मिसळपावचे अधिकृत निवेदन.

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
15 May 2010 - 9:49 am

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वर जरा गोंधळाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी हे निवेदन देतो आहे.

मिसळपाव .कॉम हे केवळ मराठी लोकांसाठी मराठीतून व्यक्त होण्यासाठीचे माध्यम म्हणून उपलब्ध करून दिलेले आहे. या संकेतस्थळाचा अन्य कसलाही हेतू नाहीये. हा खुलासा नव्याने देण्याची तशी तर गरज नव्हती कारण जे लोक या प्रवासात गेले तिनाहून अधिक वर्षे सोबत आहेत त्यांना याची जाणीव आहेच. तरी नवीन लोकांना याची कल्पना असावी हे उत्तम.

सध्या मिसळपाव वर जो गोंधळ झालेला दिसतो आहे त्यात तात्यांचे नाव गुंतलेले असल्यामुळे ती चर्चा मिसळपाव.कॉम वर कायम घसरताना दिसते आहे. माझा संबंध मिसळपाव सोबत आहे, मिसळपाव उभे करण्यापासून ते आता पर्यंत मी मिसळपाववर आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळतोय. सदस्यांचे आणि तात्यांचे काय चालले आहे हे मला फार उशीरा माहिती पडले. या सर्व प्रकरणात माझा, मिसळपावचा तसेच संपादकांचा कुठेही काहीही संबंध नाहीये.

मिसळपाव गेले अनेक महिने मीच चालवतोय आणि या पुढेही ते तसे चालू राहील याची खात्री देतो. त्यामुळे मिसळपाव बंद पडेल अश्या अफवांवर विश्वास ठेवण्याची मुळीच गरज नाही.

मिसळपावचे सर्व अधिकार माझे जवळ आहेत त्यामुळे मी व्यवस्थापनाचे निर्णय घेऊ शकतो. मात्र यापूर्वी माझे मिसळपाववर जसे वर्तन होते तसेच राहील. मी मिसळपावच्या तांत्रिक कामांतच मग्न असेल. रोजच्या संपादनाची कामे संपादक मंडळ करील. येत्या काही काळात मिसळपाव वर खूप बदल अपेक्षीत आहेत. तांत्रिक दृष्ट्या तसेच संकेतस्थळाच्या मांडणीच्या अनुषंगाने हे बदल केले जातील. मिसळपाव अधिकाधिक सहज आणि सोपे करण्यास प्राधान्य असेल.

मिसळपाव हे एक सामुदायिक संकेतस्थळ आहे. अनेक विचारांची लोक येथे येत असतात, एखाद्या विषयावर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात. मात्र एक बाब येथे स्पष्ट करावीशी वाटते की मिसळपाव व्यवस्थापन मंडळ हे आपल्या अन्य कामांतून वेळ काढून उरलेल्या वेळात मिसळपावचे काम करते त्यामुळे, मिसळपावर वर हे नाहीये... त्याबद्दल स्पष्टीकरण द्या... खुलासा करा... वगैरे गोष्टी शक्य होत नाहीत. मिसळपावच्या मागची भूमिका लक्षात घेऊनच अश्या(काही) सदस्यांनी यापुढे अश्या प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.

मिसळपाव वरच्या प्रेमाखातर लोकांनी हक्काने दिलेली सूचना मी आदेशाप्रमाणेच मानतो मात्र याचा अर्थ हा मुळीच नाही की कुणीही यावं कुठल्याही नव्या आयडीने काहीही लिहावं आणि व्यवस्थापनाने ते गपगुमान ऐकून घ्यावं. झाल्या प्रकारामुळे लोकांचा राग मला मान्य आहे मात्र यात मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठेच नाहीये, किंवा त्याच्या संपादन किंवा व्यवस्थापनाचा कुठेच काही संबंध नाहीये. त्यामुळे मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सदस्यांनी गोंधळून जाऊ नये.

झाल्या प्रकारातून लवकरच सर्वांनी सुखरूप बाहेर पडावं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान भरून निघावं अशीच अपेक्षा आहे. बाकी सर्व बदलांचे परिणाम हळू हळू दिसतीलच. थोडा धीर धरा. आणि हो निश्चिंत होऊन मिसळपाव वर येत राहा. मिसळपाव सक्षम आहे.

तुमच्या कुठल्याही सूचना, तक्रारींचं नेहमीच स्वागत आहे.

- नीलकांत

प्रकटनविचारप्रतिसादहे ठिकाणधोरणमांडणीवावर

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

15 May 2010 - 10:11 am | नितिन थत्ते

योग्य वेळी निवेदन करून शंकाकुशंकांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न स्तुत्य.

