सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
17 May 2012 - 4:33 pm

विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या भागाचे शेपूट बरेच लांबल्यामुळे हा दुसरा भाग सुरु करत आहे.

http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर डावांचे थेट प्रक्षेपण बघता येते. पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.

http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो.

चला तर मग सुरु करुयात पाचव्या डावाचे विश्लेषण.

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 May 2012 - 4:38 pm | मुक्त विहारि

आता मज्जा येणार....

चतुरंग's picture

17 May 2012 - 4:44 pm | चतुरंग

या वेळी तरी वेगळी सुरुवात बघायला मिळाली. आनंदने ई४ ने सुरुवात केली आणि बोरिसने सी५ ने उत्तर दिले.
आज काहीतरी निकाली बघायला मिळो हीच इच्छा! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

17 May 2012 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

नवीन धागा काढला ते बरंय! आधीच्या धाग्यावर भेळ झाली होती नुसती!

रमताराम's picture

17 May 2012 - 4:56 pm | रमताराम

असेच म्हणतो. धन्यवाद रंगा.

अजून आमाला शाप काय समजंना. जरा येळ लागंल आसं दिस्तंय.

चतुरंग's picture

17 May 2012 - 4:54 pm | चतुरंग

ने झाली आणि पुढे तो स्वेश्निकोव वेरिअशन मधे गेलाय.
दोघांची या ओपनिंगची तयारी सुद्धा जोरात दिसते आहे. चाली वेगाने होताहेत. पहिल्या १०-११ मिनिटात १५ चाली झालेल्या आहेत!

रमताराम's picture

17 May 2012 - 5:09 pm | रमताराम

उंट ई मधील प्याद्याने घेण्याऐवजी सी मधील प्याद्याने घेण्यामागे बोरिसच्या ई-प्याद्याकडून वजीराला बसू शकणारा संभाव्य शह टाळणे हा हेतू असावा.

चतुरंग's picture

17 May 2012 - 5:11 pm | चतुरंग

सोळाव्या खेळीला उंटाने घोडा मारला. आनंदने सी५ मधल्या प्याद्याने उंट मारुन घोड्यावर हल्ला केला.
बोरिस घोडा बी ८ खेळला. तो ज्या वेगाने चाली करतोय त्यावरुन हे नक्की दिसतंय की त्याच्या तयारी मध्ये ही पोझीशन येऊन गेली आहे आणि अजूनतरी त्याला कही नवीन सापडलेले नाही.
डाव भलताच इंटरेस्टिंग होतोय.
अजून मोहोर्‍यांचे विकसित होणे दोन्ही बाजूला सुरु आहे. बोरिसकडे जागेची बढत आहे परंतु आनंदची मोहोरी त्यामानाने जरा समन्वयात आहेत. आता थोडी मारामारी अपेक्षित आहे.

रमताराम's picture

17 May 2012 - 5:15 pm | रमताराम

आनंदने ए-३ प्यादे सरकवून प्याद्यांचे एक्स्चेंज फोर्स करून बोरिसचे ए-५ प्यादे दुबळे करण्याचा प्रयत्न केला. पण बोरिसने एक्स्चेंज नाकारून घोड्याने बी प्याद्याला आधार दिला. पण आनंदनेही घोड्यांचा एक्स्चेंज देऊन हत्ती समोरासमोर आणले. हत्तींचेही लगेचच एक्स्चेंज होणार का? इन्ट्रेस्टिंग.

अपेक्षित केह्ळी. उंट बहुदा एच ६ मधे माघार घेईल

अशा स्थितीत डाव बरोबरीत जाऊ शकतो. कोणीतरी एकाने आक्रमक राहून डावात जान ठेवावी बुवा!

रमताराम's picture

17 May 2012 - 5:25 pm | रमताराम

पण आनंदला किंचित फायदा आहे तो त्याचा उंट प्याद्यांचा जोडीला आधार देऊन वजीराला मोकळा ठेवतोय. बोरिसला डी प्याद्याला आधाराला वजीराची गरज पडते आहे.

चतुरंग's picture

17 May 2012 - 5:39 pm | चतुरंग

उंट एह ६ मधे गेल्याने सध्यातरी डावातून बाहेर आहे. डी ६ चे प्यादे कमकुवत आहे. सी ६ हे घर सुद्धा दुबळे आहे.
बी चार वरचे प्यादे घेता आले तर आनंदला डावात चांगली संधी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2012 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी जेव्हाही डाव पाहतो तेव्हा मला पटावर समसमान स्थिती दिसत असते.
तांत्रिक गोष्टी आणि खेळ्या कळत नाहीत, पण आजही डाव ड्रॉच होईल असे वाटते.

