दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात...
कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल :) )
दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून.
व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते.
लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात.
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते.
ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे.
ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.
आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते.
ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते.
तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो.
त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
प्रतिक्रिया
25 Mar 2013 - 8:49 am | सोत्रि
सर्व प्रतिसादांमधला खराखुरा 'अप्रतिम' प्रतिसाद!
-(रसिक) सोकाजी
25 Mar 2013 - 9:12 am | पैसा
डॉक्टर खरे यांचे प्रतिसाद अजिबात उपदेशाचे डोस पाजणारे वाटले नाहीत. ज्यांना तसे वाटले असेल त्यांना आपण दारू पिऊन काहीतरी चुकीची गोष्ट करत आहोत असे आंतर्मनात खवखवत असावे. डॉक्टरांची भाषा सगळीकडे अत्यंत नम्र आहे. मला एवढे थंड राहणे जमले नसते. नकारात्मक मानसिकता वगैरे मला तरी डॉक्टरांच्या प्रतिसादात कुठेही दिसली नाही. कोणत्याच बाजूचे उदात्तीकरण करू नका असे त्यांनी सांगितले आहे जे अत्यंत समतोल आणि योग्य आहे. ते फक्त वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत आहेत. तुम्हाला जर कोणी चांगले सांगितलेले पटत नसेल तर सोडून द्या. उगीच वैयक्तिक शेरेबाजी करायची गरज नाही.
एक संपादक म्हणून मी निनादचा खटकलेला प्रतिसाद सहज संपादित करू शकले असते पण त्याने त्याचे मिपावरचे सुरुवातीचे दिवस आठवावेत एवढेच सांगेन. त्याच्या टायपिंगला हसणार्यांमधे मीही होते हे इथे कबूल करते, पण नंतर त्याने जिद्दीने परत येऊन आंतर्राष्ट्रीय राजकारणावर माहिती देऊन आणि एकूण आपला वावर सर्वांना आवडेल असा करून दाखवला. आता या परिस्थितीत अशी वैयक्तिक शेरेबाजी निनादकडून अपेक्षित नव्हती.
कोणताही डॉक्टर फुकट वैद्यकीय सल्ला देत नाही. त्यांच्या क्लिनिकमधे जाऊन पैसे मोजले की त्याची किंमत आपल्याला कळते. परंतु डॉक्टर खरे यांची नेव्हीची पार्श्वभूमी असल्याने ते आपल्या ज्ञानाचा फायदा सर्व सामान्यांना करून देत आहेत तर त्यात काय चूक झाली हे मला कळत नाही. आतापर्यंत इथे दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यांबद्दल डॉक्टरांचे मी जाहीर आभार मानते आणि यापुढेही त्यांनी असे सल्ले देत रहावे अशी कळकळीची विनंती करते.
25 Mar 2013 - 12:58 pm | कवितानागेश
त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता ,
स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला ,>
हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे, आणि हे सांगताना मला अतिशय खेद वाटत आहे.
डॉक्टरांनी before and during preganancy मद्य नको, असे साम्गितले आहे, असे मी जे काही प्रतिसाद वाचलेत त्यातून मला कळलंय. आणि ३ वेळा प्रतिसाद वाचून मला कळलंय ते बरोबर आहे हेदेखिल कळलंय!
इथे प्रक्रुतीशी संबंधित धोका सांगितलेला आहे.
त्याला काही लोक्स विनाकारण फाटे फोडातायत.
सोत्री दारु म्हणजे काय आणि ती कशी प्यावी, बेतानी प्यावी अश्याच प्रकारे काही गोष्टी सांगतायत
आणि डॉक्टर ती पिताना काळजी काय काय घ्यावी हे सांगतायत...
आणि लोक्स काय वाट्टेल ते सांगतायत असं माझे निरिक्षण आहे! :)
25 Mar 2013 - 2:16 pm | सुबोध खरे
१०० टक्के मान्य
माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे.१०० टक्के मान्य.आपण गोष्टी फार वैयक्तिक पातळीवर आणता.
दारू पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचे भाग होता
.तसेच दारू पिऊ नका हा सल्ला देणे हा आमच्याही चरितार्थाचा भाग आहे साहेब.
You can win an argument but cant change someone’s point of view.
म्हणून मी हा वाद थांबवला होता.
माझ्या मनात कोणताही किंतु नाही.आपलेही मन साफ असेल अशी अपेक्षा करतो.
कळावे लोभ असावा.
सुबोध
25 Mar 2013 - 4:37 pm | निनाद मुक्काम प...
येथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आहे , की दारू न पिणाऱ्या व्यक्तींना खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले आहेत , पण माझे प्रतिसाद त्यांना खटकले ह्याबाबत मला काही आक्षेप नाही ,पण वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्यांनी खरे ह्यांचे प्रतिसाद जेवढे नीट वाचले तेवढे माझे वाचलेले दिसत नाहीत ,
उदा हे वाक्य त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता ,
स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला ,>
ह्यावर एका महिला मिपाकाराने आक्षेप नोंदवत हे पुढील विधान केले
हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे, आणि हे सांगताना मला अतिशय खेद वाटत आहे.
डॉक्टरांनी before and during preganancy मद्य नको, असे साम्गितले आहे, असे मी जे काही प्रतिसाद वाचलेत त्यातून मला कळलंय. आणि ३ वेळा प्रतिसाद वाचून मला कळलंय ते बरोबर आहे हेदेखिल कळलंय!
इथे प्रक्रुतीशी संबंधित धोका सांगितलेला आहे.
आपण माझा प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात येते .तर मी स्पष्ट हा उल्लेख केला आहे.
ह्या विषयी खरे ह्यांनी शास्त्रीय माहिती दिली ती चर्चेच्या ओघात हा पिलियन ह्यांचा मुद्दा पटला होता. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांची मते जी ते स्वतः दारू न पिता वैयक्तिक
मते मांडत होते जो त्यांचा हक्क असेल तर माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे ,
सार्वजनिक ठिकाणी महिलांनी दारू पिण्यापूर्वी विचार करावा किंवा अनोळखी माणसासोबत दारू पिऊ नये ह्या सल्याला आहे ,
मुळात येथे खरे ह्याना दारू पिणाऱ्या ज्या मिपाकर महिलांना हा दिव्य संदेश देणे अपेक्षित आहे , त्यांना मी नम्रपणे माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितले आहे , ह्या सल्याची महिलांना अजिबात गरज नाही कारण त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे ह्याचे पूर्णतः आत्मभान असते , गंमत म्हणजे येथे दारू न पिणारे अत्यंत हिरारीने ज्यात महिला सुद्धा आल्या त्या मत मांडत आहेत , पण मी आधी म्हटले तसे ज्या महिला मिपाकर दारू पितात त्यांचे खरे ह्यांनी त्यांना दिलेल्या अनाहूत सल्ल्याबद्दल
काय मत आहे ,हे कळले नाही , आदितीने तिचे मत खरे ह्यांना साफ सांगितले , सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय करावे ,दारू प्यावी की पियू नये हे महिलांना व्यवस्थित कळते , त्यांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पुरुषासोबत कसे वागावे , दारू प्यावी का हे सांगण्याची गरज अजिबात नाही , त्या सक्षम व सबल आहेत , अदिती हिने योग्य शब्दात आपला मुद्दा मांडला की आजपर्यंत वृत्त पत्रात जेवढे बलात्काराची प्रकरणे आपण वाचली त्यात महिला दारू पीत होत्या का
सार्वजनिक ठिकाणी भारतात जेथे महिला दारू पितात तेथे वातावरण अत्यंत सुरक्षित असते हे माझे व्यावसायिक मत आहे , जे मांडण्याचा मला अधिकार आहे ,
आणि मी आधीच म्हटले आहे , माझा आक्षेप खरे ह्यांनी दारू पिणाऱ्या महिला मिपाकरांना सल्ला दिला त्यावर आहे , हा माझा आक्षेप t ज्या दारू पिणाऱ्या महिला मिपाकर आहेत त्यांना खटकला नसावा. , पण ज्या महिला मिपाकर दारू पीत नाहीत त्यांना खटकला , हाच नेमका विरोधाभास मला खटकतो ,
खरे साहेब तुमची शास्त्रीय विधानांवर मी आक्षेप घेतला नाही आहे , पण त्या व्यतिरिक्त
तुम्ही जी विधाने करत आहात त्यात प्रचंड प्रमाण कमालीची विसंगती मला आढळून आली , तुमच्या ह्याच धाग्यात तुम्ही स्वतः परस्पर विरोधी विधाने करून अनेकांची दिशाभूल करत आहात असे माझे मत आहे ,उदाहरणार्थ
तसेच दारू पिऊ नका हा सल्ला देणे हा आमच्याही चरितार्थ भाग आहे साहेब.
