. >
सहमत.
म्हणूनच मी गप्प बसलेय. :)
25 Mar 2013 - 9:09 am | ५० फक्त
विमे, आपण दार न पिता, दारु पिणारे जे करमणुक करतात, त्याचा अनुभव घेतलेला दिसतो आहे.
27 Mar 2013 - 6:45 pm | उपास
खरं आहे विमे.
मागे एका धाग्यावर (मला वाटतं गांधी आणि मल्ल्या) असाच वाद झाला होता, तात्या सरपंच होता तेव्हाची गोष्ट. दारुचं विनाकारण उदात्तीकरण चालू होतं. तेव्हा ते खटकलंच आणि आताही. दोन टोकांवर बसून वाद घालायचा असेल तर दोन्ही बाजूंनी विदे काढता येतील, पण शेवटी ह्या वादात हशील काय ते महत्त्वाचं.
असो तर आपल्याला, भारताच्या चौकटीत विचार करायची सवय त्यामुळे हातभट्टी च्या दारुने मेल्यामुळे देशोधडीला लागलेली कुटूंब, दारुच्या आहारी जाऊन त्यातून आलेला कफल्लकपणा, अख्ख्या कुटूंबाची वाताहात हे सगळं जवळून बघतोय, वर्षानुवर्ष. सुरुवात बापाच्या पैशाने चांगल्या प्रकारच्या दारुवर आणि मग दारूच्या आहारी जाऊन घरादाराची विल्हेवाट इतकी की कुटुंब रस्त्यावर यावं अशी माझ्या पहाणीत ७-८ मराठी (सो कॉल्ड उच्चवर्णीय) कुटुंब आहेत (सॉरी विदा मागू नये!)सध्या कोकणात हे प्रमाण अगदी अंगावर येईल असं आहे.
मोलमजुरी करुन (नशापाणी करुन नवहे) घरासाठी पैसे कमवणे, मुलांना शिकवणे अशी काम स्त्री करतेय आणि नवरा नुसता बेवडा मारुन राहतो हे दृश्य नवीन आहे का? प्रसंगी अशा कुटुंबाच्या पोशिंदा बायका बेवड्या नवर्याच्याही कानाखाली मारायला कमी करत नाहीत, ही खरी स्त्री मुक्ती. हे चित्र आपल्या भारतिय समाजात आजही आहे हे आपण मान्यच करणार नसू तर आपण समाजसुधारणेच्या बाता मारणं सोडून द्यायला हवं.
दारु चांगली की वाईट ही व्यक्तिसापेक्ष आहेच पण समाजसापेक्षही आहे हे कधी कळणार आपल्याला? भारता संदर्भात विचार केला तर दारूचं आणि ती पिण्याच उदात्तीकरण होऊ नये असं कळकळीने वाटतं आणि म्हणूनच सचिन जेव्हा मद्याच्या जाहिराती नाकारतो तेव्हा सचिनविषयीचा अभिमान निश्चितच दुणावतो. असो!
8 Mar 2013 - 11:39 pm | सुबोध खरे
काही महत्त्वाच्या लिंक्स खाली देत आहे जरूर वाचाव्या.
संस्कृती (वा स्वैराचार) हा शब्द महत्त्वाचा आहे अतिविकसित(sophisticated )जगातील स्थिती वेगळी आहे
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-08-07/india/33081997_1_...
http://www.sciencedaily.com/releases/2009/02/090224163555.htm
http://www.cdc.gov/alcohol/fact-sheets/womens-health.htm
9 Mar 2013 - 12:44 am | सोत्रि
सर्व लिंक्स वाचल्या. पण माझा मूळ प्रश्न खालच्या वाक्यातल्या बोल्ड केलेल्या मतावर होता.
त्याचे उत्तर त्य लिंक्स मध्ये मिळाले नाही. त्यात अल्कोहोल स्त्रियांसाठी शारिरीकदृष्ट्या कसे हितकारक नाही हे आहे.
- (शंकेखोर) सोकाजी
9 Mar 2013 - 1:10 pm | सुबोध खरे
पहिली लिंक (TIMES OF INDIA ची) भारतातील विविध राज्यातील मद्यप्राशनाची आकडेवारी आहे. खालील आकडेवारी जगभरातील आहे
http://www.who.int/substance_abuse/publications/globalstatusreportalcoho...
http://www.greenfacts.org/en/alcohol/figtableboxes/table6.htm
9 Mar 2013 - 3:15 pm | सोत्रि
ग्रीनफॅक्ट्स च्या दुव्याबद्दल धन्यवाद!
टक्कट्वारीचे प्रमाण त्या त्या देशातील सामाजिक परिस्थिती आणि वैचारिक भूमिकेशी समरुप आहे
-(आभारी) सोकाजी
9 Mar 2013 - 12:47 am | सोत्रि
ही संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते?
- (शंकेखोर) सोकाजी
11 Mar 2013 - 8:35 pm | प्रसाद गोडबोले
संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते?
>>
जास्तीची मेजॉरीटी ....
8 Mar 2013 - 8:28 pm | सोत्रि
ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल.
- (अभ्यासू)सोकाजी
8 Mar 2013 - 8:34 pm | पैसा
According to a 2009 article in journal The Lancet, Indians, officially, are still among the world's lowest consumers of alcohol - government statistics show only 21 percent of adult men and around two percent of women drink. But up to a fifth of this group - about 14 million people - are dependent drinkers requiring "help".
Read more at: http://indiatoday.intoday.in/story/drink-dependence-up-in-urban-indian-w...
8 Mar 2013 - 9:00 pm | सोत्रि
हे नव्हे, सुबोध खरे जे म्हणाले त्यावर विदा हवा असे म्हणालो मी. लिंकमधला लेख त्यांच्या म्हणण्याच्या अगदी उलट आहे.
-(अभ्यासू) सोकाजी
9 Mar 2013 - 12:03 am | सुबोध खरे
साहेब
आपल्याला द्यायचा प्रतिसाद चुकून दादासाहेबांच्या ( दादा कोंडके) ना दिला गेला.तेथे तो वाचावा द्विरुक्ती टाळण्यासाठी परत देत नाही
क्षमस्व
31 Mar 2013 - 9:08 pm | आनंदी गोपाळ
सर,
मिल्ट्रीमधे दारू स्वस्तात मिळते. रिटायर झालेल्या मिल्ट्रीम्याणला देखिल दारू गावोगावी 'कँटीन' नेऊन स्वस्तात दिली जाते. मेडीकल वा इंजिनिअरिंग कोअर मधे 'नसलेल्या' लोकांना दारू प्यायची गरज नसणे, किंबहुना त्यांनी न पिणे अपेक्षित असते.
मला जरा समजवून सांगता का, की काय म्हणून सैनिकांना दारू 'पाजली' जाते?
