Skip to main content

शिकून काय झाले

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यास केला पण भोकात गेला शिकून काय झाले मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही ओझे तसेच राहिले लहानपणी मी खिडकीतून मुले खेळताना बघितली हाती पुस्तक धरूनही वीतभर फाटत राहिली साहेब साहेब करूनहि माझे कल्याण नाही झाले पुस्तक माथी मारूनही माझे बालपण हरवले आज छकुला निरागसपणे अहोरात्र खेळत राहतो मी मात्र इथं कामावरती दिवसभर चोळत राहतो चोळण्यासाठी जन्म नव्हे हा हे कळतेय मजला आज स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी अंगी असावा लागतो माज ============================= सिद्धेश्वर विलास पाटणकर
लेखनविषय:

वाचने 978
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया