समाज

मी बिचारा एक म्हातारा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Jun 2021 - 6:41 pm

मी बिचारा एक म्हातारा

ती गेली देवाघरी

आज बैसलों हसत एकटा

या हास्यकट्ट्यावरी

माती सरत चालली होती

तरी जीव थकला नव्हता

आजही थरथरत्या हातांना

ओला स्पर्श हवा होता

रोज यायची नटून थटुनी

दिसायलाही होती बरी

म्हाताऱ्याला हात पुरे तो

कशाला हवी आता परी

मी देखील नित्यनेमाने

दात काढुनी हसायचो

तिला हसताना बघून मात्र

गुलाबी स्वप्नं बघायचो

कधी कुलू तर कधी मनाली

बेत ठरायचे मनात

हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या

सर्व बेत गेले मसनात

इतिहाससमाजजीवनमान

शिकून काय झाले

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Jun 2021 - 5:31 pm

अभ्यास केला पण भोकात गेला

शिकून काय झाले

मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही

ओझे तसेच राहिले

लहानपणी मी खिडकीतून

मुले खेळताना बघितली

हाती पुस्तक धरूनही

वीतभर फाटत राहिली

साहेब साहेब करूनहि माझे

कल्याण नाही झाले

पुस्तक माथी मारूनही

माझे बालपण हरवले

आज छकुला निरागसपणे

अहोरात्र खेळत राहतो

मी मात्र इथं कामावरती

दिवसभर चोळत राहतो

चोळण्यासाठी जन्म नव्हे हा

हे कळतेय मजला आज

स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी

अंगी असावा लागतो माज

समाजजीवनमान

हा 'मी' नाही, आपण आहोत.

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
3 Jun 2021 - 1:20 am

'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?"

मांडणीमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचार

काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
31 May 2021 - 2:54 pm

.

कटाक्ष-
नेटफ्लिक्स
माहितीपर
सहा भागांची लघू-मालिका.
एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे
भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग)

ओळख-

धर्मसमाजजीवनमानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणचित्रपटआस्वादसमीक्षाशिफारस

सत्य

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
30 May 2021 - 9:18 pm

सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही.

समाजलेख

हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
30 May 2021 - 7:35 pm

हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?

५ दिवसाआधी आजी ( आई ची आई एक्स पायर झाली ,गावाकडे ,
तिचा मुलगा ,माझा मामा ३ वर्ष आधीच गेला
तिचा माझ्यावर जीव होता ,त्यामुळे मला दहावा व तेरावा करायचा आहे
पण मी हैदराबाद मध्ये अडकलो आहे
कोणी मदत करू शकेल ?

संपादक मंडळ यांशी ,हा धागा प्रशोंत्तरे सदरात टाकायला पाहिजे पण गाम्भीर्य आणि लगो लगता म्हणून येथ टाकत आहे
समजून घ्यावे

समाज

अहं

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
23 May 2021 - 10:06 pm

'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.

समाजलेख

पात्रता

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
16 May 2021 - 10:20 pm

गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात.

समाजलेख

अपवाद

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
9 May 2021 - 9:10 pm

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर.

समाजलेख

काळ

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
4 May 2021 - 9:27 pm

स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही.

समाजलेख