मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इंद्रायणीकाठी

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
इंद्रायणी काठी सुंदर कुंडमळा वैष्णवांचा मेळा दाटतो इथे.... पावसाची झडी इंद्रायणी दुथडी वैष्णवांची दाटी इंद्रायणीकाठी...... एकच तो सांधा वैष्णवांचा वांधा आड्याल पड्याल कसे जावे.... विकांती आकांत एक्याजागी दाटला सहावेना भार वैष्णवांचा.... शेल्फ्या,तूनळ्यांची उडाली एकच घाई पायपोस कुणाचा कुणाच्या पायी?.... थरारला सांधा पेकाट मोडले वैष्णव अवघे सांडले,इंद्रायणी भितोत्सवे आता उठला कल्लोळ उडाला गोंधळ भावीकांचा... इथे दोषी कोण सांधा बंद होता वैष्णव दाटले प्रशासन म्हणे... धावले नामवंत प्रशासन कृपावंत देणगी पाच लाख वारसांना.... कुणी सामावले जळी कुणी तरले,वाहीले पुन्हा तीच खेळी म्होरल्

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा ====================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

मार्गी ·

कर्नलतपस्वी Sun, 06/15/2025 - 10:42
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत Mon, 06/16/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ Tue, 06/17/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी Wed, 06/18/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल

✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

सुधीर कांदळकर ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 20:58
लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा Sun, 06/15/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

धर्मराजमुटके Sun, 06/15/2025 - 19:12
सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सुधीर कांदळकर Sun, 06/15/2025 - 21:12
सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सुधीर कांदळकर Sun, 06/15/2025 - 21:13

विजुभाऊ Sun, 06/15/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या Mon, 06/16/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

कर्नलतपस्वी Mon, 06/16/2025 - 06:40
वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या Mon, 06/16/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ Tue, 06/17/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु Tue, 06/17/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

सुधीर कांदळकर Mon, 06/16/2025 - 20:47
@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

सुधीर कांदळकर Mon, 06/16/2025 - 20:50
@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

सुधीर कांदळकर Tue, 06/17/2025 - 15:35
मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा Tue, 06/17/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

कर्नलतपस्वी Tue, 06/17/2025 - 15:50
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ Tue, 06/17/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

कर्नलतपस्वी Tue, 06/17/2025 - 17:53
काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक Tue, 06/17/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

सुधीर कांदळकर Wed, 06/18/2025 - 16:34
धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 06:33
कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ गुरुवार, 06/19/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 19:55
@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.

भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात.

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

"रुद्रावतारी" न्यायाधीश

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच... मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात. त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

गवि ·

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:32
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:47
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 19:31
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:14
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 06/12/2025 - 19:36
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:12
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 18:52
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.

आनंद गुरुवार, 06/12/2025 - 19:30
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.

In reply to by आनंद

गवि Fri, 06/13/2025 - 11:40
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.

मारवा गुरुवार, 06/12/2025 - 19:55
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:17
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/12/2025 - 22:18
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(

स्वधर्म गुरुवार, 06/12/2025 - 22:29
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.

कंजूस Fri, 06/13/2025 - 06:52
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:10
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Sat, 06/14/2025 - 23:47
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:11

अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 10:24
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.

In reply to by गवि

प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 11:35
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.

In reply to by गवि

गवि Fri, 06/13/2025 - 11:45
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.

In reply to by गवि

पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मारवा Sat, 06/14/2025 - 06:56
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.

In reply to by मारवा

गवि Sat, 06/14/2025 - 08:04
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.

In reply to by गवि

अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 12:00
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.

In reply to by गवि

आनंद Fri, 06/13/2025 - 14:39
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.

In reply to by गवि

सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे

गवि Fri, 06/13/2025 - 10:29
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते

पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 06/13/2025 - 12:37
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.

In reply to by कंजूस

पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 13:01
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 12:58
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.

In reply to by गवि

कंजूस Fri, 06/13/2025 - 13:04
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 13:18
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.

चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 14:13
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !

काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:04
फारच वाईट. दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली. अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच. एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.

In reply to by अभ्या..

गवि Fri, 06/13/2025 - 15:20
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 15:30
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली. मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि

गवि Fri, 06/13/2025 - 15:36
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.