8 Mar 2013 - 8:22 pm | पैसा
सोकाजीचा या विषयाचा अभ्यास पुरा आहे आणि डॉक्टर खरे यांचे प्रतिसाद तर नेहमीप्रमाणेच आवडले!
8 Mar 2013 - 9:37 pm | चौकटराजा
प्रतिसादात तब्बल तिघांचे प्रतिसाद डबल आलेले आहेत.बहुदा ही सहजावस्था असावी. की ड्रुपलने घेतली एक पेग ? असो.
कोणत्याही कारबोयड्रेटच्या द्रावात यीस्ट मिसळले की घरीही दारू तयार करता येते. ही माहिती बरोबर आहे का ?
9 Mar 2013 - 7:23 pm | सुबोध खरे
http://www.wikihow.com/Make-Alcohol-from-Common-Table-Sugar
http://en.wikipedia.org/wiki/Yeast_in_winemaking
10 Mar 2013 - 9:19 am | श्री गावसेना प्रमुख
इतक्या लिंकाची काय गरज कुणा आदिवासीला विचारा ,एका रात्रीत झिंगालाला तयार
10 Mar 2013 - 1:28 pm | इरसाल
कोणीही हा प्रकार घरी /बाहेर्/ऑफिसमधे करण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास प्रतिसाद लेखक त्यास जबाबदार नाही.
साहित्य : मद्रास गुळ्/काळा गुळ ( ह्यालाच गोटा असेही नाव आहे साधारण गुळापेक्षा हा अधिक गोड असतो), मोहाची सुकवलेली फुले, नवसागर वडी (अमोनियम क्लोराइड ), पाणी, १५ किलो तेलाचे रिकामे डबे, चाटु, २५/३० लिटर कपॅसिटीचे अल्युमिनियम्चे पातेले, जुना टॉवेल्/धोतर, कापसाची लांब वात, बियरची रिकामी बाटली, चुल, लाकुड-फाटा, ५ लिटर प्लास्टिक कॅन.
कृती : सुरुवातीला पहिला १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. त्यात अन्दाजे ४/५ किलो मद्रास गुळ, १५० ग्रॅम सुकलेली मोहाची फुले, एक नवसागर वडी (२५० ग्रॅम) टाकुन तो पाण्याने १३/१४ लिटर पर्यंत भरुन त्याचे तोंड हवाबंद करावे. आता हा डबा उबदार जागी कमीत कमी ९/१० तास ठेवुन द्यावा.
९/१० तासाने आतले मिश्रण आंबुन डबा पुर्ण भरला जाइल व त्यास आंबुस वास यायला लागेल. आता हे मिश्रण दारु बनविण्यास तयार आहे.
दुसरा १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. ह्या डब्याचा वरचा पत्रा पुर्णपणे काढलेला असावा.
हा डबा बाहेरुन मातीचा लेप देवुन पेटवलेल्या चुलीवरच्या रसरशीत जाळावर ठेवावा. त्यात ते आंबवलेले मिश्रण १/३ भरावे.तसेच डब्याच्या वरच्या एका बाजुस गोल छिद्र पाडुन त्यात चाटु अडकवावा. चाटु हा साधारणपणे टेबल्टेनिसच्या बॅट प्रमाणे दिसतो. त्याची एक बाजु व मुठ ही खोलगट असते. तर चाटु हा पसरट भाग मधे व दांडा बाहेर तसेच खोलगट भाग वरच्या बाजुस ह्याप्रमाणे डब्यास लावावा.
या नंतर डब्यावर अॅल्युमिनियमचे पातेले पाण्याने पुर्ण भरुन ठेवावे.तसेच जुना टॉवेल्/धोतर हे ओले करुन पातेले व डब्याचा मधे पातेल्याला रिंग सारखे अडकवावे. डब्यातील वाफ निसटु नये म्हणुन.
कापसाची लांब वात ही चाटुच्या बाहेर असलेल्या दांड्यात अर्धी आत अर्धी बाहेर अशी अडकवावी म्हणजे बाहेर पडणारा द्रव का नीट धारेने पडेल. त्या वाती खाली बियरची रिकामी बाटली ठेवावी.
चुलीचा जाळ/धग हा/ही व्यवस्थित मेंटेन करावा/करावी.जास्त जाळ बाहेर पडणार्या द्रवाला गढुळ करतो, तर कमी जाळ उत्पादकतेवर परिणाम.
अशाप्रकारे आतील द्रावण उकळु लागल्यावर ते वाफेत परिवर्तीत होते, ती वाफ वर पाणी असलेल्या पातेल्याला जावुन लागल्याने थंड होउन चाटुवर थेंबथेंबाने पडते व चाटुमार्गेच बाहेर वात धरुन पडते. ती धार बाटलीमधे अॅडजस्ट करावी.
वरच्या पातेलीतील पाण्यावर लक्ष असु द्यावे ते गरम झाल्यास त्वरीत बदलावे.
बाहेर पडणारी धार एकदम कमी झाल्यास डब्यातील द्रावण बदलायची वेळ झाली असे समजुन द्रावण बदलावे.
बाटली भरली की ५ लिटर कॅनमधे रिकामी करावी. अन्यथा आग लागण्याचा धोका संभवतो.
बाटलीमधे पडणारी धार म्हणजेच .............पहिल्या धारेची...........
10 Mar 2013 - 4:20 pm | चौकटराजा
मद्रास गूळ ऐवजी तामिळनाडू गूळ चालेल का ?
पाणी बिस्लेरीचे की साधे नळाचे ?
पंधरा किलो वजनाचे तेलाचे रिकामे डबे की पंधरा किलो क्याप्यासिटी असलेले तेलाचे रिकामे डबे??
आल्युमिनियम च्या पातेल्या ऐवजी तांब्याचे पातेले चालेल का ?
जुन्या टावेला ऐवजी नवा टावेल चालेल का ? किंवा नवी धोतर जोडीच आणली तर ?
बिअरची मागेच रिकमी केलेली बाटली हवी की भरलेली जाग्यावरच रिकामी ( इथे स्मायली ) करून वापरायची ?
काय आहे रेसीपीची पहिलीच वेळ आहे म्हून शान इचारले !
11 Mar 2013 - 11:57 pm | धन्या
ही गावठी दारु बनवण्याची स्टँडर्ड पद्धत आहे. :)
आता हा प्रकार बर्यापैकी बंद झाला आहे. परंतू काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यामधील काही गावांचा जोडधंदा असायचा. काही सुशिक्षितांची घरं सोडली तर जवळपास प्रत्येक घरातील माणसं यापद्धतीने दारु बनवत असत.