तुमच्या आधी अनेक प्रतिसादात दारू पिण्यावर तुमचा आक्षेप नाही , मित्रांच्या मैफिलीत तुम्ही सामील होता , किंवा धमाल मुलगा ह्यांच्यासोबत मैफलीचे प्लान रचणे किवा अभिषेक ला तुला प्यायची असेल तर खुशाल पी ,फक्त फुकट मिळते म्हणून पियू नको अश्या अनेक वाक्याच्या पार्श्वभूमीवर तुमचे वरचे विधान तुम्हीच पहा ,
खरे व मी व सोत्री ह्यांनी आधीच अनेक प्रतिसादात म्हटले आहे ,संतुलित प्रमाणात दारूच नाही तर खाणे ठेवले तर आरोग्याला धोका नाही ,
माझ्या पाहण्यात अनेक डॉक्टर दारू पितात , परदेशात आणि भारतात सुद्धा ,
आणि पैसा ताई
माझे सुरवातीचे दिवस आठवले तर एक गोष्ट प्रकाशाने जाणवते
आंतरराष्ट्रीय राजकारणावर मी एक लेख लिहिला व त्यानंतर माझे आख्यान सुरु केले ,
त्यात मी माझे स्वतःचे वैयक्तिक अनुभव मांडत होतो ,ही मालिका दीर्घ चालली, त्यात
माझे शुद्ध लेखन व नंतर अनेकांशी वाद झाले ज्यात आदिती अग्रस्थानी होती ,
पुढे मला समज मिळाली व मी वयक्तिक हल्ले माझ्या लेखनातून कटाक्षाने टाळले ,
पुढे मी भारतावर आधरित प्रवास वर्णन सुरु केले त्याच सोबत मी अनेक विविध विषयांवर सुद्धा लिखाण केले , ज्यात गुजरात दारू बंदी व महिला दिवस ते अनेक विविध विषय ,आपण संपादक आहात आपण ते जुने लेख पाहू शकतात ,
आता ह्या सगळ्यात तुम्हाला माझे लेखन म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय राजकारण असेच वाटत असेल तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपला माझ्याविषयी अभ्यास तोडका आहे ,आंतर्राष्ट्रीय राजकारणावर माहिती देऊन मी माझा वावर मिसळपाव वर सहज केला. विशेषतः ह्या मुद्द्यावर. कारण येथे मी फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणच नव्हे तर प्रवास वर्णन असो किंवा इतर कोणतेही विषय असो त्यावर माझ्या कुवतीने लिखाण व प्रतिसाद देत असतो ,
असे माझे मत आहे. बहुदा त्यामुळे माझा येथे वावर सुसह्य झाला असावा , माझ्या ऑक्टोबर फेस्ट वरील लेखावरील प्रतिसाद वाचलेतर तुम्हाला मी काय म्हणत आहे हे कळेल ,
फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणावर लेख ,,,,,,, हे तुमचे माझ्याविषयी मत मला पटले नाही ,
कारण माझ्या जर्मन आख्यान मला असो किंवा भारतीय दास्ताने किंवा इतर अनेक विषय असो सगळ्यांना मिपाकारणी भरपूर प्रतिसाद दिला , आता तुम्हाला माझे फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिखाणच दिसते हा माझा दोष नाही ,
दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रतिसादात लिहिले की कोणत्याच बाजूचे उदात्तीकरण करू नका असे त्यांनी सांगितले आहे मात्र पुढच्याच प्रतिसादात त्यांचे वाक्य मला कमालीचे विसंगतीचे वाटते ,
डॉक्टर म्हणून कर्तव्य ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
डॉक्टर म्हणून शास्त्रीय माहिती देणे कर्तव्य मी समजू शकतो ,
पण डॉक्टर म्हणून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे सांगणे ,,,,,,,,,,,
महिलांनी कसे वागावे ,काय करावे , काय करू नये हे कोणत्याच बाबतीत महिलांना पुरुषांनी सांगायची अजिबात गरज नाही आहे असे माझे फार पूर्वी पासून मत आहे,
माझा मागच्या वर्षात महिला दिनावर माझे मनोगत हा लेख वाचा , त्यांच्या शेवटी एका वाक्यात मी हीच भूमिका मांडली आहे ,
25 Mar 2013 - 7:32 pm | पैसा
निनाद, माझा या लेखावरचा शेवटचा प्रतिसाद. तू डॉ. खरे यांचेच नव्हे तर माझाही प्रतिसाद पूर्ण वाचून समजून घेऊन उत्तर लिहिले आहेस असे वाटत नाही.
हे सगळे का सर्जनला उद्देशून म्हणणे मला अजिबात पटले नाही. तेही त्यांनी अगदी सरळपणे सांगितल्यानंतर?
तरीही वैद्यकीय सल्ला काय विचाराल तर हा आहे इतकं स्पष्ट लिहिलेलं असताना त्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल वैयक्तिक विधाने करण्याची गरज नव्हती. आजपर्यंत डॉ. खरे यांनी एकाही मिपाकराबद्दल अशी शेरेबाजी केलेली मी पाहिली नाही. तूही ते टाळलेस तर बरे.
25 Mar 2013 - 11:42 pm | निनाद मुक्काम प...
पैसा ताई
कसे आहे माझा मुद्दा एवढाच आहे अवांतर करून की दारू पिणाऱ्या महिला मिपाकरांना ह्या धाग्यावर सल्ला देणे मला प्रशस्त वाटले नाही , माझ्या पाहण्यात महिला अत्यंत सजग असतात त्यांना पुरुषांच्या नजरेची जाण असते ,
दुसरा मुद्दा खरे हे सर्जन आहेत पण मी त्यांच्या शास्त्रीय माहितीवर आक्षेप घेतला नाही ,
मात्र स्वतः दारू न पिता जे दारू पितात त्यांना त्यांनी दांभिक म्हणणे मला भयानक खटकले ,
मी आधी लिहिले होते की माझ्या मते की प्रत्येक माणसाचे आपण आयुष्यात जी कृती करतो त्याबद्दल एक स्पष्टीकरण तयार असते ,
एखादा माणूस जेव्हा म्हणतो की मी कंपनी साठी पितो तेव्हा त्यावर विश्वास का ठेवू नये ह्याबाबत ठाम असे तार्किक किंवा शास्त्रीय मत खरे ह्यांच्या कडे आहे का
त्यांना वाटते म्हणून त्यांनी लिहिले ह्या न्यायाने मला त्यांचे सल्ले महिलांना उद्देशून प्रवचन मोड वाले वाटते , त्यांचे लोकांना दांभिक म्हणायचे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही मान्य करत असाल किंवा आवडून घेत असाल तर त्यांच्या लेखनाला प्रवचन म्हणायचे माझे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही का बरे मान्य करत नाहीत ,म्हणजे तुमच्या मनात अगदी प्रतिसाद संपादित करण्याएवढा विचार आला
त्यांच्या लेखनावर मी शाब्दिक हल्ले चढवले ते मी त्याच समयी श्री गुरुजी ,ह्यांच्यावर सुद्धा एका वेगळ्या धाग्यावर चढवले ते कुणाला का बरे खटकले नाही ,
कदाचित गुरुजींनी आपण कोठे नोकरी केली आपला व्यवसाय कोणता हे तपशीलवार पणे परत परत मिपावर सांगितले असते तर त्यांच्या बाजूने काही प्रतिसाद नक्कीच आले असते असे आता मला वाटते.
मी आयुष्यात कोणालाच दांभिक म्हणत नाही , प्रत्येकाची आपली ठाम विचारसरणी असते व आपल्या कृतीच्या समानार्थक स्पष्टीकरण असते ,
माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी कंपनी साठी दारू पिणारे अनेक जण पहिले आहेत ,
ह्यात अनेक मध्यमवर्गीय महिला ह्या घरी नवर्याला कंपनी देण्यासाठी पितात , अनेक व्यापारी लोकांच्या बायका पार्टी मध्ये कंपनी द्यावी म्हणून पितात ह्यात त्यांना ती दारू आवडते का नाही हा मुद्दा नसतो ,कारण ह्या दोन्ही वर्गातील बायका, नवरा नसतांना कधीच एकटे किंवा मैत्रिणी सोबत एकट्याने येउन दारू पीत नाहीत , हे माझे व्यावसायिक निरीक्षण आहे.
आमच्या डोंबिवली सारख्या पांढरपेशा शहरात आमच्या इमारतीत असे उदाहरण होते.
सोत्री ह्यांच्या धाग्यात अवांतर झाले तेव्हा दारू न पिणाऱ्या मंडळीनी येथे खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले हे आवर्जून सांगितले मात्र हे सांगतांना खरे ह्यांची दारूविषयी मते अत्यंत एकांगी होती हे अनेकांना खटकले नाही ह्यांचे सखेद नवल वाटले ,
एक छोटे उदाहरण देतो , सार्वजनिक ठिकाणी महिलांनी दारू पिण्यापूर्वी विचार करा
ह्यावर दादा कोंडके ह्यांनी अत्यंत समर्पक मुद्दा मांडला की मैत्रिणींना सावरणारे व साथ देणारे व गैरफायदा न घेणारे सुद्धा मित्र असतात ,पण त्यांचे हे मत खड्यासारखे बाजूला टाकल्या गेले ,त्यांचा हा मुद्दा अजिबात विचारात घेतला नाही ,
विश्वास ठेवलेल्या माणसाने विश्वासघात करायचा असेल तर तो केव्हाही करतो
ह्या समाजात निर्भायाचा बलात्कार करणारे पुरुष असतील तर तिच्या साठी जीवाची बाजी लावणारा तिचा मित्र सुद्धा असतो ,
थोडे कच्चे हे ,पर बंदे अच्छे हे ,
ताजा कलम
एकेकाळी माझे अदितीची टोकाचे वाद झाले , पण ह्यावेळी मला तिचा मुद्दा पटला
विशेषतः तिने प्रांजळपणे तिची बाजू मांडली. कारण सल्ला तिला उद्देशून होता , येथे अजून दारू पिणाऱ्या महिला असतील तर त्या सार्वजनिक ठिकाणी दारू पितात का व त्याबाबत त्यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडतील मात्र माझ्या मते त्यांचे एक उत्तर नक्की असेल की आम्ही कोठे कसे वागावे हे आम्हाला कळते.
