ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 11:34 am

परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम.

मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही. तस्मात, रायडींग चार्जेस हा छुपा चार्ज आहे, तो तुमच्या टेरिफमधे नमूद केलेला नाही.

यावर त्याचं उत्तर आलं की हा नवा चार्ज आम्ही इंट्रोड्यूस केलायं !

असा चार्ज खरं तर कुठेच नसावा कारण एकदा किलोमीटर्सप्रमाणे टेरिफ ठरल्यावर पुन्हा ट्रॅवल टाईमसाठी वेगळे पैसे लावायला नकोत. अशा तर्हेनं ओलानं ग्राहकांची नवी लुबाडणूक सुरु करुन एका चांगल्या सेवेची वाट लावली आहे. जे कॅब वापरत असतील त्यांनी ओलाकडे तक्रार करून याविषयी आवाज उठवला तर सर्वांना फायदा होऊ शकेल. किंवा ज्या कंपन्या असा चार्ज लावत नाहीत त्यांच्याकडे ग्राहकांचा ओघ वळून ही अनिष्ट प्रथा बंद होईल.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

22 Mar 2016 - 11:43 am | विवेक ठाकूर

First 2 km: ₹49.0
Rate for 3.8 km: ₹45.6
Free ride time (5 min) ₹0.0
Ride time charge for 21.23 min: ₹21.23
Total tax ₹6.72

TOTAL FARE
₹123
TOTAL DISTANCE: 5.8 km
TOTAL RIDE TIME : 26.23 min
TAX BREAKUP
Service Tax ₹6.49
Swachh Bharat cess ₹0.23
(Taxes added to your total fare)

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2016 - 11:53 am | चौथा कोनाडा

लेख आवडला. त्यातले मुद्दे व तपशिल याच्याशी सहमत.
सध्या हॉटेल्स मध्येही सर्व्हिस चार्जेस च्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळले जातात. सामान्य बिचारया ग्राहकाना तो सर्व्हिस टॅक्स अर्थातच शासकिय कर वाटतो.

रायडिंग चार्जेस च्या नावाखाली असे ज्यास्तीचे पैसे आकारणे सर्वथा अन्याय कारक आहे. पुढच्या वेळी ओला सेवा घेताना याची तक्रार नक्कीच करेन.

पण एकंदरित सध्याची कार्पोरेट स्टॅटेजी बघता, ग्राहकाना अतिशय स्वस्त व कार्यक्षम सेवा देवुन त्याना चटक लावायची अन नंतर दरवाढ करुन, वेगवेगळे जास्तीचे आकार लावुन पैसे दामदुपटीने वसुल करायचे. आधुनिक सोफॅस्टिकेटेड सावकारी !

सध्याचे वेगाने होणारे खासगीकरण अन कार्पोरेट जलुम जबर दस्ती पुढे एकंदरित आपले काही चालेल असे दिसत नाही.

अनुप ढेरे's picture

22 Mar 2016 - 11:55 am | अनुप ढेरे

सर्व्हिस चार्जेस च्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळले जातात.

टिपचे हे दुसरं नाव. हे बिलात लावलं तर टिप द्यायची गरज नाही.

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2016 - 1:36 pm | चौथा कोनाडा

असहमत. सर्व्हिस चार्जेस हे हॉटेलच्या गल्ल्यात जमा होतात व टिप ही वेटर्सना देतात. बिलात टिपचा वेगळा कॉलम पाहिल्याचे आठवते.

टीआयपी=टिप= टू एन्शुअर प्रॉम्पटनेस.
आज काल कसला आलाय प्रॉम्पटनेस ? दिलेली ऑर्डर कधी येतेय याची आशाळभुत पणे वेटरच्या तोंडाकडे पहात वाट बघत बसावे लागते. अश्या परिस्थितीत कश्याला टिप द्यायची ?

("पंचतारांकित" या प्रिया तेंडुलकर यांच्या लेख संग्रहात फाईव्हस्टार् हॉटेल मधली टिप साठीची हाणामारी भारी वर्णलीय. पुस्तक जरूर वाचा)

अनुप ढेरे's picture

22 Mar 2016 - 3:05 pm | अनुप ढेरे

टीआयपी=टिप= टू एन्शुअर प्रॉम्पटनेस.

कैच्या कै शॉर्टफॉर्म. एन्शुअर च स्पेलिंग आय ने नाही तर ई ने सुरू होतं. असो...

आजकाल आपण सगळंच इन्श्युअर करतो ना. टेम्पररी ट्राव्हल इन्श्युरंस वगैरे. मग हॉटेलच्या जेवणावर पण इन्श्युरंस का नको ! :-)

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2016 - 12:50 pm | चौथा कोनाडा

:-)) :-))) हा.. हा ... हा... !

इन्शुरन्सच .....
आज काल इ न्शु रन्स वाल्यानी उचछाद मांडलाय.
कमी भांडवली अन कमी रिस्की धंदा !

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2016 - 9:10 pm | चौथा कोनाडा

सहमत. इ न्शु र न्स च पाहिजे. माय मिस्टेक.
आपण वेटर कडुन विमा घेतो, तत्पर सेवे साठी.
हफ्ता इतर विम्या प्रमाणे आधी न भरता नंतर भरतो.

