समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
8 May 2024 - 11:11 pm

आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता,
"समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा"

सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले,
"आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही.

तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो. याचे एकमेव कारण म्हणजे, त्यातून काहीतरी संस्मरणीय घडलेलं असतं."

मी त्यांना म्हणालो,
"हे लोक तुम्हाला नकारात्मक पर्चा किंवा नामपत्र देतात किंवा त्याहूनही चांगलं असं पण सकारात्मक पर्चाशी किंवा नामपत्राशी जोडू शकतात. तुम्हाला मिळालेलं हे नामपत्र तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्यभर तुमच्या बरोबर ठेवता.
ज्याच्याशी तुम्ही चांगले नसाल ते तुमच्या आयुष्यात नंतर तुम्हाला त्रास देऊं शकतात."

मला भाऊसाहेब म्हणाले,
"सामंत,तुम्ही मला बोलायला तमुद्दा दिलात.
त्यामुळेच माझ्या जीवनातील एक बोधवाक्य मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
'प्रत्येकाशी नेहमी आदराने वागावं.'
कारण भर रस्त्यात त्यांनी तुमचा आदर करावा अशी तुमची इच्छा नेहमीच असते.

मी त्यांना रस्त्यात भेटो या न भेटो मी दिवसाच्या शेवटी माझं डोकं उंच ठेवू इच्छितो आणि स्वत: ला म्हणू इच्छितो की
"मी एक चांगली व्यक्ती आहे."
मी विश्वासठेवून म्हणू शकतो की मी चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो."

मी म्हणालो,
"आपल्या सर्वांना मनआहे.प्रत्येकाला आपलं मन आनंदात असावं असं वाटणं स्वाभाविक आहे.
आपण माणसं म्हणून इतरांवर प्रभाव टाकण्याच्या आपल्या क्षमतेला आपण कमी लेखू नये."

हे माझं ऐकून प्रो.देसाई मग म्हणाले,
"मी एखाद्याचा दिवस चांगला किंवा त्यांचं जीवन अधिक आनंददायी बनवूं शकतो.
आणि एखाद्या दिवशी माझी ही कृती माझ्या परत फेडीत रुपांतरीत होऊ शकते.मन:शांती सारखं समाधान कशातही नसतं.
प्रत्येकजण इतर व्यक्तींकडून चांगल्या संबंधांची आणि सकारात्मक भावनांची उत्कंठा बाळगत असतो."

आमची आजची चर्चा एकमेकाच्या पूर्ण सहमतात झाली.आम्हा दोघांनाही बरं वाटलं.
आणखी थोडा वेळ बसून काळोख होताच घरी जायला उठलो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 12:09 am | अमरेंद्र बाहुबली

प्रोफेसर देसाई अमेरिकेत गेले मग तुम्हाला करंमत कसं?

श्रीकृष्ण सामंत's picture

9 May 2024 - 1:29 am | श्रीकृष्ण सामंत

ते माझ्या बरोबर इथेच अमेरिकेत आहेत.
तुमच्या प्रश्नाला मी बरोबर उत्तर दिलं ना?