कुठंतरी वाचलं की, आनंद उगाच दडपणाखाली खेळतोय म्हणून.

-दिलीप बिरुटे

शंभर टक्के सहमत, मला तर पहिल्या गेमपासनं त्याचा खेळ बचावात्मक वाटतोय आणि चेहेर्‍यावर कायम प्रेशर दिसतय. आयला, हा माणूस म्हणायचा की मी चेसकडे गेम म्हणून बघतो

चतुरंग's picture

17 May 2012 - 5:43 pm | चतुरंग

आनंदचा फॉर्म चांगला नाहीये. पण असे पॅचेस येतच असतात. त्यावर मात करुन खेळत राहणे हीच खेळाडूची खरी ओळख.
त्यामुळे कोणत्याही निर्णयाला येण्याची घाई करु नका.

चतुरंग's picture

17 May 2012 - 5:53 pm | चतुरंग

डी७ ह्या घरावर आनंदची नजर आहे.
उंट जर सी ६ मधे येऊन बसला तर तो अतिशय प्रभावी ठरेल.
बोरिसचा वजीर बी ६ मध्ये आला.

रमताराम's picture

17 May 2012 - 5:55 pm | रमताराम

वजीर बी फळीत येऊन एकाच वेळी दोन प्याद्यांना आधार देत आनंदच्या राजावर नजर ठेवत त्याच्या एफ प्याद्याला हलू देत नाहीये. याचबरोबर आनंदच्या दृष्टीने फायदेशीर अशी हत्ती ए-६ ही खेळीदेखील रोखली.
आनंद बहुधा राजा जी-२ ला नेऊन एफ प्यादे हलते करेल. दुसरा पर्याय म्हणजे उंट जी-७ ला नेऊन सी-८ नि ई-८ या जागांवर नजर ठेवत बोरिसच्य हत्तींना हलू देणार नाही.

चतुरंग's picture

17 May 2012 - 6:04 pm | चतुरंग

हत्तींची मारामारी आणि आनंदने आता ए७ वरच्या प्याद्याला मटकावणे बाकी आहे. बोरिस हत्ती बी ८ मध्ये आणणार.

रमताराम's picture

17 May 2012 - 6:09 pm | रमताराम

:( :( :( :( :(

चतुरंग's picture

17 May 2012 - 6:09 pm | चतुरंग

बरोबरी झाली राव! :(

रमताराम's picture

17 May 2012 - 6:12 pm | रमताराम

बी मधील प्यादे पुढे ढकलण्याची खेळी सुरेख केली. प्यादे प्रमोट करण्याच्या स्थितीत गेल्याने आनंदला एक्स्चेंज स्वीकारण्यापलिकडे पर्याय राहिला नाही. :(

आनंदने बी ३ अशी आक्रमक खेळी करायला हरकत नव्हती.
हत्ती ए ८ मध्ये येऊ शकत नव्हता. थोडी जान आली असती.
बोरिस सॉलिड खेळला. टीम बोरिसची तयारी भन्नाट आहे.
पुढल्या डावात आनंदला काहीतरी करामत करावी लागणार हे नक्की!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2012 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्या पांढर्‍या मोहरी घेऊन बोरीस खेळतोय तेव्हा त्यालाही आमच्या शुभेच्छा.:)

-दिलीप बिरुटे

आज डाव सहा आणि परवा सात. हे दोन्ही डाव एकूण सामन्याला कलाटणी देणारे ठरु शकतात.
एकतर आतापर्यंतचे पाचही डाव बरोबरीत सुटले आहेत त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे की आधी वरच्ष्मा कोण मिळवतो. त्यातून सहाव्या डावात आनंदची मोहोरी काळी आहेत, शिवाय सहा डावांनंतर नियमाप्रमाणे मोहोर्‍यांचा रंगबदल होतो त्यामुळे पुन्हा सातव्या डावात आनंदकडे काळीच मोहोरी असणार आहेत!
१२ डावांच्या रणधुमाळीत शेवटच्या सात डावात जो पहिल्यांदा घाव घालेल तो जिंकण्याची शक्यता वाढत जाणार.
चला बघूयात डाव सहा!

