सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
17 May 2012 - 4:33 pm

विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या भागाचे शेपूट बरेच लांबल्यामुळे हा दुसरा भाग सुरु करत आहे.

http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर डावांचे थेट प्रक्षेपण बघता येते. पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.

http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो.

चला तर मग सुरु करुयात पाचव्या डावाचे विश्लेषण.

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:29 pm | चतुरंग

एफ ३ हे विषारी प्यादे होते, तो ट्रॅप होता. हत्तीचे बलिदान देऊन आनंदने बोरिसला चांगलेच गोत्यात आणले आहे!

रमताराम's picture

21 May 2012 - 6:35 pm | रमताराम

अंमळ उशीरा समजला आम्हाला. :) वजीराच्या खेळीनंतरच कळले हे. (काही हरकत नाय, बोरिस म्हणतोय त्यालाही समजले नव्हते. :) )

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:25 pm | चतुरंग

काळा वजीर अडकवलाय आनंदने!!

रमताराम's picture

21 May 2012 - 6:25 pm | रमताराम

बोरिस रिजाईन्स. हुर्रे.

रमताराम's picture

21 May 2012 - 6:32 pm | रमताराम

मागे अडकलेले घोडे नि हत्ती मोकळे करण्यास बर्‍याच खेळ्या गेल्या असत्या. त्या दरम्यान आनंदने एच प्याद्याच्या मदतीने बोरिसचा राजा नागवा केला असता त्यामु़ळे बोरिसने रिजाईन केले असावे. मझा आला.
आमची कालची प्रॉफसी खरी ठरली. ताबडतोब परतफेड करण्याची परंपरा आनंदने राखली आणि फक्त सतरा खेळ्यात मात! क्या बात है.

आहा! बोरिस म्हणतोय मी आनंदची शेवटची (वजीर एफ-२) खेळी लक्षातच घेतली नव्हती. हॅट्स ऑफ चॅम्पियन आनंद.

चतुरंग's picture

21 May 2012 - 6:33 pm | चतुरंग

वा रे पठ्ठे!! केवळ १७ खेळ्यात डाव संपवला. आज आनंदच्या खेळाने तालची आठवण करुन दिली!!
ररा तुमच्या कालच्या प्रॉफसीबद्दल तुमच्या तोंडात उंट, घोडे, हत्ती इ. पडो!! ;)

भडकमकर मास्तर's picture

21 May 2012 - 8:32 pm | भडकमकर मास्तर

डावाचे अ‍ॅनलिसिस करणारे (करा "लेको" अ‍ॅनलिसिस ;) ) म्हणत होते की दहा पंधरा मिन्टांपूर्वी गेल्फंदची सिचुएशन बरी होती आणि अचानक सारे शॉकिंग घडले... ( बोरीस अति शहाणपणा करयला गेला वगैरे वगैरे)

म्हणजे ग्रेट गेमचे आनंदला क्रेडिट मिळण्या ऐवजी बोरीएसची गोडचूक अधिक कारणीभूत आहे असा अर्थ काढायचा का?
रंगाकाका आणि ररांचे काय मत?

काहीका असेना, आनंद जिंकला हे भारी झाले....

रमताराम's picture

22 May 2012 - 9:14 am | रमताराम

लेको' वरचा श्लेष आवडला.

बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण यात बोरिसने घोडचूक केली हे म्हणण्यापेक्षा आनंदची शेवट्ची खेळी एकदम आउट ऑफ द हॅट झाली. पोजिशनल अ‍ॅडवांटेज घेण्याच्या किंवा मेटिंग थ्रेट देण्यासाठी आनंद वजीराला एफ-४ मधे आणेल अशी सार्‍यांचीच अपेक्षा होती. तसे झाले असते तर बोरिसने जी पट्टीत येऊन वजीराला आरामात सोडवला असता. पटाच्या वरच्या बाजूला प्याद्याचे एक्स्चेंज होऊन वजीराला मागे फिरण्याची संधी मिळाली असती. तसे झाले असते तर एक हत्ती कमी राहिलेल्या आनंदची स्थिती कमकुवत ठरली असती.

शिवाय फोर्क बसणे हा म्हणजे 'माथा आळ लागे' असा प्रकार असतो. बहुधा 'गाढवाला एवढं पण लक्षात आलं नाही का?' अशी प्रतिक्रिया मिळते (माझीच पहा ना. :) ) त्यामुळे अचानक ज्याला फोर्क बसला त्याच्या खेळाबद्दल लोक शंका घेऊ लागतात. पण आनंद हा आनंद आहे. उगाच २००७ पासून चॅम्पियनच्या खुर्चीत घट्ट बसलेला नाही. :)