12 Mar 2013 - 12:38 am | ५० फक्त
छे ह्या पेक्षा, दोन दिवस शिळं ताक घ्या, त्यात एक कांदा फोडुन टाका, किचन कट्ट्याखाली अंधारात दोन तास ठेवा, मग काढुन त्यात स्वच्छ आरगॅनिक गुळ घाळा, गुळ विरघळला की मग नंतर पुन्हा दोन तास अंधारात ठेवा, मग बाहेर काढा अन नाक बंद करुन वास न घेता पिउन बघा, नाय दोन घोटात चढली तर विचारा.
12 Mar 2013 - 9:39 pm | सोत्रि
आहे की नै गंमत.
दारू न पिणार्यांनी आधि असली काहीतरी माहिती द्यायची आणि मग तसले काही पिऊन कोणी लोळला की मग लगेच दारूला दूषणे द्यायला आपणच चौकात यायचे आणि दारूला बदनाम करायचे.
ये ना चॉलबे! ;)
- (शिस्तीत चांगली दारु पिणारा) सोकाजी
13 Mar 2013 - 9:07 am | श्री गावसेना प्रमुख
सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा ना
भट्टी टाकावी म्हणतोय
15 Mar 2013 - 2:56 pm | दादा कोंडके
सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट. बोलेतो, त्यांचा 'पेग' आणि आमची 'पावशेर' ;)
15 Mar 2013 - 5:37 pm | श्री गावसेना प्रमुख
अच्छा म्हणजे जगातील दारु कंपन्या सोकाजीरावांना चव चाखायला बोलावीतात काय?
15 Mar 2013 - 5:41 pm | सोत्रि
तुम्ही भट्टी टाका, आम्ही येऊन टेस्ट करुन सांगू चांगली की वाइट ते ;)
- (जीम मरेचा एकलव्य छाप शिष्य) सोकाजी
21 Mar 2013 - 8:21 am | रुस्तम
:)
8 Mar 2013 - 11:59 pm | चिंतामणी
दारवा पुराणेशु ..................... अध्याय समाप्तं.
(सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)
9 Mar 2013 - 1:42 pm | अत्रुप्त आत्मा
............................
मेलो...मेलो...!!! आंम्हाला धर्म-काहिजणांना मद्यासारखा चढतो हे माहित होते,परंतू मद्य धर्मासारखे चढलेले पाहून जाम मज्जा वाटली... 
(सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)>>>
10 Mar 2013 - 12:45 pm | कवितानागेश
येग्झॅटली!
हेपण बघा हो लोक्स. :)
http://www.satyamevjayate.in/issue09/
9 Mar 2013 - 10:56 am | jaypal
पेठकर काका आणि डॉ.खरे यांचे प्रतीसाद देखिल आवडले.
केवळ दारु पुरत म्हणुन नाही तर, कोणत्याही गोष्टीचा अतीरेक हा वाईटच.
10 Mar 2013 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोकाजीनानाचा लेख माहितीपूर्ण आहेच. प्रतिसादही तितकेच माहितीपूर्ण. धन्स दोस्तहो.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2013 - 1:52 pm | तुमचा अभिषेक
ऑफिसच्या या ना त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने वरचेवर पार्ट्या होत राहतात.
पिणार्यांची चंगळ होते कारण फुकटचे खाणेपिणे.
पण मी मात्र पित नाही.
त्यामुळे पुरेपूर पार्टी वसूल होत नाही असे वाटते.
मग सॉफ्ट ड्रींकच्या ऐवजी एखादे महागडे मॉकटेल मागवतो.
पण तरीही पिणार्यांच्या ग्रूपमध्ये ऑड मॅन असल्यासारखे वाटत राहते.
तर एखादे असे ड्रींक सुचवा, जे जास्त चढणार नाही, ना त्याचे व्यसन लागेल. तरीही चारचौघांबरोबर प्यायल्याचे समाधान मिळेल.
अर्थात बरोबरचे सुचवतात, मात्र त्यांच्यावर तेव्हा विश्वास ठेवावासा वाटत नाही,
खास करून त्यांची फुकटची मिळतेय तर हवी तेवढी ढोसल्यानंतरची हालत पाहिल्यावर..
अवांतर - कसला रे तू सिविल ईंजिनीअर.. दारू न पिणारा .. असा टोमणा गेले काही वर्षे ऐकतोय.. :(
10 Mar 2013 - 9:03 pm | सुबोध खरे
अभिषेक साहेब
माझा आपल्याला एक सल्ला किंवा विनंती आहे कि आपण दारू मजा करण्यासाठी किंवा प्यावीशी वाटत असेल तर प्या केवळ फुकट मिळते म्हणून नको.कारण फुकट दारू मिळते म्हणून पिणार्यांची ख्याती लवकर पसरते.मी स्वतः २३ वर्षे लष्करात राहून सुद्धा दारू पीत नाही.नौदलात सगळ्या बड्या पार्ट्यांमध्ये स्कॉच मिळते जॉनी वॉकर, शिवास रिगल वगैरे पण तरीही मला असा मोह कधीही झाला नाही. पण त्यामुळे माझी ख्याती एक सरळ माणूस म्हणून होती. ( मूर्ख म्हणून सुद्धा असेल) पण तरीही बर्याच लोकानी मला कधी गृहीत धरले नाही(TAKEN FOR GRANTED). आणी त्यांची बरोबरी करण्यासाठी महागडे कॉकटेल तर नक्कीच नको कारण तुम्ही वसुली करीत आहात हे लोकांना सहज लक्षात येते.
शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे
आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो.
10 Mar 2013 - 9:28 pm | तुमचा अभिषेक
मस्करीत लिहिली होती हो वरची पोस्ट.. ऑर्कुट समूहावर टाईमपास म्हणून धागा काढला तीच पोस्ट इथे चिपकवली.. बाकी गेले वर्षभर पोटाच्या आजारापायी मी साधे सॉफ्ट ड्रींक (पेप्सी किंवा कोक) जे मी एकेकाळी पाण्यासारखे प्यायचो, ते देखील पूर्णतः बंद केले आहे.
आणखी एक म्हणजे, कॉलेजच्या दिवसांत बीअर आणि व्हिस्की या दोन मद्यप्रकारांची चव घेऊन झाली आहे. आवडली नाही, ना पुन्हा प्यायची इच्छा झाली. त्यामुळे भविष्यात पिण्याचा चान्सही नाहीच आहे तसा..
अवांतर - अश्या प्रत्येक पार्टीच्या आधी माझी बायको मला कोणाच्या आग्रहात येऊन चुकूनही पिऊ नकोस अशी ताकीदभरी शपथ घालूनच पाठवते.
