मार्ग मुक्तिचा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 8:15 pm

तहानलेली नदी
पाण्याच्या शोधात
भटकत होती
भयाण वाळवंटात.

उडणार्या गिधाडास
विचारले तिने
भाऊ मिळेल का कुठे
जीवनदायी पाणी.

पाण्याचे विचारू नको
सापडेल तुला पुढे
ताई मार्ग मुक्तिचा.

एका वळणावर
नदीने पहिले
शुष्क वडाच्या फांदीवर
लटकलेले होते एक प्रेत.

झाडाखाली साचलेला होता
एक ढीग मोठा कवट्यांचा
खेळत होती त्यांच्या सवे
गिधाडांची गोंडस पोरे
फुटबॉल फुटबॉल.

टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

कविता

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 7:24 pm

इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे
निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे

वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही
स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही

जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा
शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा

पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते
अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते

दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली
त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली

कविता माझीकविता

शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
30 Mar 2016 - 6:47 pm

शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.

कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच. आणि नसलेच तरी एका घरी शेंगा काढल्या की त्याचा वानवळा वाडीवरच्या बाकीच्या घरातून चार चार शेंगा दिल्याशिवाय झाडाच्या मालकिणीलाही काही त्या घशाखाली उतरायच्या नाहीत.

मराठी अनुवाद: शहर का व्याकरण - कवी धूमिल

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 5:19 pm

नमस्कार,

कवी धूमिल ह्यांची शहर का व्याकरण ही कविता वाचली, फार दुर्बोध वाटते. तरी अनुवाद करावीशी वाटली. काही चुकलं असेल तर दुरुस्ती सुचवावी. काही बदल आवश्यक असतील तर करुयात.

शहराचे व्याकरण


शहराचे व्याकरण नीट करायला
एक सरकारीगाडी
गस्त घालत आहे
निवडणूकीच्या पोश्टरातून निघून
एक माणूस रस्त्यावर आला आहे
आसमंत शांततेने भरलेला आहे.

कवितामुक्तकसाहित्यिक

आकार

वैशाली अर्चिक's picture
वैशाली अर्चिक in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 4:27 pm

जानेवारी २०१३. स्थळ- १०वीचा वर्ग. उपस्थित मंडळी- मी, माझी मुलगी, वर्ग शिक्षिका व भूमितीचा पेपर. “ इतना सन्नाटा क्यूं है भाई?” म्हणण्यासारखी परिस्थिती. पेपरमध्ये पेन्सीलीने काढलेल्या त्रिकोण, चौकौन ह्यांपेक्षा लाल शाईतील गोल जास्त होते. आधीच आकड्यांशी ३६ चा आकडा असलेल्या माझ्या मुलीला आता भूमितीतील वेगवेगळ्या आकारांनीसुध्दा छळायला सुरुवात केली होती! वेगवेगळ्या आकारातील त्रिकोण, त्रिज्या, कोन व प्रमेय ह्यांनी तिचा जीव मेटाकुटीस आला होता. पण लवकरच हे शत्रुत्व मैत्रीत रुपांतरीत झाले जेव्हा तिने कमर्शियल आर्टसला प्रवेश घेतला. तिथे ह्याच आकारांमध्ये ती अक्षरशः गुंगून गेली.

नास्तीकांचे भारतातील योगदान

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 4:04 pm

संकुचीत विचार बाजूला ठेऊन उदात्त विचार करण्याची क्षमता असेल तर नास्तिकांनाही हिंदू जिवनपद्धतीचा अवलंब करता यावा. धर्मसंस्था थेअरी मध्ये उदात्त दिसतात पण दुर्दैवाने अनेकदा व्यवहारात संकुचितवृत्तीच्या धर्ममतावलंबीकडून धर्मसंस्थांना आक्रसून टाकले जाताना दिसते अगदी तसेच विवीध समाजघटकांनी हिंदू संस्कृतीत योगदान देऊनही त्यांना अव्हेरणे, नकारात्मक आणि अथवा विषम वागणूक देणे हे हिंदूंमध्येही दिसते यात नास्तीकांचेही योगदान नाकारले जाताना दिसते.

धर्म

सोशल नेटवर्क?

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 3:46 pm

'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.'

'बरं पोट निट साफ होते का?'

'नाही ना डॉक्टर.'

'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.'

' डॉक्टर याने काय होईल?'

हे ठिकाणमांडणीकथामुक्तकभाषासमाजजीवनमानkathaaमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखविरंगुळा

शक्तिपात

एच्टूओ's picture
एच्टूओ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 2:57 pm

फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा

खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.

मुक्त कवितामुक्तक