धात्री
(मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही संपूर्ण काल्पनिक कथा तुमच्या समोर मांडते आहे. 'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!)
धात्री
(मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही संपूर्ण काल्पनिक कथा तुमच्या समोर मांडते आहे. 'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!)
धात्री
गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी गायलेलं गीतरामायण हे काव्य अवीटातलं अवीटच. दुर्दैवाने बाबूजी प्रत्यक्ष स्वतः गात असताना गीतरामायण ऐकण्याचं भाग्य कधी लाभलं नाही मला. पण नंतर एकदा श्रीधरजींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याही सुमधुर आवाजाने त्यावेळी मी तृप्त झालो होतो .
नमस्कार ... मिपाकर !!
न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता.
अ.प्र. जोशी
चिमुलवाडा, गाव सावरगाव
गोवा
प्रति,
सर्व वाचकांस
२ -४ -२०२०
विषय: थेट चिमुलवाड्यावरून
मे महिन्याचे अखेरचे दिवस. शनिवारची रात्र. ९:३० वाजून गेले असावे. बाहेर बारीक पाऊस लागलेला, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच सामसूम. रस्ते सगळे ओलेकच्च झालेले. कुठच्या तरी सरकारी योजनेखाला लावलेल्या खांबावरील दिव्यांचा अंधुक उजेड चिमुलवाड्यावरच्या पायवाटेवर पडला होता. त्या उजेडात पावसाची बारीक भुरभुर देखील चांगली ठसठशीत वाटत होती. धुपकरांच्या सालात चिमुलवाड्यावरील सगळ्या पुरुष मंडळींचा अड्डा बसला होता. टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला होता. ऑस्ट्रेलिया वाल्यानी आधी फलंदाजी करून २० षटकांत २१८ धावा कुठल्या होत्या. भारताची फलंदाजी व्हायची होती.
फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात.
करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
"तुम्हाला कसिनोत जाऊन जर रुले ( म्हणजे ते फिरणारे चक्र) खेळायचे असेल तर तुम्हाला सुतारकाम शिकून फायदा नाही, तुम्हाला गणित शिकावे लागेल" - गणित तज्ञ् तालेब
एकदा क्रिकेट मधील जाणकारांच्या पार्टीत रमाकांत आचरेकर ह्यांच्या नावाचा उल्लेख आला. तिथे सलील अंकोला होता. त्याने सहज म्हटले कि ज्या माणसाने आयुषांत कधीही एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्या व्यक्तीने अनेक महान खेळाडू घडवले ह्यावरून कोचिंग आणि प्रत्यक्ष खेळ हि एक दोन वेगळी क्षेत्रे आहेत असे लक्षांत येते. मला क्रिकेट विशेष आवडत नसले तरी अंकोलाचे शब्द मनात घर करून गेले.
मंडळी नुकतीच रामनवमी होऊन गेली. चैत्रात माझ्या आजोळी रामाचे नवरात्र असते. तर या दिवसांमध्ये रामाला नैवेद्य म्हणून अनेक प्रकार केले जातात. जसे की लापशी खीर, पिठल्याच्या वड्या, धिरडी आणि गुळवणी इत्यादी. बर्याच वर्षात पिठल्याच्या वड्या करायच्या मनात होत्या. तर या चैत्रात केल्याही, हो तशाही सध्या भाज्या मिळतीलच असे नाही. कमी साहित्य आणि अगदी झटपट होती ही पाकृ.
साहित्य:
वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले."
आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.
मागील दुवा http://misalpav.com/node/46323