परदेशात एकटी शिकायला आलेली मुलगी व तिचा मित्र म्हणून तिला जमेल तशी साथ देणारा व मैत्री निभावणारा एक मित्र असा माझा स्वतःचा अनुभव जमेल धरून हे विधान करत आहे ,
26 Mar 2013 - 11:14 pm | घन्चकर
अगदी बरोबर आहे तुमचे मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो.कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते.
मन्हुन या करिता आपण सवतः ला मानसिक दृष्ट्या इतके खंबीर करावे कि असले व्यसन ची गरज नाही .आणिक जर विचार कराल तर लक्षात येते कि कितेक रुपय, मेहनती नि कमवले, ते दारू वर वाया घालणे पेक्षा एखादय गरीब माणसाला त्याच रुपयान नि दोन वेड चे जेवण दिले तर , आणिक बरेस जरुरत मंद व्यक्तींना मद होऊ शकते या विचारा ने . शेवटी दारू चे व्यसन पेक्षा एकदा ला जीवन चे सुख देणे जास्त बरे नाही का. आपण पैसा कामुतो आणिक फुकट असला गोष्टी वर घालतो तेवा लक्षात घ्याला पाहिजे कि बरच लोकों कष्ट करून साधेय जेवण पण नाही करू शकतात तेन्चे पोर किती अभाव चे जीवन जगतात . या साठी एक विनम्र निवेदन जे कोणी मना पासून समझून घेऊ शकते त्यान ला कि कृपया दारू पिणे चे आधी लक्षात घ्या असले पोर बदल आणिक आपल्या पैसा चे खरे मोल करा गरीब जरुरत असले ला पोरं ना मदद करून हे व्यसन कधी हि चांगले :)
फक्त एकदा विचार करा मना पासून...
25 Mar 2013 - 9:44 am | सुज्ञ माणुस
रोज सकाळी सकाळी मिपा वर लॉगीन केले कि ( नवे लेखन) पहिले दर्शन होते ते दारूच्या लेखाचे :)
जोरदार विक्री चालू आहे बहुतेक ( हा अंदाज लेख आणि प्रतिक्रिया वाचून बांधलेला नव्हे. ) :)
(शरीरानी) तरुण (असलेल्या) पिढीला प्रबोधनाची गरज आहे हेच खरे :)
25 Mar 2013 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा
माताय...काय चढलाय धागा ;) टाइट येकदम =))
26 Mar 2013 - 2:07 am | अर्धवटराव
१) दारु चांगली कि वाईट ?
ऊ: वाईट.
२) अच्छा... मग तुम्हाला दारु आवडते का?
ऊ: हो :)
३) अरे... दारु वाईट असुनही तुम्ही आवडीने पिता ?
ऊ: हो
४) सोत्री भाऊंच्या या गरमागरम उत्तम चर्चेबद्दल तुमचं काय मत?
ऊ: चिअर्स माडी :)
अर्धवटराव
26 Mar 2013 - 11:07 pm | कवितानागेश
अर्धवटराव रॉक्स!! :D
या विशेष "रसायन"शास्त्राच्या पेप्रात बत्तेचाळीसातले फत्त्याहत्तर गुण मिळ्वून फैला लंबर. ;)
27 Mar 2013 - 3:54 am | अर्धवटराव
ह्म्म्म... ऑन द रॉक्स होऊन जाउ दे या बाणिवर :)
अर्धवटराव
27 Mar 2013 - 7:52 am | सोत्रि
चुकून अर्धवटराव ऑन द रॉक्स असे वाचले
- (रसायनशास्त्रातला 'रॉक') सोकाजी
30 Mar 2013 - 11:24 am | संपत
१) साखर चांगली कि वाईट ?
ऊ: वाईट.
२) अच्छा... मग तुम्हाला साखर आवडते का?
ऊ: हो smiley
३) अरे... साखर वाईट असुनही तुम्ही आवडीने खाता?
ऊ: हो
26 Mar 2013 - 4:36 pm | सर्वसाक्षी
मिपावरील पहिल्या वहिल्या द्विशतकास केवळ पंचविस प्रतिसादांची प्रतिक्षा........................................
सोकाजीरावांना हार्दिक शुभेच्छा आणि आगाउ अभिनंदन.
27 Mar 2013 - 10:18 pm | निनाद मुक्काम प...
दारू न पिणाऱ्या व्यक्तीचे ह्या धाग्यावर एकांगी मत म्हणजे नाण्याच्या एकाच बाजूचे चित्रण असल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे सचिन तेंडूलकर चे दिले आहे ,
सचिन ने दारूच्या जाहिरात नाकारली अशी आपण बातमी वृत्त पत्रात वाचली . ही जाहिरात नाकारण्याचे कारण काय होते हे सुद्धा वृत्त पत्रात वाचले.
आता वृत्त पत्रात एखाद्या सेलिब्रेटी च्या बातम्या त्यांनी नियुक्त केलेल्या पी आर कंपनीने दिल्या असतात , तेव्हा त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ,
सचिन स्वतः मात्र व्यवस्थित दारू पितो. त्याला बकार्डी विथ कोक ह्या हाताने पाजले आहे,
, दारू पिण्याच्या शौकीन असलेल्या उच्चभ्रू लोकांसाठी संजय नारंग सोबत सचिन ह्या कुलाब्यातील आपल्या उपहारगृहात अव्वल दर्जाचा बार उभारतो ,
अगदी विजयाचा आनंद आपल्या सहकार्याच्या समवेत मदीरेत सैचेल अंघोळ करून साजरा करतो
ज्याच्या सजावटीचे काम आमच्या एकेडेमी कडे नारंग साहेब देतात व कर्मचारी सुद्धा आमचे मित्रवर्य असतात म्हणून सांगतो ,
तेव्हा तात्पर्य एवढेच आहे की स्वतःच्या मेहनती वर विश्वास असणारे अनेक खेळाडू , नट , उद्योजक , व समाजातील प्रसिद्ध व्यक्ती मी नियमित पणे दारू चे सेवन करून आपल्या शेत्रात यशस्वी असणारे पहिले आहे.
जेव्हा रशियात बेरोजगारी होती तेव्हा सर्व वैफल्य वोडका मध्ये रिते करणारी एक पिढी मी लंडन मध्ये येउन आपला उदर निर्वाह करतांना पहिली आहे , तर दररोज बियर पिणारा जर्मन किंवा वारुणी पिणारा फ्रेंच समाज कलासक्त जीवन जगत प्रगती पथावर असलेला पहिला आहे , प्रत्येक देशात दारूच्या अती सेवनाचे बळी आहेत , नियमितपणे संतुलित पणात दारू पियुन कलासक्त व नॉर्मल माणसांचे आयुष्य जगणारे सुद्धा ह्या जगात बहुसंख्य आहेत ,
दारू न पिणाऱ्या माणसांनी ह्या धाग्यावर दारूचे उदात्तीकरण नको अशी एक टेप लावली आहे , त्याचे येथे प्रयोजन मला अजिबात कळले नाही ,
कोण करत आहे दारूचे उदात्तीकरण. दारूचे उदात्तीकरण म्हणजे नक्की काय हे कोणी ठरवायचे ,
सोत्री असो किंवा मी संतुलित पणात दारू प्या असे कितीतरी वेळा लिहिले आहे
मुळात गरीब माणूस हा आपल्या गरिबीवर तोडगा म्हणून दारूकडे पाहतो , तेव्हा त्यांच्या नाशाला गरिबी व समाजातील असमतोल विकास कारणीभूत आहे , दारू हे एक माध्यम आहे ,
पण ह्याच माध्यमांचा उपयोग संतुलित प्रमाणात करून आपले सर्वसाधारण आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत करता येते हे स्वतःच्या व्यावसायिक मतानुसार सांगणे म्हणजे दारूचे उदात्तीकरण वाटत असेल तर त्यावर इलाज नाही ,
दारू बद्दल समाजात पूर्वग्रह व चुकीच्या समजुती आहेत ,
कालपरवा पर्यंत प्रेमभंग म्हणजे दारू असे समीकरण सेहेगेल , दिलीप कुमार , व शाहरुख ने समाजात रुजवले ,
आताच्या काळात मधुर भांडारकर चा नायक सिनेमात मदिरा पितो , नियमित पितो ,
पण करीनाला मी तुझ्या सारखा मूव ऑन आहे असे सांगून एक प्रेयसी आयुष्यातून गेली तर दुसरी येईल
आयुष्य कशाला उध्वस्त करायचे ह्या विचारसरणीतून आपले यशस्वी आयुष्य जगतांना दाखवला आहे.
