जुळ्यांचं दुखणं!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
10 Oct 2017 - 5:05 pm

'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर.
त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न.

मांडणीजीवनमानप्रकटनआरोग्य

सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
10 Oct 2017 - 3:12 pm

सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

आता कशाला पावसा
तू उगाच कोसळतोस
उभी राहिली पिके ही
का त्यांना भिजवतोस

नक्षत्रे पावसाची सारी
संपली ती आता रे
सरला आश्विन आता अन्
आली आली दिवाळी रे

असा अवेळी तू येता
उडे खूपच धांदल
मेघ गर्जना विद्युत
काळे काळे हे बादल

नको रागाने बरसू
नको आणू रोगराई
दिवस सण उत्सवाचे
आहे लगबग घाई

निरोप घेऊन धरणीचा
पुढल्या वर्षी रे तू यावे
आगमन होईल शिशिराचे
तू आता उगी राहावे

-- शब्दांकित (वैभव दातार )

वाङ्मय

मधुघट१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
10 Oct 2017 - 12:12 pm

मधुघट कुणा मिळे भरलेला
शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।।

बळ कैसे
येईल अंगा
जळही दुर्मिळ भासतसे
अमृताची जरी हाव नसे
ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।।

लोळे कुणी
मखमालीवरी
वणवण, हाय! कुणा ललाटी
भलीबुरी, ही जगरहाटी!
कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।।

भला जाणता
दीन नेणता
कष्ट करी अमाप जरी
जैसे तैसे रहावे धरी
साखरपाणी तो प्यालेला ।।३।।

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणशांतरसकलाकविता

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

मिल्टन's picture
मिल्टन in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 11:39 pm

अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली.

अर्थकारणप्रकटन

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
9 Oct 2017 - 3:31 pm

अपयशातून शिकताना

रामराम! सायकल नव्याने सुरू करून चार वर्षं झाली आहेत. सायकलीच्या सोबतीत इतकं काही शिकायला मिळालं, नवी दृष्टी मिळाली! ह्या पूर्ण प्रवासात सायकलसह अनेक दिग्गज सायकलपटू, फिटनेस क्षेत्रातील मातब्बर आणि प्रेरणा देणारे लोक सतत भेटत आहेत! हे निवेदन सुरू करण्यापूर्वी ह्या सर्वांना एकदा नमन करतो.

काय विचार करताय?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 12:51 pm

नुकताच बोली आणि भाषा या लेखावर गापै यांची प्रतिक्रिया वाचून डोक्यात काही विचारचक्रे फिरू लागली.
त्यात एक मुद्दा असा आला कि भाषा हि एका व्यक्तीसाठी किती गरजेची आहे?

भाषाविचार

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 9:23 am

बिझनेस नेट्वर्किंग

आपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे.

२०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे. मी हे चांगलं/वाईट असं काहीच म्हणणार नाही, परंतु एखाद्या नेकीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला मात्र स्वानुभवातून काही टिप्स देवू इच्छितो :-

काय आहे मुळात BNI ?

तंत्रसल्ला

पक्षी वैभव

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
9 Oct 2017 - 12:41 am

उगवणाऱ्या सूर्याबरोबर पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने आमची पहाट मंगलमय होते. आमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमुळे अनेक पशु-पक्ष्यांच्या सहवासाचा आम्हांला आनंद घेता येतो.

सकाळी पाहिले की पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर बागडत असतात, काही पक्षी कोवळ्या किरणांच्या उबेत फांद्यांवर आरामात पहुडलेले असतात तर काही स्वतःची साफसफाई करत असतात. कुणी दाण्या-पाण्याची सोय करण्यात गुंग असतात तर कुणी मस्ती करण्यात दंग असतात. पक्षांचे निरीक्षण करताना बऱ्याच गमती जमती अनुभवता येतात.