अनुप ढेरे's picture

22 Mar 2016 - 9:49 pm | अनुप ढेरे

काहीही बोगस अ‍ॅक्रॉनिम बनवू नका. टिप हा साधा शब्द आहे. नाम अथवा क्रियापद. तो कसलाही शॉर्टफॉर्म नाही. कोणीतरी दिलेल्या सर्वीसबद्द्ल बक्षीसी एवढाच त्याचा अर्थ आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2016 - 12:56 pm | चौथा कोनाडा

ओ मालक, अक्रॉनिम वै आमी नाय बनवला, जो प्रचलित आहे तो सांगितला. नेट वर शोधलं तर TIP अजुन काही फुल्लफॉर्म्स सापडतील.
बगा, पटलं तर व्हय म्हणा नाय तर सोडुन द्या. कसं ?

( आन TIP चा अर्थ बक्षिसी ह्ये आमी आदी सांगितले आहेच .... तत्पर सेवेची बक्षिसी ! )

बबन ताम्बे's picture

23 Mar 2016 - 4:57 pm | बबन ताम्बे

टाईमपास इन पॅन्ट्री.

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2016 - 12:02 pm | पिलीयन रायडर

वर्षं झालं हे होऊन. मागच्या वर्षी मीह्याच सुमारास पासपोर्ट ऑफिसला गेले होते तेव्हा हा शोध लागला. मी सुद्धा खुप भांडले पण उपयोग नाही. ट्रॅफिक मध्ये जाम लागला तर गाडी २ तास अडकली पण १ किमी पण पुढे गेली नाही म्हणुन दायवरचे नुकसान होऊ नये म्हणुन हे केले असावे असा माझा अंदाज होता.

परवाच ओला मधुन टॅक्सी फॉर शुअर बुक केली. का तर त्यावर मला एक प्रोमो कोड मिळाला होता. सुमारे १/२ तास प्रोमो कोड लावायचा प्रयत्न करुनही अ‍ॅपने तो कोड घेतला नाही. ३ फोन झाले कस्टमर केअरला. ते म्हणे १/२ तासाने पुन्हा बघा. पण शेवटपर्यंत ते काही झाले नाही. शेवटी आहे त्या रेट मध्ये बुक केली.

त्या ड्रायव्हरने आणली स्कॉर्पिओ.. म्हणलं का रे बाबा? तर खालील फंडा कळाला.

ह्या कंपन्या ड्रायव्हरांना जितक्या राईड्स तेवढे पैसे देतात. ते सुद्धा चारच्या पटीतल्या राईड्स ना. म्हणजे
४ ट्रिप्स - १०००/- , ८ ट्रिप्स - २०००/-, १३ ट्रिप्स - ३०००/- (हो.. १३... १२ नाही..)

आता तुमचे बिल ५० येवो किंवा ५००, ड्रायव्हरला काही घेणे देणे नसते. त्याला पटापटा जितक्या ट्रिप संपवु तेवढे पैसे मिळतील. म्हणजेच हे रायडींग चार्जेस सुद्धा कंपनीला जाणार. चालवणारा अडकला काय किंवा पटकन पोहचला काय, त्याला ती एक ट्रिप म्हणुन मोजायची असते, बास! म्हणजे टॅक्सी अडकली तर नुक्सान ड्रायव्हरचे आहे, पण त्याबद्दल मिळणारे पैसे कंपनीला.

तो म्हणत होता की आता १.५ पैकी १ रुपया ड्रायव्हरला देण्याचे म्हणत आहेत.

ह्या सगळ्यामुळे अनेकदा सकाळी सकाळी लांबच्य ठिकाणी टॅक्सीवाले येत नाहीत. मला किमान चारदा तरी हा अनुभव आला आहे की भाडे घेऊन कुठे जायचे आहे हे फोन करुन विचारतात आणि मग नाही म्हणतात. (त्यामानाने उबेर चा अनुभव बरा आहे..)

विवेक ठाकूर's picture

22 Mar 2016 - 12:09 pm | विवेक ठाकूर

ते रायडींग चार्जेस लावत नाही का?

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2016 - 12:19 pm | पिलीयन रायडर

लावतात. पण ड्रायव्हरने आधी भाडे घेऊन मग फोन करुन भाडे नाकारल्याचे बघितले नाही. टॅक्सी फॉर शुअरमध्ये तो प्रकार खुप वेळा पाहिला आहे.

उबेरचे रेट असे दिसत आहेत

उबेर गो
बेस फेअर - ३५/- + १ / पर मिन + ८/- पर किमी

(बेस फेअर किती किमी साठी आहे ते लिहीलेले नाही. जसे की बाकी सगळीकडे बेस फेअर पहिल्या २ किमी साठी असते.)

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 12:49 pm | अमृता_जोशी

या कंपन्यामध्ये चालक हेच सर्वात जास्त फायद्यात असतात. ओला, टेक्सी फोर शुअर, उबेर यांनी सुरु झाल्यापासून एक रुपयाचाही नफा नोंदवलेला नाही. उलट करोडो रुपये दर महिन्याला या कंपन्या तोट्यातच असतात.
या कंपन्या टेक्सी अग्रीगेटर आहेत, म्हणजे ते मोबाइल एप सोडले, तर त्यांच्या मालकीचे काहीही नसते. सगळे पैसे टेक्सी मालकाच जातात, त्यातील २५ टक्के कमिशन व 5% टेक्स या कंपन्या कापून घेतात, सध्या या कंपन्या 'customer acquisition' पायरी मध्ये आहेत, त्यांच्याकरता सर्वात महत्वाचे आहेत कस्टमर आणि ड्रायव्हर, म्हणून सध्या हे गाडी मालकांना बोनस वाटत आहेत. हे बोनस ओला मध्ये ६० रुपये प्रती ट्रीप एवढे आहे. १२ पेक्षा जास्त ट्रीप केल्यास ते वाढून १०० रुपये प्रती ट्रीप एवह्दे होते.
आता, तुमचे बिल झाले १२३ रुपये म्हणजे, ओला कंपनी त्यातून ३०.७५ रुपये कमिशन व ६ रुपये टेक्स कापून घेईल. उरलेले ८६.२५ रुपये व कंपनी तर्फे बोनस म्हणू ६० रुपये अशे एकूण १४६.२५ रुपये ओला कंपनी चालकांना देते. प्रोमो कोड असल्यास तर बघायचेच काम नाही.
हे कुठपर्यंत चाणार ते माहित नाही, पण सध्या तरी ओला कंपनी प्रेत्येक राईड ला सरासरी ३५ रुपये तोट्यात जात आहे. एक दिवस त्यांनी जर चालकांना बोनस देणे बंद केले, तर त्यांना फायदा व्हायला सुरुवात होईल.