रमताराम's picture

18 May 2012 - 4:38 pm | रमताराम

वेगवान खेळी. नवव्याच खेळीत बोरिसचा हत्ती अ‍ॅक्टिव झालाय. आनंदने लगेच उंटाने त्याच्यावर हल्ला चढवलाय. आज मजा येणार.

चतुरंग's picture

18 May 2012 - 4:40 pm | चतुरंग

स्लाव डिफेन्स! कालच्या सिसिलियन वरुन पुन्हा बोरिस स्लाववर आला.
दोघांची तयारी पट्टीची आहे हे दिसतेच आहे. ७ मिनिटात दोघांच्या १३ खेळ्या झाल्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2012 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला, आजतरी आनंद ड्रॉ साठी प्रयत्न करणार नाही अशी अपेक्षा.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

18 May 2012 - 4:55 pm | रमताराम

सतरा खेळ्या. बरेच महत्त्वाचे मोहरे एक्चेंज झाले देखील. आता हत्ती, वजीरांच्या लढाईवर उतरला डाव. आनंदचा उंट नि दोन्ही हात्ती तुलनेने अधिक फिरते असल्याचा किंचित फायदा आहे. कसा उपयोग होतो ते बघायचे.

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:00 pm | चतुरंग

नंतर भरपूर मारामारी झाली इथपर्यंत दोघांची घरची तयारीच दिसून आली. फारसे नाविन्य नव्हते.
१७ व्या खेळीअखेर आनंदकडे एक प्यादे कमी आहे परंतु त्याची मोहोरी संपूर्ण विकसित आहेत.
बोरिसचा उंट सी१ मधे अडकलाय, त्यामुळे हत्ती अडलाय. त्याचा वजीर ऑकवर्ड जागी आहे.
बघूयात काय होते.

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:07 pm | चतुरंग

वजिरावर चढाई केली ती उंटाने मोडीत काढल्यावर आनंदने उंट बी ६ मधे बसवला. डी स्तंभाचा ताबा बोरिसकडे आहे.
वजिराच्या बाजूची प्यादी पुढे सरकणार असे दिसते. बरोबरीकडे जातोय की काय डाव अशी शंका मनाला चाटून गेली.

दहा मिनिटांनंतर कॉमेंटरीरुममधे कास्पारोव येतोय! :)

रमताराम's picture

18 May 2012 - 5:11 pm | रमताराम

दहा मिनिटांनंतर कॉमेंटरीरुममधे कास्पारोव येतोय! J)

बोरिसने विसाव्या खेळीसाठी आत्तापर्यंत जवळपास १५ मिनिटे खर्ची घातली आहेत. काही सापडते का बघत असणार.

रमताराम's picture

18 May 2012 - 5:23 pm | रमताराम

एकदम सपशेल माघारच की. उंट नि हत्तीला पकडून बसण्यासाठी वजीर मागे नेला. थोडक्यात आनंदला कोंडी फोडण्याचे आव्हान दिले.

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:19 pm | चतुरंग

ला आनंदने क्यूई६ ने उत्तर दिले. आता हत्ती ई१ मधे आणून वजिरावर चाल झाली तर आनंद वजिरावजिरी करेल असे वाटते.

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:21 pm | चतुरंग

.

इंटरेस्टिंग कर्णातला काळा उंट, डी५ वरचा हत्ती आणि एफ ३ मधला वजीर यांच्या संगनमताने राजाच्या बाजूला हल्लाबोल करायचा डाव दिसतोय बोरिसचा!
आनंदचे उत्तर काय असेल? बहुदा हत्ती एफ१ डी८...
किंवा आधी एफ ३ असे प्यादे सरकवून उंटाची रग जिरवेल तो

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:31 pm | चतुरंग

अ‍ॅडवांटॅज मिळवण्यासाठी त्याची दमछाक होते आहे. आज आनंद बराच कूल वाटतोय!

गॅरी, तू तुझी उद्धट मतं ऐकवायला कधी येतो आहेस? ;)

रमताराम's picture

18 May 2012 - 5:37 pm | रमताराम

म्हणूनच मगाची चिडकी स्मायली टाकली. :)

बादवे बोरिस बहुधा हत्ती डबल करेल. तसे झाले तर ड्रॉ. पण पांढर्‍या मोहर्‍यांचा फायदा उठवण्यासाठी काहीतरी आउट ऑफ द हॅट काढेल बहुधा. तब्बल पंधरा मिनिटे झाली विचार चालू आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2012 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खेळ रे बाबा लवकर. हत्ती हत्तीच्या मागे घे नाही तर वजीर एच५ खेळ.
च्यायला, कंटाळा येतोय.