In reply to by अभ्या..

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 16:32
अगदी अगदी त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.

Bhakti Fri, 06/13/2025 - 16:53
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 17:09
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे. एक निरीक्षण नोंदवतो. बर्‍यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे. धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 18:42
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे. गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?

In reply to by अकिलिज

अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते? ब्रेकऐवजी चुकुन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?

सिद्धार्थ ४ Fri, 06/13/2025 - 19:38
Dear Colleagues, This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them. I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday. Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place. As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it. None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them. We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget. Sincerely, Chandra

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 09:56
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील. लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत. कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे. तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले. अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/14/2025 - 10:36
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल. विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.

In reply to by विजुभाऊ

कंजूस Sat, 06/14/2025 - 21:41
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी. -------------------- 11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).

तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला? पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला. https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गवि Sun, 06/15/2025 - 10:03
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-points-to-engine-failure-in-air-india-boeing-787-crash-after-new-video-evidence-19621409.htm

गवि Sun, 06/15/2025 - 19:38
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 23:51
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/17/2025 - 11:49
बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 20:08
पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

गवि Wed, 06/18/2025 - 21:13
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

कंजूस Wed, 06/18/2025 - 21:44
असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

स्वधर्म गुरुवार, 06/19/2025 - 21:03
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

गवि गुरुवार, 06/19/2025 - 22:04
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे

२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

पट्टदकल २: काशी विश्वेश्वर मंदिर

प्रचेतस ·

दुर्गविहारी Wed, 06/11/2025 - 19:35
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख ! या मंदीरातील शिल्पकामाचा दर्जा मात्र आयहोळ किंवा बदामी तसेच पट्टदकलमधील इतर मंदीराच्या तुलनेत उणावलेला वाटतो. कदाचित हे मंदीर आधी बांधले गेले असावे. पुढे उत्तम दर्जाची शिल्प कोरण्याचा सराव इथे झाला असावा हि शक्यता आहेच. राष्ट्रकुटांनी कोरलेल्या वेरुळच्या तुलनेत रावणानुग्रह शिल्पपट खुपच साधा वाटतो. गजासुरवधाचा घारापुरी लेणीतील पट किंवा हळेबीडूमधील शिल्पपट खुपच अप्रतिम आहेत. लिंगोदभव प्रसंगात ब्रह्मदेव खोटे बोलला कि शिवशंकराचा वरच्या बाजुला असलेले टोक पाहिले, म्हणून शंकराने त्याला शाप दिला कि त्याची पुजा होणार नाही. कल्याणसुंदर शिव हा शिल्पपट देखील फारसा स्पष्ट नाही. वास्तविक कल्याणसुंदर शिव या पटात ब्रह्मदेव बर्याचदा पौरोहित्य करताना खाली बसलेला दाखवला असतो तसेच विष्णू पार्वतीचे कन्यादान करताना दाखवला असतो. जमीनीवर विवाह प्रसंगी अग्नी म्हणून ज्वाळा तर काही वेळ अग्नीचे मुख दाखवले असते. वरील शिल्पपट तुलनेने ओबडधोबड असल्यामुळे खाली दाखवलेले अग्नीचे मुख असावे. विवाहप्रसंगी वराच्या हातात वधुचा हात असतो,मात्र इथे पार्वतीने शिवशंकराचा हात हातात घेतलेला दिसतो. सोमास्कंद मुर्तीची शिल्पपट दक्षिण भारतात उत्तम आहे, गंगैकोंड्चोलापुरम किंवा इतर ठिकाणी खुप सुंदर शिल्पपट आहेत. मंदिर ज्या देवाचे आहे, त्याच देवासंदर्भात शिल्प शक्यतो मंदीरावर कोरलेली असतात. मात्र इथे मंदीर शंकराचे असून देखील विष्णुशी संबधीत शिल्प म्हणजे कृष्ण अवताराची शिल्प बघायला मिळतात हे विशेष. शरभ शिल्प हि फारशी रेखीव नाहीत. असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

