मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या.
काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो. पोंक्षे आणि श्री समर्थ दोघेही शहरात गेले होते.
अलीकडे जगात शेजारच्या शेजारच्या देशात छोट्या छोट्या युद्धाची धुम:चक्री चालू झाली आहे.दुसऱ्या दोन जवळच्या देशात बरेच दिवसांपासून युद्ध चालू आहे.
आमच्या कोकणात एक म्हण आहे.
“फौव नाय, कातळी नाय, खाऊक फक्त सूको काजर “
याचा अर्थ “सर्व प्रयास फुकट जाणं”.
युद्धाच्या संधर्भात म्हणायचं तर, युद्धात दोन्ही बाजुची लोकं मरतात, सामुग्रची हानी होते आणि शेवटी निष्पन्न काहीच नाही.असं काहीसं
म्हणता येईल.
हा युद्धाचा विषय माझ्या डोक्यात घोळत होता.आणि अलीकडे
“ भारताने POK घेतलं तर पाकिस्तान भारतावर परमाणू अस्त्र वापरू शकतं”असं म्हटल्याचं ऐकून
तोच विषय घेऊन मी भाऊसाहेबांना म्हणालो.
“ तिसरं महायुद्ध होणार म्हणतात.आणि ते परमाणू युद्ध होणार म्हणतात.ही अशी युद्ध होऊन शेवटी मानवजातीचा ऱ्हास होणार आणि ही पृथ्वी जीव विरहित होणार असं मला वाटतं.तुम्हाला काय वाटतं?”
“ ही पृथ्वी पुढची लाखों वर्षे आहे तिथेच असणार. पण मानवजात असेलच हे सांगता येत नाही.
कदाचित भविष्यात पृथ्वी वेगळी दिसेल.”
प्रो देसाई मला म्हणाले.
आणि पूढे म्हणाले,
“ महाद्वीप आहेत त्या जागेवरून हलतील, समुद्राची पातळी वाढेल किंवा कमी होईल.
परंतु पृथ्वी आहे तिथेच असेल.
पृथ्वीवर जीवन देखील असेल, कदाचित आहे त्यापेक्षा जास्त बुद्धिमान जीवन देखील असेल.
मानवजात गेली कैक वर्षं पृथ्वीवर अस्तित्वात आहे.”
मी म्हणालो,
“काही हजार वर्षांपासून, पर्यावरणात काही प्रमाणात बदल करण्याचं तंत्रज्ञान मानवजातीने अंगिकारलं आहे.
इतर प्राण्यांची मानवजातीकडून शिकार करायला सुरुवात त्याच दरम्यान झाली असावी.”
“तेव्हाच शेतीची कौशल्यं प्रस्थापित करण्यासाठी पुरेशी सुरवात झाली असावी.
तंत्रज्ञान एव्हढ्या झपाट्याने बदलत गेलं की, औद्योगिक क्रांती उदयाला आली.
ह्याच काळात पृथ्वीचा बदलाव करण्यात मानवजात व्यस्त राहिली.
मानवजातीने आता आपल्या करामतीचे ,प्रभाव आणि दुष्परिणाम ओळखून पृथ्वीच्या संरक्षणाकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे.”
भाऊसाहेबांनी आपलं स्पष्टीकरण दिलं.आणि पूढे म्हणाले,
“प्रजातींचं विलुप्त होणं आणि पुन:प्रसार होणं ही एक संथ आणि स्थिर घटना आहे जी अनेक सामूहिक विलुप्ततेने उघडकीस आली आहे,
हा विलुप्ततेचा धक्का आणि जिवंत असलेल्या प्रजातींचे वैविध्य हे नैसर्गिक निवडीचं अनुसरण आहे हे उघड आहे. यात कोणतीही मार्गदर्शक बुद्धिमत्ता नाही,
उत्क्रांतीचे धक्के फक्त नैसर्गिक निवडीच्या नियमाद्वारे निर्देशित केले जातात.
मोठ्या प्रमाणात प्रजातीला नामशेष होण्याआधी नैसर्गिक उत्परिवर्तन रोखण्यासाठी प्रजातीतच पुरेशी स्पर्धा असते, पण त्यामुळे जिवंत रहाण्याची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारत असते.
सामुहिकरीत्या नामशेष झाल्यानंतर, प्रजातीत वाचलेल्यांवर नामशेष होण्याचा नैसर्गिक दबाव कमी असतो.
प्रजातीतला नामशेष होण्याच्या कमी दबावाच्या सुधारणेची प्रक्रिया पुढील पिढ्यांपर्यंत पोचण्याची अधिक शक्यता असते आणि एव्हढंच नाही तर ती सुधारण्याची प्रक्रिया लागोपाठ येणाऱ्या पिढ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या वाढवली जाते.”
ह्यावर मी म्हणालो.
