माझे सल्ले

सदासुखि's picture
सदासुखि in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 2:25 pm

काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ.
पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!)

सल्ला १- काहि बॉस उगाचच रागवत असतात(आणि रोजच) . हे असेच का नाहि केले?हे का केले?वैगेरे . तर अशा वेळी काय करावे स्वत:ला १ मोबाइल समजावे आणि बॉसला दुसरा. आणि बॉस ब्लू टूथ ऑन करून आपल्याला नको नको ते सेंड(म्हणजे शिव्या, त्रास इ.) करत आहे असे समजावे मग आपण काय करावे आपला ब्लू टूथ ऑफ करून द्यावा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही .बॉस आपला एकटाच बडबडत राहील. (जर त्याचे बोलणे सहन होत नसेल तर सरळ माफी मागून केबिन बाहेर निघून जाने.)जो त्रास होतो तो बॉसलाच होईल .(असा मनात विचार करावा म्हणजे आपला त्रास आणखी कमी होईल.)कारण बॉसच्या त्रास जास्त असेल तर आपण निगेटीव्ह विचार जास्त करतो त्याने आपलेच नुकसान होते.आपण आपल्या कामाप्रती पोझीटीव्ह विचार करावा.काही चुकले तर (जास्त)वाईट वाटून घेऊ नये .

सल्ला २:- [माझ्या मुलासाठी मी हा सल्ला दिला आहे जेव्हा मी खूप रागवत असते तेव्हा ]
आई रागवत असेल तर शांत राहावे(ध्यानमुद्रा करावी). आईचे रागावून झाले कि मग सांगावे कि अशी चूक पुन्हा करणार नाही मग आईपण खुश होते राग विसरून जाते.

सल्ला ३:- या जगात प्रत्येकाला दु:ख (कमी -जास्त )असतं. पण आपण ठरवायचे कि या दु:खाचा त्रास करून घ्यायचा कि त्यात सुख शोधन्याचा प्रयत्न करायचा? कोणी आपल्याला काही वाईट म्हटले कि आपण सारखा विचार करतो कि माझ्यात काय कमी आहे?मला असेच का म्हटले?मी खरच वाईट आहे का? पण असा विचार करण्या पेक्षा आपल्याला कोणी वाईट म्हटले हे विसरणे जास्त चांगले (सोपे) आहे ना? जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा सकारात्मक गाणी ऐकावी,चांगले लेख वाचावे. (मी तर उगाचच विनोद करते, किंवा स्वत: गाणी गाते ).एक नेहमी लक्षात ठेवावे जर छोटासा नकारात्मक विचार आपल्या मनात आला आहे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाच त्याला मनातून काढून टाकावा.आणि नेहमी सकारात्मक विचार करावा.

महत्वाची सूचना :-वरील सल्ले ज्याने त्याने आपल्यानुसार घ्यावे. नाही आवडले तर सोडून द्यावे.जास्त विचार करू नये.तसेच सल्ले गंभीर आहेत कि विनोदी हे स्वत:च ठरवावे.

विनंती :- मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. तरी सर्वांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. काही चुकल्यास माफी असावी.(असे लिहायचे असते हो कि नाही?)

जीवनमानसल्ला

प्रतिक्रिया

आनंदराव's picture

13 Dec 2013 - 2:53 pm | आनंदराव

तुमच्या मुलाने पहिला सल्ला अमलात आनायचे ठरवले तर हो...?

अभ्या..'s picture

13 Dec 2013 - 3:02 pm | अभ्या..

मी तुला राशिचा असल्याने प्रतिक्रिया द्यावी की नको?

जेपी's picture

13 Dec 2013 - 3:07 pm | जेपी
तरी सर्वांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.
शैलेन्द्र's picture

13 Dec 2013 - 3:26 pm | शैलेन्द्र

+१११

कंपुशिवाय पर्याय नाही..

सदासुखि's picture

13 Dec 2013 - 3:08 pm | सदासुखि

माझि काहिच हरकत नाही. कारण मि बरेचदा त्याला उगाचच रागवते. म्हणुनच तो दुसरा सल्ला जास्त वापरतो.
तसंहि सल्ला कोणताहि वापरला तरी त्याला त्रास होत नाहि आणी तेच महत्वाचे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/blender-accident.gif

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 3:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

फक्त येणारे लोक तूळ राशीचे नाहीत ना तेवढे बघा

शिद's picture

13 Dec 2013 - 3:24 pm | शिद

म्हणुनच तुम्ही "सदासुखी" आहात बहुतेक...