विवेक ठाकूर's picture

22 Mar 2016 - 12:59 pm | विवेक ठाकूर

जर गाडी मालकाला ७५ % मिळत असतील तर रायडींग चार्जेस लावायलाच नकोत. स्वतःच्या मालकीच्या गाड्या असणार्‍या कंपन्या असा चार्ज लावत नाहीत.

विवेक ठाकूर's picture

22 Mar 2016 - 1:00 pm | विवेक ठाकूर

टी कॅब्ज किंवा विंग्ज.

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2016 - 1:44 pm | पिलीयन रायडर

मला त्या चालकाने सांगितल्या प्रमाणे तर त्यांना पर ट्रिप पैसे मिळत नसुन, चार ट्रिप्सचे लमसम १०००/- मिळतात. म्हणजे ४/५/६/७ ट्रिप्स चे १०००/- च.

तुम्हाला वरील माहिती कुठुन मिळाली?

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 8:57 pm | अमृता_जोशी

आमची गाडी लावायची होती कंपनीत, तेव्हा इंक्वयारी केली होती.पण ड्रायव्हर आपणच पुरवावा लागतो हे कळल्यावर नाद सोडून दिला.

गाडी + ड्रायव्हर दिला तर काय ऑफर होती त्यांची?

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 11:48 pm | अमृता_जोशी

६० रुपये प्रती ट्रीप बोनस प्लस ट्रीपच्या टोटल बिलापैकी ७०% रक्कम.

आणि दिवसाला किमान किती ट्रिप झाल्या पाहिजेत असं काही होतं का?

फारएन्ड's picture

23 Mar 2016 - 10:14 am | फारएन्ड

चांगली माहिती मिळाली. मी उबर व इतर अशाच कंपन्यांबद्दल वाचल्यापासून कायमच असे वाटत आले आहे की हे बिझिनेस मॉडेल सस्टेनेबल नाही. सध्या ड्रायव्हर लोकांना बोनस देउन कंपन्या मोटिव्हेटेड ठेवत आहेत. पण कंपन्या त्यामुळे फायद्यात नाहीत. जोपर्यंत इन्वेस्टर्स लोकांना हे चालत आहे तोपर्यंत हे चालेल. नंतरचे माहीत नाही.

त्यात अगदी एक दोन वर्षे कायम यातील कोणतीही सर्विस वापरली, तरी कस्टमर्स दुसरीकडे जाणार नाहीत असेही नाही. उद्या आणखी एखाद्या कंपनीने त्यांच्याकडे फण्डिंग असल्याने जर डिस्काउण्टेड सर्विस दिली तर तिकडे जातील. 'स्टिकिनेस' अजिबात नाही.

मुळात यांना टॅक्सी पेक्षा कमी पैशात लोकांना नेणे का परवडते? बहुधा कारण या चालकांसाठी हा साइड बिझिनेस असल्याने थोडे कमी मिळाले तरी चालतील असे असेल. पण एक गाडी विकत घेउन उबर, ओला किंवा अशा सर्विस ला चालकासकट लावली तर त्याचेही काहीतरी ब्रेक इव्हन मॉडेल असेल.

अर्थात जेथे टॅक्सीज सहज मिळत नाही, रिक्षा ही मिळत नाहीत अशा ठिकाणी ती गॅप ही सर्विस भरून काढते हे खरे. पण सेल्फ सस्टेनेबल नसेल तर किती काळ चालेल माहीत नाही.

मला अजून एक कुतूहल आहे - अमेरिकेत बहुधा बहुसंख्य उबर चालक हे एरव्ही एकटे गाडी चालवणारे आहेत व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पॅसेंजर घेतात. केवळ उबर साठी गाड्या घेतलेले फारसे नसावेत. भारतात वेगळे चित्र आहे का? म्हणजे जे लोक घेउ शकतात त्यांनी एक दोन गाड्या घेउन अशा सर्विस ला लावल्या आहेत व बहुतांश त्याच गाड्या आहेत? म्हणजे लांबच्या अंतरावर जायला आपण गाडी एखाद्या ट्रान्स्पोर्ट कंपनी कडून चालकासकट घेतो तसे फक्त हे कमी अंतराकरता.

