कला

दिवाळी किल्ला: दगड, माती न वापरता !!! (पुनः प्रकाशित)

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in जनातलं, मनातलं
29 Oct 2018 - 9:01 pm

नमस्कार मंडळी,
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचं जस फराळ, आकाशकंदील, फटाके, नवीन कपडे , गुलाबी थंडी, उटणं यांच्याबरोबर अतूट नातं आहे तसंच नातं आणखीन एक गोष्टीबरोबर आहे. किल्ला !!!
आपण प्रत्येकानेच लहानपणी किल्ला केलेला आहे. अगदी स्वतः नाही तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किल्ल्याच्या निर्मितीत भाग घेतलेला आहेच. ज्यांचं बालपण वाड्यात किंवा जुन्या सोसायटीत गेल आहे त्यांनी तर हा आनंद मनमुराद लुटलेला आहे.

कलाआस्वादविरंगुळा

नवरंग - भोंडला

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
18 Oct 2018 - 12:01 am

'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अ‍ॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्‍यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अ‍ॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्‍या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात.

कलाप्रतिभा

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
15 Oct 2018 - 1:44 pm

यापूर्वीचे कथानक:
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३
https://www.misalpav.com/node/43228

लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :

वावरसंस्कृतीकलानृत्यधर्मइतिहासवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजारेखाटनस्थिरचित्रप्रकटनआस्वादलेखअनुभवमाहितीप्रतिभाविरंगुळा

बोनेदी बारीर पूजो

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
10 Oct 2018 - 5:29 pm

“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मलेख

आशाताई आणि आपलं भावगीत विश्व 

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
20 Sep 2018 - 10:49 am

आशाताई आणि आपलं भावगीत विश्व 

आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते.... 

कलासंगीतलेख

पिया तू अब तो आजा.....

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
8 Sep 2018 - 5:57 pm

पिया तू अब तो आजा.....

रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं  ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही.

कलाविचार

सेक्रेड गेम्स: ठो-कळे

वनफॉरटॅन's picture
वनफॉरटॅन in जनातलं, मनातलं
3 Sep 2018 - 10:55 am

भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं.
(पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.)

कलाkathaaचित्रपटआस्वादसमीक्षा

जर चंद्र तुमच्यासारखा सुंदर असता ...

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
17 Jul 2018 - 8:00 pm

सिंदखेडचे राजे लखुजी (अथवा लुखजी ) जाधवराव - राजमाता जिजाबाईसाहेबांचे वडील आणि शहाजी राजांचे सासरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळातली महत्वाची व्यक्ती. अश्या जाधवरावांचे एक नव्हे तर दोन चित्रे मला सापडली, त्या दोन चित्रांची ही कथा.

कलाइतिहासलेखबातमी

४ गोष्टींच्या निमित्ताने!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
15 Jul 2018 - 5:38 pm

'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच.

कलाचित्रपटप्रकटनआस्वादमाध्यमवेध

कल्पनेतील चव!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
14 Jul 2018 - 2:31 pm

'सेक्रेड गेम्स' खूप चर्चेत असली तरी मला खूप शिवराळ भाषा आणि विनाकारण असलेली काही दृश्ये यामुळे इतकी आवडली नाही.
त्यात आपली जुनाट बॉलीवूडी विचारसरणी असल्यामुळे एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही! :)
बाकी अभिनय, कथासूत्र, निर्मितीमूल्य वगैरे उत्तम आहेच.

असो, तर लिहिण्याचा मुद्दा म्हणजे एक आवडलेला प्रसंग.

कलाप्रकटनमाध्यमवेधविरंगुळा