(मी आणि बार)

अहिरावण's picture
अहिरावण in जनातलं, मनातलं
7 May 2024 - 7:45 pm

प्रेरणा - ओळखलेच असेल

निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता..
मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की बारकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो

मला आठवतं की एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो,तो बार वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो.
पण गावातला, माझ्या घरा जवळचा
बार मला निराळा वाटायचा. पहाटपर्यंत बसु शकतो, सर्वत्र टेबल होते आणि खुर्च्या बेवड्यांनी भरलेल्या होता. बारशी मला नेहमीच एक निराळा संबंध जाणवू लागत असे. प्रत्येक वेळी मी नारमधे गेल्यावर माझे प्रेम वाढत गेलं.

ग्लासशी खेळणं, कमी थंड पाहून बर्फ टाकणे, दाण्यांमधे रेघोट्या करणं,आपलेच पाय खुर्चीवर घेऊन
मांडी घालणं,,मिघायच्या वेळी काड्या गोळा करणं, वगैरे .
शेवटी माझं बारबद्दलचे प्रेम इतकं वाढलं की मी बारला दुसरं घर म्हणून विचार करू लागलो आणि शेवटी मी बार जिवंत असल्याचा विचार करू लागलो.
का कुणास ठाऊक कदचित मनाची ती एक किमया असावी, बारच्या अशा अंधा-या कोंदट वातावरणात एकटाच एखादा अगदी
भारावून जात असावा.

मी जेव्हाही बारवर जायचो तेव्हा मला खूप आनंद व्हायचा .
बार मला आनंदाची भेटवस्तू द्यायचा.

त्या वयात मी बारम्धे असताना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वेळ वेटरच्या सान्निध्यात जायचा.तो एकाकीपणा आणि त्यातला आनंद मी ह्या वयात फक्त माझ्या आठवणीतून उपभोगु शकतो.शब्दांतून कदापि
वातावरण प्रत्यक्षात तयार करणं महाकठीण
आहे,नव्हेतर अशक्यप्राय आहे.

त्यावेळी बारकडून मिळत गेलेल्या आणखी गोष्टी म्हणजे क्षणभरासाठी चिंता दूर
व्हायची, कधी अस्वस्थ किंवा चुकीचं वाटलं नाही.कसं व्हायचं हे मला माहित नाही, फक्त व्हयचं एव्हढंच..
त्या वयात माझ्यासाठी बार हे माझं नंदनवन होतं, माझं स्वप्न होतं. वेटर,
माझा मित्र होता.
माझ्यासाठी बार खूप महत्त्वाचा होता.
एक प्रकारे मला बारमधे वेळ घालवणं हे एक व्यसन झालं होतं.

धोरणविचार