थोडक्यात यश न पचवू शकलेले भगवान दादा सारखे किंवा आयुष्यातील वैफल्य दारूत बुडणाऱ्या मीना कुमारी सारखे उदाहरण मागच्या पिढीत होते ,
आजच्या पिढीतील मदिरेचे नियमित सेवन करून अपयशापासून यशाकडे झेप घेणारे अनेक अभिनेते मी डोळ्याने पहिले आहेत ,
तस्मात त्यांनी दारू हे आपल्या अपयशावर उत्तर न मानता चिकाटी व प्रयत्नाने यश संपादन केलेले दिसून येते ,
तस्मात दारू वाईट नाही वाईट आहे ती तुमची नकारात्मक मानसिकता
हि मानसिकता समाजात निर्माण कशी होते , त्यावर उत्तर काय ह्यावर खरे तर संशोधन समाजशास्त्राच्या अभ्यासातून शोधले पाहिजे , उगाच दारूच्या नावाने शंख करून काय फायदा.
,
27 Mar 2013 - 10:59 pm | उपास
निनाद साहेब, नट नट्या काय करताहेत, इतकच काय 'सचिन' त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो ह्यात कुणालाच रस नाही पण तो उदात्तीकरण करत नाही एवढे सगळ्यांनाच दिसते. आता उदात्तीकरण काय असे भोळसट प्रश्न विचारून टाळ्या मिळवायच्या असतिल तर तुमची मर्जी.
तुमच्या व्यक्तिशः मतांबद्दल मला आदर असला तरी ह्या धाग्यावरचे कुणाचे प्रतिसाद एकतर्फी आहेत हे वाचणाराच समजेल.
दारुमुळे होणारे नुकसान हा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याविषयी आंतरजालाच्या खुल्या माध्यमात चर्चा होणारच, ही बेसमेंटमधल्या बार मधली चर्चा नाही, तुम्ही तिथून बाहेर आलात तरच दिसतील दारूचे दुष्परिणाम अर्थात डोळ्यावर कातडे ओढले तर ते ही दिसणार नाही, आणि हो, 'नकारात्मकता घालवणे' 'मानसिकता घडवणे' हे करायलाच हवे, प्रगत समाजात ते घडतेच (पण तिथेही दारु पिऊन सर्रास गाडी चालवता येत नाहीच, म्हणून कडक नियम करावे लागतात, तस्मात प्रमाणाबाहेर दारु ही वाईटच) पण ते होण्या आधी काही सामाजिक नियम घालून घ्यायला हवेत की नाही?
मला असं वाटतय, की एक बाजू सामाजिक दुष्परिणाम समजवतेय दारुचे आणि दुसरी बाजू वैयक्तिक मुद्द्याच्या बाहेरच येत नाहीये.
अवांतरः मूळ धाग्याचा उद्धेश आणि सोत्रिंची कळकळ आवडली त्यामुळे ह्या प्रतिसादात्मक अवंताराबद्दल क्षमस्व!
28 Mar 2013 - 3:51 am | निनाद मुक्काम प...
सचिन दारूचे उदात्तीकरण करत नाही म्हणजे नक्की काय करत नाही ,
तो दारू पितो हे त्यांच्या बहुतेक चाहत्यांना माहिती आहे ,
बाळासाहेब ठाकरे ह्यांची निखिल वागले ह्यांनी मुलाखत घेतली व तुम्ही बियर पितात का असा काहीसा प्रश्न विचारला
तेव्हा त्यांनी हो पितो व
हायनिकन हा माझा आवडता ब्रंड आहे व मी माझ्या पैशाने पितो ,त्यात लपवण्यासारखे काय आहे , असे उत्तर दिले , आता तुम्ही म्हणाल ते सुद्धा दारूचे उदात्तीकरण करत आहेत , महाराष्ट्र तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही हे सुप्रसिद्ध वाक्य बहुदा तुम्हाला ठाऊक नसेल.
उपास राव
सामाजिक नियम करायला हवे ,
दारू ह्या विषयी लोकाना सर्वार्थाने साक्षर करावे लागेल.
पण तिथेही दारु पिऊन सर्रास गाडी चालवता येत नाहीच, म्हणून कडक नियम करावे लागतात, तस्मात प्रमाणाबाहेर दारु ही वाईटच
फार चांगला मुद्दा मांडला
कडक नियम ह्या बाबतीत दोन्हीकडे आहेत ,मात्र त्यांची भारतात अंमलबजावणी
होत नाही , दारू पियुन आपण पकडले गेलो तर पैसे देऊन सुटू ह्यांची शाश्वती असल्याने
हे प्रकार घडतात . तेव्हा दारू वाईट का आपल्या लोकांची मानसिकता
आणि अति दारू वाईट हे येथे तुम्ही वेगळे कशाला लिहायची गरज आहे
तुम्ही आतापर्यंत येथे प्रतिसाद नीट वाचले तर तुमच्या लक्षात येईल
प्रत्येक जण हेच म्हणत आला आहे ,
तुमच्या माहिती साठी सांगतो
गोपीचंद ह्याने आरोग्याला हानिकारक म्हणून शीत पेयांच्या जाहिराती नाकारल्या त्या सचिन ने दाबून करून पैसा कमावला
आता सचिन विषयी तुमचा आदर नक्कीच दुणावला असेल
हो कि नाही ,
माफ करा तुमच्या अवांतर केलेल्या मुद्द्यावर अवांतर करण्याचा मोह आवरला नाही ,
28 Mar 2013 - 5:59 am | उपास
निनाद, अहो तुम्ही जे परत परत दाखले देताय ते वैयक्तिक आहेत, सामाजिक मुद्द्याला बगल देऊन प्रश्न सुटणार नाहीत. समाज प्रबोधन तिसर्या कुणीतरी येऊन करावं किंवा ते आपोआप व्हावं असं म्हणून काहीच होणार नाही, नुसत्या नियमांतून सुद्धा होत नाही, म्हणून दारुमुक्त गाव, दारुबंदी करावी लागते. शिवाय इथे चर्चेत दारूवरुन शीतपेयांवर घसरण्याची मुळातच गरज नाही, दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत हे तुम्हालाही माहित आहेच.
बरं तर, शेवटी एकच सांगेन, 'दारु (पिण्या) मुळे मला इतकं यश मिळालं' असं सांगणारी एकही व्यक्ति भेटली नाहिये मला अजूनही, परंतु, मित्रांच्या संगतीत दारुच्या नादी लागून वाया गेला, तसेच मित्र दारुडे पण त्याने दारुला स्पर्शही न केल्याने घसरण्यापासून वाचला अशी उदाहारणे कितीतरी म्हणजे कितीतरी आहेत. तस्मात, दारु पिणे हा व्यासंग/ छंद/ आनंदाचा मर्ग असू शकेल पण तो मूठभर लोकांचा, बहुतेकांच्या वाट्याला समाजात दारुमुळे वैफल्यच आल्याच दिसतं. असो, माझे अनुभवविश्व खुज असल्याने असेल पण मला अशी दारुने गांजलेले संसारच दिसतात समोर!
बरं झालं सचिनने 'अमुक व्होडका इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी' नाही म्हटलं, भारतातली ( विशेषतः अडाणी) लोकं काय करुन बसली असती :)
28 Mar 2013 - 7:16 am | सोत्रि
सुबोध खर्यांचा नौदलातले अनुभव भाग १ वाचा. त्यातल्या माणसाला (चतुर्थ श्रेणी कामगाराला) तो जे काम करतो त्यात यश केवळ दारुमुळे आले आहे.
च्यायला हे भारी आहे, जरा सरासरी सांगाल का ह्याची?
हे जरा उलटे असावे असे नाही का वाटत तुम्हाला, वैफल्य आल्यामुळे लोकं दारूच्या आहारी जातात असे?
जर दारूमुळे वैफल्य येत असेल तर जे लोकं तीला कवटाळून बसतात ते मूर्खच आहेत की नाही?
हे मात्र शंभर नंबरी! पण जर तोच मार्ग व्यापक करून दाखविण्याचा प्रयत्न असेल तर?
आता सामाजिक प्रश्नाबाबत,
म्हणजे असे बघा, मिपा समाज प्रबोधनासाठी आहे का? म्हणजे ज्यांना प्रबोधनाची गरज आहे ते इथे प्रबोधन करुन घ्यायला येतात का? ज्यांची दारूमुळे वाताहत झालीय ते लोक मिपावर त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रबोधन करून घ्यायला येतात का? (तसे असेल तर त्याचा विदा द्या.)
इथे मी दारुवर जे काही लेखन करतो त्याचा मूळ उद्देश 'दारु पिणे हा व्यासंग/ छंद/ आनंदाचा मार्ग' कसा होऊ शकतो हेच उलगडून सांगण्याचा प्रयत्न आहे. ह्या लेखाचा उद्देशही '- म्हणजे काय रे भाऊ?' ह्या माझ्या तांत्रिक विषयांवरील फॉरमॅट मध्ये दारू हा विषय त्याच, तांत्रिक, अंगाने मांडायचा करून बघितलेला एक प्रयोग होता. जे दुर्दैवाने कोणाच्याही लक्षात आले नाही.
असो, जर कोणाला ह्या लेखात किंवा एकंदरीतच माझ्या दारूविषयक लेखांमध्ये दारूचे उदात्तीकरण दिसत असेल तर ज्याची त्याची जाण आणि ज्याची त्याची समज!