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

15 May 2010 - 10:20 am | ऋषिकेश

योग्य वेळी योग्य निवेदन...अभिनंदन नीलकांत

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

वेताळ's picture

15 May 2010 - 10:27 am | वेताळ

निवेदनाबद्दल आभारी आहे. सर्व सभासदान नम्र विनंती आहे कि मिसळपावचे नाव बदनाम होईल अशी कॄती कोणी करु नये.विचारपुर्वक आपला निर्णय घ्यावा.

वेताळ

दत्ता काळे's picture

15 May 2010 - 10:46 am | दत्ता काळे

"योग्य वेळी योग्य निवेदन... "मी ही असेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2010 - 10:55 am | बिपिन कार्यकर्ते

भूमिका जाहिरपणे मांडली हे उत्तमच.

बिपिन कार्यकर्ते

समंजस's picture

15 May 2010 - 10:59 am | समंजस

गोंधळाचे वातावरण दुर करण्याकरीता केलेल्या जाहिर खुलाशा बद्दल धन्यवाद.. :)
मिसळपाव वृद्धिंगत होत जावो ही शुभेच्छा!!!

इन्द्र्राज पवार's picture

15 May 2010 - 11:17 am | इन्द्र्राज पवार

रोखठोक असुनही अतिशय प्रांजळ आणि समयोचित निवेदनाचा हा एक सुन्दर नमुना होय, जिचे स्वागत स्थापनेपासून असलेले सदस्य तर करतीलच, पण माझ्यासारखे नव्याने या हॉटेलात आलेलेदेखील निश्चित करतील, इतके हे स्पष्ट आहे. नव्याने सदस्य झालेल्या अन्य व्यक्तींचे मत मला माहित असणे शक्य नाही, पण माझ्यापुरते मी सांगू इच्छितो कि, सदस्यत्व घेतलेल्या पहिल्या दिवसापासून मला इथे निखळ आनंद मिळत गेला आहे.... आणि व्यवस्थापक म्हणतात त्याप्रमाणे "मिसळपाव बंद पडेल अशा अफवा" याची जाणीव कुठेच दिसली नाही. कदाचित खरड माध्यमातून अशा प्रकारचे एकमेकात संदेश लिहिले गेले असतील/नसतील.... मात्र "धागा" या बाबी पासून अलिप्त आहे असे माझे वाचन मला सांगते.

"....कुणीही यावं कुठल्याही नव्या आयडीने काहीही लिहावं आणि व्यवस्थापनाने ते गपगुमान ऐकून घ्यावं....."

इथ "नव्या आयडी" ने याचा अर्थ "नवीन" सदस्यांनी असा नसेल असे गृहीत धरतो.

मिसळपावच्या उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व सदस्य सदैव "पॉझिटीव्हली" कार्यरत राहतील अशी खात्री आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सोम्यागोम्या's picture

15 May 2010 - 11:29 am | सोम्यागोम्या

नीलकांत वर काही लोकांनी लेखाचे कौतुक केले आहे. काही अंशी सहमत आहे .
या सर्व प्रकरणात बुडित धागे उडवण्याचे मुख्य कारण समजले नाही. जर मिपाच्या व्यवहारात पारदर्शकता असेल तर धागे उडवण्याचे काहीच कारण नव्हते.
तुम्ही कसलेसे निवेदन दिले होते असे समजले पण असे काही निवेदन आमच्या नजरेस पडले नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

15 May 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

लवकरच ह्या धाग्यावर काही "द्रष्टे समाजसेवक" नको त्या प्रतिक्रीयांचा पाऊस पाडतील ह्याची खात्री आहे. त्यामुळे हा धागा वाचनमात्र ठेवावा असे वाटते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

15 May 2010 - 11:32 am | अवलिया

हेच आणि असेच.

--अवलिया

सहज's picture

15 May 2010 - 11:33 am | सहज

द्र्ष्टे समाजसेवक सक्रिय होतील व ते कोण ते कळेलच की रे. त्यामुळे लिहून दे त्यांना. लोकांना कळेल की समाजसेवक कोण अस्सल मिपाकर कोण.

