अमर फोटो स्टुडियो

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 5:09 pm

एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.

नाट्यसमीक्षा

नेत्र न कोई

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जे न देखे रवी...
11 Sep 2017 - 1:43 pm

दुःख दर्शविण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

शोभून दिसते सुंदरी
अन् सुगंध देते मोगरी
फरक इतकाच सखे
भार तुच्छ हा उरावरी

टकटक आवाज करती
चाले गुलाबी परी
मधुर सुगंध तिचा
वाटे नभाची सरी

हे दृश्य पाहण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

कविता माझीसंगीतकविताचारोळ्याभाषाव्युत्पत्ती

१/१/२१०२, स.न.वि.वि.

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 12:45 pm

बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे. आज २१०२ साली ती अस्तित्वात आहे हेच एक मोठे आश्चर्य आहे.

संस्कृतीविचार

हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
11 Sep 2017 - 11:22 am

अशी पाककृती केली तर चालेल का?

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in पाककृती
11 Sep 2017 - 10:45 am

बंधु आणि भगिनिंनो

माझा असा विचार आहे की खालील प्रमाणे पिठ वापरुन पराठे बनवावे,
कृपया मला सांगा की यात काही अजुन करता येईल का, कींवा यात काय चुकीच आहे

पिठ :-

गहु १ किलो, १०० ग्रा. सोयाबिन, १०० ग्रा. बदाम एकत्र दळुन तयार केलेल पिठ

यामुळे पिठातील प्रोटिन प्रमाण वाढेल का? , माझे काही चुकत आहे का? किंवा अजुन काही घटक वाढवावे का?

यानंतर नेहमी प्रमाणे, पालक किंवा मेथी किंवा धनिया टाकुन पराठा बनवणे.

दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 6:30 am

नमस्कार मिपाकरहो!

"गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत.

संस्कृतीप्रकटन