27 Mar 2013 - 6:21 pm | घन्चकर
खूप छान , मना पासून कौतुक कि आपण बायको चे आय्क्ता तिचा भावने चा मान ठेवता कारण किती विश्वास ने ती तुम्हाला सांगत असेल आणिक जेवा तुम्ही त्य्वार खरे उतरतात तेवा तिचा मना ला खूप आनंद होत असेल. आणि हो हे कुठे लिहले नाही आहे sotware engineer चा syllabus मध्ये किवा इतर कुठ्लाय पाठ्यक्रम मध्ये कि दारू पिणे आवश्यक आहे. मला सुधा अशी बरेच लोको माहित आहे जे या क्षेत्रात मोठा पदावर असून पीत नाही आणिक ते सुखी संसार करून सगड्या जवाबदार व्यवस्थित पेलतात. तुमचा सारखे सागडे नवरे ना ला कडो हीच अपेक्षा :) तर संसार ची गाडी व्यवस्थित चालेल निदान या दारू मुडे त्यात अडचण येणार नाही बरे ना :)
27 Mar 2013 - 6:02 pm | घन्चकर
अगदी खरे आहे तुमचे हे वाक्य 'शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे
आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो.
आणिक तुमचे खूप अभिनंदन, तुम्ही इतके वर्ष लष्कर मध्ये राहून सुधा या पासून दूर आहात,कारण हल्ली ची मुलं कंपनी चे कामा pressure मुढे प्यावेय लागते असली फुकट कारणे देतात.शेवटी दारू व्यसन कुठलाय परिस्थितीत नुकसान देः आणिक हि पड्वात नसावी एखादा त्रास किवा प्रेस्सुरे मधून बाहेर पडणा साठी
10 Mar 2013 - 4:03 pm | पैसा
11 Mar 2013 - 11:16 pm | ५० फक्त
लेख माहितीपुर्ण आणि डॉ. ख-यांचे प्रतिसाद अगदी उत्तम, माझ्या ब-याच मतांना बळकटी देणारे, खरोखर धन्यवाद खरे सर.
काही प्रतिसाद वाचुन मात्र एखाद्या बारमध्ये बसल्यासारखं वाटलं, अगदी ' बोल,बोल मी म्ह्णंतो ते साप बरोबर है ना, बोल बोल, दाखव दाखव कुठाय तो क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष .
असो, मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतो, आणि हो ब-याच वेळा माझ्या बददलची खरी मतं कळतात, सुधारणेला वाव मिळतो हे का कमी आहे.
12 Mar 2013 - 1:08 am | अभ्या..
मी पण. अगदी रोज.
अगदी कृतज्ञता दाटून येते त्यांच्याबद्दल
12 Mar 2013 - 3:24 am | अर्धवटराव
मी अगदी गटारात लोळत वगैरे नाहि पडलो कधि... पण खुप पिणे, खुप झिंगणे हा आपला आवडता छंद आहे. शिवाय यार-दोस्त मंडळी जमवुन बीअर, खाणं पिणं करत रात्री जागवाव्या हे तर इसी का नाम झिंदगी :)
पण साला एव्हढं पिऊन देखील एक बीअर सोडुन इतर कुठलच द्रव्य रंग-गंध-चवीवरुन ओळखता येत नाहि :(
अर्धवटराव
12 Mar 2013 - 4:24 am | श्रीरंग_जोशी
मूळ लेखाचा नसला तरी चर्चेचा जो विषय आहे त्यावर एक वाचनीय लेख -
मद्यप्राशनाच्या विळख्यात तरुणाई.
13 Mar 2013 - 6:06 am | पाषाणभेद
माहितीपुर्ण लेख.
सुबोध खरेंचे प्रतिसादही वाचण्यायोग्य व अंमलात आणण्यायोग्य आहेत.
15 Mar 2013 - 2:12 pm | नुमविय
सोत्री सर आणि खरे काका दोघेही आपल्या जागी बरोबर आहेत असे वाटते.... मला वाटत दारू चांगली कि वाईट ह्या पेक्षा जसा सोत्री सर म्हणाले तसा कि जे पिनार्यावर अवलंबून असता...मी स्वतः सहजावस्था खूप एन्जोय करतो..पण न कधी सवय लागली ओर लागेल.... मला वाटता कि आयुष्यात कुठे थांबायचा हे कळला न कि बर्याच गोष्टी साध्य होतात...
मी माझ्या वडिलांचे दोन मित्र दारूपायी देशोधडीला लागले आहेत हे बघितलाय.... जगात अशा बरायचं गोष्टी आहेत ज्या प्रमाणाबाहेर केल्या कि वाईट ठरू शकतात... मध्ये एक विशेष बातमी होती कि एका महिलेचा अति परमात कोक प्यायालामुळे मृत्यू झाला.... म्हणजे डॉक्टरांचा असा अंदाज होता.. ( हि शिंची लिंक काही सापडत नाहीये त्या बातमीची )....असो....
पण अजूनही बरेच लोक खरे काकांसारखे विचार करत नाहीत...म्हणजे जसा खरे काका म्हणतात कि ते दारू पीत नाहीत ह्यात विशेष अभिमानस्पद काही नाही तसे त्यांना असेही वातात नाही कि दारू पितात ते लोक वाईट...जे कि एकदम बरोबर आहे.... पण बरेच लोक असे मानतात कि एखादा दारू पितो म्हणजे तो काहीही ( ? ) करत असेल..मला आठवते एकदा मी एका पार्ट्य ला गेलो होतो ( मी शाकाहारी आहे ) एका युवतीने मला एक दिश दिली ज्यात नोन-वेग भात होता....मी म्हणालो कि मी नोन-वेग खात नाही...तर तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते कि ...आवरा!!!... ती म्हणाली अरे तू ड्रिंक्स घेतोस न म....मी म्हणालो मी ड्रिंक्स घेतो म्हणजे मी काय वाटेल ते खातो ओर करतो असा वाटत का तुला ??? म्हणजे अरे तू ड्रिंक्स घेतोस म्हणजे घरून पैसे चोरत असशीलच!!!! कमाल असते लोकांची
17 Mar 2013 - 10:55 am | विश्वनाथ मेहेंदळे
परमा* असा पण लई वाईट बघा. त्यातून अतिपरमा तर अति वाईट !!
*अर्थ कळला नाही तर सुबोधकाकांना सांगा. ते लगेच समजावून सांगतील :-)
21 Mar 2013 - 10:10 am | धमाल मुलगा
म्हेंदळे....आवरा!!! :D
फुटलो राव ठ्या: करुन...एव्हढ्या शिरेस मूडमध्ये चर्चा चालू होती अन एकद्म अतिपरमा कुठून आलं बॉ म्हणून चमकलो ना. :D
21 Mar 2013 - 6:26 pm | अधिराज
भातालाही "वेग" असतो कि काय?