“ गेल्या कित्येक वर्षांपासून मानवजातीने तिच्या बरोबर स्पर्धा करणाऱ्या किंवा मानवजातीला धोक्यात आणणाऱ्या प्रजातींना दडपून टाकलं आहे. उदा. निरनिराळी जंगली श्वापदं,वाघ,सिंह, हत्ती वगैरे.
आणि त्या प्रजातींना जिवंत रहाण्याचं मानवजातीकडून प्रोत्साहन दिलं गेलं आहे ज्या मानवजातीला आधार देतात. उदा.दुभती जनावरं(,गाई, म्हशी) मांस खाद्यासाठी उदा. शेळ्या,मेंढ्या.
भविष्यात जर मानवजात अपयशी ठरली आणि प्रजातींवरील तिचा प्रभाव संपुष्टात आला तर समतोल रहाण्यासाठी नवीन प्रजाती निर्माण
होईल.ती नवी प्रजाती कदाचित हुशार असेल किंवा कदाचित नसेल.
पृथ्वीवर दुसरी कोणतीही प्रजाती नाही जिच्याकडे,मानवजातीला मिळालेल्या वातावरणात बदल करण्याची शक्ती आहे.
तरीही,असं असूनही, पृथ्वीला खरोखर बदलण्याची मानवजातीची शक्ती फारच मर्यादित आहे.
तुम्हाला कसं वाटतं भाऊसाहेब?”
ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,
“जरी मानवजातीने काही जागतिक आण्विक विध्वंस केले, तरी ती पृथ्वीवरील जीवन पूर्णपणे पुसून टाकू शकत नाही.
तसंच महाद्वीपांचा भव्य प्रवाह रोखू शकत नाही.
अगदी अघोरीपणा झाल्यास मानवजात फक्त स्वतःला आणि जीवनाच्या उच्च स्वरूपांना पुसून टाकू शकेल.आणि जसा समय जाईल तसा, पृथ्वीवरील जीवसृष्टी पुन्हा भर भरून येईल.असं मला वाटतं.
पृथ्वीवरील मानवजात संपुष्टात आल्यास पृथ्वीवरील दगड-मातीत मानवजातीच्या अस्तित्वाची नोंद ठेवली जाईल.
कदाचित हाच मानवजातीचा संपुष्टात येतानाचा सर्वात मोठा खरा प्रभाव राहील.
जर मानवजातीचं अस्तित्व अयशस्वी झालं तर आणि अनेक वर्षांनी पृथ्वीवर काही इतर बुद्धिमत्ता उद्भवली, तर ती बुद्धीमत्ता हे दगड-मातीतून दिसणारं कोडं सोडवू शकेल.कारण विलोप होण्याआधी मानवजातीकडून दगड-मातीत ठेवला गेलेला पुरावा पाहून,नव्याने उद्भवलेली ती बुद्धीमत्ता शोध घेईल आणि अशा तर्हेने सध्या असलेली आणि भविष्यात दगड-मातीत विलोप पावलेल्या/पावणाऱ्या मानवजातीच्या कथेचा उलगडा केला जाईल.”
तिसऱ्या महायुद्धात मानवाने परमाणू अस्त्रे वापरली तर मानवजातीचं काय होईल? ह्या माझ्या प्रश्नाला प्रो. देसायांनी अगदी छान उत्तर दिलं आहे असं मला वाटलं.
प्रतिक्रिया
15 May 2024 - 3:53 pm | भागो
परमाणू अस्त्राची काही गरज नाही. इतर अनेक करणे असतील. पण...
एके काळी डायनासोर्स नी पृथ्वीवर राज्य केले. ते नाहीसे झाले. आता मानव. एके दिवशी त्यांची पण अशीच गत होईल. जीवसृष्टी पुन्हा बहरली. तेव्हा काळजी नसावी.
16 May 2024 - 12:21 am | श्रीकृष्ण सामंत
अणू अस्त्र संबंधीत magnato hydro dynamics ह्या विषयावर
मी माझ्या ग्रुप सोबत बरीच वर्षे
Tata institute of Fundamental Research
(TIFR ) मधे संशोधन करीत होतो.
16 May 2024 - 7:13 am | भागो
अणू अस्त्र संबंधीत magnato hydro dynamics>>> ही नवीन माहिती मिळाली. माझ्या कल्पने प्रमाणे MHD पॉवर जनरेशन संबंधित विषय होता.
16 May 2024 - 1:32 pm | नठ्यारा
सामंतकाकांना बहुधा अणुउर्जा म्हणायचं होतं.
-नाठाळ नठ्या
16 May 2024 - 5:09 pm | अमर विश्वास
Magnetohydrodynamics (MHD; also called magneto-fluid dynamics or hydromagnetics) is a model of electrically conducting fluids that treats all interpenetrating particle species together as a single continuous medium.
(अंतर्जालावरून साभार)
आत याचा आणि अणुयुद्धाचा काय संबंध ?
18 May 2024 - 12:56 am | नठ्यारा
सामंतकाका,
चुंबकद्रायूशास्त्रावर ( MHD ) एखादा लेख येउद्या.
-नाठाळ नठ्या