- (मद्यपी) सोकाजी
28 Mar 2013 - 8:06 am | उपास
अहो, सुबोध खर्यांनी दिलेलं उदाहरण हे अपवादात्मक स्थिती आहे की नियम? त्यांनीच पुढे लिहिलेलं वाचलत ना, की एक डो़क्टर अशाच प्रकरचं (किंबहुना त्याहून वाईट) काम दारु पिऊन करेल का? आपल्याला पाहिजे तसं तुकडे पाडूण उदाहरण घेता आली की झालं का?
आणि तुमचा लेख एक मजा म्हणून ठीक आहे, आणि तसं मी म्हटलेलं आहेच (एकाहून अधिक वेळा..) निनाद ह्यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आणि हो 'अवांतर' असं नमूद करुन लिहिलं होतं की.
प्रबोधनाचा विचार करता पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे आणि आता आंजा ह्यातिल लिखाणातून ते होतच असते त्यासाठी वेगळा विदा आणि त्याला पुष्टी द्यायची काय गरज! आता 'एकच प्याला' सारखं असतं काहीतरी ते समाजाच्या नाड्या पकडतच!
28 Mar 2013 - 3:18 pm | निनाद मुक्काम प...
एकच प्याला
तुम्ही गमतीदार उदाहरणे शोधून काढतात बुआ
लग्नाची बेडी हे नाटक आजही जनता आवडीने पाहते किंबहुना आजही त्याचे व्यावसायिक प्रयोग होतात तसे एकाच प्याला चे होत नाही ,
किंबहुना भाई ह्यांचे भय्या नागपूरकर ह्या पात्रात त्यांनी भय्याच्या तोंडी
एकाच प्याला सब झूठ असे वाक्य टाकले आहे ,
तो पुढे असेही म्हणतो
ज्याला जमते त्याने प्यावी पण गरीब लोक दारू पियुन आपली कच्चीबच्ची उपाशी ठेवतात त्याचे वाईट वाटते.
ह्यात शब्द इकडचा तिकडे झाला असेल पण भय्याच्या वाक्याचा तोच अर्थ होतो.
माझ्या मते व्यक्ती आणि वल्ली आजही तरुण पिढी आवडीने वाचते
एकच प्याला ......
हा प्रयोग करणारे नट प्रयोगाच्या नंतर ........
असो
येथे गंमत मला काळात नाही
गावठी पियुन .......
येथे किती गरीब मिपाकर आहेत ज्यांना रोजच्या खायची भ्रांत आहे , व प्यायचे असेल तर गावठी शिवाय दुसरी परवडत नाही
पण दररोज मिपावर येण्यासाठी त्यांना इंटर नेट घरबसल्या शासनाने त्यांची साहित्यिक भूक भागण्यासाठीच पुरवले आहे असे गावसेना प्रमुख ह्यांचे मत असावे ,
गावठी पिणारा मिपाकर मला गावसेना प्रमुखाने दाखवावा
आणि जर गावठी पिणारे गरीब लोकांचे दुख , मानसिकता , प्रश्न हे मध्यमवर्गीय लोकांच्या पेक्षा वेगळे आहेत , तर हा लेख मध्यमवर्गीय किंवा उच्च किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय वाचतो. त्याला गावठी पियुन आयुष्य उध्वस्त झालेल्या लोकांचे उदाहरण का देतात.
मुळात समाजातील असामाजिक विषम विकास दूर झाला तर त्यांना गावठी पिण्याची वेळ येणार नाही ,
28 Mar 2013 - 6:57 pm | श्री गावसेना प्रमुख
वा वा ,मिपा कर गरीब नाहीत पण मला बाकीच्या गोष्टींच भान असत म्हणुन् मी तसे म्हटलो,तुम्ही हुच्चभ्रु तुम्हाला त्याच्याशी काय घेण हे ही खरच आहे म्हणा.
बाकी गावठी बद्दल ते माझ मत आहे तुम्हाला पटल नाही तर सोडुन द्या.(लयच मनाला लावुन घेता राव एक गावठीचा पॅक घ्या आणी शांत व्हा बर)
28 Mar 2013 - 9:51 pm | निनाद मुक्काम प...
पण मला बाकीच्या गोष्टींच भान असत

गावसेना प्रमुख
बाकीच्या म्हणजे अजून कश्या ,कश्याच्या ... यादी येऊ दे जरा
म्हणजे त्या गोष्टींचे उदात्तीकरण करणारे धागे काढले जाणार नाहीत
ह्या अर्थाने भारताची
बहुसंख्य जनता अर्धपोटी झोपते त्यांच्या पोटात अन्नाचा दाणा
नाही आणि येथे पाककृती विभागात खाण्याचे , जिभेचे चोचले पुरवणारे
खाण्याचे उदात्तीकरण करणाऱ्या पाककृती पाहून तुमचे मत तेथे व्यक्त करा
येथे आयुर्वेदाची पदवी असलेले व व्यवसाय करणारे मिपाकर आहेत ,
शाकाहार त्यांना प्रिय किंबहुना शाकाहाराचा प्रसार ,त्याचे महत्व समाजात सांगून समाजाचे प्रबोधन करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे ,
किंबहुना अभक्ष खाण्यापेक्षा शाकाहार कसा चांगला व आरोग्याला कसा पोषक
हे काही ते मांसाहारी पाककृती असेलल्या धाग्यावर आपले नैतिक कर्तव्य बजावायला जात नाही ,
मुक्या प्राण्याची क्रूर हत्या करून जिभेचे चोचले पुरवू नका असे सुद्धा सांगायला जात नाहीत.
तेवढा अलिखित संकेत ते पाळतात.
28 Mar 2013 - 10:03 pm | प्यारे१
सुंदर प्रतिसाद.
निनाद भाऊ नि असेच आणखी काही लोक जे सगळ्याच्या मुळाशी जाऊन नंतर त्या गोष्टीचा अज्जिबात त्रास होणार नाही अशा प्रकारे विश्लेषण करुन सुंदर सुंदर प्रतिसाद देतात.
मान गये!
कीप इट अप निनाद.
- प्यारे मु पो अल्जिरिया.
29 Mar 2013 - 8:26 am | श्री गावसेना प्रमुख
निनाद राव्,येथे दारु चा विषय चालु आहे , न की पाककृती चा.आपण शाकाहार घेतला काय अन मांसाहार काय शरीराला आवश्यक घटक त्यातुन पुरविले जातात,पण दारु ही इंपोर्टेड असली काय अन देशी असली काय त्याचा व्हायचा तो परीणाम हा होतोच,तुम्ही दारु पित असावे किंवा पित नसावे पण त्या गोष्टीच प्रदर्शन मांडणे तुम्हाला योग्य वाटते काय,येथे इंपोर्टेड पिणारे भरपुर असतील पण तुम्हीच दारुच जोरदार समर्थन करतात(हे सुबोध खरे साहेबांना ही मान्य असाव पण ते तसे इथे बोलुन दाखविणार नाहीत)
येथे आयुर्वेदाची पदवी असलेले व व्यवसाय करणारे मिपाकर आहेत ,
शाकाहार त्यांना प्रिय किंबहुना शाकाहाराचा प्रसार ,त्याचे महत्व समाजात सांगून समाजाचे प्रबोधन करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे ,
किंबहुना अभक्ष खाण्यापेक्षा शाकाहार कसा चांगला व आरोग्याला कसा पोषक
हे काही ते मांसाहारी पाककृती असेलल्या धाग्यावर आपले नैतिक कर्तव्य बजावायला जात नाही ,
मुक्या प्राण्याची क्रूर हत्या करून जिभेचे चोचले पुरवू नका असे सुद्धा सांगायला जात नाहीत.
तेवढा अलिखित संकेत ते पाळतात.
येथे तुम्हाला असे अभिप्रेत आहे काय, की तुम्ही दारु विषयी लिहाव अन ते कुणाला पटो अथवा नको पटो,त्याने तुमच्या बाजुने लिहाव .
29 Mar 2013 - 3:39 pm | निनाद मुक्काम प...
मी संतुलित प्रमाणात दारू पिण्याबाबत नेहमीच लिहित आलो आहे ,
मी जेवढे जग पहिले त्यातून दारू विषयी माझी वैयक्तिक व व्यावसायिक अनुभवातून दारू विषयी माझी मत मांडली आहेत ,
दारू सगळ्यांनी घेतलीच पाहिजे , तिच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ,असे मीच काय कोणीच येथे म्हटले नाही आहे ,
पण जे येथे दारू पितात , किंवा त्यांना पिण्याची इच्छा आहे , अश्या लोकांना
गावसेना प्रमुख तुम्ही जबरदस्ती करून दारू पियू नका असे तर सांगू शकत नाही ,
तेव्हा दारू विषयी समग्र माहिती ,ती पिण्याची पद्धत , ह्याबाबत माहिती देणे थोडक्यात दारू विषयी आपल्या समाजात अनेक समाज , गैर समज आहेत ,
अनेक दारू पिणाऱ्या व्यक्तींना ती कशी प्यावी , किती प्यावी ,हे नीट ठाऊक नसते , असे बहुतांशी जे नवीन नवीन दारू प्यायला शिकले आहेत त्यांना लागू पडते ,
तेव्हा ह्या विषयी थोडी माहिती देण्यात आली तर काय बिघडले .