15 Mar 2013 - 6:02 pm | सूड
डॉ. खरे यांचे प्रतिसाद आवडले. आमच्या एका पिकनिकला पिणार्या मंडळींनी ब्लॅक डॉगच्या दोन खंब्यांना उद्याची सकाळ दिसू द्यायची नाही अशी शपथ घेऊन प्यायला सुरुवात केली होती, पुढे रात्र चढत गेली तशी त्यांना चढत होती आणि शुद्धीवर असलेल्यांसाठी तो प्रचंड करमणूकीचा विषय ठरला होता. फुल्ल टल्ली झालेल्यांबरोबर मांडलेला रमीचा डाव आणि त्यात झालेली मजा मजा विसरु म्हणता विसरता येणार नाही.:D
15 Mar 2013 - 6:45 pm | गणपा
दोन्ही बाजुंचे मत प्रहाव वाचले.
काही अपेक्षीत प्रतिसाद नेहमी प्रमाणे अपेक्षीत आयडींकडूण आलेत त्यामुळे करमणूक झाली.
बाकी ज्याला झेपते/परवडते त्याने त्याच्या जवाबदारीवर (इतरांना त्रास होणार नाही हे पाहून. {इतरांची करमणूक होत असल्यास आमची ना नाही.} ) प्यावी.
बाकी सोत्रि एक लेख म्हणुन धागा आवडला.
15 Mar 2013 - 7:05 pm | दादा कोंडके
सहमत. हा प्रतिसादसुद्धा वाचून करमणुक झाली.
15 Mar 2013 - 7:35 pm | गणपा
चला घटकाभर का होईना तुमचीही करमणूक झाली. आनंदच आहे. :)
17 Mar 2013 - 3:42 am | निनाद मुक्काम प...
आमच्याकडे
बाबा बियर महात्म्य
संपूर्ण देशात गायले जाते , प्रत्येक शहराची एक बियर असते ,
त्यातसुद्धा कलोन व दिस्ल्डोर्फ मध्ये मुंबई पुण्यासारखंच विळ्याभोपळ्याचं नाते असल्याने आमचीच बियर चांगली अशी लाल करण्याची वृत्ती असते ,
, पण आजकाल आठवड्यातून एकदा क्वचित प्राशन केली जाते ,
ह्या न्यायाने आमचीच बायरिश बियर कशी चांगली , बियर प्यायची तर किमान एक मास म्हणजे एक लिटर चा प्याले कसे रिचवले पाहिजे ह्याचे वर्णन करणे ओघाने आले.
५०० ते २००ओ माणसे एकाचवेळी बसू शकतील एवढी भव्य व विशाल मोकळ्या वातावरणात उन्हाळ्यात अनेक बियर गार्डन जर्मनीच्या बवेरीया राज्यात आढळतात व ह्याचा कळस साध्य म्हणजे बवेरीया ची राजधानी म्युनिक मध्ये दोन आठवडे रंगवणारा
ऑक्टोबर फेस्टिवल.
थोडक्यात काय तर बियर म्हणजे आमचा जीव की प्राण
आमच्या इंग्लिश स्कॉच शी फ्रेंच कोर्नियाक शी व अमेरिकन कॉकटेल शी प्रतारणा करून आम्ही सध्या बियरच्या प्रेमात अखंड बुडलो आहोत
ह्या विषयावर लिहिण्यासारखे बरेच आहे ,पण सोत्री हे काम चोख पणे करतात तेव्हा शक्यतो वाचकांची भूमिका पार पडतो ,
हॉटेल व्यवस्थापन केले असल्यामुळे दारू हा नुसता पिण्याचा नसून पाजण्याच्या व त्याहून महत्त्वाचा म्हणजे अभ्यासाचा विषय होता.
बारावी नंतर सारे मित्र अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळले , नि आम्ही ह्या .........,
ते सर्व चार वर्ष सलग वायवा , सबमिशन्सच्या , आणि कायकाय विषयावर चर्चा करायचे ,
आणि माझे काय चालले आहे ह्यावर मी त्यांना आज वाईन कशी बनवितात ते शिकलो तर आज स्कॉच.....
तर पहिल्या वर्षाच्या शेवटी इंटर्नशिप करतांना पंचतारांकित हॉटेलात
कसे बनवून दिले व तिला ते आवडल्या वर तिने ,..... असो
करायला लागलो ,
एका नामांकित अभिनेत्रीला मी तिच्या आवडीचे कॉकटेल
तुझे जग वेगळे , नि आमचे जग वेगळे असे नाथा कामत ने ऐकलेले वाक्य
मी थोड्याफार शब्दांचा फेरफार होऊन कानावर पडायचे ,
टोम क्रुज चा कॉकटेल हा सिनेमा पाहून त्यांच्यासारखे जग्लिंग
पुढे मुंबई च्या अनेक नामांकित हॉटेलात ही कला सादर केली ,
त्यानंतर परदेशात शिकायला गेलो तेव्हापासून आजतागायत व्यवस्थापनाचे विषय शिकल्याने हॉटेलच्या कार्यालयात गळ्यात टाय व अंगावर कोट चढवून बाबूगिरी करायला लागलो ,
बाटलीला बेईमान झालो ,
तेव्हापासून ह्या विषयावर शास्त्रोक्त लिहिणे टाळतो , मनात कदाचित अपराधीपणाची भावना असावी.
18 Mar 2013 - 8:11 pm | मदनबाण
अंमळ झिंगलेला लेख ! ;)
बाकी डॉ.खरे यांचे प्रतिसाद आवडले. :)
19 Mar 2013 - 4:35 pm | प्यारे१
प्रतिसाद वाचून दारु पिऊन जेवढी चढेल त्यापेक्षा न पिता जास्त चढू शकते असं वाटू लागलंय....!
20 Mar 2013 - 9:02 am | श्री गावसेना प्रमुख
ह्या धाग्यावर सेसाँर शिप जोरात चालु आहे वाटतेय्,जय हो कात्रीवाले बाबा की
21 Mar 2013 - 10:22 am | धमाल मुलगा
डॉ. खरे ह्यांची मते पुरेपूर पटली.
