कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
2 Oct 2023 - 8:24 pm

अलिकडेच यु ट्युबवर कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy या physiotherapy शी संलग्न असलेल्या थेरपीचे video बघितले .

बहुतेक करुन orthopedic problems ( सांधे दुखी , स्नायु आखडणे , bones lock होणे ) , व मायग्रेन ( neuro therapy ) अशा ठिकाणी chiropractic therapy वापरली जाते असे दिसले .

या chiropractic therapy क्षेत्रातील तज्ञांना chiropractor कायरोप्रॅक्टर असे ओळखले जाते . हे video बघुन कुतुहल तसेच काही प्रश्न डोक्यात आले .

भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस चा वापर हा परदेशाच्या तुलनेत कमी व अनोळखी आहे का ?

कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy ला वैद्यक शास्त्राची मान्यता आहे का ?

भारतामध्ये किंवा एकुणच , physiotherapists च्या तुलनेत chiropractor कायरोप्रॅक्टर चे तज्ञ कमी आहेत का ?

भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy च्या शिक्षणासंबधीत वेगळ्या संस्था आणी clinics , hospitals आहेत का ?

या संदर्भात मिपाकरांना असलेले ज्ञान , अनुभव , मते जाणुन घेणे माहितीपुर्ण ठरेल .

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Oct 2023 - 8:59 pm | कंजूस

कोणते विडिओ पाहिले?

उदाहरणार्थ?

मॉडर्न मेडिसिनमध्ये कायरोप्रॅक्टरला अधिकृत मान्यता अथवा स्थान नाही. निसर्गोपचार, पुष्प औषधी, मॅग्नेट इत्यादि थेरपीजप्रमाणे ते समांतर उपचार समजले जातात. साधारणपणे मणक्यांची अलाईनमेन्ट करून / सुधारून , दाब देऊन किंवा विशिष्ट हालचाली , ताण यांचा वापर करून हे साध्य केले जाते अशी साधारण माहिती ऐकिवात आहे. या अलाईनमेन्ट नीट केल्याने आजार बरे होतात अशी त्या उपचारांची थियरी आहे. जसे शरीरातील विद्युत किंवा अन्य प्रवाह, सर्किट यांतील बिघाडांनी आजार होतात असे ॲक्युपंक्चरमध्ये समजले जाते. (चुभुद्याघ्या. विधाने ढोबळ असू शकतात.)

धर्मराजमुटके's picture

2 Oct 2023 - 10:34 pm | धर्मराजमुटके

भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस चा वापर हा परदेशाच्या तुलनेत कमी व अनोळखी आहे का ?
हो.

कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy ला वैद्यक शास्त्राची मान्यता आहे का ?
माहित नाही. इथे भारतात लोक आपले शरीर छिन्नी हातोड्याने ठोकून घ्यायला तयार असतात तिथे हा प्रश्न गैरलागू ठरावा. अधिक माहितीसाठी ही चित्रफित पहा.

भारतामध्ये किंवा एकुणच , physiotherapists च्या तुलनेत chiropractor कायरोप्रॅक्टर चे तज्ञ कमी आहेत का ?
नाही. एका गल्लीत जाऊन physiotherapists च्या नावाने हाक मारली तर १० जण ओ देत बाहेर येतात. कायरोप्रॅक्टर मात्र कमी आहेत.

भारतामध्ये कायरोप्रॅक्टिस chiropractic method therapy च्या शिक्षणासंबधीत वेगळ्या संस्था आणी clinics , hospitals आहेत का ?
हो. शिक्षण देणार्‍या संस्था आहे पण त्यात नावाजलेले कोणी नाही.

वैयक्तिक अनुभव :
आमच्या हिचे बाळांतपण होण्याअगोदर अंग दुखत असेल तेव्हा ती दोन्ही बाजूने कंबरेची हाडे कडाकड मोडत असे. बाळांतपणानंतर ते बंद झाले. अंगदुखी नंतर हाडे मोडत नाहीत आणि कंबर खूप दुखते अशी तिची नेहमीची तक्रार असायची. खूप औषधोपचार करुनही गुण न आलयाने तिला ठाण्यात डॉ. रवि शिंदे यांचेकडे नेले. त्यांनी ५ मिनिटात शरीरात असतील नसतील तेवढी हाडे मोडून २५०० रुपये चे बिल आणि कॅल्शीअम वाढ्ण्यासाठी १२०० रुपयांचे कसले तरी सफेद दिसणारे आयुर्वेदीक द्रावण दिले. त्या दिवशी हिच्या चेहर्‍यावर २ मिनिटासाठी वेदना आणि पुढील सहा महिन्यांसाठी आनंद दिसला.
अजून ५-६ वेळा या सांगीतले पण पुढे जाणे झाले नाही. पहिल्यापेक्षा हिची कंबरदुखीची तक्रार कमी झाली आहे.

