सासंला आलेले व्यनी

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in गटसाहित्य
11 Sep 2017 - 3:06 am

येथे सासंला आलेल्या व्यनीसंदर्भात चर्चा करूया.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

11 Sep 2017 - 3:10 am | जव्हेरगंज

1.

समाधान राऊत Feb 20
मिटवा Block
माझे मलाच हसु येतेय,
मोडकं तोडकं,वाकडं तिकडं झालयं सगळच (पहिल्यांदा धरपकड केली आहे शब्दांची) म्हणुन-
स्पर्धा पुर्ण झाल्या नंतर नाव जाहीर होणार नाही एवढी विनंती!!

---------
http://www.misalpav.com/node/38957
---------

2.समाधान राऊत Sep 8
मिटवा Block
उपरोल्लिखित धागा - 'हा खेळ कागदांचा' सासं च्या नावे प्रकाशित न होता माझ्या नावे प्रकाशित झाला आहे, असे करु नये अशी मागणी योग्य त्या वेळी केली होती; परंतु ती मान्य न झाल्याचे दिसते आहे, मागणी मान्य करावी अशी विनंती. वा धागा अप्रकाशित केल्यासही चालेल(धागा उडवला तरी चालेल)!!
-समाधान राऊत

---------

माझे मत,
रास्त मागणी आहे. धागा उडवून देण्यास हरकत नसावी.

पद्मावति's picture

11 Sep 2017 - 11:19 am | पद्मावति

येस.
धागाही उत्तम.

एस's picture

11 Sep 2017 - 12:13 pm | एस

+१

पद्मावति's picture

27 Sep 2017 - 12:28 pm | पद्मावति

काल हा व्यनी आलाय.

नमस्कार,

सध्या मिपा च्या दिवाळी अंकासाठी अभिवाचन करण्यासाठी कथा शोधत होते. त्या शोधत असताना आणि वाचून बघत असताना अशी कल्पना सुचली कि जर मिपा वरील उत्तम लेख, कथा मालिका, व कविता यांचे असे अभिवाचन करून दर आठवड्याला किंवा जसे ठरेल तसे एक एक प्रसिद्ध करून मिपाचा स्वतः चा पोडकास्ट सुरु केला तर जुने उत्तम उत्तम लिखाण परत एकदा समोर येईल आणि काहीना कामाच्या गडबडी मुळे वाचन करता येणे शक्य नसेल तर ते असे लिखाण ऐकू शकतील.

कल्पना सुचल्यावर ती तुम्हा मंडळीना सांगावीशी वाटली, जेणे करून हे शक्य आहे का ते तुम्ही ठरवू शकाल.
जर योग जुळून आलाच तर या कामात सर्वतो परी मदत करायला मी नक्की तयार आहे. मी पूर्वी नाट्य वाचनामधे भाग घेतला आहे.तसेच काही तांत्रिक बाबी मधे जिथे शक्य असेल तिथे पण मदत करू शकते.

आपले या वरचे मत ऐकायला उत्सुक आहे.

कळावे,
सई

जव्हेरगंज's picture

28 Sep 2017 - 12:24 am | जव्हेरगंज

उत्तम कल्पना!

प्रोत्साहन द्यायला हवे.

'गोष्ट तशी..' च्या टिमकडे हे पाठवायला हवे.

एस's picture

28 Sep 2017 - 5:17 pm | एस

सहमत.

पद्मावति's picture

28 Sep 2017 - 5:33 pm | पद्मावति

काय उत्तर द्यायचं त्यांना?
त्यांना हे सांगायचं का की गोष्टच्या टीमला संपर्क करा म्हणून?

हो - गोष्ट..च्या टीमशी संपर्क साधायला सांगा.

दिवाळी अंकाशी संबंधित व्यनि कृपया मिपासंवादवर लिहावेत. सगळं संभाषण एकत्र राहील, आणि रिलेव्हंट लोकांपर्यंत आपोआप पोचेल.