तुमचा अभिषेक's picture

13 Dec 2013 - 6:21 pm | तुमचा अभिषेक

छान आहेत सल्ले पण... दुर्दैवाने आमच्या छोट्याश्या ऑफिसचा बॉस मीच आहे, आणि रागवायचे काम आमच्याकडे आई न करता बाबा करतात, किंबहुना ते सरळ मारहाण करणेच पसंद करतात.. अर्थात करायचे.... गेले ते दिन.. :(

बाप्पू's picture

13 Dec 2013 - 9:10 pm | बाप्पू

सल्ले आवडले. खास करून ३ रा.

पैसा's picture

13 Dec 2013 - 9:14 pm | पैसा

सल्ले आवडले

सदासुखि's picture

13 Dec 2013 - 10:21 pm | सदासुखि

प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!!

सदासुखि's picture

13 Dec 2013 - 10:45 pm | सदासुखि

प्रतिक्रिया एवजी प्रतिसाद वाचावे. चुकच झाली...माफ करा...

खटपट्या's picture

13 Dec 2013 - 11:20 pm | खटपट्या

मी तर सदासुखी हा पुरुषाचा आयडी समजत होतो.

अभ्या..'s picture

14 Dec 2013 - 12:13 am | अभ्या..

सदासुखी आणि पुरुष ??
शक्य तरी आहे काय? ;-)

नित्य नुतन's picture

17 Dec 2013 - 6:10 pm | नित्य नुतन

खी खी खी
का नाही??

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 6:13 pm | बॅटमॅन

अभ्याचे बरोबर आहे.

सदासुखी म्हणजे पुरुष नसून त्याचाच एक अ‍ॅनाग्राम सखीदासु म्हणजे पुरुष. गर्लफ्रेंड असो नैतर बैको, तिचा दासु म्हणजे पुरुष.

उपास's picture

14 Dec 2013 - 12:03 am | उपास

बरं मग?

काळा पहाड's picture

14 Dec 2013 - 2:33 am | काळा पहाड

सल्ला १ बद्दल: (१) अभ्यास करावा आणि हॅकिंग शिकून घ्यावं. (२) बॉस चा पीसी हॅक करून त्याची त्याच्या मैत्रीणींना पाठवलेली पत्रे त्याच्याच इमेल आयडीने त्याच्या बायकोला मेल करावीत व प्रिंट आउट काढून ऑफिस च्या नोटीस बोर्डावर लावावीत.

(३) आपल्याला राँग नंबर आल्यास / क्रेडीट कार्ड वा पर्सनललोन विक्रेत्या कन्येचा कॉल आल्यास बॉसचा नंबर द्यावा.

राँग नंबरच्या केसमध्ये "तुम्हाला हवा आहे तो माणूस या नंबरवरच्या माणसासोबत आहे!" असे सांगीतल्यास बॉसला होणार्‍या त्रासामध्ये दुप्पट / तिप्पट भर पडते कारण कॉल करणारी व्यक्ती अनेकदा हुज्जत घालत बसते.

टेलीकॉलींगवाल्या एखाद्या टीमसोबत आपले काही कॉन्टॅक्ट असल्यास गाडीपासून नोकरीपर्यंत काहीही विकण्यासाठी फेक कॉल करवावेत.

ज्ञानव's picture

16 Dec 2013 - 10:44 am | ज्ञानव

एकदा असाच एक कॉल आला.

तिकडून : "रमणभाई ने फोन आपो जरा "
इकडून : "रमणभाई तो बायडी जोडे होटेल गया....पण तमे कोण?"
तिकडून : "हू एमनि मिसेस वात करू छु तमे क या बायडीनि वात करो छो भाई"
इकडून :" अरे,पण रमणभाई ए कह्यु के एमनी जोडे हती ए एम नि वाईफ छे .... सॉरी हं भाभी"

झाले संध्याकाळी भाभीने रमणभाईला धुतले असणार.

सूड's picture

17 Dec 2013 - 9:51 pm | सूड

दंडवतच !! __/\__ =))

काळा पहाड's picture

14 Dec 2013 - 2:45 am | काळा पहाड

सल्ला १ बद्दल: (१) बॉस नसताना त्याच्या केबिन मध्ये एक मेलेला उंदीर लपवून ठेवावा. (२) बॉस च्या फ्लॅट विकाय बद्दल जाहीरात पेपर मध्ये द्यावी. सध्याच्या रेट च्या ३/४ रेट लावावा.

ज्ञानव's picture

14 Dec 2013 - 8:13 am | ज्ञानव

तुम्ही एकदम ब्रिटीश खोपडी वापरायचा सल्ला देताय.....लैच आवडला फ्लेट बेच्नेका आयडिया