नमस्कार मंडळी,
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
यंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.
साहित्य:
कृती:
सर्वप्रथम पोह्यांचा चुरा करून घ्यावा.
थोडे तूप तव्यावर टाकून ते तापल्यावर त्यात पोह्यांचा चुरा खरपूस होईपर्यंत परतून घ्यावा.
पोहे बाजूला काढून अर्धी वाटी तूप तव्यावर तापवावे.
तूप तापल्यावर त्यात कणीक मिसळून मंद आचेवर भाजत राहावी.
१०-१२ मिनिटांत कणकीचा रंग सोनेरी होतो व खमंग वास येऊ लागतो.
या सर्व काळात कणीक हालवत राहावी जेणेकरून ती करपणार नाही.
रंग बदललेल्या कणकेत पिठीसाखर घालावी व ते मिश्रण एक दोन मिनिटे परतावे.
हे मिश्रण पातेल्यात काढून घ्यावे.
सुरुवातीला तुपात भाजलेला पोह्यांचा चुरा या मिश्रणात घालावा.
लाडू बांधण्यास सुरुवात करावी व गरजेनुसार अधिक तूप त्यात घालावे.
बांधलेल्या लाडवांवर बदाम बी किंवा त्यांचे काप लावावे.
- २ वाटी कणीक
- ३/४ वाटी तूप
- ३/४ वाटी पिठी साखर
- २ टीस्पून पोहे (जाडे किंवा बारीक)
- ७-८ बदाम बी (सजावटीकरिता)
कृती:
सर्वप्रथम पोह्यांचा चुरा करून घ्यावा.
थोडे तूप तव्यावर टाकून ते तापल्यावर त्यात पोह्यांचा चुरा खरपूस होईपर्यंत परतून घ्यावा.
पोहे बाजूला काढून अर्धी वाटी तूप तव्यावर तापवावे.
तूप तापल्यावर त्यात कणीक मिसळून मंद आचेवर भाजत राहावी.
१०-१२ मिनिटांत कणकीचा रंग सोनेरी होतो व खमंग वास येऊ लागतो.
या सर्व काळात कणीक हालवत राहावी जेणेकरून ती करपणार नाही.
रंग बदललेल्या कणकेत पिठीसाखर घालावी व ते मिश्रण एक दोन मिनिटे परतावे.
हे मिश्रण पातेल्यात काढून घ्यावे.
सुरुवातीला तुपात भाजलेला पोह्यांचा चुरा या मिश्रणात घालावा.
लाडू बांधण्यास सुरुवात करावी व गरजेनुसार अधिक तूप त्यात घालावे.
बांधलेल्या लाडवांवर बदाम बी किंवा त्यांचे काप लावावे.
दिवाळी अंक वर्ष
वाचने
19320
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकृ! पोह्यांचे कण खाताना
सुंदर
वाह! मस्त..
भारीच!
वाह... फोटो आणि सादरीकरण
छान. करुन पाहतो.
मस्त लाडु.मी करते असे पण
वेगळा प्रकार.
आभार
सुपर्ब लाडू
फोटो आणि सादरीकरण दोन्ही छान.
मस्त
छान आहे
मस्तच झालेत लाडू!
मस्त दिसताहेत लाडु.
मस्त!
वाह!! तुपाचं प्रमाण नेहमी
मस्त ! जुईचे फोटो पण छान.