चतुरंग's picture

22 May 2012 - 12:16 am | चतुरंग

'लेको' हा पार लेकोच आहे ;) तो आणि तिथला दुसरा ग्रँमा नेपो ह्या दोघांनाही आनंदचा डाव समजला नव्हता.
पण एक गंमत सांगू का डाव सुरु असताना चेसडोमवरच्या ऑनलाईन अ‍ॅनालिसिस मधे आनंदच्या बाराव्या खेळीनंतर तिथला अ‍ॅनालझर ग्रँ.मा. बालोग साबा काय म्हणालाय बघा -
There is a very important detail: 12...Bxb1 13.Rxb1 Re8 14.Kd1 and here Qf6 with idea to stabilize the knight on f4 is refuted by 15.gxh5! Qxf3 16.Kc2 Qxh1 and 17.Qf2! and the Black queen is trapped after the bishop moves away from f1.
म्हणजे १२ व्या खेळीलाच हा धोका लक्षात आलेला होता! किंबहुना आनंदने हा ट्रॅप १० व्या खेळीला बोरिसने एफ५ असे प्यादे ढकलल्यावरच शोधला असे माझे म्हणणे आहे!
राजाच्या बाजूची काळी घरे उंटाच्या अनुपस्थितीत कमजोर आहेत त्यामुळे तिकडून काळ्या वजिराला घुसायची वाट ठेवत आनंदने एकप्रकारे बोरिसला 'टनेल सायटेड' ठेवले. शिवाय एफ१ मधला उंट न हलवून दोन्ही हत्ती समन्वयाबाहेर राहतील याचीही खबरदारी घेतली. राजाला पटाच्या मध्यात अशाप्रकारे उघडा टाकला की बोरिसच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवल! आधी हत्ती चाल करुन आला तसा राजा हळूच सी १ ह्या सुरक्षित स्थानात गमन करता झाला पण त्याच वेळी काळ्या वजिराला चेक द्यायचा मोह अनावर होईल याचीही खबरदारी त्याने घेतली ती पुढे आलेल्या काळ्या वजिरासमोर एफ३ चे विषारी प्यादे ठेवत, शिवाय कोपर्‍यातला हत्ती खुणावत होताच. वजीर एफ२ ही अफलातून खेळी इतकी सटल आहे की त्याचा परिणाम चटकन लक्षात येत नाही. हा गनिमी कावाच होता. भर डावात सात मूव्ज आधी हे सगळे बघू शकणे हीच जग्गज्जेत्यांची खासियत. तोच त्यांच्यातला आणि इतरांमधला फरक!!
त्यामुळे मी तरी संपूर्ण क्रेडिट आनंदलाच देईन.

भडकमकर मास्तर's picture

22 May 2012 - 11:44 am | भडकमकर मास्तर

ररा आणि रंगा,

दोघांच्या प्रतिक्रिया वाचल्या... बोर्ड समोर बघत चाली मागे पुढे करून पाहिल्या.... ( त्याशिवाय काहीच झेपत नाही)...
एकदम मजा आली.. दहाव्या अक्राव्या मूवपासून बोरीसला लालूच दाखवत आत घ्यायचा, एफ थ्री प्यादे मोकळे सोडायचे, फोर्क बसवून घ्यायचा, हत्ती मारून घ्यायचा आणि मग वजीर एफ टू .. खल्लास....

काल लाईव म्याच पाहताना--- शेवटची क्वीन एफ टू खेळी करून आनंद उठून गेला आणि मग बोरीस थोडा वेळ थक्क ..... लेको नेंपो सुद्धा " धिस इज शॉकिंग" वगैरे वगैरे...आणि शांतपणे आनंद कडेला उभा होता... बोरीसने घड्याळ थांबवले.. म्याच खतम.... अहाहा....

अवांतर : . काय मजाय . चेस समालोचकांनाही किती शिव्या पडताहेत .. चेस समालोचनपेक्षा क्रिकेट समालोचन किती सोपे.... सेहवागचा सिक्सर बसला तर म्हणायचे " एक्सलंट हँड आय कोऑर्डिनेशन" आ ऊट झाला तर म्हणायचे, " नो फीट मूवमेंट, प्लेयिन्ग अवे फ्रॉम बॉडी"... हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोरीसनं लैच लवकर मान टाकली.
रंगाशेठ काल म्हणाले होते. आनंद उद्या परतफेड करेल तसेच झाले.

चला आभार्स लोकहो. :)

-दिलीप बिरुटे

वाहवा! १७ चालींचा गेम म्हंजे निव्वळ एक्साईटमेंट होती! आता पुढल्या म्याचेससाठी भाग -३ काढा प्लीज!

भडकमकर मास्तर's picture

22 May 2012 - 11:48 am | भडकमकर मास्तर

अगदी.. पुढल्या सामन्यासाठी भाग तीन काढा.. हे प्रकरण पुढल्या पानावर गेले आहे...

चतुरंग's picture

23 May 2012 - 12:49 am | चतुरंग

ट्रॅप लावून अडकवले हा ज्यांना फ्लूक वाटत असेल आणि आनंदला डावाचे श्रेय देणे जड जात असेल तर त्यांनी आनंदने २००८ च्या विश्वविजेतेपदाच्या सामन्यात क्रामनिकला कसे हरवले होते ते बघावे.
२७ व्या खेळीला हत्तीपुढे आला प्याद्याने चाल करवून घेतली, नंतर हत्तीने डी स्तंभातल्या प्याद्याला बढत द्यायची आहे असे भासवून सी ३ मधे मुक्काम केला, क्रामनिकच्या घोड्याने ते प्यादे मारले आणि नंतर आनंदने वजिराने घोडा मारुन हत्तीला बळेच अंगावर घेतले, आनंदच्या घोड्याने पांढर्‍या वजिरावर हल्ला केला, वजिरावजिरीच्या नंतर राजाला शह देऊन आपल्याला उंटही मिळतोय अशा भ्रमात क्रामनिकला ठेवले मग राजाने शह घेत उंटाचे बलिदान दिले आणि शेवटच्या पट्टीत हत्तीने चाल करुन दोन खेळ्यात डाव संपवला! केवळ लाजवाब!!
इथेही पुन्हा ८ खेळ्यांचे (२८ ते ३५) कॅलक्यूलेशन अचूक झालेले होते! निव्वळ जीनिअस!!

रमताराम's picture

23 May 2012 - 11:33 am | रमताराम

आहा, शेवटी प्यादे कसे बरोब्बर नेमक्या घरात बसणार याचे कॅल्क्युलेशन! एक उंट जास्त असूनही प्रतिस्पर्धी xट काही करू शकत नाही. जबरा.