मुक्त विहारि's picture

3 Oct 2023 - 10:57 am | मुक्त विहारि

थायलंड मधली अजून एक हातोडी मार चित्रफीत

https://youtu.be/umwoEgUqGrg?si=OrarSLlp-gtqnleu

स्वधर्म's picture

2 Oct 2023 - 10:51 pm | स्वधर्म

डॉ रॉबीन कुक यांची मेडीकल थ्रिलर पुस्तके बरीच वाचली आहेत. त्यांची एक कादंबरी इंटरव्हेन्शन (https://www.goodreads.com/book/show/6013077-intervention) ही कायरोप्रॅक्टर लोकांच्या उपचारामुळे कसे मृत्यू झाले ते शोधणार्या एका शवतपासणी करणार्या नायकाचीच आहे. पुस्तक अर्थातच चांगले आहे, पण कायरोप्रॅक्टीस हे काहीसे छद्मविज्ञान असल्यासारखे लेखकाचे मत आठवते.

कपिलमुनी's picture

2 Oct 2023 - 11:58 pm | कपिलमुनी

कायरोप्रॅक्टीस करणारा माणूस उत्तम तज्ज्ञ नसेल तर आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते.

चित्रगुप्त's picture

3 Oct 2023 - 6:31 am | चित्रगुप्त

पृवी मला बरेचदा कमरेत उसण भरायची. कारण अगदी क्षुल्लक असायचे, उदाहरणार्थ नळाला रबरी पाईप जरा जोर लावून लावणे वगैरे.
उसण भरल्यावर चालणे फिरणे अशक्य व्हायचे. मग मुलगा (तो तेंव्हा फिजियोथेरॅपी शिकत होता) गाडीत मला कसेबसे बसवून जवळच्या एका खेडेगावात असलेल्या पहिलवानाकडे घेऊन जायचा. तो एका कुशीला झोपवून एका झटक्यात कंबर ठीक करायचा. लगेचच चालता वगैरे यायचे. अलोकडे मात्र खूप वर्षात हा त्रास झालेला नाही.
झटित प्रचिती येत असल्याने 'मॉडर्न मेडिसीनची मान्यता' आहे की नाही वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. ताबडतोब परिणाम होतो यापेक्षा आणखी मोठे सर्टिफिकेट कोणते असू शकेल?
मुलाच्या शिक्षणात हे झटका देऊन बरे करणे नव्हते, पण त्याने ते पहिलवानाकडून शिकून घेतले होते.
बाकी यालाच कायरोथेरापी म्हणतात किंवा कसे, हे मला ठाऊक नाही.

विशिष्ट समस्येवर विशिष्ट उपाय ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि सर्वच समस्यांवर एक विशिष्ट थेरपी ही वेगळी गोष्ट आहे. उसण भरणे हा एक आजार झाला. उदा. काही प्रकारच्या वेदनेवर गरम शेक हा उपाय योग्य असेल. काही प्रकारात तोच गरम शेक अपायकारक , अधिक चिघळवणारा उपाय असू शकेल. तोंडाने इन्फेक्शन कमी करण्याच्या गोळ्या घेणे अशा केसमध्ये योग्य उपाय असेल.

एक विशिष्ट उपाय एका विशिष्ट प्रकारात लागू होत असेल, पण अमुक एका थियरीनेच विविध आजार बरे करणे ही पद्धत त्यामुळे सिद्ध होत नाही.

निनाद's picture

5 Oct 2023 - 12:03 pm | निनाद

असे वाटते की तुम्ही सर्व अल्टरनेटिव्ह थेरपी द्वेष्टे आहात!
शेवटी मॉडर्न मेडिसीन मॉडर्न मेडिसीन म्हणजे काय असते? ते पण तर या थेरपीज मधून सिद्ध झालेले उपाय आयात करत राहतात...

शेवटी मॉडर्न मेडिसीन मॉडर्न मेडिसीन म्हणजे काय असते? ते पण तर या थेरपीज मधून सिद्ध झालेले उपाय आयात करत राहतात...

यू सेड इट..

अगदी योग्य. तिथे जे स्वीकारले जाते ते अधिक कसोट्यांतून जाऊन आलेले आणि अधिक स्टँडर्ड असण्याची शक्यता जास्त असते. त्यात फायदे नुकसान दोन्हींची स्पष्ट नोंद असते आणि कबुली असते.