ओला कॅब आणि टीएफएस (टॅक्सी फॉर शुअर) ह्या कंपन्या एकाच्याच आहेत. दोन्हीचे एम्प्लॉयी इकडे तिकडे टॉगलिंग करत असतात. नवीन ओला लाँच करतात. फ्लीट वाले हंट करतात. सुरुवातीला त्यांना देतात चांगले पॅकेज नंतर लॉगीन लॉगाउट वरुन गोंधळ सुरु होतो. ड्राय रन (पॅसेंजर नसताना, एम्प्टी) अमाउंटवरुन कंपनी फ्लीट वाल्याशी कायम तक्रार करते. मग टीएफेस येते. ती हे स्ट्रक्चर बदलुन कमी पॅकेजमध्ये तोच फ्लीट घेते. नंतर एक कुठलीतरी दुसर्‍यात मर्ज करतात. ही कंपनीची रेग्युलर स्ट्रॅटेजी आहे.
सोलापुरात हीच स्ट्रॅटेजी केली गेली. रिक्षावाल्यंच्या कडव्या विरोधामुळे कारवर स्टीकर्स लावत नाहीत. अ‍ॅडव्हर्टाइझ करु देत नाहीत. ओला रिक्षा प्रकरण पण परवडत नसल्याने गुंडाळ्ले गेले. ज्या माणसाच्या तीन चार इंडिका/इंडिगो बसून असतात, गॅरेज वगैरे धंदा असतो त्यांनाच फक्त ओला परवडते. कोल्हापुरात तर टूर्स असोसिएशनने ओलाला इंडिका लावल्यात.
ह्याबद्दल लिहिन तेवढे कमी आहे इतके विचित्र प्रकार आहेत.

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 1:15 pm | अमृता_जोशी

होहो.. काही महिन्यापूर्वीच ओलाने 'टेक्सी फोर शुअर' कंपनी विकत घेतली. आता सध्या सगळी मीली भगत चालू आहे.

रॉजरमूर's picture

22 Mar 2016 - 6:50 pm | रॉजरमूर

उबेर चे बेस fare ४० रु. आहे ० km त्यात किमी समाविष्ट नाही . पुढे ८ रु./km .
त्याही पुढे जाऊन ते peak hours सरचार्ज लावतात बिलाच्या ३३%. दोन महिन्यांपूर्वी हा अनुभव आला होता .
हे बिल

कॅब बुक करायच्या वेळेला अर्थात तशी त्यांनी सूचना दिलेली की आता सर्व कॅब व्यस्त आहेत तुम्ही ३३ % अधिक चार्जेस भरायला तयार आहेत का म्हणून . पण दुसऱ्या कुठल्या कॅब उपलब्ध नसल्याने व घाई असल्याने संमती दिली .

उबेर च्या app पेक्षा ओला आणि taxi for sure चा युजर इंटरफेस छान आणि सुटसुटीत आहे.

मला दिवाळीच्या वेळी 80% सर्ज लावला होता

कार्पोरेट जलुम जबर दस्ती पुढे एकंदरित आपले काही चालेल असे दिसत नाही.

ग्राहकांनी वेळीच आवाज उठवला तर सेवादात्यांना नमतं घेणं भाग पडतं. हॉटेलातल्या सर्वीस चार्जबद्दल सहमत आहे आणि त्याबद्दलही ग्राहकांनी अशाच प्रकारे व्यवस्थापनाकडे तक्रार केली तर तो रद्द होऊ शकेल असं वाटतं कारण हॉटेल बिलात सर्वीस चार्ज गृहित असायला हवा.

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2016 - 12:09 pm | पिलीयन रायडर

अजुन एक..

एकदा मला पुणे विमानतळावर जायचे होते. तेव्हा टॅक्सी आली पण सुमारे ४-५ किमी झाल्यावर पंक्चर झाली. तिथुन मला रिक्षा करावी लागली. मी घाईत असल्याने टायर चेक केले नाही. पहिले ५०/- अधिक सर्व्हिस चार्ज वगैरे लागुन किवळ ५ किमी साठी पुष्कळच बिल झाले. मी गडबडीने वाद न घालता देऊन टाकले आणि रिक्षा केली. पण हेच अंतर मी आधीच रिक्षाने आले असते तर फारच कमी पैसे लागले असते.

आता हा ट्रिप्सचा फंडा कळाल्यावर त्या ड्रायव्हरने पंक्चरचे नाटक केले असले तरी सांगता येत नाही.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 5:27 pm | मराठी कथालेखक

ट्रिपचा फंडा फक्त Taxi for sure साठी आहे, ओला सठी नाही

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 12:15 pm | नाना स्कॉच

आपण पुणे मुं ग्रा प ह्यांच्याशी संपर्क करावा, जर आपणाला ग्राहक मंचा पर्यंत मॅटर ओढायचे असेल तर. सोडुन द्यायचे असल्यास भाग वेगळा झाला. पण माझ्यामते ही शुद्ध लुटालूट आहेत.

(असो!. हा एक फुकट सल्ला होता)

जव्हेरगंज's picture

22 Mar 2016 - 12:32 pm | जव्हेरगंज

1

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 1:16 pm | नाना स्कॉच

पट्टी पाना ठेवा मंग त्यों खाली, घालताल गरबडीत आमच्या डोक्यात!! :D

अत्रन्गि पाउस's picture

22 Mar 2016 - 12:19 pm | अत्रन्गि पाउस

मेरू इझी कॅब tabकॅब पेक्षा पुष्कळ स्वस्त आणि सुटसुटीत ...
तथापि बेईमानी, बेशिस्त, समोरच्याला चुना लावायची अनिवार हौस आणि त्यातून मिळणारा बौद्धिक उन्माद आणि असंघटीत ग्राहक ...ह्या वातावरणात ....हे सगळे कसे आणि कितपत तग धरेल हे ठौक नै ...