In reply to by दुर्गविहारी

प्रचेतस Mon, 06/16/2025 - 07:13
काशी विश्वेश्वर मंदिरातील शिल्पांचा दर्जा काहीसा सामान्य आहे मात्र येथीलच विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरातील शिल्पांचा दर्जा अतिशय उच्च आहे. विरुपाक्ष मंदिरातील सूर्य आणि महिषासुरमर्दिनी ह्यांच्या मूर्ती तर प्रचंड सुंदर आहेत. स्तंभशिल्पांच्या बाबतीत हे अगदी प्राथमिक काळातले मंदिर असल्याने येथे सराव करून पुढील मंदिरांत उत्तमोत्तम शिल्पे निर्मिली गेली असे मानता येते. वेरूळच्या कैलास मंदिरातील सोमास्कंद मूर्ती देखील अप्रतिम आहे.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. Mon, 06/30/2025 - 13:49
विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरातील शिल्पांचा दर्जा अतिशय उच्च आहे. विरुपाक्ष मंदिरातील सूर्य आणि महिषासुरमर्दिनी ह्यांच्या मूर्ती तर प्रचंड सुंदर आहेत.
अगदी अगदी. हा आमच्या हिस्टरी ऑफ इंडीयन आर्टस च्या सिल्याब्सातला धडा आहे. नागर शैलीतले आणि दक्षिणेतले मंदीर हा तर योग आहेच.

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 19:59
वाचताना विद्यार्थ्याची भुमिका असते. सुंदर प्रचि, माहितीपूर्ण. बादवे,अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. याचेच नाव रक्तबिज असे पण आहे का?का तो वेगळा कुणीतरी? धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस Mon, 06/16/2025 - 07:15
अंधकासुर कथा प्राचीन आहे, रक्तबीजाची कथा मात्र ह्यावरून प्रेरणा घेऊन नंतर देवीमहात्म्यात आली.

कंजूस Wed, 06/11/2025 - 20:59
शिल्पं पाहिल्यावर पौराणिक कथा समोर दिसू लागतात. इतर देवळांच्या तुलनेत ती ओबडधोबड वाटतात हे मान्य. पण हे देवळं बांधण्याचे /घडवण्याचे प्रयोग होते. सुंदर.

Bhakti Fri, 06/13/2025 - 07:40
वाह! सुरेखच! इथले शिव दृश्य पट वेगळेच वाटत आहेत.मी ६ व्या शतकापर्यंतच्या शिव दृश्य स्वरूप अभ्यासात हे शिवपट म्हणजे सामान्यांसाठी हे दाखवतात की,युद्ध,विवाह सारीपाट,संसार हे प्रसंग शिवाच्याही आयुष्यात होते.परंतू त्यात तो जसा धीराने वागला तसा सामान्यांनी वागायचा प्रयत्न करावा.हे गोष्टीऐवजी कोरलेल्या शिल्पातून पहायला मिळतात. शिवलिंग ब्रम्ह, विष्णू गोष्टही नवीनच समजली होती :)