पण काय करणार, आम्ही च्यायला वेगळीच लाईन पकडलेली आलरेडी. :)
बाकी काही म्हणा, सहा-आठ दोस्त मंडळी एखाद्या रिकाम्या फ्ल्याटवर जमवावीत, स्कॉचचे खंबे साक्षीला ठेऊन रात्री साडेआठ नऊला मैफिलीला सुरुवात करावी...गप्पांमध्ये तलत यावा, रफी यावा, मदनमोहन, गालीब, खय्याम हेही पाहुण्यांसारखे हजेरी लाऊन जावेत....सरत्या पेगांसोबत चर्चा आणखी निराळ्या विषयांकडे वळत जावी...कधी समाजकारण, कधी राजकारण कधी आणखी काही....चढत्या रात्रीनुसार विषय गूढ होत जावेत...लहानपणीच्या उन्हाळी सुट्टीची याद दिलवून राहील अश्या गप्पा रंगत जाव्यात..मध्येच जेवणाची गडबड उडून जावी......ते झाल्यानंतर बाल्कनीत उभं राहून शिलगावलेल्या सिगारेटीच्या धुरासोबत यारदोस्तांसोबत एखाद्या टेन्शनची चर्चा व्हावी....अन संपल्या सिगारेटीसोबत ती चर्चाही चुरगाळून 'छोड यार...चल! ग्लास रिकामे पडलेत बे!!!' असं म्हणून पण मैफिलीत घुसावं...तावातावानं चाललेल्या चर्चेत आपणही मुसंडी मारावी....... हे असं पार पहाटे पहाटेपर्यंत चालावं, दारावरची घण्टी वाजल्यावर आलेल्या पेपरसाठी तू-तू-मी-मी व्हावी...अन मथळ्याच्या बातमीवरुन पुन्हा खणखणीत चर्चा घडाव्यात. तोवर हातात वाफाळत्या चहाचा कप यावा... अशी साग्रसंगीत मैफील करणार्याला कितीही समजाऊन सांगितलं तरी तो काही सुधारणार नाही! :)
- (सुधारण्याच्या पलिकडला) ध.
21 Mar 2013 - 10:28 am | रुस्तम
बरेच दिवस झाले असा योग आला नाही. आठवण येते त्या सगळ्या दिवसांची.
21 Mar 2013 - 5:49 pm | सर्वसाक्षी
देवळात देवाला पेढा वा फळ ठेवतात तद्वत मला कुणी कधी खंबे वगैरे ठेवल्याचे स्मरत नाही!
22 Mar 2013 - 10:54 am | धमाल मुलगा
माफी असावी सरकार माफी असावी! गरीबाच्या तोकड्या शब्दसंपत्तीची ती चूक मानून माफ करावी. पुढल्या वेळेस तिसर्याच्या आमटीचा नैवेद्य दाखवण्यात येईल. :)
21 Mar 2013 - 6:20 pm | अप्पा जोगळेकर
खास. एकदम खासच.
22 Mar 2013 - 10:13 am | शिद
हम्म्म्...जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या होउन डोळे पाणावले... :(
मायाला, लग्न झाल्यापासुन अश्या मौजमजेला कायमचा मुकलो असे वाटु लागले आहे.
22 Mar 2013 - 10:16 am | शिद
कॄपया मायाला हे मायला असे वाचावे.
22 Mar 2013 - 10:30 am | सुबोध खरे
वा
ध मु साहेब
फार दिवस झाले अशी मैफिल जमवून मी दारू पीत नसलो तरी अशी कंपनी फारच आवडते. आणि अशा मैफिलीत एखादा अरसिक विचारतोच दारूचे दुष्परिणाम? माझे त्याला तेथे एकच सांगणे असते झणझणीत मिसळ खाताना मूळ व्याधीची आठवण काढता का?
.गप्पांमध्ये तलत यावा, रफी यावा, मदनमोहन, गालीब, खय्याम हेही पाहुण्यांसारखे हजेरी लाऊन जावेत....सरत्या पेगांसोबत चर्चा आणखी निराळ्या विषयांकडे वळत जावी...कधी समाजकारण, कधी राजकारण कधी आणखी काही....चढत्या रात्रीनुसार विषय गूढ होत जावेत...लहानपणीच्या उन्हाळी सुट्टीची याद दिलवून राहील अश्या गप्पा रंगत जाव्यात..मध्येच जेवणाची गडबड उडून जावी....
वा वा वा आठवणीनीच छान वाटायला लागलंय.
तेंव्हा मैफिल केंव्हा लावताय?
आपला कृपाभिलाषी
सुबोध
22 Mar 2013 - 10:59 am | धमाल मुलगा
बाकी, ते साहेब वगैरेला लावा हो काडी. सरळसोट 'धम्या' म्हणायचं ते राहिलं कुठे..अन साहेब नी फिहेब कशाला ते? :)
मैफिल तर जरुर रंगेल. कधी अन कशी ठरतेय त्यानुसार तुम्हाला कळवायचे व्यवस्था करुच आता नक्की. काय? :)
आपला मित्र
धम्या.
22 Mar 2013 - 2:02 pm | सोत्रि
ब्वाँर...
तिकीटाची सोयही करणार का ते बोल का नुसताच हिरवा माज म्हणायचा?
-(मैफिलोत्सुक)
अवांतर:पावसाळ्यात पन्हाळा, लता आणि तलत ची गाणी आणि सिंगल माँल्ट असा बेत ठरला आहे
23 Mar 2013 - 10:18 am | धमाल मुलगा
ते डाक्टरसाहेब मैफिलीचा मझा लुटायला येतो म्हणताहेत अन तुम्ही लावा नाट!
अरे सोकाभैय्या, अरे, शौक करायचे, तर त्यांची खिदमतदेखील करायलाच पाहिजे! तुम्ही मैफिल तरी ठरवा, शक्य झालंच तर येऊ आम्हीही गोर्या सायबाला चुना लाऊन :)
- धमाजी देवासकर. :)
2 Apr 2013 - 7:28 pm | मन१
ह्याच धाग्यात का कुठंतरी प्रा डॉ बिरुट्यांनी म्हटल्याप्रमाणं धमुच्या जिंदादिलीचा हेवा वाटतो खरं.
22 Mar 2013 - 11:42 am | विश्वनाथ मेहेंदळे
दारूविरोधविरोधकांनी आवर्जून वाचवा असा प्रतिसाद :-)
27 Mar 2013 - 12:02 am | चिगो
मुजरा घ्यावा, मालक.. स्साला, कसली याद आणून दिलीस, दोस्ता.. व्वाह ! दारु ही प्यायची असेल, तर अश्याभ-या मैफिलींसाठीच प्यायची असते. आणि एक अगावू सजेशन, पुढच्या मैफलीत पांचाळेच्या गझला लावून बघ. स्पेशली 'एक जखम सुगंधी'.. मी हा प्रयोग केलेला नाहीये,पण करायची इच्छा नक्कीच आहे.. :-)
( यारा-दोस्तांच्या मैफिलीची चाह असलेला) चिगो
27 Mar 2013 - 6:17 am | धमाल मुलगा
भीमराव पांचाळे मैफिलीत आले अन एखादं रडूबाई असेल तर पुरता राडा होतोय मर्दा! उगं रात्री अडीच अन तीन वाजता समजूत घालत बसावी लागते. त्यापेक्षा भाऊसाहेब पाटणकर हवेत. नुस्ता धिंगाणा होतोय खरं!