मृत्युन्जय's picture

22 Mar 2016 - 1:14 pm | मृत्युन्जय

ओला कॅब्स कुठल्या हेड खाली पैसे घेते हे माझ्या दृष्टीने गौण आहे. बिलाचा अंतिम आकडा महत्वाचा. ४ च दिवसापुर्वी प्पुणे विमानतळावरुन घरी गेलो. अंतर १७.६ किमी. पैसे झाले १८६ रुपये. वेळ सकाळी ५ वाजता. याच मार्गासाठी इतर काही कॅब कंपन्यांनी माझ्याकड्न २८३ रुपये घेतले असते (पहिले ३ किमी = ४९ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी १६ रुपये).

याच मार्गासाठी मला रिक्शासाठी २५७ रुपये मोजावे लागले असते ( पहिले १.५ किमी = १७ रुपये आणि त्दनंतर प्रत्येक किमी साठी ११.६५ रुपये आणि त्यावर २५% रात्रपाळीचे). इतके पैसे मोजुनही रिक्शावाल्याचे समाधान नसतेच. अजुनही हे लोक रात्रीचे ५०% जास्त मागतात (२५% चा नियम आहे). यांची रात्रपाळी ९.३० सुरु होते आणि ६.३० - ७ ला संपते (११ ते ५ चा नियम आहे). इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, चढ चढणार नाही, लगेजच जासत आहे (एक्स्ट्रा द्या) असे नखरे असते. मुलुखाचा माज असतो. बर्‍याचादा मीटर न टाकता मनमानी रक्कम वसूल करतात. मेन रोड सोडुन जरा आत जायचे म्हटल्यासा यांना एक्ष्ट्रा पैसे द्यावे लागतात. मीटरपेक्षा जासत का द्यायचे असा प्रशन विचारल्यावर हे लोक "एवढेच आहे तर मोटारी विकत घ्या ना मग" किंवा "परवडत नाही तर बसने जा किंवा चालत जा " असली उर्मट उत्तरे देतात.

असे असताना एक सामान्य नागरिक म्हणुन मी रिक्शाच्या किंवा इतर प्रायवएट टॅक्सी च्या ऐवजी ओला चा पर्याय का निवडु नये? त्यांनी माझ्याकडुन पैसे वेटिंग चार्जेस म्हणून घेतले किंवा ड्रायव्हर वेलफेयर फंड म्हणून घेतले किंवा "सौजन्य सप्ताह" चार्जेस किंवा स्माइल चार्जेस किंवा दगडु चार्जेस म्हणुन घेतले तरी काय फरक पडतो?

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 1:18 pm | नाना स्कॉच

"एवढेच आहे तर मोटारी विकत घ्या ना मग" किंवा "परवडत नाही तर बसने जा किंवा चालत जा " असली उर्मट उत्तरे देतात.

पुणे!! असो!!

स्वस्त अन पर्याय निवडायचे स्वातंत्र्य असावेच. पण होते काय की सब घोडे बारा टक्के ह्यापध्दतीने सर्व पर्याय वागू लागतात हा मुख्य प्रॉब्लेम आहे. प्रत्येक पर्यायाचे काही चांगले अन वाइट मुद्दे आहेत. त्यातल्या त्यात सोय बघणे श्रेयस्कर.

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2016 - 1:57 pm | चौथा कोनाडा

अगदी करेक्ट. याच कारणा साठी कॅब करतो.

रायडिंग चार्जेस कडे दुर्लक्ष करायचे. सेवा मुळातच महाग आहे असे समजले की नो प्रॉब्लेम. आपली निकड, वेळ अन सोय महत्वाची.

ओला कॅब्स कुठल्या हेड खाली पैसे घेते हे माझ्या दृष्टीने गौण आहे.
...
त्यांनी माझ्याकडुन पैसे वेटिंग चार्जेस म्हणून घेतले किंवा ड्रायव्हर वेलफेयर फंड म्हणून घेतले किंवा "सौजन्य सप्ताह" चार्जेस किंवा स्माइल चार्जेस किंवा दगडु चार्जेस म्हणुन घेतले तरी काय फरक पडतो?

हेच लिहायला आलो होतो.

ब़जरबट्टू's picture

22 Mar 2016 - 5:04 pm | ब़जरबट्टू

ओला कॅब्स कुठल्या हेड खाली पैसे घेते हे माझ्या दृष्टीने गौण आहे. बिलाचा अंतिम आकडा महत्वाचा
+१
त्यात ते फ्री राइड, प्रोमो कोड ही मजा आहेच..

एक वेळ जाणार नाही, पण रिक्षाने जाणार नाही... :)

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 5:51 pm | मराठी कथालेखक

बर्‍याचादा मीटर न टाकता मनमानी रक्कम वसूल करतात

?
काही मोजकी शहरे (त्यात पण अगदी शह्रराचा अगदी १००% भाग नाहीच हं) सोडली तर सर्रास सगळीकडे मीटर न टाकणारेच रिक्षावाले मी पाहिलेत (पिंपरी चिंचवड, डोंबिवली, औरंगाबाद, अहमदनगरचा स्वानुभव आहे, बाकी अनेक शहरांतही तीच बोंब असणार याची खात्री आहे)

बांद्रा टर्मिनस ते कुर्ला रे स्टे- रिक्षावाला" फिक्स्ट भाडे ८० का मिटरने जायचे?"
" फिक्सटने चल."
अत्यंत सुसाट वेगाने ट्राफिकला गुंगारा देत पळवली रिक्षा.
एकतर लांबून मजा करून आल्यवर घरच्या उंबरठ्यावर ठेचकाळायचं कशाला?

