पन्हाळगड ते विशाळगड, एक स्मरणयात्रा (Panhalgad to Vishalgad)
स्वराज्यावर चालून आलेल्या बत्तीस दाताचा बोकड, अफजलखानाला फाडून शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्याची मोहिम आखली. नेताजी पालकरांना त्यांनी सातारा,कराड्,सांगली परिसरातील किल्ले ताब्यात घेण्यास पाठ्विले. नेताजीनी बराच मुलुख तातडीने मारला, पण मिरजेचा भुईकोट काही त्यांच्यासमोर झुकेना.