दारू पिणाऱ्या व्यक्तीला गरम दुध व अल्कोहोल अशी कल्पना सुद्धा करवत नाही,
मात्र गरम दुधात ककाव पावडर घालून त्यात बेलीज हे क्रीम लिक्योर मिसळून पिणे ह्या धर्तीची मी सूचना दिली होती , ह्यात दारूची कुठलीही किक न बसता , एक अवीट गोडीचे पेय प्यायल्याचा आनंद मिळतो ,
दारू म्हणजे चक्क वकार युनुस होणे , किंवा अति प्रमाणात पियुन महिलांशी दूर वर्तन करणे असाच होत नाही ,
थोडक्यात जमले तसे दारू विषयी गैरसमज दूर करत वेगवेगळ्या ती वेगवेगळ्या पद्धतीने पिण्याबद्दल माहिती देत असतो, अधून , मधून
सध्या माहितीचे युग सुरु आहे , अनेक बातम्या व माहिती आपल्या समोर येत असतात .
आपल्याला झेपेल ,आवडेल तेवढे घ्यावे , दारू विषयी आजपर्यंत सर्व सामान्य माणसाला जी माहिती नसते ती एक माहिती म्हणून वाचण्यास काहीच हरकत नाही ,
एरवी माझी लेखनाची राखीव कुरणे वेगळी आहेतच परत अनेक लेखांवर प्रतिसाद सुद्धा नियमित असतात , दारू विषयी क्वचित म्हणजे फारच क्वचित लिहिले जाते.,
येथे काही रोज आठवड्याला एक असा दारू वर लेख येत नाही ,
गाव सेना प्रमुख
काही वर्षापूर्वी मिपावर नाटक्या नावाच्या मिपाकाराने कॉकटेल वर आधारीत धुंद , बेधुंद करणारी नितांत सुंदर सचित्र लेखमाला चालवली होती , त्यांच्यानंतर सोत्री ह्यांनी सुद्धा अशीच मालिका नाही ,पण अधून मधून सुंदर कॉकटेल विषयी माहिती देणारे सदर येथे सादर केले ,
आता ते वाचून जर एखादा मिपाकर दारूच्या पार व्यसनी लागला , त्याचे कुटुंब देशोधडीला लागले असे एखादे उदाहरण जरी समोर आले ,
तर मी माझ्या सर्व प्रतिसादासाठी जाहीर माफी मागायला तयार आहे ,
उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या न्यायाने ह्याच धाग्यावर अवांतर करण्याची अहमहमिका चालवल्या गेली , त्याला मी माझ्या परीने उत्तर दिले ,
माझा ह्या लेखावर पहिला प्रतिसाद वाचा , मी स्पष्ट लिहिले आहे ,
दारू विषयी शिक्षण घेऊन एकेकाळी हा माझ्या व्यवसायाचा भाग होता , पण ह्या विषयी मिपावर माझ्याकडून लिहिणे होत नाही ,
30 Mar 2013 - 11:35 am | संपत
तुम्ही एकच प्याला पाहीले आहेत काय? मला तरी ते नाटक सुधाकराच्या दारुच्या व्यसनावर जेवढे आहे तितकेच सिन्धुच्या पतिव्रत्याच्या व्यसनावरदेखिल आहे असे वाटले. दोन्हीही व्यसनेच..
28 Mar 2013 - 10:30 am | विश्वनाथ मेहेंदळे
आता आयडी बदलून ३_१३_सोत्रि करून घ्या लवकर !!!
28 Mar 2013 - 12:30 pm | सोत्रि
वैचारिक मुद्दे संपले की व्यक्तिगत हल्ले सुरू होतात.
-(वैचारिक) सोकाजी
29 Mar 2013 - 2:00 am | विश्वनाथ मेहेंदळे
काहीही काय ?? मी आधी व्यक्तिगत हल्ले करतो आणि समोरचा नामोहरम झाला की मग वैचारिक मुद्दे काढतो.
बाकी, इथे मी व्यक्तिगत हल्ला नेमका कुणावर केला असे तुमचे म्हणणे आहे ?? तुमच्यावर कि ३_१३ वर ??
29 Mar 2013 - 3:41 pm | प्यारे१
विमे,
३_१३ असा कोणताही आयडी मिपावर नाहीये !
बाकी रात्रभर पिऊन दोघा तिघांनी परिक्षा छान प्रकारे दिल्या व उत्तम पास देखील झाले असा आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितलेलं आठवतं. असो.
जाताजाता तू आता अभ्यास वाढवच विमे, कमी पडतो आहे असं सांगावंसं वाटतंय.
इतक्या अभ्या सूप्रति सादांचा प्रति वा दकरायचा असला तरते करणं अत्यंत आवश्य आहे,,,,,,,,,
- अत्यंत सीरियस प्यारे. (सध्या मु पो अल्जिरिया हे तुला माहिती आहेच.)
28 Mar 2013 - 2:36 pm | दादा कोंडके
:)) :))
28 Mar 2013 - 3:47 pm | निनाद मुक्काम प...
हे मात्र शंभर नंबरी! पण जर तोच मार्ग व्यापक करून दाखविण्याचा प्रयत्न असेल तर?
असे काय करता सोत्री साहेब
आम्ही येथे दारू पीत नाही ,त्यामुळे दारू म्हणजे व्यसन एवढेच आम्हाला खरडता येते.
दारू पियुन उध्वस्त झालेली कुटुंबे आम्हाला दिसतात मात्र दारू पियुन सुद्धा
आपले आयुष्य व्यवस्थित दिसणारी कुटुंबे आम्हाला दिसत नाहीत , किंबहुना ती दिसली तरी त्यांचा येथे आम्ही उल्लेख करत नाहीत ,
आम्ही आमच्या सोयी नुसार खरडतो हे तुमच्या ध्यानी आले नाही का अजून
आम्ही दारू पीत नाही ह्या मागे आमचे काहीतरी लॉजिक आहे , ते तुमच्या धाग्यावर अवांतर करून आमची बाजू मांडण्याचा आम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहोत ह्याची तुम्हाला जाणीव होत नाही का
दारू मुळे मला अपयश मिळाले असे सांगणारी व्यक्ती बहुदा आम्हाला नेहमीच भेटते. अश्या थाटात आमचे लिखाण चालू आहे.
किंबहुना आमचा आमच्या मनावर ताबा नाही आहे , दारूचे चे लेख पाहून त्यांचे उदात्तीकरण झाले अशी आवई उठवतो , त्याने आमच्या मनावर परिणाम होईल किंवा इतरांच्या मनावर होईल अशी भीती व्यक्त करतो ,
मात्र बॉलीवूड चे सिनेमे अनेक गोष्टींचे उदात्तीकरण करतात म्हणून ते पाहणे आम्ही सोयीस्कर टाळतो , कारण काय वाचून व पाहून आपण कसे वागावे ,आपल्या प्रवृत्तीला काय झेपेल व आवडलेलं ह्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची आमची शमता दारू न पिताच बोथट झाली आहे
मिपा वरील अवांतर करण्याचे नियम आमच्या सारख्या समाज प्रबोधन करण्याच्या उद्दात हेतूला लागू होत नाहीत ,
किंबहुना जो येथे अवांतर करतो त्याचे प्रतिसाद आवडले असे म्हणून आम्ही अवांतर होण्यास हातभार लावतो ,
लोकशाहीत मतांच्या संख्येला महत्व आहे , सध्या ह्या धाग्यावर दारू पिणारे मिपाकर कमी व आमच्या सारखे न पिणारे जास्त आहेत तेव्हा आमचे म्हणणे खरे आहे आणि हेच खरे सत्य आहे.
तुम्ही कधी लहानपणी जास्तीची मेजोर्टी
हा खेळ खेळला नाही आहे आहे का
दारू न पिणारा एक मिपाकर
28 Mar 2013 - 4:22 pm | उपास
छान विनोदी लिखाण :) पण एकच सांगा कोणत्या लॉजिक्ने तुम्हाला वाटलं की मी किंवा इथे दारु वाईट आहे असं म्हणाणारे स्वतः दारु पितच नसतील. गंमत आहे बुवा..!! वैयक्तिक आयुष्याचा काय संबंध ह्याच्याशी. दारुमुळे प्रचंद सामाजिक (तसेच कौटुंबिक) नुकसान होतेय हेच मान्य नसेल तर यापुढे कुठलाही वाद हा वितंड वादच असणार, त्यामुळे चालूंद्या.. करमणूक होते आहेच :)
28 Mar 2013 - 5:38 pm | सोत्रि
हांग आश्शी, मूळ धाग्याचाही नेमका तोच उद्देश होता. समाज प्रबोधन अजिबात नव्हता जो अवांतरारून झाला.
:)
- (विनोदी मद्यपी) सोकाजी
28 Mar 2013 - 5:58 pm | निनाद मुक्काम प...
गमंत खरेच आहे बुआ

माझ्या लिखाणातून असे तुम्हाला का वाटले मला असे वाटत आहे ,
@पण एकच सांगा कोणत्या लॉजिक्ने तुम्हाला वाटलं की मी किंवा इथे दारु वाईट आहे असं म्हणाणारे स्वतः दारु पितच नसतील. गंमत आहे बुवा..