माहितगार's picture

22 Mar 2016 - 2:54 pm | माहितगार

वर दिलेल्या समस्यांमध्ये भर घालून जंत्री अशी करता येईल

१) उपलब्धतेसाठी वेगवेगळ्या सर्वीसेसच्या अ‍ॅप डाऊनलोड करत माहिती भरत बसावे लागते. (वेगवेगळ्या अ‍ॅप हाताळत बसावे लागू नये म्हणून अजून एका वेगळ्या अ‍ॅपची आवश्यकता असावी)
२) गर्दीच्या वेळी अव्वाच्या सव्वा प्रिमिअम चार्जेस लावणे.
३) कॅबसेवा कंपनीने सांगितल्या नावा पेक्षा भलताच वेगळाच ड्रायव्हर येणे, वेगळीच गाडी पाठवणे/येणे
४) सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ऐनवेळी कॉलकरुन अथवा न करुन सरळ सांगून अथवा बहाणे करुन सेवा नाकारणे. उपलब्ध न करणे.

वरील प्रतिसादात ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार ह्याची अथवा त्याची सेवा चांगली आहे म्हटले आहे पण क्रमांक १, ३ आणि क्रमांक ४चा अनुभव मी जवळपास प्रत्येक कंपनीकडून घेतले आहेत. क्रमांक ४चा ऐनवेळी नाही म्हणणे हा अनुभव अत्यंत वाईट परिस्थितीत नेऊन ठेवतो आणि इलाज/पर्यायही रहात नाही.

मोबाईल मध्ये जसे नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी सुरवात होण्यासाठी म्हणून स्कीम्स दिल्या जातात तसेच याही सेवांबाबत होत असावे. हा एक भाग झाला समस्येचा दुसरा महत्वाचा भाग टॅक्सी/कार मालक मंडळी बाहेर गावचे अधिक आर्थीक फायद्याचे गिर्‍हाईक मिळाले की या कॅबसर्वीसेसचे गिर्‍हाईक अचानक सोडून देतात. त्यांना माहित असते या कंपनीचे गिर्‍हाईक सोडले म्हणून कंपनी खुप काही करु शकत नाही कारण त्यांना दुसर्‍या कंपनीशी सहजपणे करार करता येत असावा नाही आला तरीही बिघडत नाही. काही कार भाड्याने देणारे मालक केवळ लांबचे भाडे मिळते का आणि ग्राहक परिचय होतो का हे पाहण्यासाठी कॅब कंपनी सोबत नाव नोंदवून असतात लांबचे ग्राहक असेल तर ठरवल्या पेक्षा वेगळी गाडी देऊन अधिक नफा कमावण्या कडे कल असतो. आणि हे अधिक नफा कमावण्याची वृत्तीचे आकर्षण या व्यवसायात लाँग टर्म रहाणार असल्यामुळे या सेवा स्टॅबीलाईज होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी आणि राज्यसरकारच्या नियमावलींची आवश्यकता असावी.

त्यांना धंदा करायचाय साहेब , समाजसेवा करायला नाही आल्यात ह्या कंपन्या .

अशा तर्हेनं ओलानं ग्राहकांची नवी लुबाडणूक सुरु करुन एका चांगल्या सेवेची वाट लावली आहे.
रायडींग चार्जेस हा छुपा चार्ज आहे, तो तुमच्या टेरिफमधे नमूद केलेला नाही.

आणि लुबाडणूक कसली आलीय त्यात ?
त्यांच्या टेरिफ कार्ड मध्ये स्पष्ट उल्लेख आहे travel time charges १ रु. /मिनिट याचा . उबेर पण तेवढेच घेते
TFS १.२५ रु./मिनिट आकारते . त्यामुळे व्यवहार पारदर्शकच होता. वर्ष होत आले हा चार्ज लावून

रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही.

मग यात ड्रायव्हर चा काय हात असतो ? तो फोन करुन त्याची माणसे गाड्या घेऊन पाठवून जाणूनबुजून रस्त्यातली ट्राफिक जाम करत असतो का तुमच्या कडून जास्त पैसे उकळता यावेत म्हणून ?तुमच्या बिलाच्या बाबतीत २१ रु.२१ मि.चे.
तो ड्रायव्हर गाडी घेउन तुमच्या दिमतीला आलेला असतो तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तो घेऊन जात असतो मध्येच काही कारणास्तव (तसही आपल्याकडे मोर्चे, आंदोलन, मिरवणुकांना कमी आहे काय )रहदारी खोळंबली समजा, अर्धा एक तास
तर त्याचे नुकसान नाही का होणार ? कारण शक्य आहे की तेवढ्या वेळात त्याने इतर ग्राहकांच्या १-२ ट्रीप केल्या असत्या कोणत्याही अडथळ्याविना तेव्हा आपल्या तर्काचे समर्थन होऊ शकत नाही.