:-)

टारझन's picture

15 May 2010 - 11:40 am | टारझन

नीलकांतला आणि मिसळपावला आपला फुल्टू सपोर्ट होता/ आहे/ राहिल :)

आनंद's picture

15 May 2010 - 12:34 pm | आनंद

धन्यवाद नीलकांत,

या वेळी एक जुना संवाद आठवला.http://misalpav.com/node/2572#comment-35348

गणपा's picture

15 May 2010 - 2:05 pm | गणपा

झाल्या प्रकाराचा मिसळपाव व्यवस्थापनाशी संबंध नव्हता सत्य हे माहीत होतच. पण या वाईट कामासाठी मिपाचा दुरुपयोग केला गेला हेही तितकच खर आहे.
या धुराळ्यात हकनाक काही संपादकांवर धुळ उडली. निलकांतांच्या या निवेदनाने या सर्वावर पडदा पडो.

मिपाच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा.

भोचक's picture

17 May 2010 - 4:02 pm | भोचक
अरुंधती's picture

15 May 2010 - 2:12 pm | अरुंधती

माहितीबद्दल धन्यवाद नीलकांत!
ह्यापुढे असे काही गैरप्रकार मिसळपाव वेबसाईटच्या माध्यमातून होऊ नयेत ह्यासाठी आवश्यक ती खबरदारी, सदस्यांना आर्थिक धोरणाचे निवेदन इत्यादी माहितीही जर आपण संकेतस्थळावर सहज उपलब्ध करून दिलीत व वैयक्तिक पातळीवर केलेल्या अर्थ व्यवहारांचा मिसळपावाशी काहीही संबंध असणार नाही असा खुलासा केलात तर चित्र अजून स्पष्ट होईल व ह्यासारखे प्रकार पुढे होणार नाहीत.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नरेन's picture

15 May 2010 - 2:39 pm | नरेन

थोडक्यात आपले म्ह्णणणे चान्गले मान्ड्लेत.आता आणखि किति दिवस वरणभाताचे खिमट खाउ घालणार आहात्?मुखप्रुश्ट बदला आता?

नितिन थत्ते's picture

15 May 2010 - 2:46 pm | नितिन थत्ते

अहो अजून ते खिमट वाढायला निदान एक श्रीमतीजी आहेत.
पुढे त्या पण नसणार. मग फक्त अळूचं फदफदं आणि सेल्फ सर्विस

=))

नितिन थत्ते

मी-सौरभ's picture

15 May 2010 - 4:17 pm | मी-सौरभ

प्रथमच आपलं अस्तित्व दिसलं.......

आता तेवढ पहिल पान बदला की...........

-----
सौरभ :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2010 - 4:21 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रथमच आपलं अस्तित्व दिसलं.......

हेच तर कौतुकास्पद आहे. नाही का?

बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

15 May 2010 - 5:50 pm | स्वाती२

निवेदनाबद्दल धन्यवाद!

मूळ प्रतिसाद काढून टाकला आहे.
बरेच मोठे बदल झालेले आहेत. लोकविकासचे मनःपूर्वक आभार.

सुधीर काळे's picture

16 May 2010 - 3:45 am | सुधीर काळे

धन्यवाद, नीलकांत-जी!
माझा प्रतिसाद तात्यांच्या निवेदनाखाली दिला आहे.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

धनंजय's picture

16 May 2010 - 4:25 am | धनंजय

बरेच मोठे बदल झालेले आहेत.

लोकविकासचे मनःपूर्वक आभार.

अक्षय पुर्णपात्रे's picture

16 May 2010 - 5:10 am | अक्षय पुर्णपात्रे

या मोठ्या बदलांविषयी (मुखपृष्टावरील स्त्रीचे चित्र सोडून अधिक बदल आत्तापर्यंत जाणवलेला नाही) काही माहिती मिळू शकेल काय? काही मुद्द्यांविषयी थोडेतरी स्पष्टीकरण आवश्यक आहे. मालकीविषयी सदस्यांना घेणे देणे नाही पण पैशांच्या व्यवहाराविषयी उघडपणे बोलणार्‍या सदस्यांना भविष्यात मिपाचा वापर करून सतावले जाणार नाही याची हमी व्यवस्थापकांकडून मिळू शकेल काय?

एकलव्य's picture

16 May 2010 - 4:44 am | एकलव्य

खुलाश्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा!

People want leadership, Mr. President, and in the absence of genuine leadership, they'll listen to anyone who steps up to the microphone.

गुंडोपंत's picture

16 May 2010 - 5:04 pm | गुंडोपंत

हे वाचून बरे वाटले.

आपला
गुंडोपंत

मी प वर कोणते विषय मांडावे कि मांडू नये
काही मदत मिळेल काय

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2016 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे

स्वगृह पानाच्या सर्वात खाली असलेल्या पर्यायांपैकी मिसळपावचे धोरण हा पर्यायावर टिचकी मारल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.