बिडी: नाशिक उद्योग - ०५ : बिडीने "वळवले" नाशिकचे अर्थकारण
ती १९/२० वर्षाची असेल. साल सुमारे १९८०. काशा तिचा धाकटा भाऊ. मी अन काशा घट्ट मित्र. शाळेतले. त्यावेळी आम्ही पाचवीत. खेळायला आम्ही एकमेकांच्या घरी किंवा गल्लीत पडीक. काशाची आक्का (ताई) मला किती तरी वर्षे राखी बांधायची. आमची तिघांची घट्ट गट्टी. आक्काचं लग्न चारच महिन्यापूर्वी करंडीच्या जल्लोषात झालं होतं. करंडी हे आमच्या निपाणीचे खास वाद्य. लग्नानंतर चारच महिन्यांनी त्यादिवशी कामगार वस्तीतल्या त्यांच्या एक खोलीच्या घरात जोरात रडारड.कल्ला. आक्की रडत होती. आई मोठ्यानं शिव्या देत रडत होती. आबा ओरडून समजावत होता. मला एवढंच आज नक्की आठवतं, आक्की शेवटी ओरडून म्हणाली होती "....