मिपाकर होता होता .....
सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.