मी येथे सरळ साधा उल्लेख केला आहे
दारू न पिणारा मिपाकर
आता तुम्ही ह्या धाग्याचा व प्रतिसादांचे नीट वाचन केले तर अनेकांनी येथे ते दारू पीत नाहीत असा सरळ उल्लेख केला आहे ,माझा रोख त्यांच्यावर आहे ,
आणि उपास राव येथे एवढे पोटतिडकीने लिहित आहात पण तुम्ही मात्र स्वतः दारू पितात का नाही हे अजून सांगितले नाही ,नाही म्हणजे दारू विषयी मत व्यक्त करता आहत तुमच्या आयुष्यात दारूचे स्थान काय हे गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय
येथे बहुतेक सर्वांनी प्रतिसाद लिहिले आहेत ते नीट वाचा ,सर्वांनी ते दारू पितात किंवा पीत नाही ह्याचा उल्लेख करून मग दारूवर मत मांडले आहे ,
आणि दारू पिणारे दारू वाईट आहे , असे म्हणत असतील
म्हणजे जर असे कुणी म्हणत असेल
मला एक गमतीदार कल्पना मनात आली
सलमान खान ने फेस बुक वर स्टेटस टाकले
विवाहाच्या आधी शरीर संबंध वाईट आहे . मी माझ्या भूमिकेतून करणार नाही
आणि त्यांच्या ह्या स्टेटस ला लाईक करणारे सोमी , संगीता , ऐश्वर्या , कतरिना असतील.
दारू पिणारे अनेक मिपाकरांनी संतुलित प्रमाणात दारू प्यायली तरी आयुष्य सुरळीत जगता येते असा स्वानुभवाने आपले मत मांडले तर इतरांना का खुपते ,
येथे येणारा मिपाकर सुज्ञ आहे ,
उदा अभिषेक ने सांगितले आहे
कॉलेज जीवनात त्याने दारू चाखली आहे , व आता तो पीत नाही ,
तस्मात आपण काय करावे ,काय करू नये ह्याचे आत्मभान ज्याला नसते ,
ते उदात्तीकरण , उदात्तीकरण अशी आवई उठवतात.
मुन्नी आणि शिलामुळे मिपाकर बदनाम झाला नाही किंवा त्यांची जवानी उतू गेली नाही ,
किंवा रंग दे बसंती पाहून कुठल्या मिपाकाराने भष्टाचार निर्मूलनाचा त्यात दाखवला तो मार्ग सुद्धा स्वीकारला आहे असे पाहण्यात नाही ,
तस्मात मिपाकर समूहाला
काही पाहून ,काही वाचून आपण शेवटी काय करायचे हे नक्कीच कळते
असे मला वाटते.
आता प्रश्न आला
28 Mar 2013 - 9:27 pm | अर्धवटराव
>>असो, जर कोणाला ह्या लेखात किंवा एकंदरीतच माझ्या दारूविषयक लेखांमध्ये दारूचे उदात्तीकरण दिसत असेल तर ज्याची त्याची जाण आणि ज्याची त्याची समज!
-- या वाक्यात " दारूचे उदात्तीकरण दिसत असेल तर" पर्यंत वाचले आणि काळजात धस्स झाले... आता सोत्री यापुढे वारुणीवर लेख लिहायचे टाळण्याची प्रतिज्ञा करतो कि काय अशी भिती वाटली. पण "ज्याची त्याची जाण" वाचुन मरणछ्या गर्मीत होरपळुन निघाल्यावर चीईईईल्ड हेवर्ड ५००० चा घोट घ्यावा तसं गार वाटलं :) जीव भांड्यात पडला :)
अर्धवटराव
28 Mar 2013 - 8:11 am | उपास
>>जर दारूमुळे वैफल्य येत असेल तर जे लोकं तीला कवटाळून बसतात ते मूर्खच आहेत की नाही?
अगदी त्रिवार सत्य! ते मूर्खच आहेत त्यामुळे त्यांना कळत नाही की अशा (वैफल्यग्रस्त) परिस्थितीत दारू ही सुटका नाही पाश आहे आणि म्हणून स्वतः तर गुंतत जातातच आणि कुटुंबाची वाट लावतात.
28 Mar 2013 - 8:55 am | श्री गावसेना प्रमुख
काही लोक दारुच उगाच उदात्तीकरण करताहेत्,खर तर ते हुच्चभ्रु लोकांनाच समोर ठेउन लिखाण करीत असावेत(मुंबैत दारु पिउन फुटपाथवर गाडी चढवुन झोपलेल्यांना मारणारे हे ही हुच्चभ्रुच होते असे ऐकण्यात आहे),पण दारुची नशा करी जीवनाची दुर्दशा ही स्लोगन त्यांना माहीत नसावी,कारण जसे बंगल्याच्या सभोवताली हिरवळ असली तर बाहेर दुष्काळ असला तरी दिसत नाही,तसे गावठीने मेलेले त्यांना दिसत नसावेत
स्वता हुच्चभ्रु समजणारे किंवा असणारे हे हुच्च दर्जाची?(दारु ही हुच्च असली काय गावठी असली काय व्हायचा परीणाम तो होतोच)पितात ती त्यांना चढत नसावी ,पण ह्या सांगोसांगी मुळे जे दारु च उदात्तीकरण?होतय ते गावठीचही होउ शकत हे त्यांनी ध्यानात घ्याव ही एक अपेक्षा.
मांडवाच्या ग्रामस्थांबद्दल सहानभुती ठेउन असलेला.
28 Mar 2013 - 4:15 pm | कवितानागेश
२००!
28 Mar 2013 - 7:53 pm | प्यारे१
सोत्रि,
दारु म्हणजे काय रे भाऊ???????????????
- चर्चेचे गुर्हाळ बघून स मू ळ भरकटलेला....प्यारे
29 Mar 2013 - 4:02 pm | इरसाल
29 Mar 2013 - 5:03 pm | शिद
बरोबर आहे...कश्याला उगाच चर्चा दोन्ही बाजूंनी ताणुन धरली आहे तेच कळत नाही. अरे, ज्याला आवडते तो पितो (ते देखील स्वखर्चाने) आणि ज्याला नाही तो नाही. मग कश्याला हे चर्चेचे गुर्हाळ सुरु आहे तेच कळत नाही.
29 Mar 2013 - 5:29 pm | निनाद मुक्काम प...
एवढे सरळ साधे सोपे कळत हो आम्हाला पण वळत नाही ,
उदात्तीकरण
खपवून घेतले जाणार नाही ,
लगावो बत्ती
30 Mar 2013 - 10:44 am | इरसाल
लावा बत्ती.
आता मी जिठं तिठं फटु चिटकव्याचे ठर्र्व्यिले हाये
29 Mar 2013 - 5:54 pm | मन१
ह्याच लायनीवरची जुनी चर्चा मिपावर पहायला मिळेल.((http://www.misalpav.com/node/23075) तिथे दुसर्या पानावर गविंचा भन्नाट प्रतिसाद आवडला.
आँ?
गवि - Fri, 09/11/2012 - 17:51
आँ?
चेटकीण, पाकिस्तान.. अयायाया... थांबा, धाग्याचं शीर्षक परत बघून येतो..
माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.
29 Mar 2013 - 5:56 pm | बॅटमॅन
मणोबा तुझ्या सहीत एक तांत्रिक चूक आहे. जीजस ख्राईस्टने सुरू केलेल्या धर्माचे अनुयायी, थोडक्यात ख्राईस्टला मानणारे म्हणून ख्रिश्चन आहेत. खुद्द जीजस कसा क्रिश्चन होईल रे? :)
29 Mar 2013 - 5:58 pm | प्यारे१
ब्याटॅ,
अरे किती अवांतर करशील रे!
इतकी मुद्देसूद चर्चा सुरु असताना असं करायचा धीरच कसा झाला बे तुला??????????????????
संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का?
-सध्या अल्जेरियात
29 Mar 2013 - 6:14 pm | मन१
ख्रिस्तानं घालून दिलेली तत्वे पाळणारे ते ख्रिश्चन.(शेजार्यावर प्रेम करा वगैरे वगैरे ष्टाइल उपदेश.)
ती तत्वे ख्रिस्त पाळत असेल तर तोही ख्रिश्चनच.
.
<टवाळकी मोड सुरु >
मी खेडू कडूस मध्ये असताना एका ख्रिश्चनाशी बोललो होतो. तिथे त्याने मला ख्रिस्तदृष्टांविषयी सांगितले.
मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
माझ्या व्यवसायात , डेव्हलपमेंट, युनिट टेस्टिंग दरम्यान जाता येता बग्ज निघाल्यावर "जीझस" असे म्हणायची वेळ येते.
त्यावरून मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
तसेच मी एकदा कंपनीत काम करत असताना माझ्या शेजारुन एक ख्रिश्चन क्लायंट गेला होता.
म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
मी अशा देशातून हे सांगत आहे जिथून शिकून जीझस पुन्हा बेथलहॅम- जेरुसलेमला गेला(lost years of jesus) म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
मी इथे असल्यामुळे आणि मलाच एकट्याला सगळ्यातले सगळे झुंजवता येत असल्याने माझी सही योग्यच आहे.