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

18 May 2012 - 5:46 pm | ५० फक्त

एक बेसिक शंका, तुम्ही जे एक्स्चेंज म्हणता आहात त्याचा अर्थ, तु माझं एक प्यादं मार मी पण तुझं एक प्यादं मारतो असा आहे का ? म्हणजे प्याद्याला प्यादं, घोड्याला घोडा असा प्रकार आहे का ?

चतुरंग's picture

18 May 2012 - 5:52 pm | चतुरंग

पोझीशनल अ‍ॅडवांटेज मिळवण्याकरता हे केले जाते.

रमताराम's picture

18 May 2012 - 5:56 pm | रमताराम

याचा बहुतेक वेळा एका प्रकारचे मोहरे मारणे/जिंकणे.

चतुरंग's picture

18 May 2012 - 6:01 pm | चतुरंग

आनंद त्याचे मोटीवेशन हरवून बसलाय! मला त्याचे मत नक्कीच विचारात घ्यावेसे वाटते. सध्या बॅडपॅच सुरु असल्याने असेल परंतु तो अतिसावधपणाने खेळतोय हे खरे आहे.
गॅरीच्या मते आनंद क्रामनिक आणि टोपालोव विरुद्ध ज्या प्रकारे खेळला त्याप्रकारे त्याने खेळायला हवे. बोरिस १९९३ पासून आनंदविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाहीये ही एक बाब बोरिसला मानसिक तणाव देत असणार. त्या ताणावर मात करुन बोरिस कसा खेळतो हे मह्त्त्वाचे.
आनंद मोक्याच्या क्षणी चुका करतो आणि ताण वाढवून त्याचा फायदा घ्यायचा असा बोरिसचा डाव आहे असे गॅरीचे मत.
इथून पुढल्या डावात नर्व्ज पणाला लागणार हे निश्चित.

चतुरंग's picture

18 May 2012 - 6:05 pm | चतुरंग

तब्बल वीस मिनिटे खर्ची घातली आहेत. हल्ला हा उत्तम बचाव याच मार्गाने त्याला जायला हवे अन्यथा बोरिस वरचढ ठरायला बघणार हे नक्की!
बहुदा हत्ती एफ २ मधे आणेल की काय आनंद?

त्याने आनंदची पुढची खेळी बरोबर ताडली - क्यू सी ६!!

रमताराम's picture

18 May 2012 - 6:17 pm | रमताराम

सी पट्टीतला हत्ती कायम वजीरावर अवलंबून रहात असल्याने आनंदने एका वजीराने दोघांना एकाच वेळी पिन केले. आता बोरिस बहुधा आतला हत्ती डी-१ ला आणून वजीराला हलता करेल. हत्ती हलला तर आनंद वजिरावजिरी करायच्या तयारीने बसला आहे असे वाटते (बोरिसचे प्यादे डबल होते नि राजा उघडा पडेल. एच नि जी दोन्ही पट्ट्या आनंदला मोकळ्या होतील.)

चतुरंग's picture

18 May 2012 - 6:20 pm | चतुरंग

एकदा का वजीर गेले की नक्कीच ड्रॉ! त्यामुळे बोरीस वजीर वाचवायला बघणार आणि त्याच वेळी हल्लाही करायचा आहे. हे कठीण काम आहे.

आनंदला हे माहिती आहे की बोरिस जिंकण्याच्या तयारीनेच खेळतोय. त्या जोरात त्याने एकजरी चूक केली तरी आनंद तुटून पडणार!

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 6:29 pm | मृत्युन्जय

आता हत्ती बाहेर काढुन आनंद अ ६ क ६ मधली प्यादी खायला बघणार काय? काळ्या उंटाखाली हत्ती नेलास हे साध्य होइल काय?

रमताराम's picture

18 May 2012 - 6:27 pm | रमताराम

:(. काय व्हईना आता. हत्ती नि उंटाचे एंडिंग. ड्रॉच आता.

चतुरंग's picture

18 May 2012 - 6:56 pm | चतुरंग

कोणत्यातरी वेळी एंडगेम कसा होतो त्याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. आत्ताच वेळ आहे. उद्याही पांढरी मोहोरी आहेत ही त्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आज तो रिस्क घेऊ शकतो!