पद्मावति's picture

28 Sep 2017 - 6:01 pm | पद्मावति

हा व्यनी दिवाळी अंकाशी आहे की नाही याबाबत मी शुअर नव्हते, म्हणून इथे टाकले. मला वाटले(वाटतंय) की सई पॉडकास्ट हे मिपाचे परमनंट फीचर व्हावं असे म्हणतेय.
अजुन एक म्हणजे तिने हा व्यनी संपादक मंडळ आणि सा सं मंडळ यांना लिहिलाय तेव्हा तो परस्पर मिपासंवाद मधे टाकणे मला योग्य वाटलं नाही. येस तिला गोष्ट च्या टीम ला संपर्क करायला सांगणे जास्ती संयुक्तीक वाटते.

हा व्यनी दिवाळी अंकाशी आहे की नाही याबाबत मी शुअर नव्हते, म्हणून इथे टाकले. मला वाटले(वाटतंय) की सई पॉडकास्ट हे मिपाचे परमनंट फीचर व्हावं असे म्हणतेय.
अजुन एक म्हणजे तिने हा व्यनी संपादक मंडळ आणि सा सं मंडळ यांना लिहिलाय तेव्हा तो परस्पर मिपासंवाद मधे टाकणे मला योग्य वाटलं नाही.

ओह ओके. नो प्रॉब्लेम!

पद्मावति's picture

11 Dec 2017 - 12:20 am | पद्मावति

अभिजीत अवलिया यांचा व्यनी आलाय

नमस्कार सा.संं,
कृृपया पुणे ते लेहचा भाग ५ अनुक्रमणिकेत जोडाल का?

पद्मावति's picture

5 Jan 2018 - 2:37 pm | पद्मावति

नमस्कार,

माझ्या या लिंक वरील लिखाणामधील सर्व चित्रे दिसत नाही आहेत. त्या चित्रांच्या लिंक्स मला दुरुस्त करून द्याल का?
http://www.misalpav.com/node/40045

नवीन लिंक्स अनुक्रमे पुढील प्रमाणे :

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/19399422_10155484042299452...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/19250862_1015548404400445...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/19264548_1015548403848945...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/19388369_1015548433335945...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/19260255_10155484334874452...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/19275197_10155484338044452...

https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/19397077_10155484344699452...

धन्यवाद,

सही रे सई

पद्मावति's picture

31 May 2018 - 11:43 pm | पद्मावति

अभिजीत अवलिया यांचा व्यनी आलाय
नमस्कार सा.सं.,
पुणे ते लेह लेखमालेत भाग ११,१२,१३,१४ अनुक्रमणिकेत जोडून द्यावे ही विनंंती.

११ - http://misalpav.com/node/42223
१२ - http://misalpav.com/node/42411
१३ - http://misalpav.com/node/42556
१४ - http://misalpav.com/node/42684

धन्यवाद.

पद्मावति's picture

11 Jun 2018 - 10:02 pm | पद्मावति

समर्पक यान्चा व्यनी
<<<नमस्कार, एक जुना धागा नवीन फॉर्मॅट मध्ये संपादित करू इच्छितो. शक्य आहे का>? https://www.misalpav.com/node/28781 https://www.misalpav.com/node/28740
मुख्यतः चित्रांचे आकार व गाणी>>>

पद्मावति's picture

29 Aug 2018 - 12:21 am | पद्मावति

मा सा. सं,
माझा सोडियमचा लेख यापूर्वीच्या ' खनिजांचा खजिना' या लेखास जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.

आभार !

(कुमार १ यांचा व्यनी)

पद्मावति's picture

29 Aug 2018 - 12:50 am | पद्मावति

लेख जोडणी करता येतेय. पण मुळात लेखमाला बनवायची असेल तर कशी बनवायची? आय मीन, कुमार यांनी म्हंटलंय की ' खनिजांचा खजिना ' या त्यांच्या लेखमालेत एक लेख जोडायचा आहे. पण लेख जोडायला गेले तर लेखमालिका अस्तित्वात नाहीये असे लक्षात आले. म्हणून विचारतेय लेखमाला कशी बनवायची.

