पट पट पट मोजीत नोटा
पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता
ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा
उंची फेरारी स्वतःस छान
जनास करी ईंधन दरवाढ
भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा
नेता राजा फार हुषार
सत्तेवर तो होता स्वार
नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा
सात सदनिका भूखंड सात
बळकावितो हा एक दमात
आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा
मूळ कविता:
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
उंच भरारी दोन्ही कान
ऐटीत वळवी मान कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा
होळीचे रंग
राम राम मंडळी,
लिहण्याचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने फ़क्त होळीचे रंग दाखवणारी छाया चित्रे प्रकाशित करीत आहे
स्थळ - बरसाने, मथुरा
कॅमेरा - निकोंन डी ७५० ५० मीमी आणि २४-१२०
भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.
पूर्वी
पूर्वी म्हणे जग फार फार छान होत
पिंपळाला सोन्याचं खर खर पान होत
पूर्वी म्हणे विमान आमचे आकाशात उडायचे
धनुष्याच्या लढाईनंतर तिथून फुलं पडायचे
बाण घेवून आमचे ऋषी समुद्राला नडायचे
साध्याश्या गाईसाठी पण राजाशी लढायचे
पूर्वी म्हणे शेतात सकस अन्न पिकायचे
बालपणी बचावलेले शंभर वर्ष टिकायचे
एका एका गर्भाचे शंभर क्लोन करायचे
मोठे मोठे राजे साध्या क्षयाने मरायचे
आत्ता आत्ता चाळीत माणुसकी नांदत होती
रोज सकाळी नळावर पाण्यासाठी भांडत होती
आपल्या वाट्याची मिलो प्रेमाने कांडत होती
भरलेल्या एसटीमधून गावो गाव सांडत होती
ताम्हणकर
आज अनेक वर्षं झाली मी आमच्या आळीतल्या गणेशोत्सवात उत्साहाने कार्यरत आहे. जसं वर्षं नवीन तशी सजावट नवीन, मूर्ती नवीन आणि संकल्पना सुद्धा नवीन. पण तसं बघायला गेलो तर दर वर्षीच्या या गणेशोत्सवाची कथा, पटकथा, पात्रे आणि अगदी संवाद सुद्धा जसेच्या तसे असतात. जरी वर्ष नवीन असलं तरी जणू काही आपण मागेच पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचे 'रिपीट टेलिकास्ट' पाहतोय असा भास व्हावा. नाही म्हणायला दर वर्षी 'बावा', 'शिरी', 'वाचव' अश्या निरर्थक शब्दांची भर पडत असते इतकेच. मात्र या चित्रपटाची नेहमीची सर्व पात्रं उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण.
हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)
हा लेख ३० जून २०१३ ला जागरण पेपर मध्ये छापून आला होता.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)
मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे.
बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ४ - रंगून, ब्रह्मदेश
ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस
परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम.