समाज

विवेकाच्या वाती

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
6 Nov 2021 - 10:06 pm

आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात.

समाजविचारलेख

आवाज बंद सोसायटी - भाग ५

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
4 Nov 2021 - 6:43 am
समाजजीवनमानप्रकटनलेखमाहितीआरोग्य

वाडा

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
25 Oct 2021 - 1:38 am

जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||

इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||

कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||

सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||

फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||

मुक्त कवितासमाज

क्वाण्टम जम्प

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
10 Oct 2021 - 8:45 pm

1
.
क्वाण्टम जम्प
.................
काळाचा प्रवाह बदल घडवत असतो, बदल स्वीकारायला भाग पाडत असतो. काही बदल जोरबल वापरून लादले जातात, काही बदल आपणहून स्वीकारले जातात.
.

समाजविचार

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
1 Oct 2021 - 9:17 pm

'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. अर्थात, हा जमणं अथवा न जमण्याचा प्रवास त्या-त्यावेळच्या प्रयोजनांचा, प्रसंगांचा अथवा परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

समाजविचारलेख

कूरबूर / (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
19 Sep 2021 - 10:40 pm

2
..
(भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर
- कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती
- Mental State of being gracious to act!
.....................................................................
[लेखाचं उद्दीश्ट:

समाजविचार

विवेक हरवलेलं विश्व

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
19 Sep 2021 - 8:52 pm

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर.

समाजविचारलेख

काळाचे खेळ

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
15 Sep 2021 - 9:00 pm

स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही.

समाजविचारलेख