चतुरंग's picture

18 May 2012 - 7:06 pm | चतुरंग

पुन्हा एकदा! :(
आनंद अ‍ॅग्रेसिव हो रे बाबा जरा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली झोप लागली होती सातव्या डावात तरी आनंद काही पराक्रम करेल म्हणून ही झोपमोड

रंगासेठ आणि रमतारम, चला ना भो लवकर. :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

20 May 2012 - 5:48 pm | चतुरंग

आत्ता कुठे मला गेम दिसायला सुरुवात झाली! :(
एक तास नुसताच झगडतोय इंटर्नेटशी. असो.

पुन्हा एकदा स्लाव. यावेळी तरी काही नाविन्य असेल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>आत्ता कुठे मला गेम दिसायला सुरुवात झाली !
थेट डाव पाहता येत होता. पण चेसबाँबवर लटकलो होतो.

१५ व्या कॅसलिंगच्या खेळीनंतर पुन्हा एकदा बोरीस बचाव आण डावाला ड्रॉकडे घेऊन जातोय का ?
आनंद काही अफलातून खेळी करेल असे वाटत नाहीच. :(

-दिलीप बिरुटे
(आनंदच्या परफॉर्मंसवर नाराज)

चतुरंग's picture

20 May 2012 - 5:50 pm | चतुरंग

दोघांचे किल्लेकोट झालेत. पटाच्या मध्यात डी४ डी५ अशी प्यादी आली आहेत. सी स्तंभात पांढर्‍याचा वजीर आणि हत्ती जोरात आहेत. ई स्तंभात काळ्याचे प्यादे आहे आणि त्या स्तंभाचा ताबा अजून कोणी घेण्याचा प्रयत्न केला नाहीये!
अजून तरी समसमान स्थिती आहे.

चतुरंग's picture

20 May 2012 - 6:10 pm | चतुरंग

क्यू बी ८ खेळी केली. तो आक्रमक खेळलेला आहे!
एफ६ वरच्या घोड्याला वजिराचा आधार होता. आता एच ४ वरच्या बोरिसच्या उंटाने तो घोडा मारला तर जी७ वरचे प्यादे त्या उंटाला मारते. किल्लेल्कोट झालेला काळा राजा उघडा पडण्याचा धोका आहे. त्यानंतर सी३ वरचा घोडा ई२, जी३, एच ५ असा झेपा घेत आला तर काळ्या राजाला स्थिती अवघड होऊ शकेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>आता एच ४ वरच्या बोरिसच्या उंटाने तो घोडा मारला तर
नै ना. बीजी३ खेळून बोरीसनं शेपूट घातलं वाटतं.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

20 May 2012 - 6:39 pm | चतुरंग

मारामारी करुन बोरिसने डावात आणखी गुंतागुंत टाळली. आता सी स्तंभात हत्ती दुहेरी करणार तो.
केंद्रातले डी४ वरचे आयसोलेटेड प्यादे, जी पट्टीतले डबल प्यादे असे काही सूक्ष्म दोष पांढर्‍याच्या डावात निर्माण झालेत.
तसेच आनंदसाठी ए६ वरचे प्यादे आयसोलेटेड आहे.
बघूया काय होते.

चतुरंग's picture

20 May 2012 - 6:53 pm | चतुरंग

हत्ती दुहेरी करणे हा पांढर्‍याचा उद्देश.
ए ८ मधला हत्ती हलवण्यासाठी ए ६ वरच्या प्याद्याला जोर मिळणे आवश्यक त्यामुळे आनंदने घोडा डी ७ मधे घेतला.
पांढरे हत्ती दुहेरी झाले.
आता काळे हत्ती दुहेरी होणार का?

कॉमेंटरीबॉक्समधे कार्पोव येतोय! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता डाव कुठे जाईल कोणास ठाऊक ? पण आज मजा येत आहे.

रमताराम's picture

20 May 2012 - 8:25 pm | रमताराम

उगवलो. भलत्याच कामात अडकलो होतो. आलो तर गेम तुफान झालेला दिसतोय. समजायला वेळ जाणार.

चतुरंग's picture

20 May 2012 - 8:33 pm | चतुरंग

१९ वर्षांनंतर बोरिसने आनंदला हरवले!! आजचा डाव आनंदने मध्य डावात चुका केल्या. त्याचा पांढरा उंट डावात जो अडकून बसला तो शेवटपर्यंत सुटला नाही अणि तीच त्याची डोकेदुखी ठरली.
एक चांगले झाले की आज आनंद हरला! कारण ह्या शॉकनंतर आता तो चवताळून उठेल आणि पुढचे डाव नक्कीच रंगतदार होतील!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्य डावानंतर पटावर बोरीसची पकड घट्ट झाली. रंगाशेट म्हणतात तसं आनंदचा उंट शेवटपर्यंत हलला नाही आणि आनंदने काही चुका केल्या. आनंद डावाच्या शेवटी हत्ती आणि घोड्याला घेऊन काही अप्रतिम चाली खेळून डावावर पकड मिळवतो का किमान डावाला ड्रॉ तरी करेल असे वाटत होते परंतु आनंदला महत्प्रयासानेही जमले नाही. काल कास्पोरव्ह म्हणाला की, आनंद पूर्वीसारखा खेळत नाही. (मला विश्वनाथ आनंदचा सचिन व्हायला लागला की काय असे वाटले) असो, पण आज पटावर खेळ पाहतांना मजा आली. आजच्या पराभवानंतर वि.आनंद जिद्दीने खेळेल आणि विजयी होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन माझे दोन शब्द सं.

वेगवेगळ्या खेळींचे विश्लेषन करणारे रंगाशेठचे आणि उशिरा आलेले रमतारामचे आभार. :)

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

20 May 2012 - 10:31 pm | रमताराम

पुन्हा एकवार सचिनवर घसरण्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईनोचा टँकर पाठवला आहे. :)
रंगाशेठशी सहमत. जेव्हा निर्विवाद वर्चस्व निर्माण होते तेव्हा थोडी कॉम्प्लसन्सि निर्माण होते, आळस भरतो. एक दणका बसला की खडबडून जागा होण्यास फायदा होतो. पराभवाचा बदला आनंद लगेचच पुढच्या सामन्यात घेतो असा इतिहास आहे. उद्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का पहायचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईनोचा टँकर पाठवला आहे

आमची मतं स्पष्ट आणि न आवडणारी असतात त्यामुळे टँकर परत आपल्या पत्त्यावर पाठवला आहे. :)

बाय द वे, संजय, खाली प्रतिसाद म्हणतात ते मलाही पटतंय. आनंद वजीर जीवंत करायच्या नादात बोरीसला चान्स देऊन बसला अर्थात रंगाशेठ आणि आपणच त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकाल.

-दिलीप बिरुटे

अदर वाईज त्यानं उंटाच्या बदल्यात वजीर निर्माण केला होता, तो हरला तरी हरकत नाही त्याचा आजचा गेम मला आवडला, ही हॅज टेकन अ रिस्क!. बहुदा वजीर तयार करण्याच्या उत्साहात, बोरिसच्या मात करणार्‍या चालींना आपल्यापेक्षा फक्त एक मूव कमी लागतेय हे त्याच्या लक्षात आलं नाही . तुम्हाला काय वाटतं चतुरंग?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2012 - 12:07 am | संजय क्षीरसागर

तुम्ही `सामना विश्वविजेतेपदाचा' : डाव- ८, ९,१० वगैरे प्रत्येकी स्वतंत्र पोस्ट करा, इथे प्रतिसाद मिक्स-अप होतायत

चतुरंग's picture

21 May 2012 - 4:27 pm | चतुरंग

म्हणताहेत त्याप्रमाणे आनंद वजीर करायच्या मागे लागला नव्हता, म्हणजे "वजीर करण्याच्या नादात डाव गेला" असे झाले नव्हते. तर डाव ऑलरेडी गेल्यात जमा असल्याने ज्याला निर्वाणीचा प्रयत्न म्हणतात तशा प्रकारची ती हाराकिरी होती!
साधारणपणे विसाव्या खेळीपासूनच आनंदची डावावरची पकड ढिली होत गेली.
आणखीन विस्तृत विश्लेषण नंतर देईन. आता डाव आठवा बघूयात.

चतुरंग's picture

21 May 2012 - 4:46 pm | चतुरंग

ग्रुनफेल्ड डिफेन्सने सुरु झाला!
आनंदने चौथ्या खेळीला डी५ खेळून आधीच्या तिसर्‍या डावापेक्षा वेगळी खेळी केली. आता डाव किंग्ज इंडियन सामिश वेरिएशनकडे जातोय.
पांढर्‍याची धडपड जास्तीतजास्त जागा पटकवण्याची असते त्याबदल्यात त्याची मोहरी आधी थोडी कमी विकसित राहतात.
हे शार्प वेरिएशन आहे. मुख्य म्हणजे हा ग्रुन्फेल्ड डिफेन्स बोरिसचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा ह्यातला अनुभव प्रचंड आहे! असे असताना आनंदने हा प्रकार निवडावा म्हणजे "तुम्हारे इलाके में आके" असे सरळसरळ आव्हान आहे. आज मजा येणार!