2 Apr 2013 - 4:06 pm | चिगो
एखादं रडूबाई असेल तर पुरता राडा होतोय मर्दा!
हे आगदी बरुबर, दोस्ता.. त्यातल्या त्यात "टूटे दिल सनम" असला तर मेलेच बाकीचे.. :D
21 Mar 2013 - 3:37 pm | उगा काहितरीच
धन्यवाद सोत्री साहेब, आपल्या अश्या अभ्यासपुर्ण लेखांमुळे आमच्यासारख्या न पिणा-यांनादेखिल फुकट्ची "शाईन" मारता येते. :)
24 Mar 2013 - 9:51 pm | श्रीरंग_जोशी
या विषयांवर जाणकारांनी लिहून माझ्यासारख्या अज्ञानी लोकांस उपकृत करावे.
24 Mar 2013 - 10:35 pm | सोत्रि
http://www.countyofsb.org/uploadedFiles/phd/Tobacco_Prevention/Tobacco%2...
सध्या एवढेच. बाकीचे व्यनितून बोलूयात.
- (साकिया) सोकाजी
24 Mar 2013 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी
सवडीने वाचून पुढील प्रश्न व्य.स. ने विचारतो.
27 Mar 2013 - 9:23 am | श्रीरंग_जोशी
या दुव्यावरील माहिती बघून अपेक्षाभंग झाला.
# सोत्रि - आता व्य. स. मधून काय कप्पाळ विचारणार?
25 Mar 2013 - 1:28 am | रेवती
लेख आणि चर्चा वाचली. डॉ. खरेसाहेबांचे प्रतिसाद आवडले. बाकीच्यांचे समजले नाहीत्......शुद्धीत असूनही! ;)
एकदा दोन दारवा एकेक चमचा पिऊन पाहिल्या. कडवट टाईपच्या होत्या. लोकांना ही चव का आवडत असावी असा प्रश्न पडला होता पण नंतर जी झोप आली त्याने प्रश्नाचा विसर पडला. पास्त्याचा एक सॉस करताना त्यात मद्य घालण्यास सांगितले होते. तेवढ्यासाठी बाटली विकत आणली. पावकप मापाने ते पास्ता सॉसमध्ये ओतले. नंतर जी झोप आली की विचारता सोय नाही. उरलेली बाटली बरेच दिवस पडून होती. शेवटी टाकून दिली.माझा अनुभव हा एवढाच आहे. ;)
25 Mar 2013 - 8:55 am | सोत्रि
मद्य सांगितले होते की वाइन घालायची होती?
वाइन असल्यास कुकिंग वाइन वेगळी असते नेहमीच्या पीण्याच्या वाइनपेक्षा.
-(साकिया) सोकाजी
25 Mar 2013 - 6:58 pm | रेवती
लाल वाईन सांगितली होती म्हणून दारूच्या दुकानात जाऊन कुकींगसाठी हवी आहे म्हणताच त्या बुवाने अमूक एक प्रकार सुचवला (नाव आठवत नाही, सुमारे १० वर्षे जुनी गोष्ट असल्याने). तो आणून मापाने पदार्थात घातला. आता कदाचित तुम्ही म्हणाल की ती फारच सौम्य असते, चढत नाही, झोप येत नाही पण आम्हाला आली, त्याला काय करणार?
वाईन, बियर ही दारू नाही असे काहीजण मानण्याची शक्यता आहे पण बियर व वाईन ही दारूच आहे हे नक्की (निदान माझ्यासाठी तरी). मी एरवी चहा कॉफी घेत नाही त्यामुळे कधीकाळी नाईलाजाने मद्रासेस कॉफी प्यायले आणि दोन रात्री टक्क जागी होते. नंतर त्या वाटेला गेले नाही. तुमच्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयीपेक्षा वेगळा पदार्थ असल्यास त्याचा किंचित परिणाम होत असावा पण हे अगदी सुक्ष्म असावे. पेयाच्या बाबतीत जरा जाणवत असेल एवढेच! तुमची कॉक्/मॉकटेल्स पाहणे, कुकींगमध्ये वाईन वापरणे यास माझा विरोध नाही हे आपल्याला आपल्या धाग्यांवरचे माझे प्रतिसाद पाहून समजले असेलच पण माझ्यासाठीतरी हा प्रकार वर्ज्य आहे. कुतुहल शमण्यापुरती चव पाहून झाली आहे.
25 Mar 2013 - 4:07 am | निनाद मुक्काम प...
येथे काही गोष्टींचा खुलासा करतो ,
दारू वर माझे व्यावसायिक अनुभवावर आधारलेले मत मागच्या वर्षी गुजरात मधील दारू बंदी ह्या लेखात तर महिलांविषयी मत महिला दिनाच्या दिवशी मांडले होते.
ह्या विषयी खरे ह्यांनी शास्त्रीय माहिती दिली ती चर्चेच्या ओघात हा पिलियन ह्यांचा मुद्दा पटला होता. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांची मते जी ते स्वतः दारू न पिता वैयक्तिक
मते मांडत होते जो त्यांचा हक्क असेल तर माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे ,
सोत्री ह्यांचे दारू विषयी लेख हे काही मिपावर नवे नाही ,त्यांचा दारू विषयी दृष्टीकोन सुद्धा आपल्याला माहिती आहे.
खरे ह्यांनी त्यांच्या एका प्रतिसादात आपण दारू पीत नाही हे सांगणे म्हणजे आपला दांभिकपणा आहे असे ते स्वतः मानतात असे लिहिले ,
मात्र ह्या नंतरच्या अनेक प्रतिसादात आपण दारू पीत नाही , नौदलात राहून ती पीत नाही हे अनेक प्रतिसादात कारण असतांना व नसतांना सांगत राहिले ,
ह्या मिपावर ह्या आधी अनेक मान्यवर दारूच्या थेंबाला स्पर्श सुद्धा करत नाही मात्र
त्यांनी कधीच स्वतःची जाहिरातबाजी केली नाही किंवा इतरांना सल्ले दिले नाही.
सोत्री ह्यांच्या धुंदव बेधुंद करणाऱ्या धाग्यांचा निर्मळ आनंद घेतला ,उगाच मिठाचा खडा टाकला नाही ,
दारू काय किंवा खाणे काय अति तेथे माती हे मी माझ्या प्रतिसादातून अनेक वेळा लिहिले होते , ह्याबाबत कोणाचे दुमत नव्हते , पण तरी खरे ह्यांची वैयक्तिक मते
मला प्रचंड एकांगी व नकारात्मक वाटली..