म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
तुझे प्रतिसाद वैयक्तिक आहेत.
तू विनोद करीत आहेस.
<टवाळकी मोड संपला >
29 Mar 2013 - 6:38 pm | प्रचेतस
अजून एक कारण राहिलं ना भो.
मी याआधी अब्राहमिक धर्मांवर लिहिलेलंआहे.
म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.
29 Mar 2013 - 6:50 pm | मन१
:)
30 Mar 2013 - 12:25 pm | इरसाल
मी ख्रिस्चनांच्या कंपनीत काम करतो म्हणुन मलाबी यात बोलायचा अधीकार हाये म्हन्जे हाये
2 Apr 2013 - 6:19 pm | बॅटमॅन
अमुक अमुक तत्वे पाळणारा तो क्रिश्चन ही व्याख्याच नंतर आली, सबब हे असले रिव्हर्स इंजिनिअरिंग कामाचे नै भौ :)
29 Mar 2013 - 8:54 pm | ५० फक्त
हे एवढे प्रतिसाद वाचुन आता मात्र खरंच आंतरजालीय बार मध्ये बसल्यासारखं वाटत आहे.चला बिल यायच्या आधी निघावं हे बरं, अजुन काय? चला प्यारेजी अल्जेरियावासी निघता ना, सोडतो तुम्हाला जाता जाता.
29 Mar 2013 - 10:57 pm | निनाद मुक्काम प...
अरे गवि कुठे गेलेत
ह्या धाग्यावर त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवायला लागली आहे.
29 Mar 2013 - 11:50 pm | प्यारे१
हे बघा, जर्मनीवाले निघाल्याशिवाय आम्हाला हलता यायचं नाही.
आम्ही त्यांची दीक्षा घेणार आहोत.
तुमी व्हा फुडं. आमी आवरुन येतो.
जाताना कुणी यशस्वी गटारात तर पडला नाही ना ऑर गटारात जाऊन यशस्वी झाला नाही ना हे पण पहायचंय ना! ;)
31 Mar 2013 - 7:33 pm | श्री गावसेना प्रमुख
येथे जमले नाही म्हनुन काही लोक दुसर्या धाग्यावर जाउन नसत्या उचापत्या करीत असावेत अस माझ मत झालेल आहे.
1 Apr 2013 - 12:56 pm | सुमीत भातखंडे
खरेसाहेबांचे प्रतिसाद आवडले
1 Apr 2013 - 2:22 pm | मृत्युन्जय
हा धागा भलताच रंजक झाला आहे. सुबोध खर्यांचे प्रतिसाद बर्याच अंशी पटले. बरेच जण दारु केवळ धतिंग करण्यासाठी पितात. किंवा एक स्टाइल स्टेटमेंट म्हणुन. माझ्या ओळखीतील एका सद्गृहस्थांनी शाळेत जाणार्या आपल्या मुलीला वाईन प्यायला लावली आणि वर "प्यायची नाही म्हणजे काय? गावंढळ रहायचे आहे का तुला जन्मभर?" असे विचारले. थोडक्यात त्यांच्यासाठी दारु पिणे हे एक स्टाइल स्टेटमेंट किंवा एक सामाजिक गरज होती. ते उच्चभ्रू आणि सुशिक्षित असण्याचे लक्षण होते.
दारु प्यायल्याने लोकांशी संवाद साधणे सोपे जाते हे मात्र खरे. दोन दारुडे इतर कुठलाही संबंध नसेल तरी दारु या एका विषयावर लगेच एकमेकांशी संवाद साहु शकतात. दारु पाजुन लोकांकडुन कामे करुन घेतली जाउ शकतात. घसट वाढवली जाऊ शकते. व्यावसायिक गरजांसाठी आणि कामाचा एक भाग म्हणुन मी दारु प्यायला सुरुवात करावी म्हणजे योग्य माण्सांशी ओळख आणि घसट वाढवणे सोप्पे जाते असे मला हापिसातुन बॉसकडुन बर्याच वेळा सांगण्यात आले आहे. मी तो सल्ला फाट्यावर मांडला.
बाकी मी स्वतः दारु पीत नाही कारण ज्या पदार्थाने माझा माझ्या मेंदुवरचा किंवा जिभेवरचा ताबा सुटु शकतो अश्या कुठल्याही पदार्थाचे सेवन करणे मला रुचत नाही. यावर अर्रे एका पेगने काही चढत नाही असे ज्ञान मला एका मित्राने दिले होते. मग एवढी घाणेरड्या चवीची आणी वासाची दारु प्यायचीच कशाला याचे उत्तर मात्र तो देऊ शकला नव्हता.
1 Apr 2013 - 11:29 pm | सोत्रि
हे पटले नाही, अर्धवट आणि ऐकिव माहितीवर केलेले विधान.
- (साकिया) सोकाजी
1 Apr 2013 - 5:45 pm | मालोजीराव
मद्याचार्य सोकाजीराव त्रिलोकेकर यांचा जोरदार धागा !
धाग्याबरोबरच सोत्री आणि सुबोध खरेंचे प्रतीसाद वाचनीय…अनेक ठिकाणी भरकटलेले आणि अवांतर प्रतिसाद…पण साठवून ठेवण्यासारखा धागा
धन्यवाद सोत्री, एक या विषयाला वाहिलेला कट्टा होऊन जाऊदेत…काय बोलता ?
- सोत्रीजी कडून मद्य-ज्ञान घेण्यास उत्सुक असलेला मालोजी
2 Apr 2013 - 3:12 am | निनाद मुक्काम प...
अश्या लोकांनी खरे तर सोत्री ह्यांचे धागे वाचले पाहिजे
म्हणजे दारूच्या बाबतीत ते साक्षर होतील.
भारतात दारू म्हणजे काय , ती कशी बनते , ती कशी प्यायची ह्या बाबत माहिती नसते ,
अनेकांची दारू पिण्याची सुरुवात लपून छपून होते ,ह्यामुळे पुरेश्या माहिती अभावी
दारू पिणाऱ्या मंडळींच्या मध्ये दारू विषयी अनेक गैर समज असतात
ते दूर व्हावेत असे वाटते.
,
भारतात आज भारतीयांना जर कोणत्या संस्थेविषयी आदर आहे तर तो भारतीय लष्कर
होय ,
भारतीय लष्करात अनेक बडे अधिकारी ते सैनिक दारू पितात ,
आणि हे माहिती असूनही त्यांच्या विषयी भारतीय जनतेच्या मनातील आदर कमी होत नाही ,
लष्कर व दारू ह्या संबंधी काही वृत्त पत्रातील बातम्या वाचल्या .
आमची मते जुळतात ,हे पाहून बरे वाटले.
2 Apr 2013 - 10:13 am | श्री गावसेना प्रमुख
भारतात दारू म्हणजे काय , ती कशी बनते , ती कशी प्यायची ह्या बाबत माहिती नसते ,
कशी प्यायची ह्याचे क्लासेस चालु करावेत असा विचार आहे, भारतातल्या लोकांना अक्कलच नाहीये पिण्याची.
2 Apr 2013 - 1:28 pm | निनाद मुक्काम प...
कशी प्यायची ह्याचे क्लासेस चालु करावेत असा विचार आहे,

गावसेना प्रमुख
ह्या भारतीयांची अक्कल काढण्याची काय गरज आहे.
दारू हा अभ्यासाचा विषय आहे ह्या संबंधी अनेकांना माहिती नसते ,
आपण प्रथम येथून रीतसर शिक्षण घ्या
मग भारतात दारू जर प्यायची झाली तर रीतसर कोणती ,कशी प्यायची
ह्याबाबत तुम्हाला लोकांना प्रशिक्षित करता येईल
आता दारू म्हणजे गावठी एवढेच भावविश्व असणाऱ्या लोकांना ह्या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे ,
2 Apr 2013 - 4:29 pm | गवि
चियर्स..
2 Apr 2013 - 6:41 pm | प्यारे१
दारु लय वाईट!
तुमी डावीकडनं सुरु करा. म्या उजवीकडनं कर्तु.
संपवूनच टाकू च्यामारी.
दारु लय वाईट!
चकन्याला शाकारी काय मिळालं तर आन रे आन्ना ;) !
2 Apr 2013 - 5:30 pm | श्री गावसेना प्रमुख
ते पण खर आहे म्हणा,दारु म्हणजे गावठीच एव्हढेच मज पामराला माहीत,
आता मी एक करतो की आधी तुमच्या कडुन रितसर शि़क्षण घेतो,मग भारताच्या कानाकोपर्यात जाउन्,त्या येड्या भारतीयांना सांगतो की मुर्खांनो काही अक्कल आहे की नाही हे बघा निनाद राव बाहेर जाउन काय नाही ते शिकुन आले,आता राहा तुम्ही दारुमागास्,येड्पट कुठले जरा आंतरराष्ट्रीय दर्जाची प्या,मग कळेल जिवन म्हणजे काय ते.
2 Apr 2013 - 6:44 pm | निनाद मुक्काम प...
चालेल
सोबतीला
हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।
पहिल्या उदाहरणात
तुम्हाला ह्या कार्यातून फुरसत मिळाली की सांगा मला
हे कार्य करण्याचे प्रोजेक्ट मी परदेशातून तुम्हाला out सोर्स करतो