रमताराम's picture

21 May 2012 - 4:53 pm | रमताराम

मला हा प्रकार धोकादायक वाटतो. मी जेव्हा जेव्हा (अर्थात कम्पूटरशी) असा प्याद्यांचा व्यूह रचतो तेव्हा अनफोल्डिंगमधे गडबड करतो नि बहुधा हरतोच. :(

चतुरंग's picture

21 May 2012 - 4:54 pm | चतुरंग

आनंदने ई२ मधला घोडा सी३ मधे आणून बोरिसला विचारात पाडले. वेगळ्या खेळ्या सुरु झाल्यात. बोरिसने एफ६ वरचा घोडा एच५ मधे नेला दोघांनी सातव्या खेळीपासूनच विचार सुरु केलाय. ह्या स्थितीचे होम प्रिपरेशन फारसे नसावे. बहुदा जी४ करुन प्यादे घोड्यावर घालतो का ते बघायचे!

रमताराम's picture

21 May 2012 - 5:06 pm | रमताराम

वेगळी केली आनंदने. बहुधा प्यादे एफ-६ खेळायला फोर्स करतोय आनंद. कारण त्याशिवाय बोरिसला मागचे ई प्यादे हलवता येत नाही. पण या खेळीने बोरिसचा उंट बंद होतो नि आनंदचा सी पट्टीतला घोडा मोकळा होईल (जो हलल्यास थेट हत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.)

आनंदने उंट जी५ मधे नेऊन चांगली खेळी केली. ई५/६ अशी काळ्या प्याद्याची खेळी थांबवली. काळ्याला एफ३ असे प्यादे खेळता येत नाही कारण मग जी४ अशा पांढर्‍याच्या खेळीला घोड्याला जागा राहत नाही! बघूयात बोरिस काय करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदला उंट थेट मागे घ्यावा लागतो असे दिसते.
अर्रर्र, उंट तर दिला. अशा खेळीमागे काय कारण असतं हो ?

रमताराम's picture

21 May 2012 - 5:17 pm | रमताराम

फार पर्याय नव्हता. पण बोरिसने मात्र घोड्याने उंट न घेता ई-प्याद्याने घेतला हे जरा आश्चर्यच आहे. प्यादे डबल तर झालेच पण आनंदच्या डी-प्याद्याला शह द्यायला प्यादे उरले नाही. कदाचित हुशारीने या डबल झालेल्या प्याद्याचा वापर करून ई पट्टीत (राजाच्या!) प्याद्यांच्या कोटाला भोक पाडायचा विचार दिसतोय. शिवाय ई पट्टी वजीराला मोकळी झाली.

चतुरंग's picture

21 May 2012 - 5:19 pm | चतुरंग

आज दोघेही नेहेमीच्या समजुतीना धक्का देऊन खेळताहेत.
आनंदने काळा उंट एक्सचेंज केला. बोरिसने घोड्याने पांढरा उंट घेऊन ई६ असे प्यादे सरकवणे आणि केंद्रात भक्कम फळी उभारणे हा आडाखा मोडून ई प्याद्याने उंट घेतला! आता हत्ती ई पट्टीत आणून नंतर एफ ४ असे प्यादे सारुन आनंदच्या अजूनही किल्लेकोट न झालेल्या राजाला कोंडीत पकडायचा डाव आहे! लै भारी!

रमताराम's picture

21 May 2012 - 5:23 pm | रमताराम

आनंदचा काळा उंट गमावल्याने पांढर्‍या घरातील प्याद्यांचा कोट पार करून पलिकडे जायला त्याचा दुसरा उंट कामात येणार नाही. तो उंट वापरात आणण्यासाठी तो कोट आधी कुठेतरी फुटावा लागेल. बोरिस बहुधा एफ-६ खेळेल.

त्याआधी वजीर पुढे घेऊन आनंदने बोरिसचा घोडा धोक्यात आणला. त्याला बहुधा जी-७ ला माघार घ्यावी लागेल.

