चारोळी: हिरवा"गार" पाऊस!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
27 May 2017 - 9:52 pm

पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार

चारोळ्या

कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
27 May 2017 - 9:24 pm

( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे )

---------------------------------------------

१. अमावशेची रात ( मालवणी )

“मजा आली का नाही.”

“हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.”

“आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.”

“बरं बरं.”

“सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?”

“हडळीच्या माळावर”

“एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.”

कथाभाषाशब्दक्रीडाप्रतिभाविरंगुळा

परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
27 May 2017 - 10:59 am

२० नोव्हेंबर २०१६

बालकथाप्रकटन

मोदींची ३ वर्षे

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
27 May 2017 - 9:39 am

मोदी सरकारची तीन वर्षे

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . .

मला दिसतात ते मुद्दे असे

नोटाबंदी
जी एस टी सर्वसहमती
बांगलादेश जमीन वाटप सर्व सहमती

आणि मनमोहनसिंग यांच्याबाबतीत
२जी ३जी घोटाळा, मुंबई हल्ला २६/११, कसाबला यशस्वीरीत्या पकडणे आणि फाशी देणे, अफझल गुरुला फाशी देणे

आपल्याला काय काय मुद्दे आठवतात !

राजकारणप्रकटन

अनवट किल्ले ९ : जंगलाने गिळलेला, मुडागड ( Mudagad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
26 May 2017 - 6:57 pm

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला , सह्याद्रीच्या एन कण्यावर एक छोटे गाव वसलेले आहे,"पडसाली". गावाच्या आजुबाजूला घनदाट जंगल आहे आणि पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येतो. पेशव्यांच्या काळात राजापुर, आचरा, देवगड, विजयदुर्ग या बंदरातून करवीरला येणारा माल निरनिराळ्या घाटाने चढविला जाई. त्यापैकी राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून काजिर्डा घाटाने मालाची ने आण केली जाई. यासाठी नानासाहेब पेशव्यानी सन १७४२ ते १७४७ या दरम्यान करवीरकरांच्या प्रदेशाजवळ मुडागड बांधला असावा. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसले होते. वाडीचे सांवत पेशव्याना मदत करीत.

जपुन टाक पाउल

Vinayak sable's picture
Vinayak sable in जे न देखे रवी...
26 May 2017 - 3:20 pm

"जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे
सरसावतात
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून
नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात
म्हणुन......!

कविता माझीकविता

मन से बाता अर्थात मनोगत...

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
26 May 2017 - 1:15 pm

सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/एसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो.

परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला. कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले.

मुक्तकलेख

कोकणात कुठे फिरावे ? काय बघावे? कुठे रहावे ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
26 May 2017 - 12:22 pm

मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे. या संदर्भात कुठे कुठे जात येईल, रहाण्याची/जेवण्याची सोय कुठे करावी, पुण्यापासूनच गाडी करून जावे किंवा कसे ? गाडीचा खर्च अदमासे किती येईल ? वेळ किती लागेल ? (पुण्यातून निघून परत पुण्यालाच यायचे आहे).

हळद

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जे न देखे रवी...
26 May 2017 - 12:09 pm

सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद,
तिला मात्र जखमी करून जाते...
आजही ती कोणाच्या हळदीला जायचं
अट्टाहासाने टाळते...

जखमेवर हळद भरायची म्हटलं की
तिचे डोळे येतात भरून...
आजही.. हरितालिका पुजताना,
वटपौर्णिमेला मागणं मागताना,
कातर होते ती...

अंगाला लागलेली हळद
कोणाची..
कळेनासं होतं..
वेडावून जाते ती..

त्याने विनोद पाठवला
जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते

तिचे डोळे भरून आले...
हळदीच्या विनोदानेच
जखमेवरची खपली काढली...
हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....

कविता