जेव्हा तुम्ही या कंपन्याची app इंस्टाल करता त्याचवेळी तुम्ही सर्व अटी आणि शर्तींना मंजुरी देत असता .
त्यामुळे या कंपन्या छुपे चार्जेस लावतात हा आपला आरोप अत्यंत चुकीचा आहे .
उलट रिक्षापेक्षा स्वस्तच आहे की . आरामदायी वातानुकुलीत गाडीत ऐसपैस बसून रिक्षाच्याच भाड्यात किंवा त्याहीपेक्षा कमी भाड्यात जायला मिळते हे काय कमी आहे ?
निदान बाबा "आढावां"च्या आशीर्वादाने जो "आढाव "पणा रिक्षावाले दाखवतात तो हे
कॅब ड्रायव्हर तर नाही दाखवत ना . पक्षी विनम्र आणि तत्पर सेवा असते त्यांची हा अनुभव आहे .
तसेच विविध कर ही हे सरकारला देत असतात आपण वर लेखात लिहिलेल्या बिलात दिलेच आहे ते . रिक्षावाले भरतात का कर ? शिवाय कॅबवाले डिटेल बिल पण देतात मेल वर.
शेवटी कुठल्याही आस्थापनेला आपली किंमत ठरवण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार निश्चितच असतो पुढे त्यांचे अस्तित्व मार्केट आणि त्यांच्यातील स्पर्धा दर ठरवत असते.
आताचे बघाल तर गेल्याच महिन्यात RTO ने जबर शुल्कवाढ केली आहे ही वाढ विविध प्रकारा नुसार सध्याच्या शुल्का पेक्षा ३ ते १५ पटीने अधिक आहे. त्यामुळे या वाहनांची operating cost अजूनच वाढलीये . आता सरकार पण लुटतेय अस म्हणायचे काय ?
असो.

धर्मराजमुटके's picture

22 Mar 2016 - 4:24 pm | धर्मराजमुटके

आपण तर बुवा मेरुचे फॅन आहोत. जवळजवळ ५-७ वर्षे झाली पण एकदाही वाईट अनुभव नाही आला. पैसे जास्त जातात पण सेवा एक नंबर. पण ही सेवा अगदी जास्तच गरज असेल तेव्हाच घेतली आहे. तेव्हा पैसे जास्त गेल्याचे दु:ख नाही. त्याबदल्यात सेवा चांगली मिळाली की पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळते.

मित्रहो's picture

22 Mar 2016 - 4:59 pm | मित्रहो

मी पण मेरुच वापरतो. महाग आहे पण चार सहा महीन्यातून गरज पडते तेंव्हा हरकत नाही.
पुण्याला ओला वापरली होती, ड्रायव्हर सकाळी बरोबर साडेचारला आला होता. रीक्षापेक्षा या सेवा कितीतरी पटीने चांगल्या आहेत.

प्रसाद१९७१'s picture

22 Mar 2016 - 4:27 pm | प्रसाद१९७१

मला पण ह्यात फसवणुक कशी हे काही कळले नाही. जो पर्यंत जे आधी सांगतात तेच घेतात किंवा जे घेतात ते आधीच सांगीतले असले तर काय प्रश्न आहे?

स्पा's picture

22 Mar 2016 - 5:27 pm | स्पा

बरीच नविन माहिती मिळाली

- मध्यमवर्गीय स्पा

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 5:40 pm | मराठी कथालेखक

Material म्हणजे कापलेले अंतर किमी प्रमाणे (यात इंधन खर्च, वाहन देखभाल खर्च, वाहन विम्याचा खर्च, नफा ई अंतर्भुत आहे)
Time चालक वेळ देत आहे, त्याच्या श्रमाची , वेळेची किंमत. ट्रॅफिकमध्ये अडकून त्याचे नुकसान होवू नये म्हणून.

आता प्रश्न Peak Hour charges चा - ज्यावेळी टॅक्सीच्या उपलब्धता कमी आणि ग्राहक जास्त त्यावेळी हे चार्जेस आकारले जातात. यामुळे हळूहळू उपलब्धता आणि मागणी यातील तफावत कमी होण्यास मदत होते. (कारण Peak Hour Charges मुळे चालकाला जास्त उत्पन्न मिळते मग अधिक चालक यावेळी आपली टॅक्सी उपलब्ध करणार आणि त्यामुळे हळूहळू Peak Hour Charges कमी होणार)

ओला बद्दल मला एकच अडचण वाटते - ते म्हणजे यांचे जास्तीचे Night Charges नसल्याने चालक रात्री उशिरा टॅक्सी रस्त्यावर आणत नाहीत, अगदी विमानतळावरुनही रात्री अकराच्या सुमारास ओला टॅक्सी मिळत नाही.
TFS ची ट्रिपची कल्पना तितकीशी पटत नाही. त्यामुळे अल्पसंतुष्ट चालक लांबचे भाडे घेण्यास उत्सुक नसतात.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 5:44 pm | मराठी कथालेखक

झालंच तर Ola Auto पण चांगली सेवा आहे, नेहमीचेच रिक्षावाले पण Ola मधून बुक केले की मीटर टाकतात (अर्थात त्यांना मीटर + १० रु द्यायचे असतात, तसे अ‍ॅपमध्ये नमूद केलेले आहेच) आणि विनम्र सेवाही देतात.
पिपरी-चिंचवडमधील इतर रिक्षाचालकांचे मीटर तर आता बहुधा कधीही न वापरल्यामुळे जॅम झालेही असतील !!

चिगो's picture

1 Apr 2016 - 2:35 pm | चिगो

Time चालक वेळ देत आहे, त्याच्या श्रमाची , वेळेची किंमत. ट्रॅफिकमध्ये अडकून त्याचे नुकसान होवू नये म्हणून.

हे पटलं..

आदिजोशी's picture

22 Mar 2016 - 9:28 pm | आदिजोशी

ह्या प्रायव्हेट देवादात्यांमुळे ग्राहकांची बरीच सोय होत आहे. रि़क्षा आणि टॅक्सीवाल्यांचा माज कमी झाला असून त्यांची हवा टाईट झाली आहे. म्ह्णूनच त्यांनी मध्यंतरी संपही केला होता ह्यांच्या विरोधात.
सांगून चार्जेस घेतले असतील तर त्यात काही चूक नाही माझ्या मते.

