मांडणी

दोन शशक- बटणाचा मोबाईल

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 12:58 pm

शशक१-
बाबा, जाऊदेना तो जुनापुराणा बटणाचा मोबाईल आता?मी इकडे अमेरिकेत, तुम्ही काही इकडे यायला तयार नाही.आई गेल्यापासून मला सारखी तुमची काळजी लागून राहते. मी काय म्हणते? आजकाल सगळे म्हातारे लोक व्हाट्सअप वापरतात. व्हिडीओ कॉल करून मुला-नातवंडांशी छान बोलतात. तुम्हालाही मी इथून एक चांगला मोबाईल पाठवू का? हळू हळू जमेल तुम्हालापण.

अग नको पोरी , मला काही ते समजत नाही. फक्त आलेला कॉल घ्यायचा किंवा कधीतरी कॉल करायचा इतकेच जमते ते बस आहे की.

मांडणीप्रकटन

शशक- निवडणूक ३

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
2 Mar 2023 - 2:11 pm

आधीचे भाग
निवडणूक

निवडणूक २

साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात?

अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार?

पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा.

मांडणीप्रकटन

शशक- खड्डे

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
28 Feb 2023 - 12:15 pm

नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का?
डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे.
नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली.
डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे.
नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत?
डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल.

मांडणीप्रकटन

शशक- निवडणूक २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
27 Feb 2023 - 6:08 am

आधीचा भाग शशक- निवडणूक

आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो.

कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल.

आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी?

कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो.

आबा - काय भाव आहे यावेळी?

कार्यकर्ता- ५०० रुपये.

मांडणीप्रकटन

शशक-फ्रिज

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Feb 2023 - 11:44 am

ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही?
मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना?
ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात.
मी- मला धमकी देतेस? ठिक आहे, बघुन घेईन.

मांडणीविचार

कॅलेंडर

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
21 Feb 2023 - 2:03 pm

आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे.

दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात. त्यात तारखांबरोबरच विविध सण, उत्सव,तिथ्या, आणि सर्व धर्मीयांना उपयुक्त माहिती असते.

दिनदर्शिका ही अतिशय उपयुक्त वस्तू तर आहेच पण त्याचबरोबर ती अतिशय इंटरेस्टिंग आणि मनोरंजक वस्तू आहे.

मांडणीसमाजप्रकटनविचार

शशक--दरोडा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
8 Feb 2023 - 8:00 am

रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत?

धोरणमांडणीप्रकटनविचार