नीलमोहर's picture

31 Aug 2018 - 8:51 pm | नीलमोहर

नीलकांत यांनी एका धाग्यात माहिती दिली होती याविषयी,
ते मलाही नीट कळलेलं नव्हतं पण, बघावं लागेल.

पद्मावति's picture

14 Sep 2018 - 12:08 pm | पद्मावति

समर्पक यांचा व्यनी
शिफारस विभाग जरा स्व्च्छ करण्यात यावा... काही लेख तिथे बर्‍याच काळापासून आहेत... असण्यास हर्कत नाही पण गणेशोत्सव लेखमाला उठून दिसेल असे तरी काही करा... मागे लेखातील दुरुस्तीबाबत संदेश पाठवला होता त्याचे उत्तर आले नाही त्यामुळे लेख प्रकाशित झाल्यावरच दुरुस्त करावा लागेल असे दिसते तेव्हा गेल्या विशेषांकाप्रमाणे तशी सोय ठेवावी.

सर्वात महत्वाचे, लेख जसा दिला आहे तसाच निटनेटका प्रकाशित करावा. गेल्या वेळी याबाब्तीत बरीच हेळसांड झाली होती.

तसदीबद्दल धन्यवाद !

पद्मावति's picture

14 Sep 2018 - 3:14 pm | पद्मावति

व्याकरणातल्या चुका दुरूस्त केल्याबद्दल खुप आभारी आहे. खास करुन ‘शिट=सीट’ नाहीतर विचित्र वाटले असते वाचता. धन्यवाद!
सुधांशु तुमच्या मु शो ला दाद दिलीय शाली यांनी :) व्यनी आलाय.

सुधांशुनूलकर's picture

14 Sep 2018 - 3:34 pm | सुधांशुनूलकर

इश्श्कस्चकस्च....

अशा खूप चुका होत्या त्या लेखात. मुख्यतः कीबोर्ड लेआउट वेगवेगळे असतात, त्यात 'ऑटोकरेक्ट' नावाचा राक्षस असतो. म्हणजे लेखकाला बरोबर शब्द माहीत असतात, पण टाइप होतात वेगळेच.

पद्मावति's picture

14 Sep 2018 - 5:12 pm | पद्मावति

काही सूचना व अटी: कृपया, लेखाचे फॉर्मॅटिंग आहे तसे जपावे. गेल्या वेळेप्रमाणे लेख भटकंती विभागातच प्रकाशित करावा जेणेकरून गरजेप्रमाणे बदलाची संधी राहते. काही लहान सहान बदल असल्यास नंतर करेन.

हा समर्पक यांचा व्यनी ३१ ऑगस्टलाच आला होता पण इथे टाकायचं राहून गेलं ...सॉरी. या व्यनी मधली भटकंती मध्ये टाकण्याची गोष्ट मला नीट समजली नाही. त्यांना काय उत्तर देऊ?

पद्मावति's picture

16 Sep 2018 - 1:49 pm | पद्मावति

ज्योति आळवणी यांचा खूप छान संदेश आलाय. त्यांना थँक्सचा रिप्लाय पाठवला आहे.

नमस्कार,

श्रीगणेश लेखनमाला खूप छान झाली आहे यासाठी अभिनंदन आणि माझा लेख या लेखनमालेमध्ये घेतल्याबद्दल मनापासून आभार.

आपण दिवाळी मध्ये देखील आपला अंक काढतो. यावेळी त्याची काही थीम आहे का? त्यावर जर काही ठरले असेल तर जरूर कळवा. काही वेगळ्या विषयावर मुलाखत घेणे असे काही असेल तर मला त्यात भाग घ्यायला खूप आवडेल. मिसळपावचा अंक छान व्हावा अशी मनापासून इच्छा आहे. काही चांगल्या सेलिब्रिटीजशी ओळख आहे. त्याचा काही उपयोग होणार असल्यास जरूर सांगावेत ही विनंती