ते एकेठिकाणी म्हणतात की ते पीत नसले तरी मैफलीत मित्रांना साथ देण्यात बसतात व तेथे त्यांना दारूचे दुष्परिणाम देणे आवडत नाही, मग सोत्रींच्या धाग्यावर ते देण्याचे
त्यातही महिलांना देण्यामागे काही विशेष प्रयोजन आहे का ,
माझ्या व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर सांगतो ,
मी भारतात ज्या महिला दारू पितात त्यांच्या मध्यमवर्गीय , उच्च मध्यम वर्गीय , आणि श्रीमंत
व अती श्रीमंत अश्या सर्व गटांच्या महिलांना भारतात साडेतीन वर्ष मदिरा पाजली आहे , , पुढे परदेशात काही वर्ष हेच कार्य केले आहे ,
माझा अनुभव भारतातील असा सांगतो की बायका बहुदा समूहात उच्चभ्रू नाहीतर बर्यापैकी चांगल्या बार मध्ये जातात, ह्यात उच्च पदावर काम करणाऱ्या किंवा गृहिणी ज्यांचे पती उच्च पदावर आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय आहे, किंवा अभिनय व मॉडेलिंग करणाऱ्या व श्रीमंत घरातील मूली सुद्धा येतात ,
आता खरे ह्यांनी जो सल्ला दिला आहे तो मिसळपाव वर दिला आहे ,येथे शक्यतो
मध्यम व उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रींमत महिला मिपाकर असतील.
माझा त्यांच्या बाबतीत अनुभव सांगतो ,
शक्यतो त्या परिवार किंवा मित्र मैत्रिणींच्या समूहाबरोबर बार किंवा उपहार गृहात जातात ,
पब किंवा डिस्को मध्ये शक्यतो एकट्या जात नाही , व जर एखादी डेट वर पहिल्यांदा आली असेल हे प्रमाण ह्या गटांच्या मध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी असते पण जर त्या आल्या असतील ,
तर जुजबी ओळखीवर किंवा एका अनोळखी व्यक्तीकडून त्या ड्रिंक स्वीकारत नाही ,
हे माझे निरीक्षण व अनुभवांच्या अंती मत आहे ,
दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपण कोणत्या समाजात वावरत आहोत , येथे पुरुषांच्या नजरा कश्या असतात ,
ह्यांची त्यांना पूर्ण कल्पना असते ,
त्या शक्यतो एकट्या जात नाहीत , व जर कामानिमित्त एखाद्या कलीग सोबत गेल्या तरीही ,फुकट मिळत आहे म्हणून त्या पीत नाही ,
अनोळखी मुलीला जुजबी ओळखी वर दारू पाजून आपला स्वार्थ साधने एवढे सोपे असते तर पिक अप पोइंत व डान्स बार रिते पडले असते.
पंचतारांकित हॉटेलात मी अनेक उच्च पदस्थ भारतीय महिला पहिल्या आहेत ज्या उच्च मध्यमवर्गीय व श्रींमत ह्यांच्या सीमा रेषेवर असतात , त्या जुजबी ओळख झालेल्या व्यक्ती समवेत ड्रिंक करतात पण हे मी अनुभवाने सांगतो त्यांचे वागणे , बोलणे , कमालीचे आत्मविश्वास पूर्ण असते व त्यांना कुठे थांबायचे ह्यांची बरोबर जाण असते , त्यांना संभाषण करणारा आपला कलिंग आपल्याला त्यांच्या रूम मध्ये नेण्याच्या विचारात आहे का हे पहिल्या काही मिनिटात कळते. ते आता आम्हाला ही अनुभवाने कळायला लागले होते ,
मिपावर ज्या महिला दारू पितात त्यापैकी एकी ने जरी मला येथे नमूद केले की
सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायची का नाही किंवा ती कोणासोबत प्यायची
व कंपनीच्या कामानिमित्त असलेल्या पार्टीत अनोळखी व्यक्ती सोबत कसे वागावे हे त्यांना खरे ह्यांच्या सल्ल्यामुळे
कळले ,आधी ह्याबाबत त्याचे ह्याबाबतीत नॉलेज
शून्य होते ,
तर मी खरे ह्यांची जाहीर माफी मागायला तयार आहे ,
त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता ,
स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला ,
सोत्री ह्यांचे ह्या पूर्वी येथे दारूवर अनेक लेख आहे , कोठेही तिचे उदात्तीकरण नव्हते तर पेठकर काका म्हणतात तसे ह्या कलेला आस्वाद कसा घ्यावा ह्यांचे तो साक्षात्कार
असायचा, अनेक दारू न पिणाऱ्या सन्माननीय मिपाकरांनी दाद दिली आहे ,
प्रवचन दिले नाही आहे ,
दारू व व्यसनाधीनता ह्या बाबतीत अनेक स्तरातील अनेक देशातील दारू पिणाऱ्या व्यक्तींशी संभाषण करून हे मत बनवले आहे.
दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचे भाग होता.
म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......)
एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो.
येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.
दारू हे केवळ एक निमित्त असते.
मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो.
कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मग त्यासाठी वास्तविक जगातील एखादे व्यसन उदा दारू हि त्या इसमास खर्या आयुष्यातून एखाद्या मोहमयी जादुई दुनियेत नेऊन ठेवते. तेथे मिळणारा क्षणिक आनंद व त्यात दुनियेत चालणारी आपली अधिसत्ता त्या दुनियेत आपल्याला सारखे रमविण्यास प्रवृत्त करते ह्यालाच मग व्यसन लागणे असे म्हणतात.
माझ्या पाहण्यात अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोटीव. लक्ष्य ,उद्दिष्टांचा अभाव हे देखील रिकामे डोके सैतानाचे घर ह्या न्यायाने दारूचे व्यसन म्हणावे इतपत दारू पितात ,
दारूचे व्यसन लागणे म्हणजे नक्की काय त्याशिवाय तुम्ही राहू न शकणे
माझ्या पाहण्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांना रात्री अर्धा खंबा लागतो काहींना पूर्ण पण त्यांच्या व्यवसायात व जीवनात ते आजतागायत यशस्वी गणले जातात
किचन मधील सुरीने एरवी भाजीपाला कापला जातो मात्र एखादा त्याने दुसर्याचा किंवा स्वतःचा गळा चिरतो ,किंवा कोथळा बाहेर काढतो.
दारू वाईट नाही वाईट आहे ती नकारात्मक मानसिकता.
,
25 Mar 2013 - 4:36 am | श्रीरंग_जोशी
हे वाक्य खूपच भावले.
गेल्या काही वर्षांत मी आंतरजालाच्या खूपच आहारी गेलेलो आहे. वरील विचार वाचून माझ्या या व्यसनाच्या तीव्रतेची मला जाणिव झाली आहे.
पण काहीही झाले तरी मी अध्यात्माच्या आहारी जाईन असे वाटत नाही :-).