खिलजि Sun, 06/15/2025 - 10:37
Sundar varnan bhau.. dandvat swikaaraa.. Aamachi maay marathi harvali aahe... Ataparyant aamhi tich giravali aahe... Shodhat aahe pan sapdat naahi... Kuthali Kal dabaavi tech kalat nahi.. Tuzya lekhaani mala punha uthavale... Maay marathila, englishne sajavale... Rup gojire, nave balase... Bhavanaa pochlya ki naahi Te lavkar kalavane....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/19/2025 - 18:04
शिल्प, मंदिरं, माहिती सांगतांना विस्तारभयाची काळजी करु नये. आपल्या लेखनामुळे त्या त्या स्थळाची महिमा कळतो. बाय द वे, द्वारशाखांच्या तळाशी आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर देखील गंगा यमुना आणि निधी आणि सेवक असून ललाटबिंबार आहेत. हे शिल्प ओळखायचे कसे ? यावर एक सविस्तर लेख लिहा. हा ललाटाबिंबार कुठे असतो त्याचे काही वैशिष्ट्ये ? त्याच्या कामाचं स्वरुप ? तपशीलवार माहिती प्लीज. रावणानुग्रहाचं शिल्प' या आयडियाची कल्पना आमच्या वेरुळपासून तिकडे आलेली दिसते. आमच्या वेरुळचं शिल्प अधिक रेखीव आणि अधिक आकार ऊकार आणि सुंदर आहेत असे वाटते. (दुवा )पार्वतीने कडेवर घेतलेला कार्तिकेय अर्थात स्कंद तुम्हाला ओळखू येतो. ( नमस्कार करतो पाय करा इकडे ) तारकासूर त्याची लेकरं, त्यांची ती नावे, सगळं लिहायचं म्हणजे लै अभ्यास लागतो, आणि तो तुमच्याकडे आहे तेव्हा लिहिते राहावे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 19:20
धन्यवाद सर, आपल्या प्रोत्साहनामुळे लिहिण्याचा नेहमीच हुरुप येतो. द्वारशाखा म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराचा दोन्ही बाजूस असणारा भाग. सहसा द्वारशाखेवर गंगा यमुना, निधी (जल, पाणी, पैसा आणणारे सेवक) इत्यादी कोरलेले असतात, बहुतकरुन नक्षीदेखील आढळते. ललाटबिंब म्हणजे मंदिराच्या किंवा द्वाराच्या ललाटावरील (कपाळावरील भाग). उदाहरणार्थ येथील मंदिराच्या ललाटबिंबावर (द्वाराच्या वरच्या बाजूस) आणि शिखराच्या खालच्या बाजूस मध्यभागी कोरलेला नटराज शिव. तर द्वारशाखेवरील ललाटबिंब म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही मंदिराच्या द्वारावर असणारी गणेशपट्टीतील मध्यभागी असलेली गणेशप्रतिमा. वेरुळच्या कैलास मंदिराच्या ललाटबिंबावर लिंगिन शिवमूर्ती (शिवानेच शिवलिंंग हाती धारण केलेली मूर्ती) कोरलेली आहे.
रावणानुग्रहाचं शिल्प' या आयडियाची कल्पना आमच्या वेरुळपासून तिकडे आलेली दिसते
हे मंदिर वेरुळच्या लेणीपेक्षाही कमी अधिक प्रमाणात जुने असावे. तुम्ही दिलेल्या दुव्यातील चित्र वेरुळच्या २९ क्र. (धुमार) लेणीतले आहे, मात्र ह्यापेक्षाही सर्वोत्तम रावणानुग्रह कैलास एकाश्ममंदिरात आहे त्याची तुलना कशाशीच नाही, इतके प्रचंड बारकावे त्यात आहेत. बाकी शिल्पं ओळखणे तसे सोपे असते. निरिक्षण मात्र खूप लागते.

सौंदाळा Sun, 06/22/2025 - 08:03
सुंदर लेख आणि फोटो आणि त्या अनुषंगाने दिलेली पुराणकथांची माहिती काशी विश्वेश्वर मंदिर — अशी किती विश्वेश्वर मंदिरे आहेत? (अजून पण एक ऐकले आहे पण आता पटकन कुठे ते आठवत नाही) वाराणसीकचे काशी विश्वेश्वर हे मूळ मंदिर आणि त्याची प्रेरणा घेऊन हे मंदिर बनवले असेल का? आता जसे प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी मंदिरे आहेत त्याप्रमाणे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Sun, 06/22/2025 - 12:43
काशी विश्वेश्वर किंवा काशी विश्वनाथ ह्या नावाने देशभरात भरपूर आहेत, अगदी आपल्या वाईला देखील काशी विश्वेश्वर आहे. काशी वरूनच प्रेरित आहेत हे उघड आहे मात्र पट्टदकल येथील काशी विश्वेश्वर मंदिराचे ते मूळ नाव नसावे. येथील मंदिरे सुरुवातीला वेगळ्या नावाने होती, नंतर अलीकडची नावे पडली. उदा. लोकमहादेवी वरून लोकेश्वर मंदिर तर त्रैलोक्य महादेवीवरून त्रैलोकेश्वर अशी अनुक्रमे विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरांची मूळ नावे होत.

MipaPremiYogesh गुरुवार, 06/26/2025 - 08:05
कमाल चालू आहे लेखमाला वल्लीशेठ...काय अप्रतिम आहे हे सगळे..best

गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 13:05
लेखमाला छानच सुरु आहे . "आपले लेख म्हणजे शंभर नंबरी सोनं असतयं बघा" कर्नलतपस्वी यांच्याशी पुरेपूर सहमत .