चतुरंग's picture

21 May 2012 - 5:27 pm | चतुरंग

अपेक्षेप्रमाणे काळ्याचे प्यादे एफ५ असे आलेच! आता आनंद जी४ खेळू शकत नाही. त्यामुळे घोड्याला धोका नाही. परंतु या मागे आनंदचा डाव असा असावा की उगाच राजाच्या बाजूची प्याद्याची फळी जी ४ खेळून खिळखिळी करायची आणि घोड्याला उचकवून मागे ढकलायचे त्यापेक्षा त्या घोड्याला पटाच्या बाजूलाच बसूदेत. आपसूक एक मोहरे डावातून बाहेर जाते!

चतुरंग's picture

21 May 2012 - 5:30 pm | चतुरंग

आनंदने ई४ ने एफ५ चे प्यादे घेतले. आता उंटाने मारले तर जी४ ला उत्तर नाही जी ६ ने प्यादे मारले तर काळा राजा उघडा पडतो! क्या बात है!!

रमताराम's picture

21 May 2012 - 5:37 pm | रमताराम

एकदम मस्त खेळी.
(प्यादे न खाता पर्यायी थ्रेट निर्माण करता येईल का हे तपासून पहावे लागेल. गुंतागुंत वाढते आहे. :) )

चतुरंग's picture

21 May 2012 - 5:46 pm | चतुरंग

गोष्ट नजरेतून निसटली माझ्या जी४ ला काळा उंटाने बी१ मधला घोडा घेऊन उत्तर देऊ शकतो. आनंद तेच खेळला आता बोरिस बहुदा आधी हत्तीने शह देईल मग राजा डी१ जाईल त्यानंतर उंटाने घोडा मारला की आनंद काळा घोडा मारेल.

रमताराम's picture

21 May 2012 - 5:53 pm | रमताराम

पण वाचलेला घोडा मागे जाण्यापलिकडे काही फारसे साधत नाही. शिवाय तो मागचा घोडा बाहेर पडायला अडचणच आहे आनंदला, पिन झालेला तो घोडा देऊन त्याबदली बोरिसचा उंट मिळणे हा फायदाच म्हणायला हवा. शिवाय आनंदचा हत्तीही मोकळा होतोय.

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:00 pm | चतुरंग

आनंदने तेच कॅलक्यूलेट केले असणार. राजा डी१ सी२ असा नेऊन पांढरा उंट बाहेर काढला की हत्तींचा समन्वय होतो. काळ्या राजाच्या बाजूला हल्लबोल आहे. काळ्याचा पांढरा उंट मेला की घोडा ई४ मधे येऊन बसतो पांढर्‍याचा.
आज आनंद त्याच्या प्राईमटाईम मधे खेळला तसा खेळतोय!

रमताराम's picture

21 May 2012 - 6:07 pm | रमताराम

अपेक्षित खेळी आलीच. हत्ती आला समोर. पुढच्या दोन खेळ्याही अपेक्षेप्रमाणेच.

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:08 pm | चतुरंग

राजा डी१, उंटाने घोडा मारला आता हत्तीने उंट मारला घोडा हलवावा लागणार आता जी ७ किंवा एफ ६.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डावावर आनंदची पकड म्हणावी काय ?

रमताराम's picture

21 May 2012 - 6:12 pm | रमताराम

शिवाय उजवीकडून बोरिसचा वजीर घुसला असता की. मधे आणायला वजीराला उंटाचा अडथळाच झाला असता.

अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद (आमच्या सारखेच दिसताय. :) ) असो. मला आनंदला अ‍ॅडवांटेज आहे असं वाटतंय या क्षणी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद
आपले प्रतिसाद टाकून होईपर्यंत तरी त्यांनी दम मारावा ना.
उंट मधे आणावा असा प्रतिसाद टाकून पट बघायला गेलो तर राजा हलवलेला होता मी तरी त्याला काय करु :)

काळ्याचा वजीर इ४ खेळतो वाटतं.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:10 pm | चतुरंग

परंतु बोरिसचे मनगट त्याने पकडले आहे असे म्हणायला हरकत नाही! ;)

रमताराम's picture

21 May 2012 - 6:23 pm | रमताराम

बोरिसने मस्त गंडवला आनंदला. हत्ती गमावला. फोर्क ध्यानात आला नव्हता कि काय आनंदच्या. आता आनंदने वजीर ई पट्टीत आणून बोरिसच्या वजीराला जेरबंद केला आहे. आता फक्त मोकळ्या हत्तीच्या बळावर बोरिस काय करतो पाहू. मजा आ रहा है. :)