काहीही लेख. त्यांचे रेट असेच आहेत.

शिवाय टी कॅब्जही लोकल कंपनी असे चार्जेस लावत नव्हती. माझ्याकडे कार असल्यानं सहसा कॅब हायर करावी लागत नाही पण परवा केली तेंव्हा हे कळलं

एकदाही कोणत्याही क्याबचा अनुभव घेण्याची वेळ आलेली नाही पण आली तर काय करेन हा विचार करत होते. सगळ्यांनी चांगले प्रतिसाद दिलेत. मृत्युंजयजींसारखाच विचार करतिये. माझ्या वेळेला, सोयिने, प्रदुषणापासून थोडी सुटका देत, सामान वहन क्षमता वगैरे विचार करता मी ट्याक्सीनेच जाईन. रिक्षावाले लुटतात ही आता बातमी राहिलेली नाही. लुटूनही यांच्या जिवाला थंड वाटत नाही हे रडगाणे आहे. रिक्षा नीट न चालवणे, अचकट विचकट गाणी म्हणणे, नेम धरून रिक्षा खड्ड्यातून नेणे, मिटरमध्ये फसवणे, अमूक वेळेला तमूक ठिकाणी न येणे असले सगळे पाहता क्याबचे ते एक बरे वाटते. पूर्वी एक बस होती/अजूनही असेल. ती डेक्कन जिमखान्यापासून निघून लोहगाव एयरपोर्टावर जाते. चारेक वर्षांपूर्वी तिचे तिकिट माणशी ५० रुपये होते. आता जास्तच असेल. सार्वजनिक सेवा असल्याने वेळ तर जास्त लागतोच! विमानतळापर्यंत सेवा देताय म्हणजे तिथपर्यंत जाणार्‍यांच्या हातात एकच भाजीची पिशवी असेल असे नाही. ढीगभर सूटकेसा, ब्यागा असतात. ते सामान ठेवण्याची सोय काय? पूर्वी त्या बसचे वळण्याचे ठिकाण म्हणजे जिथे रिक्षा उभ्या राहतात ते होते. मध्यंतरी तिथे खोदकाम निघाल्याने बस कशीबशी वळवून नेली. आता सामान वाहून न्यायचे कसे हा प्रश्न राहतोच! त्यापेक्षा ट्याक्सी परवडते. टायरे मात्र बरी वापरा हे सांगावेसे वाटते. पूर्वी एक आरक्षित केलेल्या मुंबै ट्याक्सीची टायरे बाद होती. मुंबैपासून पुण्यात येईपर्यंत तिनदा पंक्चरली. त्यावेळी पिरा म्हणते तसे पटकन रिक्षा पकडून जाता येते. दोन्ही सेवा हव्यात व बरी सेवा गडबडली की वाईट सेवेने कसे का असेना काम होते.

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2016 - 8:52 am | प्राची अश्विनी

ठाकूर अँड ब्रदर्स(टॅब) किंवा मेरुचा अनुभव नेहमीच चांगला आलाय.

ओलाने आता मायक्रो कॅब नावाचा ऑप्शन आणला आहे.

वॅगन आर, ह्युंडाई इऑन किंवा तत्सम सेगमेंटच्या गाड्या. ४० रूपये बेस फेअर + सरसकट सगळे अंतर ६ रूपये किमी + १ रूपया राईड टाईम.

माजोरडे रिक्षावाले सुधारले नाहीत तर स्वतःची मस्ती भोवणार असे वाटते आहे. (..आणि असेच व्हावे अशी मनापासून इच्छा!)

ओलाने शेअर्ड टॅक्सी नावाचा फंडा आणला आहे. जर तुम्हाला घाई नसेल तर त्याच रस्त्यावरच दुसरा पॅसेंजर घेऊन कॅब वाला निम्म्या पैशात तुमचा प्रवास पुर्ण करुन देतो. ही सुविधा फक्त तुम्ही एकटे असतानाच घेऊ शकता.

इरसाल's picture

23 Mar 2016 - 4:17 pm | इरसाल

असं पुण्याच्या रिक्षावाल्यांबद्द्ल काही बोलु नका.
मला घरुन (खानदेश) निघुन पुण्याहुन दिल्लीसाठी विमान पकडायचे होते. सकाळी ६:३० पुणे स्टँडा वर उतरल्यावर रिक्षाचालक चक्क मीटर चालु करुन कुठल्याश्या पुलाखाली उतरवण्यासाठी नेले जिथुन मला विमानतळासाठी बस मिळणार होती. आणी मीटर बरहुकुमच पैसे घेतले.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2016 - 4:45 pm | चौथा कोनाडा

तुमचा इतका उत्कट अनुभव वाचून ड्वोले पाणावले.

बघु या आत असेच काय काय दवणीय अनुभव लोक इथे टाकातत ते !

रेवती's picture

23 Mar 2016 - 4:49 pm | रेवती

हौ लक्की! :)
कधीतरी असं होतं चुकून............ त्या रिक्षावाल्याल्या माफ करा. ;)

फारएन्ड's picture

23 Mar 2016 - 7:22 pm | फारएन्ड

लोल रेवती.

रॉजरमूर's picture

1 Apr 2016 - 12:51 am | रॉजरमूर

ही लिंक बघा
रिक्षावाले आणि आप वाल्यांच्या युतीचा धटिंगण शाहीचा आणखी एक नमुना .
हे आप वाले पण नको तिथे आपला चक्रमपणा दाखविण्याची विलक्षण हौस असते यांना . युतीचा धटिंगण शाहीचा आणखी एक नमुना