एखाद्या मालमत्तेची खरेदी करताना ती एसबीआयकडून लोनसाठी प्रि - अप्रूव्हड असेल तर कसा अधिक दिलासा असतो तत्सम. कोणीतरी छगनलाल छंगानी नामक सावकार त्याला मान्यता देत असण्यापेक्षा, किंवा कोणी एकेकट्या व्यक्ती त्या जमिनीचे टायटल क्लिअर आहे असे तोंडी सांगत असण्यापेक्षा हे एसबीआय रेकग्नीशन अधिक बरे वाटते इतकेच. बाकी द्वेष असा कोणाचा नाही. ज्याला जे आवडते ते करावे.

कॉमी's picture

5 Oct 2023 - 3:24 pm | कॉमी

परफेक्ट.

हा प्रकार पाळीव प्राण्यांसोबत सुध्दा केल्याचे युट्यूबवर व्हिडिओ आहेत.
फायदे होतात का हे नक्की माहीत नाही पण चुकीचे केले तर तोटे होतात हे नक्की माहीत आहे. त्यामुळे असल्या प्रकारापासून लांब रहावे हेच उत्तम.

फायदे होतात का हे नक्की माहीत नाही पण चुकीचे केले तर तोटे होतात हे नक्की माहीत आहे. त्यामुळे असल्या प्रकारापासून लांब रहावे हेच उत्तम.

-- 'मॉडर्न मेडिसिन' मधेसुद्धा चुकीचा औषधोपचार, गरज नसता लाखो रुपयांच्या चाचण्या करवणे, गरज नसता दिलेले औषध, जन्मभरासाठी औषधाचा ससेमिरा मागे लावणे, चुकीचे निदान, गरजेपेक्षा जास्त औषध देणे, अशा अनेक प्रकारांमुळे होणारे तोटे, पेशंटाचा मृत्यु होणे वगैरे उदाहरणे भरपूर सापडतात. तस्मात असल्या मेडिसिनवाल्यांपासूनही लांब रहावे हे उत्तम, असेही म्हणता यावे.

मॉडर्न मेडीसिन मध्ये बऱ्याच चाळण्या असतात. त्यातून काही खडे निसटून आपल्यापर्यंत येत असतील पण म्हणून चालण्या नसलेले कशाला घ्या ?

उसण काढणारे लोक पूर्वी असत. दहा वर्षांपूर्वी नेरळ गावात गेलो होतो एका बरोबर. त्याच्या गुडघ्यात दुखायचं. माझा खांदा अवघडला होता. ते काढणारा पन्नास वयाचा मनुष्य होता. "काय होतंय? कुठे दुखतंय?" असं विचारत पटकन काही झटका दिला आणि एकदम मोकळं वाटलं.
(अट - काही पैसे देऊ करायचे नाहीत. संतापायचा.)

कर्नलतपस्वी's picture

4 Oct 2023 - 6:36 pm | कर्नलतपस्वी

हाडवैद्य म्हणून खेडेगावात प्रसिद्ध असायचे. अजूनही भिंतीवर हाड बसवून मिळेल आशी जाहिरात दिसते.

मिळाल्यास फोटो डकवतो.

धागा आणि प्रतिक्रिया यांवरून रॉक स्टार सिनेमातील अनावर हसवणारे दृश्य (तो पियूष मिश्रांचा मसाज सीन) आठवले. त्याची लिंक शोधणे आले. ;-))

अनिकेत वैद्य's picture

6 Oct 2023 - 5:19 pm | अनिकेत वैद्य

ह्याच विषयावर आज एक Whatsapp फॉरवर्ड आला आहे.
मुंबईतले डॉ. कनाल ह्यांच्याबाबत माहिती दिली आहे.

मिपा च्या धोरणात बसत असेल तर तो लेख इथे डकवतो.
(लेखातील मजकुराच्या सत्यतेबाबत मला माहिती नाही.)

इथे कॅनडा मधे विमा मधे कव्हर आहे chiropracticए therapy.
माझे एका हाताचा कोपरा खुप दुखत होता, emergency मध्ये जन्याची वेल आलेली..रात्री एकदं दुखायला लागलं.. उल्टी झालं सारखे झालं.. फॅमिली डॉक्टर ने मला रेफर केले कायरोप्रॅक्टिव्ह वाल्या काडे.. त्यने एक्सरे काडून उपचार दिलेली..
त्यानं shocks दिला आणि tractionदिलेले..
1 महिना उपचार चालू होती... नंतर त्रास झाला नाही.

Google:
How long does it take to become a chiropractor in Canada?
The minimum educational requirement is 3 years of a bachelor's degree followed by a 4-year Doctor of Chiropractic (DC) degree program.